Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सिकोया नॅशनल पार्क

ख
खटपट्या
Tue, 12/23/2014 - 01:06
💬 36
राम राम मंडळी, गेल्याच शनिवारी सिकोया नैशनल पार्क ला जाऊन आलो. सिकोया नैशनल पार्क हे नेवाडा राज्याच्या दक्षिणेला लागून आहे. या नैशनल पार्कची स्थापना २५ सप्टेंबर १८९० साली झाली. हे पार्क ४०४ ०६३ एकरावर पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून ची उंची १४,५०५ फुट. किंग कैनियोन नैशनल पार्कला लागून असलेले हे पार्क मोठमोठाल्या प्राचीन वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे. शनिवारी सकाळी लवकर निघून संध्याकाळी लवकर परत येण्याचा बेत होता पण शुक्रवारी मजबूत पार्टी झाल्यामुळे सकाळी लवकर उठणे झाले नाही आणि निघू निघू म्हणता १० वाजले. हे जंगल अस्वलांसाठी प्रसिध्द आहे पण आम्हाला एकही दिसले नाही. हिवाळा असल्यामुळे जंगलाचा उंच भाग बर्फाच्छादित झाला आहे. पहाण्यासारखी जी ठिकाणे होती त्यापैकी बरीचशी हिवाळ्यामुळे बंद होती त्यामुळे हिरमोड झाला. परत एकदा फेरी मारून ती ठिकाणे कव्हर करण्याचा विचार आहे. माझ्याकडे एसएलआर कैमेरा नाहीये त्यामुळे साम्सुंग नोट २ ने काढलेले फ़ोटो. नुकताच पाउस पडून गेल्यामुळे रस्त्याच्या आजुबाजुला हीरवळ होती. वातावरणही अल्हाददायक होते. abcd abcd abcd ५० मैल गाडी चालवल्यावर बर्फाच्छादीत शिखरे दिसू लागली. abcd पहील्याच स्पॉट्ला फोटो काढायला थांबल्याबरोबर तिथल्या मुली आमच्या बरोबर असलेल्या सरदारजींना फोटो काढण्याची विनंती करु लागल्या. काय त्या लोकांना एवढं सरदारजींचं आकर्षण काय माहीत.. abcd बर्फाच्छादीत डोंगर जवळ आले. abcd पुढे असणारा सर्व रस्ता स्वप्नवत होता. abcd abcd abcd हा शरमन ट्री स्पॉट. चित्रात दिसतेय ते एक शौचालय आहे. एवढे सुंदर शौचालय मी कधी पाहीले नव्हते. abcd abcd आणि हेच ती प्रसीद्ध मोठमोठाले व्रुक्ष !! abcd abcd प्रवासात मधे मधे दिसणारी ही हिमशीखरे !! abcd abcd abcd abcd खालील फोटो थोडा लांबून घेतल्यामुळे अंदाज येत नाहीये पण झाडांचा बुंधा १० फुटांपेक्षा जास्त रूंद होता. abcd

प्रतिक्रिया द्या
11530 वाचन

💬 प्रतिसाद (36)
म
मुक्त विहारि Tue, 12/23/2014 - 01:12 नवीन
फोटो सुंदर...
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 12/23/2014 - 01:38 नवीन
हा धागा वाचला अन अमेरिकेत आल्यावरच्या माझ्या पहिल्या सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या. Image removed. कुठे राहिला होता तिथे? आम्ही लोक पार्क सुरू होण्यापूर्वी थ्री रिव्हर्स नावाचे लहानसे गाव लागते तिथल्या एका लहानशा मॉटेलमध्ये राहिलो होतो.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 12/23/2014 - 01:46 नवीन
राहीलो नव्हतो, १८० हायवे ने बाहेर पडलो, फ्रेस्नोला जेवलो आणि बेकर्सफील्ड्ला येउन पिके बघितला. एकदम धावपळीत गेला दीवस. रात्री उशीर घरी पोहोचलो. थंडी नसताना जायचा विचार आहे परत तेव्हा राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ख
खटपट्या Tue, 12/23/2014 - 01:48 नवीन
बाकी बाईक मस्त आहे. बहूगुणी यांनी दीलेल्या धाग्यावरून भाड्याने गाडी घ्यायचा विचार आहे. पण लायसनचे महादीव्य पार करावे लागणार आधी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मुक्त विहारि Tue, 12/23/2014 - 01:49 नवीन
सहलीला गालबोट की तीट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 12/23/2014 - 02:01 नवीन
हो ना राव ! मस्त दिवस मजेत गेला होता. चित्रपट बघून मुड गेला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 12/23/2014 - 02:07 नवीन
खाली उतारा देत आहे... मस्त कुटुंबाबरोबर एंजॉय कर... http://www.youtube.com/watch?v=twqF4T7epf0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 12/23/2014 - 02:18 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 12/23/2014 - 02:42 नवीन
हेरॉल्ड लॉइड विषयी नक्कीच लिहीन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
श
श्रीरंग_जोशी Tue, 12/23/2014 - 01:54 नवीन
एकदम निवांतपणे वेळ घालवण्यासाठीचे उत्कृष्ट ठिकाण आहे हे. पुढल्या सहलीसाठी शुभेच्छा!! येथील मोरो रॉकच्या शिखरावरून पाहिलेला सुर्यास्त मी पाहिलेल्या स्वर्गीय सुर्यास्तांपैकी एक आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मुक्त विहारि Tue, 12/23/2014 - 01:50 नवीन
बाइक मस्त आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 12/23/2014 - 01:57 नवीन
तेथे भेटलेल्या जपानी पर्यटकांची बाइक होती ती. फोटो काढण्यापुरती संधी साधली मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 12/23/2014 - 02:08 नवीन
हा हा हा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ग
गिरीश मांधळे Tue, 12/23/2014 - 05:06 नवीन
मस्त.nps.gov संकेतस्थळावर अमेरिकेतील सर्व राष्ट्रीय उद्द्यानांची छान माहिती दिलेली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 12/23/2014 - 05:20 नवीन
मस्त फोटो. जोशीबुवा तर एकदम हीरो दिसायलेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/23/2014 - 06:12 नवीन
मस्त... खटपट्याराव अवं तुमचा फोटु बी येउदे की... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 12/23/2014 - 07:21 नवीन
काय त्या लोकांना एवढं सरदारजींचं आकर्षण काय माहीत
जळजळ म्हणतात ती हिच असावी ;)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 12/23/2014 - 07:23 नवीन
तर तर जळजळ तर होणारंच !! पुढच्या वेळेला मीपण पगडी घालून जाणार आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
किल्लेदार Tue, 12/23/2014 - 14:21 नवीन
किल्लेदार सिंग :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सस्नेह Tue, 12/23/2014 - 10:08 नवीन
छानच . मस्त फोटो.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 12/23/2014 - 12:55 नवीन
आलेत. पण एका फोटोत तो सरदारजी असा का उभा आहे?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 12/23/2014 - 18:26 नवीन
अहो तो असाच स्टाईल मधे उभा असतो नेहमी !! एकदम अधुनिक सरदार आहे तो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
ट
टवाळ कार्टा Wed, 12/24/2014 - 04:27 नवीन
कदाचित आधीच्या फोटोमुळे बसता येत नसेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ट
टवाळ कार्टा Wed, 12/24/2014 - 04:28 नवीन
म्हणजे कठड्यावर बर्फ वगैरे लागले असेल की त्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खटपट्या Wed, 12/24/2014 - 04:44 नवीन
हम्म्म :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
दिपक.कुवेत Wed, 12/24/2014 - 12:54 नवीन
मला वेगळिच शंका आली....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सखी Tue, 12/23/2014 - 14:24 नवीन
छान फोटो आणि वर्णन. श्रीजोंनी काढलेला सुर्यास्ताचा फोटोपण छान आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हुकुमीएक्का Tue, 12/23/2014 - 19:31 नवीन
सर्व फोटो मस्त आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 12/23/2014 - 20:54 नवीन
मस्स्स्स्स्स्त फ़ोटुज!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 12/23/2014 - 21:35 नवीन
"प्रवासात मधे मधे दिसणारी ही हिमशीखरे !!" या वाक्याखालचा फोटो तर एकदम चित्रवत.
  • Log in or register to post comments
ट
टिल्लू Tue, 12/23/2014 - 23:25 नवीन
सिकोया अगदी मस्त आहे, आम्ही आर-व्ही करुन लॉजपोल कॅम्पवर एक दिवस मुक्कम केला होता. हा कॅम्प छान होता, गर्द झाडी, छोटी नदी, समोर बर्फाच्छादीत शिखरे, दिवसभर स्नो फॉल होत होता, आम्हाला अस्वलही दिसले होते. तुमचे फोटोज पाहून आठवणी ताज्या झाल्या.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 12/24/2014 - 01:50 नवीन
सर्व प्रतीसादकांचे धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/25/2014 - 10:23 नवीन
सुंदर प्रकाशचित्रे! सिकोया नॅशनल पार्क आणि योसेमिटी नॅशनल पार्क एकच आहेत का? मी १९९१ मध्ये योसेमिटी नॅशनल पार्कला भेट दिली होती. तिथे तो जगप्रसिद्ध २५०० वर्षे वय असलेला महाकाय वृक्ष होता. त्याच्या जवळच एक दुसरा महाकाय वृक्ष होता ज्याचे खोड करून त्यातून मोटारींसाठी रस्ता काढला होता. योसेमिटी नॅशनल पार्क अत्यंत सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 12/25/2014 - 18:31 नवीन
योसेमिटि आणि सिकोया हे वेगवेगळे नॅशनल पार्क आहेत. योसेमिटि उत्तरेला आहे आणि सिकोया योसेमिटिच्या दक्षिणेला आहे. दोन्ही पार्क सीरा नॅशनल फॉरेस्ट्ने जोडली गेली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ही दोन्ही पार्कस अत्यंत स्वछ ठेवली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पैसा गुरुवार, 12/25/2014 - 11:13 नवीन
छान लिहिलंय आणि फोटो जास्त आवडले!
  • Log in or register to post comments
अ
अगम्य Tue, 01/27/2015 - 07:33 नवीन
सिकोया नॅशनल पार्क येथे जगातील सर्वात मोठा वृक्ष (actually the largest living thing by volume on earth ) आहे. त्या झाडाला यादवी युद्धात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या जनरल शेर्मन यांचे नाव दिले आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा