Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गंध तुझे

स — सार्थबोध, Fri, 12/26/2014 - 05:59
ये जरा भेटायला, घे ओंजळीतले फुल माझे गंध सेवण्या तयाचा, काय सांग जाते तुझे ll १ ll कळ्या पाकळ्या लाजतील, येता तुझ्या हातावरी मृदू पाकळ्या केसरांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll या किनारी वाळूवरी, पुसती जरी साऱ्या खुणा तू अशी साथ असता, पौर्णिमेचा रंग सजे ll ३ ll सखे ग सहवास तुझा, रंगतो निळया लाटांपरी पुन्हा होईल भेट तोवरी, लाट वाहील काय ओझे ll ४ ll - सार्थबोध http://www.saarthbodh.com/2014/08/blog-post.html

प्रतिक्रिया द्या
1747 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/26/2014 - 06:19 नवीन
'सेवण्या' शब्द जरा दाताखाली आलेल्या खड्यासारखा वाटतो. बाकी, छान कविता. आवडली. शेवटची ओळ केवळ क्लास. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 12/26/2014 - 12:01 नवीन
काहीशी साठोत्तरी कवितांच्या आधीच्या शैलीतील एक सरळ साधी कविता. विलक्षण गेयता आणि माधुर्य. प्रीतीची उत्कटता. स्वप्नाळूपणा आणि प्रेयसीची मृदू आळवणी. अशा कविता हल्ली फारच कमी दिसतात. त्यामुळे मुद्दाम लॉगइन करून प्रतिसाद लिहीत आहे. किंचितसे बदल मला करावेसे वाटले तसे खाली दिले आहेत. पहा आवडताहेत का! ये जरा भेटायाला, घे ओंजळीतले फूल माझे गंध सेवना तयाचा, काय सांग जाते तुझे || १ || कळ्या-पाकळ्या लाजतील, येता तुझ्या हातावरी मृदू पाकळ्या केसरांस, जरा जडू दे गंध तुझे || २ || या किनारी वाळूवरी, पुसती जरी साऱ्या खुणा तू अशी संगे असता, पौर्णिमेचा रंग सजे || ३ || सखे गं सहवास तुझा हा, रंगतो निळया लाटांपरी पुन्हा होईल भेट तोवरी, लाट वाहील काय ओझे || ४ ||
  • Log in or register to post comments
स
सार्थबोध Mon, 12/29/2014 - 09:28 नवीन
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा