चारोळ्या
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता.
बाटली रिकामी
ग्लास घरंगळलेला,
टेबलावरचा थेंब
केव्हाचाच सुकलेला.
ढग विखुरलेले
पाऊस थांबलेला,
कुंदाळ हवेत
मी गारठलेला.
काडी काडी करुन
तिनं घरटं बांधलं,
वाराही वहायचा थांबला
त्यानेही ते जाणलं.
काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं.असं चालेल का? :Dमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'