Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला

व — विशाल कुलकर्णी, Sat, 01/03/2015 - 05:54
गाढवाला सांगतो, गीता... असा मी बावळा दांभिकांची कैद ज्ञाना, ज्ञानवंता कोहळा धर्म नामे सर्प डसतो, मानवी वेडेपणा भूक घेते प्राण येथे, पिंड मागे कावळा भाव नाही जाणलेला वरलिया रंगा भुले वर्ण वाटे गोरटा मनरंग काळा सावळा करपलेल्या भाकरीचे पदर घेतो वाटुनी घास उदरी पोचला तो, होय मोठा सोहळा मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला भ्रष्ट म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा? घाबरावे या जगां इतका नसे कमजोर तू सांग त्यांना ठासुनी, समजू नका मी कोवळा ! वृत्त : कालगंगा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा (इतरत्र पूर्वप्रकाशित) विशाल

प्रतिक्रिया द्या
4039 वाचन

💬 प्रतिसाद (14)
P
psajid Sat, 01/03/2015 - 06:00 नवीन
खुप छान गझल
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/03/2015 - 06:12 नवीन
+++१११ एकदम स्वाल्लिड ! *HAPPY*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: psajid
स
स्पंदना Sat, 01/03/2015 - 07:01 नवीन
___/\___!!! इतक्या सुंदर गेय कविता वाचायला मिळताहेत त्याबद्दल धन्यवाद विशाल!!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sat, 01/03/2015 - 10:42 नवीन
बहुत खूब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
सूड Wed, 01/07/2015 - 19:29 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
पैसा Sat, 01/03/2015 - 08:21 नवीन
प्रत्येक द्विपदी अत्यंत आशयसंपन्न, आणि एकूणच सुरेख वृत्तबद्ध रचना! वाहवा!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 01/03/2015 - 10:26 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 01/03/2015 - 10:55 नवीन
खूपच छान!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 01/03/2015 - 11:01 नवीन
मनःपूर्वक आभार _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sat, 01/03/2015 - 11:11 नवीन
मस्त रे दादुस
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 01/03/2015 - 11:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
अ
अजया Sat, 01/03/2015 - 11:17 नवीन
अप्रतिम _/\_घ्या.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 01/03/2015 - 12:05 नवीन
'उद्धवा अजब तुझे सरकार' आठवले
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/03/2015 - 20:25 नवीन
याच्यावर "मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला" असे विडंबन लिहिण्याचा कॉपिराईट घेऊन ठेवत आहे...तस्मात कोणीही "मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला" अथवा त्याच्या अनुशंगाने डोक्यात येणारे विचार Wink यावर विडंबन करू/पाडू :D नये अशी विषेश विनंती तसेच आजकाल विडंबनामुळेसुध्धा काही मिपाकरांच्या "भावना दुखावल्या जात आहेत" त्यामुळे ज्यांना ज्यांना "मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला" वाचायची असेल त्यांनी मला व्यनी करुन कळवावे...विडंबन तयार होताच व्यनीतूनच पाठवले जाईल अवांतर - वरील विनंतीस "पी" संप्रदायातील सदस्य अपवाद असतील ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा