अफलातून धंदे
नुकत्याच भारत भेटीमध्ये एका मित्राने काही किस्से सांगितले. मुंबईत लोक कायकाय धन्दे करतील याचा नेम नाही :
१) काही लोक अमेरिकेत ट्रस्ट चालवतात आणि अमेरिकेतून वापरलेले कपडे हिंदुस्तानात गरीब लोकांना वाटण्यासाठी घेऊन येतात (विना मुल्य आणि विना इम्पोर्ट ड्युटी) आणि मुंबईत रस्त्यावर `स्वस्त कपडे' म्हणून विकतात.
२) काल एक माणूस ऑफिस मध्ये आला होता. माझ्या गाडीचा एक्सिडेंट राजेस्थानला झाला, ड्रायवर पळून गेलाय. म्हणून दुसऱ्या एका ड्रायवरला राजेस्थानच्या एका गावात पोलिस स्टेशन मध्ये हजर करण्यासाठी घेऊन जातोय, साला १०००० मागतोय, कारण १ दिवस जेल मध्ये बसावे लागेल. पण ५००० वाला कोणीही मिळत नाही, म्हणून ह्याला झक मारून घेऊन जावे लागणार'
म्हणजे एक्सिडेंट करणारा दुसराच कोणीतरी, हजर होणारा वेगळाच, जो हजर होणार त्याला १०००० आणि पाळलाय तो सुद्धा सुखी, `साला पोलिसांच्या लफड्या मध्ये अडकलो नाही'
३) काही लोकांचा धंदा म्हणजे आर.टी.आय. फाईल करणे आणि नंतर त्या कंपनीला, त्याच्या मालकाला आर.टी.आय. च्या आधारे मिळवलेल्या माहितीद्वारे ब्ल्याकमेल करून पैसा कमवणे.
४) आर.टी.आय वरून ब्ल्याकमेल करत असणाऱ्यांना बदडवून काढणे आणि पैसे कमवणे.
संदर्भ- अभय अनिल जोशी ,डहाणू. यांच्या अनुभवांवर आधारित
(मटार उसळ आणि शिक्रण जरा जास्तच खाल्लेले दिसतेय.) +D
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihantमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihantह्या धंद्यात नक्की बेकायदेशीर काय हे समजले नाही.??? हा धंदा(?) : (अ) लोकांना बेकायदेशीर वागायला (विनातिकीट प्रवास करायला) प्रोत्साहन देतो, आणि (आ) सार्वजनिक सेवेचे लक्षणीय नुकसान करतो (पकडलेल्या लोकांना नुकसानभरपाई देउन एकूण "प्रमियम (!?)" मधून जे पैसे उरतात... ते हा गैरव्यवहारी उपद्व्याप बक्कळ फायद्याचा असल्याशिवाय होत नसणार. म्हणजे सार्वजनिक सेवेचे तेवढे नुकसान नाही काय ?) हा धंदा(?) बेकायदेशीर नसेल तर विमा कंपन्यांनी बँक लुटारूंना विमा संरक्षण देण्याची कायदेशीर स्कीम काढायला हरकत नाही :)नेहेमी पास घेऊनच प्रवास करणारा प्रवासी एखाद दिवशी पास घरी विसरला आणि पकडला गेला तर, त्याने TC शी मांडवली करण्यापेक्षा सरळ दंड भरावा आणि त्या ग्रूपकडून (विमा घेतला असल्यास) परतावा घ्यावा, अशीही व्यवस्था असू शकेल, असे कुणालाच कसे वाटले नाही?हा पण गुन्हाच नाही काय ? एखादी अवैध गोष्ट नेहमी केली तर गुन्हा आणि कधीमधी केली तर योग्य असे होउ शकत नाही.