महागाई कमी करण्या साठी आपण आता आपल्या परी ने काय काय करु शकतो?

मित्रां नो प्रश्न सरळ आहे यात सरकार काय करु शकतं महागाई कमी करण्या साठी या पेक्षा आपण वयक्तिकरीत्या काय करु शकतो याच्या वीषयी थोडस लीहावं , उदा. एकवेळचे जेवण कमी करणे ,
अर्धे कपडे कमी वापरने,
..............................
कींवा इतर काही वास्तव,............... उपाय..................

संस्कृतिरक्षक धोपटतील हे जेवढं खरं आहे, तेवढंच खरं सांगलीकर म्हणताहेत. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असताना कपड्यांबद्दल काय बोलणार?
खेड्यांकडे चला हे बोलायला ठीक आहे. पण तिथे जाऊन काय करणार, शेताचा एक तुकडासुद्धा नसेल तर?
कमीतकमी गरजा ठेवणे, हा उपाय असू शकतो. उपलब्ध स्रोतांची नासाडी रोखणे, एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो.

कपडे काढण्या आधी

१.ऑफिसातून आंतरजालावर हिंडणे कमी केले तर कामाची प्रॉडक्टिव्हिटी बरीच वाढेल, पर्यायाने वेळ आणि पैसा यांची बचत...
२. घरातून जालावर हिंडणे बंद केले तर किमान पाच सातशेची बचत होणारच...

ठरवा बुवा...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दादा , माफ करा पन तुम्हाला काय म्हणायच आहे हे कळलच नाही हो... माझा भाषा विषय थोडा कच्चा होता . इंग्रजी पन कळल नाही

हल्ली कपडे अर्धेच वापरले जातात.. चित्रपट नाहि बघत वाटतं तुमी ;)

मजेचा भाग सोडा.. खरच महागाई कमी करायची असेल तर गांधीचा "गावाकडे चला " ही विचारसरणी (कंसेप्ट) योग्य आहे असे वाटते

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

वेताळ राव ,
माहीती नाही काय तिथं सुद्धा फार गरर्दि झालीय ,आणि ख्ररं सागतो भाऊ तीथ महागाई चा त्रास नाही वाटत. कारण सरकार खाऊ घालत ना,

महागाईचा सामना करताना (किंवा तत्सम समस्यांचा सामना करताना) खर्चाला कात्री लावणे ह्यावरच अनेकजण -- सर्वसामान्य माणूस आणि उद्योगधंद्यांचे चालक/मालक -- लक्ष केंद्रित करतात.

महागाई आली तर आणखी एक जोडनोकरी शोधा... मोठ्या पगाराची, उत्पन्नाची प्राप्ती व्हावी म्हणून धडपड करा. एकवेळचे जेवण कमी करणे वगैरेंनी काहीही बचत होत नाही... नसती आजारपणे ओढवतील इतकेच काय ते.

खरोखर आमच्या कडे दिवसात फक्त २४ च तास आसतात हो..........
जोड नोकरी ला वेळ आणायचा कूठुन .................
सकाळी येरवाळी शेताकडं नीघुन गेल्यावर सन्ध्या काळीच परत येणं होत आणि रात्रि लाईटिची बोंबाबोंब मग ........

एकवेळचे जेवण कमी करणे वगैरेंनी काहीही बचत होत नाही... नसती आजारपणे ओढवतील इतकेच काय ते.
आणि त्यातून खर्चही वाढेल!

ऍनोरेक्सिक लोकं कसे आजारांना बळी पडतात ते सामंतकाकांनी लिहीलंच आहे!