((सहज..))
शब्दाने वाढला शब्द
कडाक्याचे भांडण झाले
मी सुन्न आणि स्तब्ध
अन, ती निघून गेली
न मागे वळून पाहणे
न माघारी ते फिरणे
वादातून तुटला धागा
आता उरले ते झुरणे
मी आशा का ठेवावी?
की जीवनी असेच व्हावे
साथ ही सुखाची
नेहमी मनाजोगे घडावे
ती निघून गेली आता
तिच्या एकल्या मार्गाने
कोमेजून गेली स्वप्ने
मी व्याकुळ इथे विरहाने
भेटेल कुणी कधी तिला
तो मार्ग चालता चालता
दाटूनी कंठ माझा आला
मज काही न ये बोलता
आता माझ्याही नशिबी
हे थांबणे निश्चित आहे
या स्तब्ध आयुष्याचा
मी सहप्रवासी आहे.
==============
संकटग्रस्त..
(चित्र जालावरुन साभार)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||