Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नव्या वर्षाचे संकल्प

ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 01/01/2015 - 07:11
🗣 37 प्रतिसाद
सर्वप्रथम मिपाकरांना २०१५ च्या पहिल्या दिवशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आमचे नवे वर्ष गुडीपाडव्याला सुरु होते किंवा दिवाळीला सुरु होते इ. इ. चर्चा नको. :) तर सांगण्याचा मुद्दा असा की दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी तुम्ही नवीन वर्षाचे तडीस (न) जाणारे संकल्प केले असतीलच. मागच्या वर्षी एखादा संकल्प केला आणि तो पुर्ण केला असेही काही घडले असेल. तर मंडळी येउद्या तुमचे अपडेटस. मी अजून काही संकल्प केला नाही. हजारो संकल्प ऐसे की हर संकल्प पे दम निकले. पण बघूया, मिपाकरांच्या सुचनेतून काही आवडले तर नक्कीच अनुकरण केले (मिपाच्या भाषेत केल्या जाईल) जाईल.

प्रतिक्रिया द्या
15077 वाचन

💬 प्रतिसाद (37)
स
सुनील गुरुवार, 01/01/2015 - 07:16 नवीन
यंदा संकल्प न करण्याचा संकल्प केला होता, तो पूर्णपणे तडीस नेला!!! ;)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 01/01/2015 - 16:19 नवीन
अकर्म देखील एक कर्मच आहे. संकल्प पुर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/02/2015 - 09:19 नवीन
पॅरडॉक्स. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ख
खटपट्या गुरुवार, 01/01/2015 - 08:45 नवीन
गेल्या पाच वर्षात पूर्ण न झालेल्या संकल्पांची लीस्ट मोठी हाय !! :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/01/2015 - 09:07 नवीन
आता उरलो फक्त कट्ट्या पुरता... मुवि म्हणे
  • Log in or register to post comments
म
मनिमौ गुरुवार, 01/01/2015 - 14:55 नवीन
आणी बिझनेस वाढवणार
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/01/2015 - 15:00 नवीन
न मरता आणि विना अपघाताचा जिवंत राहणार या ३१ डिसेंबरपर्यंत. तोपर्यंत जगलो वाचलो तर हाच संकल्प पुढील वर्षीही....
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 01/01/2015 - 16:17 नवीन
लैच आशावादी बॉ तुम्ही. :) देवाकडे प्रार्थना की पुढच्यावर्षी हाच संकल्प पुढे कॉपी पेस्ट करण्यास येथे हजर असाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मदनबाण गुरुवार, 01/01/2015 - 16:40 नवीन
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! जे जे उत्तम आहे... ते पाहण्याचा, वाचण्याचा आणि ऐकण्याचा मानस व्यक्त करतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shiva Tandava Stotram { Amazing }
  • Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग गुरुवार, 01/01/2015 - 17:58 नवीन
२०१४ चे संकल्प काय काय होते बुवा आठवायचे
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 01/01/2015 - 18:14 नवीन
पण आज फेसबुकवर एक छान संकल्प पाहिला, "मी वाहतुकीच्या सगळ्या नियमांचे पालन करीन. स्वतः दुचाकी/चारचाकी चालवत असताना रस्त्यावर पादचार्‍यांच्या पहिल्या हक्काचेही कसोशीने पालन करीन!" वाचून बरं वाटलं. जास्तीत जास्त लोकांनी असा संकल्प केला तर किती छान होईल!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/02/2015 - 06:11 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मराठी_माणूस Fri, 01/02/2015 - 06:22 नवीन
रस्त्यावर पादचार्‍यांच्या पहिल्या हक्काचेही कसोशीने पालन करीन
पादचार्‍यांसाठी पदपथ असतात. कित्तेक पाद्चारी पद्पथ असतानासुध्दा रस्त्याच्या मधुन चालत वाहनांचा खोळंबा करतात्.झेब्रा क्रॉसिंग असताना सुध्दा कुठुनाही कसेही रस्ता क्रॉस करतात. आपल्याकडे बर्‍याच ठीकाणी पदपथ हे चालण्यासाठी मोकळे नसतात त्यामुळे रस्त्यामधुन चालावे लागते ही वस्तुस्थिती असली तरी जिथे पद्पथ असतील तिथे पदपथावरुनच चालावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 01/02/2015 - 06:31 नवीन
पण अनेक रस्त्याना पदपथ नसतात. राष्ट्रीय हमरस्ते आणि ऑटोमेटेड सिग्नल्स असलेली व्यवस्था सोडून इतर रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग असो नसो, पायी चालणार्‍यांचा पहिला हक्क असतो. सिग्नल्स नसलेल्या शहरांमधे पोलीस हजर असला तर सगळे ट्रॅफिक थांबवून रस्ता ओलांडणार्‍यांना मदत करतो. काल बाजारात एका झेब्रा क्रॉसिंगवर पोलीस हजर नसल्याने मला रस्ता क्रॉस करण्यासाठी १० मिनिटे थांबावे लागले. तरीही गाड्या थांबेनात. शेवटी दोन्ही बाजूच्या गाड्यांना पोलिसांसारखे 'थांबा' असे हात करून सरळ रस्ता ओलांडला. किती वेळ वाट बघणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Fri, 01/02/2015 - 06:58 नवीन
राष्ट्रीय हमरस्ते आणि ऑटोमेटेड सिग्नल्स असलेली व्यवस्था सोडून इतर रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग असो नसो, पायी चालणार्‍यांचा पहिला हक्क असतो
ह्याला काही आधार आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
H
hitesh Fri, 01/02/2015 - 07:38 नवीन
हे चालणार्‍याला माहीत असुन काय फअअयदा ? गाडीवाल्याला हे ठाउक नसेल तर तो गाडी अंगावर घालेल की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
प
पैसा Fri, 01/02/2015 - 07:54 नवीन
सगळ्या जगभरची भरपूर उदाहरणे मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
प
पैसा Fri, 01/02/2015 - 07:55 नवीन
तुम्ही कुठच्या शहरात रहाता ते सांगा, म्हणजे तिथे चालताना मी नक्की पोलीस बरोबर असताना चालेन! कारण तुम्ही गाडी पायी चालणार्‍यांच्या अंगावर मुदाम घालणार्‍यांपैकी वाटत आहात! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मराठी_माणूस Fri, 01/02/2015 - 10:25 नवीन
उदाहरणे निश्चित मिळतील , पण आखुन दिलेले नियम आहेत का ज्या मधुन पहीला हक्क कोणाचा ते समजेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
असंका Fri, 01/02/2015 - 10:58 नवीन
भारी मुद्दा काढलात की. असा नियम लिखित स्वरूपात असणं जरा अवघडच दिसतंय. रस्त्यावर सगळ्यांचा सारखाच हक्क असला पाहिजे. पण लेखी जरी नसलं तरी प्रॅक्टीकली पादचारी हे असुरक्षित असल्याने त्यांचाच हक्क पहिला हे गृहित धरून वाहन चालवणं श्रेयस्कर... तमिळनाडूतली पोझिशन अशी असावी- http://www.trafficwardens.in/traffic_logic.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Fri, 01/02/2015 - 11:02 नवीन
पादचारी हे असुरक्षित असल्याने
... बरोबर, म्हणूनच त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी जिथे पदपथ असतील तिथे त्याचा वापर करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
प
पैसा Fri, 01/02/2015 - 11:08 नवीन
पण लहान शहरात पदपथ नसतातच ना! तिथे काय रस्त्यावर यायचंच नाही का? मग मी झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यावरून शिस्तीत ट्रॅफिक थांबवून रस्ता क्रॉस करते. नाहीतर घरी पोचताच येणार नाही कधी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
स
स्वधर्म Fri, 01/02/2015 - 11:57 नवीन
रस्ता वापरण्याचा 'हक्क' सर्वांना आहे, तर वाहन चालकाला रस्ता वापरायला 'परवाना/ लायसेंन्स' घ्यावे लागते. म्हणून रस्त्यावर पहिला हक्क पादचार्याचाच असतो. - स्वधर्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मराठी_माणूस Fri, 01/02/2015 - 12:24 नवीन
असे जर असेल तर कित्येक ठीकाणी वहाने जाउच शकणार नाहीत. उदा. लोकल स्टेशन्स , जिथे लोकांची सतत येजा चालु असते. अशा ठीकाणी वहान इंचभर पुढे सरकणे सुध्दा दुरापास्त. तात्पर्य , वहाने आणि पाद्चारी ह्यांनी तारतम्य ठेउन ये जा करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
अ
असंका Fri, 01/02/2015 - 14:22 नवीन
सायकलला लायसेन्स लागत नाय.....मग सायकलवाल्याचा हक्क पैला की पादचार्‍याचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
अ
असंका Fri, 01/02/2015 - 14:19 नवीन
झेब्रा क्रॉसिंगवर पादचार्‍यांना प्राधान्य आहे. वाहनचालकाने झेब्रा क्रॉसिंगवरून पुढे जाताना कुणी पादचारी क्रॉस करत नाहियेत हे बघून मगच पुढे जाणे अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गुंड्या Fri, 01/02/2015 - 05:55 नवीन
याआधी संकल्प वगैरेला पास होता. पण आता ठरवलं आहे की पूर्वीपेक्षा जास्त आणि नियमित आर्थिक बचत करेन. होउदे खर्च!!! :)
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Fri, 01/02/2015 - 06:07 नवीन
२०१४ च्या दिवाळीपासून " पालि " भाषेचा अभ्यास सुरु केला होता , त्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते आता जून २०१५ पर्यंत पुर्ण करणार , म्हणजे करणारच ! !
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/02/2015 - 06:33 नवीन
तुम्हाला खूप शुभेच्छा! त्यानंतर पाली भाषेतील वाङ्मयाची मिपावर जरूर ओळख करून द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
ज
जेपी Fri, 01/02/2015 - 13:20 नवीन
यावर्षी मोडी लिपी चा अभ्यास करणे. मागील वर्षी एका मिपाकराने दिलेली मोडी शिकण्याबद्दल दिलेली इपुस्तक अर्धीच वाचुन झालीत. आता मात्र वेळ काढुन मोडी शिकण्यात येईल.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Fri, 01/02/2015 - 19:19 नवीन
मी मोडी लिपी साठी चार तीमाही मासिके जमविली आहेत व तिचाही अभ्यास करणार आहे, पण ती तितकीशी पुरेशी नाहीत याची मला जाणीव आहे म्हणून विनंती कि तुमच्याकडे असलेले इ - मोडी लिपीचे पुस्तक फॉर्वर्ड करता येइल काय ? किंवा लिन्क पाठवता येइल काय ? जयन्त शिम्पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ख
खटपट्या Fri, 01/02/2015 - 21:40 नवीन
क्रुपा करुन मला ईपुस्तक फॉरवर्ड करु शकाल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 01/02/2015 - 13:41 नवीन
सूर्यनमस्कार घालणे आणि तब्येत जssssरा सुधारणे...किमान सर्दी तापापासुन दुर राहण्यापुरती ऑफिसमधुन मिळालेल्या व्हाऊचर चा उपयोग करुन १-२ सर्टीफिकेशन पूर्ण करणे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 01/03/2015 - 02:22 नवीन
सुप्रभात १)जुनी जैन हस्तलिखितं पाली भाषेत आहेत ना ? २)पाली, अर्धमागधि, ब्राह्मि यावर लेखाची लिंक पाहिजे. ३)या मोडिसारख्या लिपी आहेत का भाषा? ४)युनिकोडमध्ये नसणार मग याचा फोटो टाकावा लागेल का ?
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/03/2015 - 02:33 नवीन
१)जुनी जैन हस्तलिखितं पाली भाषेत आहेत ना
जैन नव्हे, बौद्ध. जुनी जैन हस्तलिखिते अर्धमागधीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
पैसा Sat, 01/03/2015 - 06:25 नवीन
पाली अर्धमागधी या प्राकृत भाषा आहेत. सुरुवात म्हणून त्यांच्याबद्दलची विकि पाने बघा. मिपावरचे श्री जयंत कुलकर्णी आणि प्रास या भाषांचे अभ्यासक तज्ञ आहेत. ब्राह्मी ही लिपी आहे. तिच्यावरही विकि पान आणि अन्य माहिती जालावर उपलब्ध आहे. माझ्या आठवणीप्रमाणे वल्लीने या लिपीचा अभ्यास सुरू केला होता. त्याला जास्त माहिती विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
व
विवेकपटाईत Sat, 01/03/2015 - 06:14 नवीन
मी संकल्प करतो, मी कुठला ही संकल्प करणार नाही आणि केला तरी तो कधीच पाळणार नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा