Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अगा पांडुरंगा ..

व — विशाल कुलकर्णी, Fri, 01/02/2015 - 07:37
ज्योताय, तुझ्या हुकूमावरून खूप दिवसानंतर मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय. गोड मानून घ्या मंडळी ... _/\_ ************************************************** किती आळवावे स्मरावे तुला मी पुन्हा चित्त बेभान व्हावे अता भुलावे जगाचे किती पांडुरंगा मनाचे मला भान व्हावे अता नसे शुद्ध गंगा न पावन किनारे नको मोक्ष आता नको स्वर्ग ते तुझ्या उंबर्‍याचा मिळो कोपरा ’मात्र’ जगणेच आख्यान व्हावे अता पुन्हा देहकोशी धुमारे फुटावे किती पापणीने लवावे पुन्हा तुला मी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, ज्ञान व्हावे अता नको चंद्रभागा न भीमा हवी मज उराशी हवा वेदनाडोह तो तुझे स्पर्श माझ्या अभंगास जैसे सुखाचेच सोपान व्हावे अता मला भावते ती जनी नामयाची सखी भाबडी रे तुझी सावळ्या भले ती अडाणी..., तिची एक ओवी, झणी दूर अज्ञान व्हावे अता नसे मी तुकोबा, नसे मी विसोबा, नसे भक्त गोरा विठू मी तुझा भिकारी प्रभो मी तुझ्या पायरीचा असे आस ’उत्थान’ व्हावे अता जरी सर्व देतोस पृच्छेविना तू तरी आर्त माझ्या मनी ते उरे पुन्हा मागणे मागतो हे अनंता जगाचेच कल्याण व्हावे अता ************************************************** वृत्त : सुमंदारमाला लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा विशाल

प्रतिक्रिया द्या
12153 वाचन

💬 प्रतिसाद (32)
ट
टवाळ कार्टा Fri, 01/02/2015 - 07:47 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/02/2015 - 07:56 नवीन
सुरेख !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats up
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/02/2015 - 07:58 नवीन
मिपावर पुन्हा एकदा लिहिते झाल्याबद्दल धन्यवाद रे विशल्या! आणि मनापासून स्वागतही! ही कविता आधी वाचली होती तेव्हाही खूप भावली होती आणि आता पुन्हा वाचतानाही तेवढीच आवडली!
  • Log in or register to post comments
श
शलभ Fri, 01/02/2015 - 08:00 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 01/02/2015 - 08:12 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 01/02/2015 - 08:16 नवीन
भक्तीरसाचा आल्हाददायक अनुभवाबद्दल धन्यवाद. खालील ओळी विशेषतः आवडल्या ... नको चंद्रभागा न भीमा हवी मज उराशी हवा वेदनाडोह तो तुझे स्पर्श माझ्या अभंगास जैसे सुखाचेच सोपान व्हावे अता नसे मी तुकोबा, नसे मी विसोबा, नसे भक्त गोरा विठू मी तुझा भिकारी प्रभो मी तुझ्या पायरीचा असे आस ’उत्थान’ व्हावे अता .... जरी सर्व देतोस पृच्छेविना तू तरी आर्त माझ्या मनी ते उरे पुन्हा मागणे मागतो हे अनंता जगाचेच कल्याण व्हावे अता
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 01/02/2015 - 08:21 नवीन
छान भक्तीरसपूर्ण कविता
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/02/2015 - 12:28 नवीन
+++१११ टू स्नेहातै. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
प्रचेतस Fri, 01/02/2015 - 08:21 नवीन
सुंदर कविता विशाल. लिहित रहा.
  • Log in or register to post comments
H
hitesh Fri, 01/02/2015 - 08:23 नवीन
सुमंदारमाला वृत्त का ? वृत्ताचे नाव कन्फर्म करावे. ऐ फूलों की रानी बहारों की मलिका तेरा मुस्कुराना गजब हो गया ! :)
  • Log in or register to post comments
H
hitesh Fri, 01/02/2015 - 09:07 नवीन
तेच वृत्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
व
विशाल कुलकर्णी Fri, 01/02/2015 - 12:32 नवीन
हितेश, हो सुमंदारमालाच आहे.कवितेच्या खाली लगावलीसह माहिती दिली आहे ना. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
स
स्पंदना Fri, 01/02/2015 - 08:23 नवीन
वा!!!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/02/2015 - 09:09 नवीन
छान
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 01/02/2015 - 09:38 नवीन
आवडलं, बर्‍याच दिवसांनी मिपाच्या बोर्डावर चांगली कविता आली. नायतर शिंची ती धौतीयोगचूर्णजनित विडंबनं!! वात आणलेनीत नुसता!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/02/2015 - 09:47 नवीन
अतिशय आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/02/2015 - 09:51 नवीन
उत्तम.. सकस. याला लिहिते केल्याबद्दल ज्योताईचे आभार.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 01/02/2015 - 12:33 नवीन
धन्यवाद गवि :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आदिजोशी Fri, 01/02/2015 - 11:29 नवीन
ह्या माणसाला पुन्हा लिहिते केल्यावद्दत समस्त मिपा वाचक वर्गातर्फे ज्योताइंचे मनापासून आभार. आपण काय धमकी दिलीत ते आम्हालाही सांगावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/02/2015 - 11:42 नवीन
त्याच्याआधी आदिजोशी या माणसाला लिहिते करण्यासाठी काय धमकी द्यावी लागेल ते सांगा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
व
विशाल कुलकर्णी Fri, 01/02/2015 - 12:34 नवीन
आड्या, ताईने सांगितले 'क्रमशः' लिहीलेस तरी तुला पुढचा भाग कधी असे विचारणार नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 01/02/2015 - 14:35 नवीन
=)) अ‍ॅड्याभौ पळाले बघ लिहायचा विषय निघाल्यावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
प
प्यारे१ Fri, 01/02/2015 - 12:06 नवीन
छान अभंग निर्मिती झाली आहे. आणखी काही डिटेक्टीव्ह स्टोरीज पण येऊ दया आता.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 01/02/2015 - 12:35 नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी _/\_
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 01/02/2015 - 12:37 नवीन
बर्‍याच दिवसांनी एक सुंदर कविता आणि तीही अक्षरगणवृत्तात वाचली. आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 01/02/2015 - 12:39 नवीन
माऊली माऊली च्या चालीवर परफेक्ट वाचता आली. आवडली.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 01/02/2015 - 13:08 नवीन
अरे वाह ! काय मस्त ! क्या बात है.... विलक्षण आवडली.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 01/02/2015 - 13:09 नवीन
वृत्तांत बांधलेल्या बिंधलेल्या कविता कमी वाचायला मिळतात आजकाल. त्यामुळे विशेष भावलेली आहे.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 01/02/2015 - 13:10 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/03/2015 - 04:45 नवीन
अत्यंत तरल सुंदर काव्य. *good* *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP*
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 01/03/2015 - 05:37 नवीन
धन्यवाद मंडळी _/\_
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 01/03/2015 - 19:04 नवीन
जोरदार....मस्त रचना. कडक एकदम
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा