अकारण
पेशावर येथील १६ डिसेंबर २०१४ रोजी शाळेतील मुलांवर झालेल्या प्राणघातक अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध...
सुंदर बगीचे साजिरे, भवताल सारे गोजिरे
प्राजक्त मुक्त बहरले, गंध तयाचे दरवळे ll १ ll
कोण सैतान आले, विचार क्रूर तयांचे
खोटे गंध प्राजक्ताचे, ओरडून सांगू लागले ll २ ll
प्राजक्त तरीही बहरले, गंध उधळू लागले
विकृत विचारी सैताने, विचित्र सारे योजिले ll ३ ll
हल्लाबोल केला प्रहारे, प्राजक्त वृक्ष ताडिले
सांडले घोष प्राजक्त, तरीही दरवळू लागले ll ४ ll
अन्य ठावे सैतान गेले, उजाडून झाड अवघे
क्रूरतेने काय साधले, प्राजक्त अकारण ओघळले ll ५ ll
पडल्या कळ्या पाकळ्या, मातीसही न दुखविले
उरल्या एकल्या फांद्यांची, माणुसकी; काय करील सांत्वने ? ll ६ ll
http://www.saarthbodh.com/2014/12/blog-post_17.html
- सार्थबोध
💬 प्रतिसाद
(2)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 12/17/2014 - 12:24
नवीन
वाह!
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 12/17/2014 - 12:50
नवीन
सुभान अल्ला..
- Log in or register to post comments