Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गंध माझे

ट — टवाळ कार्टा, Fri, 12/26/2014 - 06:16
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29834 वर्जीनल कवीची मापी मागून :) ------------------------------------------------------------------------ ये जरा "बसायला", घे बाटलीतले तीर्थ इथे गाठी शेवया मागाया, काय सांग जाते तुझे ll १ ll अट्टल पिणारे लाजतील, येता (बाटली) तुझ्या हातावरी अंगावरल्या समस्त वस्त्रांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll या शर्ट-प्यांटवरील, पुसती जरी साऱ्या खुणा ती अशी खमकी असता, गालावरचा रंग सजे ll ३ ll सखे ग सहवास तुझा, रंगतो लाल गालांवरी पुन्हा होईल भेट तोवरी, ग्लास वाहील काय ओझे ll ४ ll - पीकेबोध

प्रतिक्रिया द्या
10596 वाचन

💬 प्रतिसाद (38)
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 06:31 नवीन
प्रगती होत आहे. ("झेंडूची फुले आणि मिपाची काव्य सुमने" ह्या विषयावर पी.एच.डी. करावीशी वाटते.)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 06:33 नवीन
ठ्यांकू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रमोद देर्देकर Fri, 12/26/2014 - 06:31 नवीन
"अ"त्म्याचे शिष्यगण तुम्ही, लागले तुम्हास भाग्य असे, हव्या तेवढ्या जिल्ब्या पाडु, शब्दांचे वावडे नसे, काव्य करु नवे वा करु विडंबन अनुभवांचे बोल जसे, शाब्दिक बाण पोकळ ते, उगा कोणी ना रुसुन बसे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 06:35 नवीन
पम्या... लाख मोलाचे बोललास. इस बात पे एक मिसळ खावू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 06:36 नवीन
आधी त्याला कोणीतरी खरोखर बघू दे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 06:48 नवीन
तुला ना नसत्या शंकाच फार. अरे मिसळीचे नांव काढल्यावर पम्या येणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रमोद देर्देकर Fri, 12/26/2014 - 06:55 नवीन
काय रे सारखं तेच तेच. तु आधी ठाण्याच्या कट्टया अगोदर कुठे दिसला होतास काय? त्यात फोटोही अस्पष्ट. आणि तुलाही शक्य झालं तेव्हाच ना तु हजेरी लावलीस? आणि तुलाच भेटायला वावडे आहे. म्हंटलं तर तु कधीही भेटु शकतोस. तिकडे पुण्याला बघ दोघे असले तरी भेटतात. पण नाही.जावु दे. शिवाय मला तुझी बाईक बघायची आहे. सल्ला हवा आहे. कारण मला पण बाईक घ्यायची आहे. @ मुवी :- तुम्हाला तहसिलदारची एक मिसळपाव माझ्याकडुन लागु. आपण दोघेच जावु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 06:59 नवीन
तुला चिटकलेले कारण लगेच निघणार नाही...सगा कडून ना हरकत प्रमाणपत्र आण तसे :) फोटोही अस्पष्ट >> ह्याला कारण मी कसा काय "मला तुझी बाईक बघायची आहे." "सल्ला हवा आहे. कारण मला पण बाईक घ्यायची आहे." >> संबंध काय या २ वाक्यांचा...तुझ्या रिक्वायरमेंट व्यनी कर...मी सुचवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
प्रमोद देर्देकर Fri, 12/26/2014 - 07:07 नवीन
व्यनी केलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 08:16 नवीन
कृपया "बाइक कशी हवी आहे ते मलाच माहिती नाही कारण माझा गोंधळ उडालाय." अशी रिक्वायरमेंट पाठवू नये...मी ब्रम्हदेव नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 07:04 नवीन
कशाला चिडतोस? आणि टका, घे की जरा समजून... मस्त धागा काढला आहेस, घेऊ की जरा आस्वाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 07:16 नवीन
घेतले समजून...घेउ आस्वाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सस्नेह Fri, 12/26/2014 - 06:45 नवीन
एकंदर, आत्मुसबुवांचा शिष्यगण वाढीस लागला आहे खरंच ..!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 06:46 नवीन
इथे "बाटली" संप्रदाय असेल तर आत्मुबुआ त्यात असतील असे वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
प्रचेतस Fri, 12/26/2014 - 06:48 नवीन
सहमत आहे. मात्र ह्यालाही अपवाद आहेच. आत्मूदांनी एकदाच कच्ची ताडी वापरली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 06:53 नवीन
=)) पण त्या ताडीचा उपयोग "त्याच" कामासाठी केलेला...तस्मात ते बाटली काव्य नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सस्नेह Fri, 12/26/2014 - 06:49 नवीन
बाटली-संप्रदायाचे काही माहिती नाही बॉ ! आम्हाला 'किंचित'कवी संप्रदाय अभिप्रेत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 06:54 नवीन
'किंचित'कवी...हा हे चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 06:57 नवीन
आजकाल तू चक्क कविता का करायला लागला आहेस? "आदमी सिर्फ दो ही बार कवि बनता है. या तो कोई मिलने के बाद या किसी को खोने के बाद" अँटोनी चारसोबीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 11:43 नवीन
सूडला सांगितले तेच परत http://misalpav.com/comment/644394#comment-644394
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रमोद देर्देकर Fri, 12/26/2014 - 07:00 नवीन
किंचित'कवी..>>>> नको नको "किंकाळणारे कवी" कसे वाटते बघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नाखु Fri, 12/26/2014 - 10:05 नवीन
"किंचीत" ऐवजी "कुंथीत" कवी परस्पर भागवत मित्रमंडळ ओसाडवाडी खु||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 10:11 नवीन
मग डायरेक्ट अजरामर "मल कुन्वीत" ठेउया की नाव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 06:50 नवीन
त्यांची बाटली वेगळी... आपण नशेत बाटलीतले द्रव्य इकडे-तिकडे उडवतो. बुवांच्या बाटलीतले द्र्व्य आधी उडते आणि मग नशा चढते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 06:55 नवीन
अत्तराचे बाटली असे पूर्ण लिहा...गैरसमज नको ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 12/26/2014 - 07:07 नवीन
साता समुद्रापार गेलेले आहे... विशेषतः "कस्तूरी-हीना." तो बुवा नाहीये तो पर्यंत मज्जा करू. आला की तुला आणि मला दणके मिळणार. बंदूका आणि स्टेनगन, अगोबा आणि खाटूक साठी राखीव ठेवल्यात, असे तो मला काल स्वप्नात सांगत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
स्पंदना Fri, 12/26/2014 - 10:57 नवीन
टक्स! जमतयं, जमतयं, आता जर्र्र्र्राआआआआआअ वळण घ्या आनी हुन जौ दे खरी खुरी कविता. विडंबनावर कीती दिवस भागणार तुमच?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 11:32 नवीन
शंकाच आहे...मी ना सध्ध्या प्रेमात आहे...ना प्रेमभंगाचे दुखः घेउन जगतोय...ना हे जग "दवणीय" वाटते...ना मिपावर कोणाशी पंगे घेउन विद्रोही साहित्य लिहिले जाईल...त्यामुळे जशा जिल्ब्या पडत जातील तसेच एक दिवस कविता जमेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
सूड Fri, 12/26/2014 - 11:09 नवीन
अर्र्र्र्र्र्र!! पार खरडफळा करुन टाकलाय राव धाग्याचा. तुमच्या गुरुंच्या शौचकाव्यांची सर नाही याला. तांब्या, पीठ, डोसा, जिल्बी, बुळुक्कन, हीहीही असे शब्द न दिसल्याने भ्रमनिरास झाला. =))))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 11:28 नवीन
अजूनही हात अडखळतात "ते" शब्द लिहिताना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 12/26/2014 - 11:36 नवीन
सिरीयस नोटः काव्य लिहायचंच असेल स्वत:चं असं काहीतरी लिवा आणि स्वतःला मनापासून आवडलं तरच मिपावर टाका. दिसामाजि काहीतरी लिहील्याने फक्त वेळ वाया जाईल, नंतर अति झालं आणि हसू आलं अशी गत होईल. अर्थात तुम्ही काय करावं हा तुमचा प्रश्न आहे, मी एक निरीक्षण नोंदवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 11:41 नवीन
भौ...विडंबन मनापासून होतेय म्हणून लिहितोय...मला नाही आवडले तर मी इथे लिहिणारच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 12/26/2014 - 11:42 नवीन
जशी आपली इच्छा!! ॥इति लेखनसीमा॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अजया Fri, 12/26/2014 - 11:24 नवीन
"गंध माझे" हे नवशौचकवींच्या कवितेचे नाव पाहुन धागा नाक मुठीत धरुन उघडला.परंतु शिष्यास अजून बराच पल्ला गाठावा लागेल, परसतीराला पोहोचायला हे सपष्ट झाले आहे, हे या ठिकानी जाहिर करन्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 11:29 नवीन
मग "जुन्याशौचकवींच्या" कवीता वाचताना मास्क लाउनच धागा उघडता??? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Fri, 12/26/2014 - 11:38 नवीन
मग काय ^_~ कवितेच्या प्रकारच तसा दरवळणीय आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/26/2014 - 11:33 नवीन
आणि ४० मिळाले...बास्स की...वींजीनेरला आणखी किती पाहिजे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ए
एस Sat, 12/27/2014 - 14:27 नवीन
मला वाटतं की विडंबन करणार्‍यांनी तरी मूळ कवितेच्या धाग्यावर जाऊन एखादा प्रतिसाद दिला पाहिजे. तिथे इनमिनदोनच प्रतिसाद आहेत. निदान एवढे सौजन्य दाखवायला काही हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा