लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.
श्रीरंगने खफवर मटावरील एक कमेंट उचलून टाकली त्यातील हे एक वाक्य. श्रीरंगने त्या वाक्याच्या गमतीदार देवनागरीमुळे ते खफवर टाकले असावे. मात्र माझ्या डोक्यात त्या वाक्याने असंख्य दातेरी चाके असलेले यंत्र फीरु लागले.
लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.हे अनेक ठिकाणी अनेकांनी लिहिलेलं वाचायला मिळतं. यातले बरेच जण समाजसुधारक असतात, विचारवंत असतात, समाजाला वंदनीय असे व्यक्तीमत्व असतात. मात्र आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे हे यांना कुणी सांगितलं हा प्रश्न पडतो. की यांना तसं वाटतं म्हणून आपणही तसं मानायचं? "आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे" हे मजेत जगण्यासाठी आहे हे केवळ तत्वज्ञान आहे. स्पष्ट बोलायचं तर सत्य काय आहे हे माहिती नसल्यामुळे दिलेली थुकपट्टी. नोबडी नोज व्हाय दी हेल वुई आर हीअर ऑन धिस अर्थ. वुई हॅव टू लिव्ह अवर लाईफ इन गुड वे ऑर बॅड वे टील डेथ नोक्स अवर डोअर (ऑर वुई नोक डेथ'स डोअर इन सम केसेस.) आजचे समृद्ध सजीव सृष्टी (ज्यात माणूसही आला) एकपेशीय सुक्ष्मजीवापासून उत्क्रांत झाली हे विज्ञान पुराव्यासह छातीठोकपणे सांगतो. मात्र हा पहिला एकपेशीय सुक्ष्मजीव कसा जन्माला आला याचे ठाम उत्तर विज्ञानाकडे आज तरी नाही. महास्फोटाचा सिद्धांत हा केवळ सिद्धांत आहे. वैज्ञानिक सत्य नाही. मात्र जे आपल्याला माहिती नाही त्याला "क्ष" मानायची ही माणसाची जुनी खोड आहे. उत्क्रांतीचे ज्ञान जेमतेम दिडशे पावणे दोनशे वर्ष जुने आहे. (डार्विनबाबाचे आभार त्यासाठी) मात्र त्याच्याआधी हजारो वर्षांपासून हा प्रश्न माणसाला पडला असणार (पृथ्वीचे आयुष्य अंदाजे ४५० कोटी वर्ष आहे. मानवजातीचे आयुष्य सांगणे तसे अवघड आहे. कपीवर्गातून मानव प्राण्यात उत्क्रांत होण्याच्या नेमक्या कुठल्या अवस्थेपासून हे आयुष्य मोजायचं हा प्रश्न आहे.) तर मुद्दा असा आहे की खुप पूर्वी मनुष्य प्राण्याला मी या भूतलावर का आहे हा प्रश्न पडला असणार. मी ही जी आजूबाजूची सृष्टी पाहतो ती कुणी बनवली या प्रश्नाने डोके भंजाळून गेले असणार त्याचे. उत्तर न मिळाल्याने त्याने सृष्टी निर्मात्याला "क्ष" मानले आणि त्याला नाव दिले "देव". या अवाढव्य पसार्याचा, क्षणात आग ओकणार्या ज्वालामुखीचा, क्षणात होत्याचे नव्हते करणार्या महापुराचा, जंगल जाळणार्या आगीचा, महाप्रलयाचा, वावटळीचा निर्माताही तितकाच ताकदवान असणार. मग माणसानेच ठरवले. देव सर्वव्यापी आहे. देव सर्वशक्तीमान आहे. देव सर्व जाणतो. देवाने हे आयुष्य मला आनंदाने जगण्यासाठी दिले आहे. जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही. सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ देव त्याने आनंदाने जगण्यासाठी दिलेले आयुष्य तसं आनंदात जगता येत नसूनही प्राथमिक शाळेतल्या आज्ञाधारी बालकासारखा हाताची घडी घालून आणि तोंडावर बोट ठेवून का बसला आहे हा प्रश्न कुणालाच पडत नाही. मी तर देव मानत नाही. जे मानतात, त्यांचं काय मत आहे याबद्दल? आपल्या शेजारच्या देशात घडलेल्या निष्पाप बालकांचे शिरकाण ही जी कुणी विश्वाचे नियमन करणारी शक्ती आहे ती कसे पाहू शकते? की तिथेही आपला लाडका कर्मविपाकाचा सिद्धांत वापरायचा आणि स्वतःला पुन्हा एकदा मुर्ख बनवायचे? ----------------------------------------------------------------------- टंकणे बरेचसे विस्कळीत आहे याची जाणिव आहे.
अम्मळ मौज वाटली.अफाट कल्पना असतात एकेक ! अभ्यास शून्य , वाद उकरायची हौस ! हिन्दू धर्मात इतके प्रचन्ड साहित्य उपलब्ध असूनदेखील भल्या- भल्यांची संकल्पना पुरेशी स्पष्ट नसते याचे आश्चर्य वाटते ! अहो सतिश साहेब , आत्मनो मोक्षार्थ... मधला आत्मा मन- बुद्धीवाला नाही ...आत्मनो म्हणजे स्वतः चा ! अभ्यास वाढवा ! गृहपाठ -२ मोक्ष म्हणजे काय ? हिन्ट : मोक्ष म्हणजे salvation नव्हे ! नाहीतर गुगलून बघाल आणि याल पुन्हा वाद घालायला !