Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अर्घ्य

व — विशाल कुलकर्णी, Wed, 01/07/2015 - 09:18
झळ उन्हाची येते लेवून गतकाळातील 'आठवकळा' ते दिवस नेटके होते अन रात्री उलगडलेल्या... मी तुला, तू मजला ... हलकेच पुन्हा आठवतो विस्मृतीच्या क्षणांसाठी कण कण साठवतो .... हळुवार पुन्हा मी हसतो त्या हसण्यावर ती रुसते बट केसांची नकळत, त्या गालावर रस्ता चुकते तो थेंब चिंब ओलेता ... हलकेच चुकार ओघळतो मी शुष्क कोरडासा, तो मला भिजवूनी जातो प्राजक्त कधी परसातला खांद्यावर ठेवतो डोके दरवळताना जाई-जूई, हळुच घेती व्याकुळ झोके तो स्पर्श चंदनी स्पंदनांचा हृदयाशी गुजगोष्टी करतो विसरताना मी तूला, आठवांचे 'अर्घ्य' देतो . विशाल

प्रतिक्रिया द्या
3517 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मुक्त विहारि Wed, 01/07/2015 - 09:50 नवीन
"तो स्पर्श चंदनी स्पंदनांचा हृदयाशी गुजगोष्टी करतो विसरताना मी तूला, आठवांचे 'अर्घ्य' देतो ." एक नंबर
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 01/07/2015 - 09:52 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 01/07/2015 - 10:46 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 01/07/2015 - 15:36 नवीन
तो थेंब चिंब ओलेता ... हलकेच चुकार ओघळतो मी शुष्क कोरडासा, तो मला भिजवूनी जातो मस्त कविता, गतकाळाची आठवण ..
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/07/2015 - 18:30 नवीन
हळुवार कविता!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/08/2015 - 08:34 नवीन
आभार्स विवेकजी आणि तैबै :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 01/24/2015 - 11:01 नवीन
मस्त कविता.. एकदम छान लिहिली आहे
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 01/24/2015 - 12:50 नवीन
हळुवार कविता. आवडली
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sun, 01/25/2015 - 05:40 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 01/26/2015 - 09:47 नवीन
मिपावरील ही पहिली कविता आहे जिची वाचनखूण मी साठवली आहे. बर्‍याच उशिराने पाहिली. सुंदर!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/27/2015 - 05:53 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा