Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल

म
मंदार कात्रे
Mon, 12/22/2014 - 20:14
🗣 167 प्रतिसाद
जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचा काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने घडामोडी होतील ,असा अन्दाज आहे. या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..

प्रतिक्रिया द्या
42309 वाचन

💬 प्रतिसाद (167)
स
सव्यसाची Tue, 12/23/2014 - 17:45 नवीन
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला झारखंड मध्ये ६० विधानसभा क्षेत्रामधून आघाडी होती. आता फक्त ३७ जागा भाजप स्वतः जिंकू शकली. पण त्यामुळे भाजपला अपयश आले असे म्हणणे मला चुकीचे वाटते. मला वाटते विधानसभेचे dynamics पूर्णत: वेगळे असतात. त्यामुळे बरेच पत्रकार लोकसभेसारखे यश का मिळाले नाही असा प्रश्न करताना हा मुद्दा विसरत आहेत. बाकी बिहार आणि दिल्ली मध्ये नेमके काय होते हे पाहण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 12/24/2014 - 06:31 नवीन
झारखंडमध्ये मित्रपक्षांसह ८१ पैकी ४२ जागा जिंकून भाजपने बहुमत मिळविले.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मते देताना मतदार वेगळ्या मुद्द्यांचा विचार करून मते देतात हा माझा अत्यंत आवडता हायपोथिसिस आहे.झारखंड हे राज्य त्याचे बर्‍यापैकी चपखल उदाहरण आहे असे म्हटले तरी चालेल. २००४ मध्ये भाजपचा राज्यात धुव्वा उडाला होता. १४ पैकी अवघी १ जागा (बाबूलाल मरांडींची कोदरमा) भाजपने जिंकली होती. त्या निवडणुकांमध्ये यशवंत सिन्हांचाही पराभव झाला होता.पण त्यानंतर ९ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र भाजपने २९ तर मित्रपक्ष जनता दल (युनायटेड) ने ६ अशा ३५ जागा जिंकल्या. लोकसभेत २००९ मध्ये भाजप आघाडीने १४ पैकी ८ जागा जिंकल्या पण त्यानंतर ७ महिन्यातच विधानसभेत प्रचंड प्रमाणावर फ्रॅक्चर्ड जनादेश लोकांनी दिला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात किती मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती हा नक्की आकडा मला माहित नाही. पण तरीही नरेंद्र मोदी हे आतापर्यंतचे प्रस्थापित राजकारणातील आडाखे बदलून टाकणारे नेते आहेत असे चित्र आतापर्यंत उभे राहिले आहे. झारखंडने असा प्रचंड वेगळा कौल देणे हे आतापर्यंतचे प्रस्थापित राजकारण झाले.ते मोदी बदलू शकतात का हा प्रश्न होता. त्यामुळे पत्रकार असे प्रश्न विचारत आहेत. तरीही भाजपने काठावरचे का होईना बहुमत मिळवले त्यामुळे मोदींच्या प्रस्थापित राजकारण बदलायच्या क्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहावे असे काही झाले नाही. पण गाडी तर ३४-३५ मध्ये अडकली असती तर मात्र मोदींच्या त्या क्षमतेवर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
श
श्रीगुरुजी Wed, 12/24/2014 - 10:43 नवीन
>>> २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात किती मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती हा नक्की आकडा मला माहित नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने झारखंडमध्ये ५६ मतदारसंघामध्ये व काश्मिरमध्ये ४४ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 12/24/2014 - 11:01 नवीन
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने झारखंडमध्ये ५६ मतदारसंघामध्ये व काश्मिरमध्ये ४४ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली होती.
काश्मीरमध्ये ४४? जम्मू विभागात (जम्मू आणि उधमपूर लोकसभा मतदारसंघ) ३७ तर लडाखमध्ये ४ जागा आहेत. म्हणजे भाजपला काश्मीर खोर्‍यातील ३ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 12/24/2014 - 11:05 नवीन
काल विविध चॅनेल्सवर दिवसभर हेच आकडे सांगत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Wed, 12/24/2014 - 07:58 नवीन
>>> लोकसभेत भाजपने दिल्लीत पूर्ण स्वीप केला पण विधानसभा निवडणुकांच्या वेळी परत आआप डोके वर काढेल ही शक्यता आहेच. तशी शक्यता कमी आहे. मुख्यमंत्रीपद सोडून पलायन करणार्‍या केजरीवालांना दिल्लीकर अजूनही क्षमा करण्याच्या मनस्थितीत नाहीत. गेल्या २ महिन्यात ३-४ मतदान सर्वेक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. सर्व सर्वेक्षणात भाजप ४०+, आआप २५ च्या आसपास व काँग्रेस ५-६ असा अंदाज आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आआपचे अनेक नेते भाजपमध्ये सामील होत आहेत. जशी निवडणुक जवळ येईल तसे आआपला अजून मोठे भगदाड पडेल. >>> तसेच बिहारमध्ये लालू आणि नितीश कुमार यांचे संयुक्त आव्हान परतवून लावणे तितके सोपे जाणार नाही. लालू, नितीश व काँग्रेस नुकत्याच झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत एकत्र आले होते. राजद ४, संजद ४ व काँग्रेस २ असे जागावाटप होते. राजदने ३, संजदने २ व काँग्रेसने १ जागा जिंकली होती. परंतु डिसेंबर २०१५ असणार्‍या विधानसभा निवडणुकीत हे पक्ष एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही. वरील फॉर्म्युलाप्रमाणे बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी राजद व संजद च्या वाट्याला प्रत्येकी ९७-९८ जागा येतील व काँग्रेसच्या वाट्याला ४८ जागा येतील. सध्याच्या विधानसभेत संजदचे १२३ आमदार आहेत. इतके आमदार असताना संजद फक्त ९७-९८ जागा लढविणे अशक्य आहे. राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवे असल्याने राजद देखील निम्म्यापेक्षा कमी जागा लढविणे शक्य नाही. जरी काँग्रेसला बाजूला ठेवले तरी राजद व संजदच्या वाट्याला जेमतेम १२१-१२२ जागा येतील व त्यामुळे दोन्ही पक्षांना इतक्या कमी जागा लढविणे मान्य होणार नाही. जर संजदने ९७-९८ जागाच लढविल्या तर किमान २५ आमदारांचे तिकीट कापावे लागेल व ते आमदार तातडीने भाजपमध्ये जातील. त्यामुळे या तीन पक्षांची भविष्यात युती अशक्य आहे. राजद + काँग्रेस किंवा संजद + काँग्रेस अशी युती मात्र नक्की होऊ शकते. अशा परिस्थितीत तिरंगी लढत होऊन फायदा भाजपचाच होईल. जातीयवादी पक्षांविरूद्ध एकजूट करून लढण्याच्या गप्पा मारणे सोपे असते. प्रत्यक्षात कोणताही पक्ष कमी जागांवर लढायला तयार होत नाही. सर्वांचाच तोटा होत आहे हे लक्षात येऊनसुद्धा कोणताही पक्ष दुसर्‍या पक्षाला जास्त जागा देण्यास तयार नसतो. महाराष्ट्रात सेना-भाजपच्या बाबतीत असेच झाले होते. एकटे लढल्यावर आपले खूप नुकसान होईल हे माहीत असूनसुद्धा सेनेच्या ताठरपणामुळे युती होऊ शकली नव्हती व सेना १०० च्या पुढे जाण्याऐवजी ६३ वरच अडकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
ग्रेटथिंकर Wed, 12/24/2014 - 08:40 नवीन
जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी राजीनामा देऊन नैतिकतेचे प्रदर्शन केले होते त्याल पलायन म्हणणे मंजै वैचारिक पात्रता नसण्याचे लक्षण आहे, नाहितर या देशाने तेरा दिवसाच्या सत्तेसाठी पिपासु असलेले व ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करुन निवडणुक जिंकली, त्यांच्याशी निर्लज्ज युती करणारे भाज्यपेही पाहिले आहेत. उठसुठ नैतिकतेचा राग आळवणारे संघी सत्तेसाठी कुणाशीही युती करु शकतात हेच सांप्रत सत्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बोका-ए-आझम Wed, 12/24/2014 - 08:54 नवीन
जर केजरीवालांनी नैतिकता दाखवली होती तर आता परत एकदा संधी द्या, त्यावेळी राजीनामा दिला ही चूक झाली असं म्हणून जनतेसमोर भीक का मागत आहेत? तेव्हा लोकसभा निवडणुकीत हीरो बनून आपल्याला राष्ट्रीय पातळीवर प्रोजेक्ट करण्याची त्यांना घाई झाली होती हेच खरं. बरं, निवडणूक लढवून मग पद सोडणं हेही केजरीवाल करू शकले असते पण आम आदमी पार्टी म्हणजे आपणच असा त्यांचा भ्रम होता.बरं, त्या ४९ दिवसांत काय दिवे लावले? जनता दरबार गुंडाळावा लागला, सोमनाथ भारतींनी अधिकार नसताना किरकी एक्स्टेन्शन भागात परकीय नागरिकांवर दादागिरी करुन स्वत:चं हसं करुन घेतलं. त्यामुळे सत्ता संभाळणं वाटतं तितकं सोपं नाही हे केजरीवालांना कळलं आणि त्यांनी जनलोकपाल विधेयकाची संधी साधून पलायन केलं. नैतिकता? My Foot!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
क
कपिलमुनी Wed, 12/24/2014 - 10:49 नवीन
बाकी माहीत नाही , पण स्थानिक मित्राच्या महिती नुसार त्या भगात राहणारे नायजेरियन आणि इतर परदेशी मुले ड्रग्स आणी देहविक्रय या मध्ये गुंतले होते आणि त्यांच्या पार्टीज , व्यवसाय यांचा त्रास सोसायटी मधे सर्वांना व्ह्यायचा. पोलिस हप्ता घेउन गप्प बसायचे , त्या मुळे य कारवाईला स्थानिक पाठिंबा मिळाला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 12/24/2014 - 16:31 नवीन
सोमनाथ भारतींना अशी 'टिप' मिळाली होती की हे परकीय नागरिक अशा प्रकारच्या गोष्टी करतात. त्याची शहानिशा न करताच त्यांनी धाड टाकली. बरं, ते ठीक आहे पण तिथे त्यांची झडती घेण्याचा आणि त्यांना (अगदी स्त्रियांनाही) लघवीचा नमुना देण्याचा अधिकार पोलिसांशिवाय कोणालाही नव्हता. शिवाय दिल्लीमध्ये पोलिस हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतात त्यामुळे त्यांनी भारतींनी केलेल्या ' कारवाई' बद्दल नापसंती व्यक्त केली आणि त्यामुळे दुस-या दिवशी लगेचच दिल्लीचे मुख्यमंत्री धरणं धरून बसले. सोमनाथ भारतींच्या या कृत्याची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आणि त्यांना नोटिस पाठवली जिला भारतींनी उत्तर पाठवलं नाही आणि नंतर आपल्याला ही प्रक्रिया माहीत नव्हती अशी सारवासारव केली. रच्याकने, हा माणूस वकील आहे. ही केजरीवाल आणि त्यांच्या कंपूची 'नैतिकता' आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Wed, 12/24/2014 - 09:36 नवीन
>>> जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी राजीनामा देऊन नैतिकतेचे प्रदर्शन केले होते त्याल पलायन म्हणणे मंजै वैचारिक पात्रता नसण्याचे लक्षण आहे, हहपुवा :YAHOO:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
श
श्रीगुरुजी Wed, 12/24/2014 - 11:03 नवीन
>>> जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी राजीनामा देऊन नैतिकतेचे प्रदर्शन केले होते त्याल पलायन म्हणणे मंजै वैचारिक पात्रता नसण्याचे लक्षण आहे नानासाहेब, तुम्ही तुमच्या पूर्वीच्या "टॉपगिअर्ड फिलॉसॉफर" या अवतारात असताना केजरीवालांविषयी खालील भाष्य केले होते. तुमच्या आठवणीसाठी ते खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा. ________________________________________________________________________________ केजरीवाल हा खोटारडा आहे हे टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32 केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा .... सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥ ________________________________________________________________________________ आता अचानक केजरीवाल तुम्हाला नैतिकतेचे प्रदर्शन करणारे वाटायला लागले काय. कमाल आहे तुमच्या कोलांट्या उडीची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
क
क्लिंटन Wed, 12/24/2014 - 09:08 नवीन
इतके आमदार असताना संजद फक्त ९७-९८ जागा लढविणे अशक्य आहे. राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवे असल्याने राजद देखील निम्म्यापेक्षा कमी जागा लढविणे शक्य नाही. जरी काँग्रेसला बाजूला ठेवले तरी राजद व संजदच्या वाट्याला जेमतेम १२१-१२२ जागा येतील व त्यामुळे दोन्ही पक्षांना इतक्या कमी जागा लढविणे मान्य होणार नाही.
ही शक्यता आहेच. नोव्हेंबर २०१५ पर्यंत काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणावर मार खायला सुरवात होऊन २ वर्षे झाली असतील. बिहारमध्ये सत्तेत येणे पक्षाच्या भवितव्यासाठी अगदीच महत्वाचे असेल.२००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लालू-काँग्रेस आणि पासवान अशी महायुती होती.त्यात काँग्रेसने ४० पैकी ४ जागा लढवायला तयार होऊन पडती बाजू स्विकारली होतीच.त्याची पुनरावृत्ती अगदीच अशक्य नाही. दुसरे म्हणजे लालूंच्या राजकिय भवितव्याचा प्रश्न असल्यामु़ळे तडजोड करायला ते तयार होऊ शकतील ही पण शक्यता आहेच. २०१० मध्ये नितीश कुमारांनी भाजपसाठी ११० जागा सोडल्या होत्या.तितक्या जागांवर लालू तयार होणारच नाहीत असेही नाही.शेवटी राजदचे विधानसभेत २२ आमदारच आहेत.त्या तुलनेत ११० जागा मिळणार असतील तर राजदला अगदीच चालणार नाही असेही नाही.तसेच या ११० जागांवर गेली कित्येक वर्षे नितीश कुमारांचा उमेदवार नसल्यामुळे त्यांनाही या जागा राजदसाठी सोडायला हरकत असेल असे वाटत नाही. १९९० च्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि जनता दलाने गुजरात आणि राजस्थानात सीट अ‍ॅडजस्टमेन्ट केले होते. म्हणजे बहुसंख्य जागांवर सहमती झाली तिथे एका पक्षाचाच उमेदवार होता.तर उरलेल्या तीसेक जागांवर दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले होते.तसे बिहारमध्ये होऊच शकणार नाही असेही नाही. मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूध्द आपलाच एखादा बंडखोर उभा करायचा आणि तो जिंकल्यास त्याला "सन्मानाने" स्वगृही परत घेऊन आपले बळ एकने वाढवायचे असे प्रकारही युती करणारे पक्ष करत असतातच. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुका हा लालू आणि नितीश या दोघांसाठीही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ते एकत्र लढणार असे गृहित धरूनच भाजपने व्यूहरचना केली पाहिजे. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे महागात पडू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 12/24/2014 - 09:33 नवीन
>>> दुसरे म्हणजे लालूंच्या राजकिय भवितव्याचा प्रश्न असल्यामु़ळे तडजोड करायला ते तयार होऊ शकतील ही पण शक्यता आहेच. २०१० मध्ये नितीश कुमारांनी भाजपसाठी ११० जागा सोडल्या होत्या. २०१० मध्ये भाजप १०२ व संजद १४१ असे जागावाटप होते. >> तितक्या जागांवर लालू तयार होणारच नाहीत असेही नाही.शेवटी राजदचे विधानसभेत २२ आमदारच आहेत.त्या तुलनेत ११० जागा मिळणार असतील तर राजदला अगदीच चालणार नाही असेही नाही.तसेच या ११० जागांवर गेली कित्येक वर्षे नितीश कुमारांचा उमेदवार नसल्यामुळे त्यांनाही या जागा राजदसाठी सोडायला हरकत असेल असे वाटत नाही. राजदचे फक्त २२ आमदार असले व संजदचे १२३ असले तरी मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजदचे ४ खासदार निवडून आले आहेत तर संजदचे फक्त २ आले आहेत. त्यामुळे सद्यपरिस्थितीत आपलीच ताकद जास्त असल्याची लालूची समजूत आहे. दुसरीकडे १२३ सिटिंग आमदार असताना संजद १५० पेक्षा कमी जागा मान्य करणे शक्य नाही. तसे झाले तर राजद व काँग्रेससाठी एकत्रित जेमतेम ९३ जागा उरतात. काँग्रेस आघाडीत आले नाही तरी राजद फक्त ९३ जागा लढविणे मान्य करणार नाही. संजदपेक्षा कमी जागा लढविणे म्हणजे मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडून देण्यासारखे आहे. लालू हे कधीच मान्य करणार नाही. लालू आणि नितीशकुमार सध्या कितीही प्रेमाने एकमेकांना मिठ्या मारत असले तरी मनातून दोघेही एकमेकांवर डूख धरून आहेत. निव्वळ पोटनिवडणुकीसाठी दोघे एकत्र होते. प्रत्यक्ष निवडणुकीत ते एकमेकांविरूद्धच असतील. >>> २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुका हा लालू आणि नितीश या दोघांसाठीही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ते एकत्र लढणार असे गृहित धरूनच भाजपने व्यूहरचना केली पाहिजे. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे महागात पडू शकते. राजद व संजद एकत्र येणे अशक्य आहे. राजद + काँग्रेस किंवा संजद + काँग्रेस अशी युती नक्कीच होईल. काँग्रेसला ७०-८० जागा सोडून उरलेला पक्ष १६०-१७० जागा लढवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 12/24/2014 - 09:41 नवीन
२०१० मध्ये भाजप १०२ व संजद १४१ असे जागावाटप होते.
हो बरोबर. त्यावेळी भाजपचा स्ट्राईक रेट ९०% पेक्षा जास्त होता.
लालू आणि नितीशकुमार सध्या कितीही प्रेमाने एकमेकांना मिठ्या मारत असले तरी मनातून दोघेही एकमेकांवर डूख धरून आहेत. निव्वळ पोटनिवडणुकीसाठी दोघे एकत्र होते. प्रत्यक्ष निवडणुकीत ते एकमेकांविरूद्धच असतील.
तसे झाले तर अति उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बोका-ए-आझम Wed, 12/24/2014 - 19:04 नवीन
जर बिहार विधानसभेत त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही तरच हे घडू शकते असं मला वाटतं. आत्ता दोघंही परस्परांची गरज म्हणून एकत्र आले आहेत. पण जर पराभव झाला तर सच्च्या समाजवाद्यांप्रमाणे एकमेकांवर दोषारोप करुन ते वेगळे होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रसाद१९७१ Wed, 12/24/2014 - 10:08 नवीन
दोन पक्षांची युती झाल्याने त्यांना मिळालेल्या मतांची पण बेरीज होते हा चुकीचा समज आहे. बर्‍याच वेळेला युती करुन नुकसानच होत असते. ज्या प़क्षाला दुसर्‍या प़क्षासाठी जागा सोडायला लागते त्या प़क्षाचे बरेसचे लॉयल मतदार हे एक तर मतदानच करत नाहीत किंवा विरुद्ध पक्षाला करतात. युती करुन मतांची बेरीज होत असती तर आठलल्यांच्या आरपीआय ला २-४ जागा तरी मिळाल्या असत्या आत्ताच्या निवडणुकीमधे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रसाद१९७१ Wed, 12/24/2014 - 10:11 नवीन
कोथरुड मधल्या भाजपाच्या नेहमीच्या मतदारांनी २००९ मधे मनसे चा पर्याय उपलब्ध झाल्यावर मनसेला मतदान केले. पण २०१४ मधे भाजप पण रींगणात आल्यामुळे कोथरुड मधले भाजपीय मतदार पुन्हा भाजप कडे आले. कोथरुड मधे ह्या वेळेस पण युती असती तर कदाचित मनसे निवडुन आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
क
क्लिंटन Wed, 12/24/2014 - 10:58 नवीन
हो बरोबर. ही गोष्ट महाराष्ट्रात नक्कीच लागू पडते.पण बिहारसारख्या राज्यात मतदान जातीनिहाय होत असल्यामुळे दोन अधिक दोन चार हे आतापर्यंत बघायला मिळाले आहे. (२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वेगळे निकाल लागले). यापुढचे सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
पिंपातला उंदीर Wed, 12/24/2014 - 05:44 नवीन
आजच्या लोकसत्तेच्या अग्रलेखात काही गंभीर म्हणता येतील अशा चुका आहेत . छत्तिस गड च्या अजित जोगी ना त्यांनी झारखंड मध्ये नेउन टाकले आहे . नुकत्याच झालेल्या झारखंड निवडणुका मध्ये त्यांनी कॉंग्रेस च नेतृत्व केल असा जावई शोध त्यांनी लावला असून वर कॉंग्रेस च्या पराभवाच खापर पण जोगी यांच्या डोक्यावर फोडलं आहे . तसच अब्दुल्ला घराण्यां मधल यापूर्वी कोणीही निवडणुकीत पडल नाही अस विधान बेधडक पण केल आहे . वास्तविक पाहता उमर अब्दुल्ला एकदा यापूर्वी पण निवडणुकीत पडले आहेत . ज्या गोष्टी राजकारणात रस असणारया सर्वसामान्य लोकाना पण माहित असतात त्या गांजलेल्या शेतकऱ्यापासून देशाच्या पंतप्रधाना ना उपदेशाचे डोस पाजणार्या लोकसत्ता काराना माहित नसाव्यात याचे अमळ आश्चर्य वाटून राहिले भौ
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Wed, 12/24/2014 - 08:53 नवीन
तुमचे म्हणणे बरोबर आहे. आजच्या लेखामध्ये भयानक चुका आहेत. जोगी यांच्या बाबतीतली चूक तर टाळण्याजोगीच होती. अब्दुल्ला हरले नाहीत हे म्हणणे पण चुकीचे आहे. ओमर अब्दुल्ला यांचा पराभव झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
क
क्लिंटन Wed, 12/24/2014 - 09:23 नवीन
जोगी यांच्या बाबतीतली चूक तर टाळण्याजोगीच होती.
+१. एक गोष्ट समजत नाही. "या राज्यात अजित जोगीसारख्या बनेल नेत्यास काँग्रेसने पुढे करून पाहिले" हे या अग्रलेखातील वाक्य आहे. समजा झारखंडमध्ये काँग्रेसचा कोणी मोठा नेता असता तर त्या नेत्याऐवजी अजित जोगी हे चुकून लिहिले आहे असा बेनेफिट ऑफ डाऊट गिरीश कुबेरांना देता आला असता.पण राज्यात काँग्रेसचा असा कोणी नेताही नाही. मग इतकी मोठी चूक कशी काय झाली हे समजत नाही.
अब्दुल्ला हरले नाहीत हे म्हणणे पण चुकीचे आहे. ओमर अब्दुल्ला यांचा पराभव झाला आहे.
समजा ओमर अब्दुल्लांचा २००२ च्या विधानसभा निवडणुकांमधला गंदरबालमधून झालेला पराभव कुबेर विसरले तरी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अगदी सहा महिन्यांपूर्वीच श्रीनगरमधून फारूख अब्दुल्लांचाही पराभव झाला होता हे पण ते विसरले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
ग
ग्रेटथिंकर Wed, 12/24/2014 - 07:15 नवीन
निवडणुका जिंकने येवढेच काम मोदी करत आहेत ,विकासाच्या बाबतीत मात्र मूग गिळुन गप्प. महागाई भ्रष्टाचार कमी करणे दूरच ,उलट काँग्रेस सरकारच्या निर्णयांना पुढे चालू ठेवणे व त्यांच्या विकासकामांचे श्रेय लाटणे चालू आहे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 12/24/2014 - 08:45 नवीन
सोनिया आणि राहुल यांनी एकदा ' भाजपला फक्त सत्ता हवी आहे 'असे वेडगळ विधान केले होते. कुठल्याही राजकीय पक्षाचा हेतू हा सत्ता हाच असतो. मोदी फक्त निवडणुका जिंकण्याचं काम करत आहेत हे त्याच धर्तीचं विधान आहे. मोदींनी निवडणुका जिंकण्याचं काम केलेलं नाही, लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या पक्षाला मतं दिलेलेी आहेत. मेक इन इंडिया, जन धन योजना, किरकोळ विक्री क्षेत्रात परकीय गुंतवणूक न आणणे हे काँग्रेसचे निर्णय होते की काय? GST आणि विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक काँग्रेसच्या काळात जाहीर झाली होती पण अंमलबजावणी कोण करतो हे महत्वाचं आहेच. उद्या मी आयफोन ८ जाहीर केला आणि अॅपलने तो बाजारात आणल्यावर त्याचं श्रेय घेतलं तर चालेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
ब
बॅटमॅन Wed, 12/24/2014 - 09:25 नवीन
ओ बोकेश्वर! कुणाला उत्तरे देऊन एनर्जी वाया घालवताय? त्यांचे कामच आहे ते. मोदी हे नाव दिसले की गरळ ओकणे हा यांचा विरंगुळा आहे. खरेतर गरज आहे, कारण नायतर यांना कोणी भाव देत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 12/24/2014 - 11:40 नवीन
कसं आहे की उगाचच कुणीही उंदीर काहीही किचकिच करु लागला की फिसकारणं आणि नख्या काढणं हा बोक्याचा सहजस्वभाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
श
श्रीगुरुजी Wed, 12/24/2014 - 09:24 नवीन
वेलकम बॅक नानासाहेब! पुनर्जन्माबद्दल अभिनंदन!! मस्त्य, कस्त्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, ... या उच्च अवतारी परंपरेप्रमाणेच "ग्रेटथिन्कर, टॉपगिअर्ड फिलॉसॉफर, नानासाहेब नेफळे, माईसाहेब कुरसुंदीकर, ग्रेटथिंकर, ..." ही थोर डूआय परंपरा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
म
मृत्युन्जय Wed, 12/24/2014 - 11:15 नवीन
महागाई भ्रष्टाचार कमी करणे दूरच ?????? जरासे गूगलुन बघितले तर कळेल की महागाई कमीच होत चालली आहे: The inflation rate in India was recorded at 4.38 percent in November of 2014. Inflation Rate in India averaged 9.09 percent from 2012 until 2014, reaching an all time high of 11.16 percent in November of 2013 and a record low of 4.38 percent in November of 2014. Inflation Rate in India is reported by the Ministry of Statistics and Programme Implementation (MOSPI), India.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
व
विनोद१८ Wed, 12/24/2014 - 09:55 नवीन
अरे, ग्रे.थिं. फिलौसोफर उत्तर दे.
निवडणुका जिंकने येवढेच काम
तुला, बाजारात जाउन तुझ्या वांगी-पावट्याच्या भाजीसाठी तांबाटु आणण्याइतके सोपे वाटले का ??
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Wed, 12/24/2014 - 13:28 नवीन
ग्रेटथिन्कर व मी ,आमच्यात फरक आहे. मी ग्रेटथिंकर आहे ,नामसाधर्म्याचा अर्थ असा नव्हे कि आम्ही एकच व्यक्ती आहोत. बाकी ते नानासाहेब माईसाहेब टॉपगेअर्ड वगैरेची काहीच टोटल लागली नाही. @कपिलमुनी, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची किंमत प्रचंड उतरल्याने मोदींने पेट्रोल डीझेलचे दर कमी केले ,त्यामुळे महागाई कमी झाल्याची आकडेवारी व प्रत्यक्ष किंमती यांच्यात भ्रामकता पैदा झाली आहे. एण्ड युजरला या आकड्यांचा फायदा होताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
क
कपिलमुनी Wed, 12/24/2014 - 13:47 नवीन
@कपिलमुनी, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची किंमत प्रचंड उतरल्याने मोदींने पेट्रोल डीझेलचे दर कमी केले ,त्यामुळे महागाई कमी झाल्याची आकडेवारी व प्रत्यक्ष किंमती यांच्यात भ्रामकता पैदा झाली आहे. एण्ड युजरला या आकड्यांचा फायदा होताना दिसत नाही.
म्या कुटं काय बोल्लो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
श
श्रीगुरुजी Wed, 12/24/2014 - 16:25 नवीन
>>> बाकी ते नानासाहेब माईसाहेब टॉपगेअर्ड वगैरेची काहीच टोटल लागली नाही. तुम्हाला लागली नसेल एखादेवेळेस, पण आम्हाला लागली ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
ब
बोका-ए-आझम Wed, 12/24/2014 - 14:49 नवीन
ही किंमत उतरल्यामुळे महागाई कमी झाली आहे, त्यात मोदी सरकारचं काही श्रेय नाही!बरोबर. याचा अर्थ उद्या हे दर वाढून महागाई भडकली तर त्यालाही मोदी सरकार जबाबदार नाही!
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Sun, 03/01/2015 - 12:56 नवीन
"मैं शुक्रगुजार हूँ श्रीनगर के लोगो का, हुर्रियत का, सभी अतंकवादियो का, जिन्होंने कश्मीर में उस समय कोई गलत घटना को अंजाम नहीं दिया, वरना वो चाहते तो कुछ भी कर सकते थे. पाकिस्तान ने भी माहौल को सहायक बनाने में मदद किया, मेरा ऐसा मानना है की अगर वो नहीं चाहते तो श्रीनगर में शांति से चुनाव नहीं हो सकता था." - मुफ्ती मोहम्मद सईद
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Sun, 03/01/2015 - 13:00 नवीन
माफ करा, वरील विधान शपथविधीनंतरचे आहे हे सांगायला विसरलो. आणि हो, अजून एक... ग्रेटेस्ट देशभक्त ऑफ ऑल टाईम, माननीय श्री. सज्जाद जी लोन यांनी J&K मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sun, 03/01/2015 - 15:32 नवीन
इथले भाजप चे चिरपरिचित भक्त निवडणुकीपूर्वी असा दावा करत होते की काँग्रेस सत्तेसाठी कुणासोबत पण (ओमार अथवा मुफ्ती ) शय्यासोबत करेल . बिचाऱ्या भक्तांना मोदी देवानेच तोंडघशी पडले . ते जाऊ दे राष्ट्रगीत चालू असताना महबुबा मुफ्ती ची body language पाहिली का ? त्याहून मोठी गोष्ट म्हणजे सरकार ने ३७० कलम मागे घेतले जाणार नाही अशी भाषा वापरली आहे . ते जाऊ दे इथले भक्त या गोष्टीचे समर्थन करतील . बघतच राहा . बाय द वे सीमेवर गेल्या काही दिवसात मारल्या गेलेले जवान त्यांच्यासाठी collateral damage असावेत बहुदा . एवढं दुतोंडी सरकार देशाने कधी पाहिलं नसेल
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/01/2015 - 16:58 नवीन
>>> एवढं दुतोंडी सरकार देशाने कधी पाहिलं नसेल There is no change in the BJP’s stand on repealing Article 370 of the constitution, which guarantees special status to Jammu and Kashmir, Parliamentary Affairs Minister M. Venkaiah Naidu said Sunday. He replied in the negative when asked if the BJP had compromised on the issue to form a coalition government with the People’s Democratic Party (PDP). “We stand where we were and we will be,” he said. “Why will they accept our stand and why will we accept their stand?” he said, when asked whether the PDP had agreed to the Bharatiya Janata Party’s stand on the issue. According to sources privy to the developments, the two sides have possibly agreed on formation of a Committee which will go into the Armed Forces Special Powers Act (AFSPA) and suggest areas from where it could be revoked. On Article 370, while BJP has given no written assurance as demanded by the PDP, the CMP is expected to say that both parties will respect the aspirations of the people of the state within the Constitution. सत्तेसाठी आपली देशहिताची भूमिका न बदलता त्यावर ठाम राहणारे सरकार देशाने यापूर्वी कधीही पाहिले नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
आ
आजानुकर्ण Mon, 03/02/2015 - 15:33 नवीन
सत्तेसाठी आपली देशहिताची भूमिका न बदलता त्यावर ठाम राहणारे सरकार देशाने यापूर्वी कधीही पाहिले नसेल.
हम्म. सत्तेसाठी कायपण ही भाजपाची भूमिका कायमच ठाम राहिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रसाद१९७१ Tue, 03/03/2015 - 06:22 नवीन
गुरुजी, तुम्ही भाजपचे भक्त आहात हे मान्य. पण काय लेव्हलच्या चुकांचे तुम्ही समर्थन करत आहात? भाजपच्या मतदारांनी, पुढे भाजप पीडीपी शी लग्न करेल म्हणुन मते दिली होती का? इतकी सत्ता का हवी आहे भाजपला की कमरेचे पण सोडुन डोक्याला बांधावे. आणि तुमच्या सारख्या भाजप भक्तांना अजुन एक सल्ला. तुम्ही ह्या चुकांचे समर्थन करुन आणि असले प्रतिसाद लिहुन भाजपचेच नुकसान करत आहात. अश्या वेळी गप्प बसावे. नाहीतर तुमचे असले समर्थन बघुन सामान्य मतदार भाजप पासुन कायमचे दूर जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नांदेडीअन Tue, 03/03/2015 - 06:46 नवीन
तुम्ही ह्या चुकांचे समर्थन करुन आणि असले प्रतिसाद लिहुन भाजपचेच नुकसान करत आहात. अश्या वेळी गप्प बसावे. नाहीतर तुमचे असले समर्थन बघुन सामान्य मतदार भाजप पासुन कायमचे दूर जातील.
अगदी हेच होत आहे सध्या. माझ्या ज्या मित्रांनी ‘विकासासाठी’ म्हणून भाजपाला मत दिले होते, ते आता ‘आप’चा परफॉर्मन्स बघून आपले मत बदलत आहेत. अगदीच काही ‘आप’चे समर्थक वगैरे झाले नाहीत, पण आप हा पक्ष कॉंग्रेस-भाजपपेक्षा नक्कीच वेगळा आहे हे त्यांना कळून चुकले आहे. मी पूर्वी भाजपचा कट्टर विरोधक होतो (कॉंग्रेसचासुद्धा), पण भक्तांचे वागणे बघून मला आता भाजपवरच दया यायला लागली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
श्रीगुरुजी Tue, 03/03/2015 - 08:05 नवीन
मग तिथे भाजपने काय करायला हवे होते? तिथे तीन पर्याय होते. (१) कोणीच सरकार स्थापन न केल्याने राज्यपाल राजवट लावणे, (२) पीडीपी + नॅकॉ किंवा पीडीपी + काँग्रेस अशी युती होऊन सरकार स्थापन करणे आणि भाजपने विरोधात बसणे, (३) पीडीपी + भाजप असे सरकार स्थापन करणे. भाजप वगळता काश्मिर राज्यातील सर्व पक्ष पाकिस्तानविषयी व अतिरेक्यांविषयी सहानुभूती बाळगणारे व काश्मिरमधील हिंदूंकडे पूर्ण दुर्लक्ष करणारे आहेत. भाजप तिथे स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही. भाजपने विरोधात बसणे म्हणजे या उरलेल्या पक्षांना पुन्हा एकदा मुक्तहस्त देण्यासारखे आहे. तिथे राज्यपाल राजवट चालविणे म्हणजे अनागोंदी माजविण्यासारखे आहे. या ज्वलंत सीमावर्ती राज्यात फार काळ अनागोंदी परवडण्यासारखी नाही. भाजपकडे आता निदान सत्तेचा निम्मा तरी वाटा असल्याने या पक्षांना पूर्वीइतके मोकळे रान मिळणार नाही आणि पीडीपीच्या कारवायांवर काही प्रमाणात तरी नियंत्रण राहू शकेल. त्याचबरोबर भाजपला आपला पक्ष विस्तारण्यास संधी मिळेल. हुरियत सारख्या फुटीर संघटनांचे पूर्वीपेक्षा कमी लाड होतील. काश्मिरमध्ये श्रीनगर खोर्‍यात मुस्लिम बहुसंख्य आहेत, लडाखमध्ये बौद्ध व जम्मूमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपचे सर्व आमदार जम्मू विभागातील आहेत, तर पीडीपीचे सर्व आमदार श्रीनगर खोर्‍यातील आहेत. भाजपने गप्प बसून राहणे म्हणजे जम्मू विभागाला शून्य प्रतिनिधित्व मिळणे आणि पाकिस्तानवादी पीडीपी, नॅकॉ आणि काँग्रेसला मुक्तद्वार देण्यासारखे आहे. भाजपच्या निमित्ताने सत्तेत प्रथमच जम्मूला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले. काश्मिरमधील लाखो पंडीत कुटुंबे गेली २०-२५ वर्षे निर्वासित म्हणून दिल्लीत राहत आहेत. पीडीपी, नॅकॉ आणि काँग्रेसने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे (कारण उघड आहे). हीच मंडळी परत सत्तेत आली असती तर हे दुर्लक्ष कायम राहिले असते. परंतु आता भाजप सत्तेत आल्याने ही कुटुंबे परत आणण्याच्या हालचाली सुरू होतील. राहता राहिला प्रश्न मुफ्तीच्या प्रक्षोभक वक्तव्यांचा. अफझल गुरूच्या फाशीला पीडीपीचा सुरवातीपासूनच विरोध होता. त्यामुळे काल मुफ्ती जे बडबडला त्यात काहीच नवीन नव्हते. भाजपबरोबर सरकार स्थापन करताना पीडीपी व भाजप हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. निव्वळ पीडीपी नव्हे तर अरूंधती रॉय, ह्यूमन राईट्स वॉच अशा अनेकांनी अफझल गुरुच्या फाशीला विरोध केला होता. निवडणुक शांततेने पार पडल्याबद्दल पाकिस्तान व अतिरेक्यांचे आभार मानणे ही मुफ्तीची विचारपूर्वक केलेली चाल होती. भाजपबरोबर युती केल्याने नाराज झालेल्या या घटकांना चुचकारण्यासाठी व आपण आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहोत हा संदेश देण्यासाठी त्याने हे वक्तव्य केले. भाजपने तातडीने या वक्तव्याविरोधात आपली भूमिका मांडून आपण त्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. पुढे काय होईल याचा अजून अंदाज येत नाही. दोन्ही पक्ष अत्यंत परस्परविरोधी आहेत. मुफ्ती आपला फुटिरतावादी अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करेल आणि भाजप त्याला विरोध करेल. कदाचित ही युती अल्पकालीन ठरेल. परंतु भाजप विरोधात असता किंवा पीडीपीची इतर पक्षांबरोबर युती झाली असती तर पीडीपीला आपला अजेंडा नक्कीच पुढे रेटता आला असता. परंतु आता भाजप बरोबर असल्याने ते तितकेसे सोपे नाही. भविष्यात भाजपचे पूर्ण सरकार येण्याच्या दृष्टीने निदान भाजपचे पहिले पाऊल तरी पडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
आ
आजानुकर्ण Mon, 03/02/2015 - 15:32 नवीन
खरंय. भक्तांनी लगेच समर्थनही सुरु केलेले दिसते. जम्मू-काश्मीरबाबत काहीतरी वादग्रस्त विधान करणाऱ्या आपच्या नेत्यांविरूद्ध देशद्रोही वगैरे भाषा वापरणारे नमोरुग्ण आता पाकिस्तान-हुर्रियत-अतिरेक्यांचे आभार मानणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-पीडीपीच्या शय्यासोबतीबाबत काय करताहेत ते पाहायला जाम मजा येतेय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
न
नांदेडीअन Mon, 03/02/2015 - 15:38 नवीन
जम्मू कश्मीर में भाजपा के साथ गठबंधन में सत्ता संभालने के एक दिन बाद सत्तारूढ़ पीडीपी ने सोमवार को केंद्र की राजग सरकार से मांग की कि संसद पर हमले के दोषी अफजल गुरू के अवशेष लौटाये जाएं। पीडीपी के आठ विधायकों ने इस संबंध में बयान जारी कर कहा कि पार्टी अवशेषों की वापसी के लिए पूरी ताकत से लगे रहने का वादा करती है। - झी न्यूज २ मार्च २०१५
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/02/2015 - 16:16 नवीन
मुफ्ती काहीही बरळेल. किंबहुना तो असे बरळणार याची खात्रीच होती. मुफ्तीने निवडणुक यशस्वी पार पडल्याबद्दल जे विधान केले त्याबद्दल लगेचच भाजपने योग्य ते प्रत्युत्तर दिलेले आहे. मुफ्तीचा पक्ष किंवा अब्दुल्लाचा नॅशनल कॉन्फरन्स किंवा जम्मू-काश्मिरमधील काँग्रेस यांच्यात काहीही गुणात्मक फरक नाही. काँग्रेस मुफ्तीच्या बडबडीबद्दल त्याला चकार शब्दात जाब न विचारता भाजपने निवेदन करावे म्हणून मागे लागला आहे. वास्तविक मुफ्तीच्या मताशी असहमती दर्शवून मग भाजपला जाब विचारायला हवा होता. पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत. पीडीपी सर्वात मोठा पक्ष असल्याने व पॉडीपीला बहुमत नसल्याने त्यांना कोणत्यातरी पक्षाबरोबर युती करावीच लागली असती. पीडीपी, नॅकॉ आणि काँग्रेस हे एकाच विचारधारेचे पक्ष असल्याने त्यांची आपापसात युती होणे चांगले नव्हते. भाजप व हे इतर पक्ष हे दोन टोके आहेत. पीडीपी व भाजप एकत्र आल्याने निदान निम्मे मंत्री तरी वेगळ्या विचारसरणीचे असतील व भाजपमुळे पीडीपी वर नियंत्रण राहील. मुफ्ती वाटेल ते बरळणारच आणि त्यावर कोणीच नियंत्रण आणू शकत नाही. परंतु हुरियतशी चर्चा करणे, पाकिस्तानी निर्वासितांना सामावून घेणे, लष्कराला दिलेला विशेषाधिकार कायदा रद्द करून संवेदनाशील क्षेत्रातून लष्कर काढून घेणे, पाकिस्तानबद्दल व अतिरेक्यांबद्दल सहानुभूती बाळगणे इ. बाबतीत नॅकॉ व काँग्रेसने अजिबात विरोध केला नसता. पण भाजपचा या गोष्टींना विरोध राहील व त्यामुळे मुफ्तीला एककल्ली कारभार करता येणार नाही. अफझल गुरूबद्दल काश्मिरी पक्षांना पूर्वीपासूनच सहानुभूती होती. त्यामुळे मुफ्ती बडबडला त्याबद्दल नवीन काहीच नाही. फक्त मुफ्तीला कशाला दोष द्यायचा, भारतातील काही निधर्मांधांनी सुद्धा यापूर्वी अफझल गुरूबद्दल आपली सहानुभूती अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखविली आहे. (उदा. सुझन अरूंधती रॉय). मुफ्ती जे बडबडतो तेच भारतातील अनेक निधर्मांध अनेकवेळा बोललेले आहेत. जेव्हा भाजप सत्तेत नव्हता तेव्हा सुद्धा पाकिस्तानप्रेमी अनेकवेळा जाहीरपणे तसेच बोलायचे. त्यांचे तोंड बंद करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
आ
आजानुकर्ण Mon, 03/02/2015 - 20:19 नवीन
हहपुवा *mosking*
त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत.
*clapping* मग काँग्रेसी विचारांच्या पक्षाबरोबर भाजपाने युती का केली म्हणे? एवढं सत्तेवाचून नक्की काय अडलं होतं.
भाजपमुळे पीडीपी वर नियंत्रण राहील. मुफ्ती वाटेल ते बरळणारच आणि त्यावर कोणीच नियंत्रण आणू शकत नाही
*clapping* नियंत्रण राहील की राहणार नाही? भाजपामुळे अशा युतीतील घटकपक्षावर कितपत नियंत्रण राहते आहे ते महाराष्ट्रातही दिसतेच आहे!! बाकी प्रतिसाद आवडला आहे. राजनाथसिंग-मोदींसकट अनेक भाजपेयी देशभक्त मंत्र्यांसमोर मुफ्तींनी पाकिस्तानचे गुणगान गाऊनही खुर्चीसाठी युती टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहून फारच मनोरंजन होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/03/2015 - 08:24 नवीन
>>> मग काँग्रेसी विचारांच्या पक्षाबरोबर भाजपाने युती का केली म्हणे? एवढं सत्तेवाचून नक्की काय अडलं होतं. वर एका प्रतिसादात सविस्तर उत्तर दिलं आहे. >>> नियंत्रण राहील की राहणार नाही? भाजपामुळे अशा युतीतील घटकपक्षावर कितपत नियंत्रण राहते आहे ते महाराष्ट्रातही दिसतेच आहे!! बरळण्यावर कोणीच नियंत्रण आणू शकणार नाही. परंतु पाकिस्तानवादी, अतिरेक्यांना मदत देण्याची कृती, निर्वासित पंडितांकडे दुर्लक्ष इ. गोष्टी आता पीडीपीला अनिर्बंधपणे करणे शक्य होणार नाही. >>> बाकी प्रतिसाद आवडला आहे. राजनाथसिंग-मोदींसकट अनेक भाजपेयी देशभक्त मंत्र्यांसमोर मुफ्तींनी पाकिस्तानचे गुणगान गाऊनही खुर्चीसाठी युती टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहून फारच मनोरंजन होतंय. त्यात काहीच कसरत नाही. मुफ्तीचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे. त्यात नवे काहीच नाही. भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीतही मुफ्ती हेच करत होता. दोन्ही पक्षांनी आपापल्या भूमिका सोडलेल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सुनील Tue, 03/03/2015 - 03:58 नवीन
पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत
सईद यांच्या या वादग्रस्त वक्तव्याकडे काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल यांनी लक्ष वेधले. काश्मीर निवडणुकीच्या विविध टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी देत त्यांनी मुख्यमंत्री सईद यांचा दावा खोडून काढला. काश्मिरातील जनता, सीमेवर अहोरात्र तैनात सैन्यदल आणि निवडणूक आयोगाला या निवडणुकीचे श्रेय जाते, असे सांगून, सभागृहाने सईद यांच्या विधानाचा निषेध करणारा प्रस्ताव करावा, अशी वेणुगोपल यांनी केली. पाकिस्तान आणि हुर्रियतच्या सहकार्यामुळे निवडणूक यशस्वी झाल्याचे आपण पंतप्रधानांना सांगितल्याचा दावा मुख्यमंत्री सईद यांनी केला आहे. त्यामुळे सईद यांच्याशी काय बोलणे झाले हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. मुलायमसिंह यादव यांच्यासह अनेक सदस्यांनी या मागणीला पाठिंबा दिला, पण गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही मागणी फेटाळून लावली. (स्त्रोत - http://maharashtratimes.indiatimes.com/international/Afzal-guru/articleshow/46438107.cms) असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/03/2015 - 08:15 नवीन
याच बातमीतला खालील शेवटचा परिच्छेद द्यायचा विसरलात का मुद्दाम देण्याचे टाळले?
सईद यांच्या विधानाशी केंद्र सरकार आणि भाजप पूर्णपणे असहमत असल्याची भूमिका राजनाथ सिंह यांनी मांडली. आपण हे विधान विचारपूर्वक आणि पंतप्रधान मोदी यांच्या सहमतीने करीत असून, त्याविषयी कोणताही वाद वा संभ्रम निर्माण होऊ नये. जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीचे श्रेय निवडणूक आयोग, लष्कर आणि निमलष्कराचे जवान तसेच तेथील जनतेला जाते, असे राजनाथ सिंह म्हणाले.
राजनाथ सिंग यांनी अगदी स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात काश्मिरमधील शांततेत पार पडलेल्या निवडणुकीचे श्रेय काश्मिरमधील जनतेला, निवडणुक आयोगाला व लष्कराला दिले आहे. त्यामुळे यावर अजून काही वेगळे बोलण्याची गरज नाही. भारतात अनेकजण, अनेक ठिकाणी, अनेकवेळा प्रक्षोभक विधाने करत असतात. अशा प्रत्येक विधानाचा संसदेत निषेध व्हायचा असेल तर दरवर्षी फक्त निषेधासाठी संसदेचे एक वेगळे अधिवेशन बोलवावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Tue, 03/03/2015 - 08:54 नवीन
माझा प्रतिसाद तुमच्या खालील वाक्याबद्दल होता.
पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत
ते चुकीचे आहे, हेच सिद्ध करायचे होते, जे झाले आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Tue, 03/03/2015 - 10:21 नवीन
आता इकडे प्रतिवाद नाही. कारण ते त्यांना सोयीस्कर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा