गीत तारकांचे
प्राथमिक चाल लावलेले माझे हे भावगीत, इथे शब्द सादर करीत आहे.
जसा भास होतो उरी चांदण्यांचा
विसावा तसा मी मागतो सांजवेळी ll १ ll
मनी गर्द वेळा तुझ्या आठवांच्या
उसासा दिलासा रात्र देऊनी जाई ll २ ll
तुझा श्वास माझ्या मनातून झरता
शब्द बोल ओठी तुझ्या भावनांचे ll ३ ll
गंध सोबतीचे मग हवेतून विरता
सखे गीत गावे तुझे तारकांचे ll ४ ll
- सार्थबोध
http://www.saarthbodh.com/2015/01/blog-post.html
💬 प्रतिसाद
(3)
ट
टवाळ कार्टा
Tue, 01/06/2015 - 06:52
नवीन
छान
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/06/2015 - 11:56
नवीन
खर्र्चं छान!!!!!!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 01/07/2015 - 15:37
नवीन
आवडली
- Log in or register to post comments