Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकटा

Y — Yash, Tue, 12/16/2014 - 17:27
बघतो आहे वाट ती आता तरी येईल, आलीच अगदी वेळेवर तरी पुढे काय होईल... तिचे ते डोळे अन् ती मोहक अदा, ते रेशमी केस पाहून झालोय मी फिदा... तिच जागा आणि वेळ पाळण्याचा विक्रम मी रचला, "पेहली नझर का प्यार" वर विश्वास माझा बसला... इतकं सगळं झालं तरी बोलणं काही होत नाही, समोर जरी आली तरी लक्ष मात्र देत नाही.. सरली अशीच दोन वर्षे आता तरी बोलावं, थेट समोर जाउन आता प्रपोजच करावं... मग विचार केला की कसे तिचे मन वळवू, समोर जाऊन बोलण्यापेक्षा पत्रानेच कळवू... एक छान पत्रं मी लिहिले अन् हिमतीने नेउन दिले, न वाचताच तिने ते फाडून फेकूनही दिले... ती निघून गेली अन् डोळ्यासमोर अंधारी पसरली, पाहिलेली लाखो स्वप्नं खाणार्धात विखुरली... प्रेम वगैरे खोटं असतं, प्रयत्न माझा होता खरा.. आता कुणी नको मी आपला एकटाच बरा !!

प्रतिक्रिया द्या
3577 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मदनबाण गुरुवार, 12/18/2014 - 06:13 नवीन
मस्त ! प्रेम वगैरे खोटं असतं, प्रयत्न माझा होता खरा.. आता कुणी नको मी आपला एकटाच बरा !! हे आधी लक्षात येत नाही, म्हणुनच तर लोच्या होतो ना... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt Oil's Price Decline Weighs On High Yield Debt U.S. shale junk debt tumbles amid oil crunch
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 12/18/2014 - 07:40 नवीन
छान कविता. अवांतरः ते नझर आणि प्रपोज हे दोन शब्द खटकले.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/18/2014 - 12:45 नवीन
च.चा. काव्य झिंदा'बाद! =))
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 12/18/2014 - 14:02 नवीन
असंच काहीसं लिहायला आलो होतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/18/2014 - 14:12 नवीन
=)))))) उतारा काढलाय बघा इकडे >> इस नये च.चा. को, किसी की नझर ना लगे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/18/2014 - 14:28 नवीन
लिहित राहा. प्रेम वगैरे खोटं असतं, प्रयत्न माझा होता खरा.. आता कुणी नको मी आपला एकटाच बरा !! अजून तरी खोटं बिटं वाटलेलं नाही. :) -दिलीप बिरुटे (आत्ता तरी एकटा)
  • Log in or register to post comments
ग
गुलजार Tue, 12/23/2014 - 10:57 नवीन
पत्र तिने न वाचता फोडून टाकून गेली ही गोष्ट बघत बसलो तर आपणाला त्रासाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. त्यापेक्षा कवितेतील इतर गोष्टी पण आहेत त्यातून आपणाला आनंद मिळू शकतो.... असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
ग
गुलमोहर Tue, 12/23/2014 - 15:45 नवीन
मस्तच ....... खुप छान लिहील आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा