पाककृती
मुळ्याचा ठेचा
Primary tabs

साहित्यःमुळा चकत्या १ मोठी वाटी
मुळ्याचा पाला १ मोठी वाटी
कोथिंबिर २ चमचे
मिरच्या ७ ते ८ (आवडिनुसार)
लसुण ३ पाकळ्या
जिरे १/२ चमचा
लिंबु रस १ चमचा
मीठ
साखर
तेल

कृती: मुळ्याच्या चकत्या आणि मुळ्याचा पाला ठेचुन घ्यावा.ठेचायला शक्य नसेल तर मिक्सरवर जाडसर एकत्र वाटुन
घ्या.
कोथिंबिर्,जिरे,मिरच्या आणि लसूण एकत्र वाटुन घ्या.
कढईत मोहरी,हिंग,हळदिची फोडणी करून त्यात मिरचीचे वाटण घाला.एकदा परतुन घ्या.
त्यात ठेचलेला मुळा आणि मुळ्याचा पाला टाकावा.
पाला भरपुर परतुन झाल्यावर मीठ्,किंचीत साखर टाकावी
एक वाफ आल्यावर लिंबाचा रस घालावा.छान एकत्र केले कि मुळ्याचा ठेचा तयार.
हा ठेचा थोडा तिखटच असावा.गरम भाकरी,घट्ट दहि आणि मुळ्याचा ठेचा थंडित मस्त लागतो.

नक्की करणार
मस्त प्रकार , आजच करुन पाहते
सॉलिड दिसतय. मुळा आवडत नाही खर तर. पण आता करुन पहाव लागेल.
न क्की क रु न ब घे न.
म स्त पा क क्रु ती.
मस्त प्रकार! आणि ते ताट काय सॉल्लिड दिसतंय!
मुळ्याची भाजी माझी आवडती. ठेचा तर आणखी चमचमीत लागेल. नक्की करणार गं.
फोटोपण छान आलेत. घट्ट दही... तोंपासू!
:smile:
मुळा आणलाय.हम्म....
सुंदर फोटो व सोप्पी पाकृ!
आणि महत्त्वाचे म्हणजे आरोग्यदायी पाकृ!!
मनापासून धन्यवाद.
अरे भारी एकदम..तोंपासू
मस्तच.....
वेगळा प्रकार
हे मिश्रण वापरून पराठे पण रापचिक होतात! दह्याबरोबर अफलातून लागतात!
छान
मुळ्याची मुळ चव आवडत नाही पण हे असे इतर चवींचे संस्कार करुन खाऊ शकते. त्यामुळे नक्की करणार.
हा वेगळा प्रकार करुन पहाते. नशिबाने परड्यात मुळे आलेत! :)
अपर्णाताई, परड्यातले मुळे म्हणजे क्कायच्या क्काय चव येणार गं!
घरच्या ताज्या कोवळ्या मुळ्याचा पाला मस्तच लागेल अपर्णाताई.करुन बघा.=) :smile:
छान पा़कृ. ताट मस्त दिसतयं इशा :)
केला.मस्त झालाय._/\_
'मुळातच ठेचा' असे नाव वाचले गेल्यामुळे हा लेख पाकृमध्ये आल्याचे नवल वाटले. हा लेख 'धोबीपछाड' मध्ये येणे अपेक्षित होते. असो, मस्त पाकृ, तोंपासु.
करून बघणार.
आम्ही कोणत्याही ठेच्याची सामग्री शक्यतो अगोदर तव्यावर परतून घेतो आणि मग ठेचतो.
एकदा असा करून पाहिला पाहिजे.
मस्त प्रकार , आजच करुन पाहते
एक शंका.
मुळा मिक्सरमधून काढल्यावर परतताना गोळा होत नाही का ?
थोडा जाडसर करायचा मिक्सरमधे म्हणजे गोळा नाहि होत.
मी ही मुळे घेतले, आमच्या कडे रोज छान गावठी भाज्या मिळतात, मुळे ही मिळाले. आज उद्या करुन पाहते.
हा पदार्थ पहिल्यांदाच बघतिये. छान दिसतोय.
नक्की करून पाहतो. फ़ोटो आणि वर्णनावरून छान पदार्थ आहे असे वाटते.
पा.कृ चविष्टं वाटते आहे.
पण मुळ्याचा वास .. जो , त्यावर कितीही संस्कार केले तरी जाता जात नाही,
त्या मूळे कराविशी वाटत नाहीये.
विस्फोटक पाककृती ;)
हिवाळ्यात दिल्लीत मिळणारे मुळे गोड असतात. कालच मुळ्याचे परांठे केले होते. मुळ्याची दही घातलेली कोथिंबीर ही मस्त लागते. सरसों च्या साग बरोबर किसून त्यात वरती पसरवलेला मुळा, मस्त स्वाद येतो. मुळा, मुळ्याचा पाला, बेसन लाऊन ही भाजी मस्त होते. शिवाय धिरडे ही मस्त लागतात.
कोवळा आणि मध्यम आकाराच्या मुळ्याचे वरचे साल काढून, त्याला अर्धी चीर देऊन त्यात चाट मसाला व वरून लिंबू पिळून ठाकले कि मस्त स्वाद येतो. दिल्लीत ठेल्यांवर हे मुळे खायला मिळतात. आम्ही घरी सुद्धा मुळे कापून त्यात चाट मसाला आणि लिंबू लाऊन सलाड सारखे खातो. असो.
अहो एव्हढ लिहीलत पण, एखादा शब्द ही पाककृती कशी वाटतेय, त्याबद्दलही येउ दे. की मुळा पुराणात विसरुन गेलात?
पदार्थाच्या आठवणीने लिहीता लिहीता 'श' चा 'थ' झालाय का? ;)
थंडी मधे अश्या अस्सल करंट देणार्या पाककृती(विशेषतः शेवटच्या फोटूं सारखे ,फोटू टाकून! :-/ ) टाकू नयेत, अशी विणम्र सुच्णा करुण आम्मी आम्चे दोण श्ब्द संपवितो..धण्यवाद!
आह्ह... ठेच्याच्या या वेगळ्या पाकॄ बद्धल धन्स ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये जो चिलमन हैं, दुश्मन हैं... { मेहबूब की मेहंदी (१९७१) }
याला आम्ही मुळ्याचा भगरा म्हणतो. ज्वारीच्या भाकरीबरोबर चांगला लागतो. आम्ही नेहमी करतो परंतू चवीला साखर आणि लसूण घालत नाही. माझ्या मते दोन शहाणे एकत्र नांदत नाहीत (मुळा आणि लसूण दोन दर्पवाले पदार्थ एकाच भाजीत).
काल करुन पाहीला , मस्तच लागला, एक वेगळा प्रकार मिळाला खाण्यासाठी, ज्वारीच्या भाकरी बरोबरच खाल्ला.
धन्यवाद कविता..
हयाच मिश्रणात कणिक [गव्हाचे पीठ ] मिसळुन तिखट मिठ अड्जस्ट करुन थालिपीठ पण छान होतिल
छान वाटतेय, नक्की करून पाहते.
नवीनच प्रकार ,नक्की करणार
आणखी पौष्ठिक करायाचे असेल तर त्यात कणिक [गव्हाचे पीठ ] आणि ईतर पीठे उदा. ज्वारीचे, बाजरीचे, तांदुळाचे पीठ व चणा डाळीचे पीठ पण घालु शकता.
काल केला . मस्त आहे रेसिपी. एक नवीन पदार्थ Ad झाला. धन्यवाद.
सुदैवाने घराजवळ काही कच्छी लोक भाज्या पिकवतात, पाणि चांगले आहे. त्यामुळे मूळे ताजे मिळाले.
हा ठेचा वापरून परोठे करायचा विचार आहे.
@भ ट क्या खे ड वा ला..करून बघितलात आणि पोच दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
@ चिजय..हो हा ठेचा वापरून थालीपीठ्,पराठे छान होतात.
कहर !
करायलाच हवा हा ठेचा !
तुझा नाव इशा १२३ बदलून ठेचा १२३ ठेवायला हवं . ठेच्यांचा भांडार आहे तुझ्याकडे. मुळा मला मनापासून आवडतो आणि तुझ्या फोटो मुले अजून च टेम्प्ट व्हायला झालंय.
तशी माझ्याकडे पण खूप मोठी लिस्ट आहे ठेच्ण्यासारख्या गोष्टींची :P तुझ्याकडे पाक्रु असली तर दे ;)
कुणाला ठेचायचे आहे त्यावर कृती ठरेल.तु सांग तशी पाकृ देतेच.=b :tongue:
सुमडीत सांगते तुला ;)
पंजाबि लोक करतात तसलि मुळ्याच्या पराठ्याचि रेसिपि जर कोणाकडे असेल तर कृपया शेअर करा.