जाळ्यावर विणले जाळे
शब्दांनी कसंरतं केली.
मी काहि केले नाही
अन्,सहजी कविता झाली.
ना शब्द रंग रस गंध
ना प्रतिकांचे प्रतिबंध.
तालातून जुळता सांधा
लाभला तिला स्वच्छंद!
मी आशा का ठेवावी?
की कविता ऐशिच व्हावी!
जाणून अलंकारांची
का प्रीती मी तीज द्यावी???
तिज वहात जाणे आहे
त्या संथ नदीच्या काठी.
शब्दांच्या लाटा येता
मग पडती सहजी गाठी.
भेटेल तिलाही कधितरि..
तो समुद्र..वहाता वहाता..
कवितेचा सिंधूसागरं
शब्दांचा प्राक्तन दाता.
तोवरी तिच्याही नशिबी
हे वहाणे निश्चित आहे.
या वाहात्या शाश्वततेचा
मी सहप्रवासी आहे.
==============
.
अतृप्त..
बुवांचे "प्रतिमा पुनर्निमाण" यशस्वी झाले आहे असे म्हणावयास अत्ता हरकत नसावी.
त्यांच्या "तांब्या"ला जो उत्तराधिकारी लाभला आहे तोही आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे.
तिज वहात जाणे आहे
त्या संथ नदीच्या काठी.
शब्दांच्या लाटा येता
मग पडती सहजी गाठी.
तोवरी तिच्याही नशिबी
हे वहाणे निश्चित आहे.
या वाहात्या शाश्वततेचा
मी सहप्रवासी आहे.
दिसले जर काही तळताना
मला तेल नेहमी आठवते
झाली सवय मना माझ्या
अहो त्याला इलाज नाही
दिसता कविता हो बुवांची
मज वाटे तसली जिलबी
जरी असे ती सुंदर कविता
अहो त्याला इलाज नाही
तुम्ही कितीही नाके मुरडा
अन ठेवा कितीही नावे
थांबे न तांब्या संप्रदाय
अहो त्याला इलाज नाही
जोडी र ला र, ट ला ट
पाडीती कितीतरी जिलब्या
मजसारखे ते "रटा"ळ कवी
अहो त्याला इलाज नाही
तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी.सुंदर !मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats upताम्रपात्रजनित तैलपक्व शर्करावगुंठित पाकचक्रिका