Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बस्स इतकेच..

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Wed, 12/10/2014 - 15:29
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचा पारीजात ओसंडून बरसला तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल छातीत जेव्हा त्याचे एक फुल पायाखाली आले बस्स इतकेच.. ---- परवा अलमारी उचकतांना तुझे एक पैंजण हाताला लागले छन्न झालं एकदम आपल्या जोडीदाराअभावी एकाकी,केविलवाणे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला आपला एक अल्बम सापडला 'त्या' तस्बिरीतले तुझे डोळे आणि त्या डोळ्यातले ते काजळ.. बघता बघता कां कोण जाणे टचकन डोळ्यात पाणिच तरारले एकदम बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने काही ठोके चुकतात परत मार्गी लागतात बस्स इतकेच.. पण तू गेलीस तेव्हाचे चुकलेले चुकार ठोके अजुनही परतलेले नाहीत बस्स इतकेच.. ---- हम्म.. दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. इतकेच... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१०/१२/२०१४)

प्रतिक्रिया द्या
6711 वाचन

💬 प्रतिसाद (31)
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/10/2014 - 15:33 नवीन
अप्रतिम !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/10/2014 - 15:37 नवीन
आवडली कविता. अवांतर : हम्म, खटकतंय. पण चालायचंचं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/10/2014 - 15:58 नवीन
कविता अप्रतिम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
य
यसवायजी Wed, 12/10/2014 - 15:46 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज Wed, 12/10/2014 - 15:51 नवीन
मस्त जमलीय. आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 12/10/2014 - 15:59 नवीन
छळ मेल्या छळ! आवडली हे वे सां न ल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/10/2014 - 16:01 नवीन
मि.का. .... बस्स इतकेच!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 12/10/2014 - 17:46 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/10/2014 - 18:42 नवीन
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. वाह...क्या बात हयं... :)

मदनबाण.....

आजची बदलेली स्वाक्षरी :- Chamak Cham Cham... { Sitaron Mein Tu Hi :-Yesudas }
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 12/12/2014 - 04:31 नवीन
मिकाशेठ जियो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
पाषाणभेद Fri, 12/12/2014 - 05:06 नवीन
एकदम मस्त आहे भावकाव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मुक्त विहारि Wed, 12/10/2014 - 19:18 नवीन
परत एकदा, एका संवेदनशील मनातून उतरलेली, जबरदस्त कविता. (वाचतांना, काही विधूर नातेवाईक, डोळ्यासमोर आले, अन अक्षरेच अंधूक झाली.)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 12/10/2014 - 19:59 नवीन
अगदी मनातलं मांडलंत !! बस्स इतकंच !!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 12/10/2014 - 20:07 नवीन
आवडली . अवांतरः ''इतकेच' ऐवजी 'इतकंच' शब्द अधिक परिणामकारक वाटेल असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज गुरुवार, 12/11/2014 - 02:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
च
चुकलामाकला गुरुवार, 12/11/2014 - 11:37 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
क
किसन शिंदे Wed, 12/10/2014 - 20:13 नवीन
आवडली रे, बर्‍याच दिवसांनी एक संवेदनशील कविता वाचायला मिळाली.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 12/11/2014 - 00:04 नवीन
मिक्स!!!
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 12/11/2014 - 03:16 नवीन
फार सुंदर..
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 12/11/2014 - 11:47 नवीन
पेस्शाल मिका टच चायला हे असले काही वाचले म्हणजे जीव हैराण होतो असो एकदम खास उतरलंय जियो !!!!!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 12/11/2014 - 12:28 नवीन
मिका अगदी खरं...
  • Log in or register to post comments
च
चाणक्य गुरुवार, 12/11/2014 - 12:55 नवीन
तुफान झालीये
  • Log in or register to post comments
प
पलाश गुरुवार, 12/11/2014 - 14:30 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 12/11/2014 - 17:29 नवीन
अप्रतिम!बस्स इतकेच.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 12/11/2014 - 18:01 नवीन
एवढ्यातच बस्स ? नो नो अजून येऊ द्या..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/12/2014 - 05:24 नवीन
मिका रॉक्स, बस इतकेच, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 12/12/2014 - 17:42 नवीन
उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या.... याची आठवण आली. पूर्वी साधारण अशाच अर्थाच्या २ ओळी लिहिल्या होत्या मी,.... खुश थे के खत्म हो गयें, आँसू, आहे, और यादेभी, कल अचानक लबोंने पुकार लिया, तो चौंक गये।
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/12/2014 - 17:48 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Mon, 12/15/2014 - 12:11 नवीन
छान ... आवडली कविता
  • Log in or register to post comments
फ
फिझा Fri, 02/23/2018 - 10:34 नवीन
अशक्य अशक्य सुंदर कविता आहे बस्स इतकंच
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 02/25/2018 - 06:40 नवीन
अत्यंत सुरेख !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा