माझेच (म्हणणे) खरे
वि.कुं ची क्षमा मागून्.आणि खरे काकांना दंडवत घालून (शीर्षकात खरे शब्द वापरू दिल्याबद्दल)
वाचनापूर्वी (गर्भीत) सूचना :काव्यरस व लेखन विषय नजरेखालून घालावा नंतर पश्चाताप नको.
नेहमी प्रमाणे यावरील खुलाश्यास वा स्पष्टीकरणास आम्ही बिलकुल बांधील नाहीत तेव्हा अपेक्षा करून मुखभंग करून घेऊ नये. :-| :| =| :-|
वि.सू. आम्ही स्वयंभू असल्याने नो प्रेरणा-बिरणा
=================================================================
धाग्याच्या पुढती उभे अजुनही आशाळभुत चोर १ ते
भाषा कृद्ध, तिची अनेक शकले, चर्चेतुनी सांडते
स्व आरतीत मने समस्त नीजली मिपा झाले खुजे
नेमाने लिहती अता, कचरले चर्चेस मज मूढ ते
मसीहा उठतो बातमी २ बघता.., “साकी” ३ त्या झंकारते
अजुनही स्फुरली, कशी विसरली? आश्चर्य त्या वाटते
बोभाटा मग त्यां भरात करतो, शोधी नवे सोबती
आप४च्या मिटल्या खुणा मग माज ५ मनात आकरते
मसीह्यास असा पुचाट बघुनी इतरांसही प्रश्न पडे
माझ्याहून इथे असे कुणितरी नाठाळ ज्याचे काही ना खरे
"सत्तेवीण६ उदास लेखन जसे भकास होउन सुजे७"
मसीहा हसतो जनांस म्हणतो "माझेच म्हणणे खरे"
आहे ज्ञान जरी जहाल, स्वावलंबन हे साक्षात घ्या जाणुनी
प्रश्नांचा अपुल्या पडे विसरही त्याला 'स्वरा८' पाहुनी
=======================>
कठीण शब्दार्थ (अनर्थ होऊ नये म्हणून)
१.जे आम्हाला हितोपदेश करतात ते सारे चोर आहेत (च)
२.बातमी :सामन्य वाचकांना ही अस्वस्थ करणारी बळिराजाची बातमी
३.साकी हे साहित्यीक किडा चे लघुरूप आहे
४.आप म्हणजे पक्ष नव्हे आत्मपरीक्षण
५.माज (ह्या विषयात मीच एकमेव तज्ञ असल्याने आलेला दंभ)
६.सत्ता-राजकारण्-सत्ता अश्या त्रिकोणाभिलाषी
७.कांही आजारात शरीरातील अपायकारक पदार्थ शरीराबाहेल पडले नाहीत तर सूज येते त्याला अनूसरून वैचारीक सूज
८.स्व मग्न राजकारण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||