Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुखसाधना

स — सार्थबोध, Tue, 12/30/2014 - 05:38
मथुरा सुखी कान्हा सवे, त्याच्याविना इथे प्राण ना गोकुळ रंगे त्याच्या सवे, त्याच्याविना मुळी त्राण ना ll १ ll जादू करी मुरलितुनि फुलवी, चैतन्य कैसे सांग ना मी घेतसा माझ्या करी, ती अबोल कैसी सांग ना ll २ ll तू सावळा चितचोर रे, तू घननीळ जैसा श्रावणा तू घे मला संगती, रंगात तुझिया मज रंग ना ll ३ ll तू येतसा मन नादते, आल्हाद छाया या वना तरु फुले अन पाखरे, धेनुही आतुर तव दर्शना ll ४ ll तू सखा संगे तुझ्या, ये पूर्णता या जीवना अगम्य साऱ्या लीला तुझ्या, एकवार अजुनी दाव ना ll ५ ll तू श्वास माझा ध्यास, तूच माझी सुख साधना सांज होतसा तू जातसा, राधा राहील कैसी सांग ना ll ६ ll -सार्थबोध http://www.saarthbodh.com/2013/05/blog-post_24.html

प्रतिक्रिया द्या
943 वाचन

💬 प्रतिसाद (1)
म
मदनबाण Wed, 12/31/2014 - 09:37 नवीन
सुंदर... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा