Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिशोब..

च — चुकलामाकला, गुरुवार, 12/11/2014 - 11:59
मी जन्मांचा विचार केला ,तुझी धाव पण वर्षांपुरती कसे निभावू नाते अपुले ,परतुनी आले अर्ध्यावरती … किती विनवण्या, किती अबोले, एका छोट्या पत्रासाठी हट्ट पुरवी तू अखेरीस पण पत्ता दुसरा पत्रावरती… शब्द असे तू उधळीत जाशी, जशी फुले वा माणिक मोती फसवे तरीही वेचीत गेले, माया केली अर्थांवरती … उगाच वेडा जीव लावला ,अशी कशी मी विसरून गेले , कितीही गुणले शून्याला तरी हाती अपुल्या शून्यच उरती...

प्रतिक्रिया द्या
3508 वाचन

💬 प्रतिसाद (14)
आ
आयुर्हित गुरुवार, 12/11/2014 - 12:47 नवीन
अरे व्वा! ! गज़ल छान जमली आहे. पत्ता दुसरा पत्रावरती… अरेरे, वाईट वाटले वाचून.... पण काही हि म्हणा, गणित पक्के आहे हो आपले!
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 12/13/2014 - 12:10 नवीन
छान आहे कविता,वाचायची राहुन गेलेली!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sat, 12/13/2014 - 12:56 नवीन
धन्यवाद!!:):)
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sat, 12/13/2014 - 13:19 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 12/13/2014 - 20:25 नवीन
@शब्द असे तू उधळीत जाशी, जशी फुले वा माणिक मोती फसवे तरीही वेचीत गेले, माया केली अर्थांवरती … >>> मार डाला! @उगाच वेडा जीव लावला ,अशी कशी मी विसरून गेले , कितीही गुणले शून्याला तरी हाती अपुल्या शून्यच उरती... >>> स्वाल्लिड!!!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 12/13/2014 - 22:30 नवीन
भावना चांगल्या मांडल्या आहेत. अजून एक शेर लिहा म्हणजे गजल पूर्ण होईल. गजलेत किमान ५ शेर हवेत.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sun, 12/14/2014 - 09:56 नवीन
धन्यवाद ! पाचवा शेर लिहिला होता , ओढ नभाची कधीच विरली, उंच उंच मी उडते तरिही नको कुणा नजरेत यावया, जखमा माझ्या पंखावरती पण ... नाही प्रकाशित केला . अब्दुल अहद साज यांचा शेर आठवला , शेर अच्छे भी कहो, सच भी कहो, कम भी कहो दर्द की दौलते नायब को रुसवा न करो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
अ
अजया Sun, 12/14/2014 - 16:25 नवीन
वा!क्या बात!! तुमचा शेरोशायरीवर लेख वाचायला आवडेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
अ
अनुप ढेरे Fri, 12/19/2014 - 06:23 नवीन
ओढ नभाची कधीच विरली, उंच उंच मी उडते तरिही नको कुणा नजरेत यावया, जखमा माझ्या पंखावरती
भारी!! संपादकांना सांगून मूळ धाग्यात टाकाना हा शेर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 12/14/2014 - 04:47 नवीन
भावना शब्दांमधे अचुक पकडल्या आहेत. कविता फार म्हणजे फारच आवडली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 12/14/2014 - 04:50 नवीन
खूप छान आणि हळवी !!
  • Log in or register to post comments
ह
होकाका Sun, 12/14/2014 - 18:26 नवीन
कविता वाचायला आवडली पण नीटशी कळली नाही... तशा कुठल्याच कविता कळत नाहीत - आणि त्यातही गझल म्हणजे अगदीच अनाकलनीय. ही सुद्धा त्यापैकीच एक. उदाहरणार्थ: १) "परतुनी आले अर्ध्यावरती" यात कोण परतून आले? 'मी' की 'नाते'? आणि का? २) "... एका छोट्या पत्रासाठी" यात कोणत्या पत्राचा उल्लेख आहे? कोणत्या संदर्भात? आणि का? ३) "हट्ट पुरवी तू अखेरीस पण पत्ता दुसरा पत्रावरती…" कसला हट्ट? आणि दुसरा पत्ता म्हणजे? पहिला पत्ता कोणता? आणि दुसरा कोणता? ४) "ओढ नभाची कधीच विरली, उंच उंच मी उडते तरिही" .. उंच उडत असल्यावर नभाची ओढ कशी राहील? अजूनही काही प्रश्ण आहेत. पण राहून्दे...
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 12/19/2014 - 04:51 नवीन
हं ! कवितेचा अर्थ प्रत्येकाचा वेगळा असू शकतो . हा माझा अर्थ ही गझल / कविता स्त्रीच्या मनातली आहे. १ कुठल्याही नात्याकडे पाहण्याचा दोघांचा दृष्टीकोन जर वेगळा असेल तर ते नाते फुलू शकत नाही . म्हणून नाते कुजू देण्यापेक्षा मी अर्ध्यावरून परतायचे ठरविले . २ तू मला पत्र लिहावे म्हणून मी कितीतरी वेळा तुला विनवण्या केल्या . शेवटी तू पत्र लिहिलेस खरे , पण मला नाही तर दुसऱ्याच कुणाला . ३ कधी जपून तरी कधी मुक्तपणे तू माझ्यावर शब्द उधळत गेलास मला जरी त्या मागचा तुझा खोटेपणा कळला तरी त्यात शब्दांची काय चूक? मी त्यांच्या अर्थावर नेहमीच माया केली . ४ ज्या नात्यांना नाव नाही ओळख नाही , अशी नातीही असतात, म्हटले तर शून्यासारखी . कधी कधी त्यातून हाती काहीच लागत नाही . हे माहित होते तरीही … ५ आकाशात उडायची इच्छा आता राहिली नाही तरीही मी उंच उडते कारण खाली उतरले तर माझ्या पंखावरच्या जखमा लोकांच्या नजरेत येतील . इतरांच्या मनातील माझी आनंदी, स्वच्छंदी ही प्रतिमा मला पुसायची नाही --
  • Log in or register to post comments
अ
अजब Fri, 12/19/2014 - 05:22 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा