Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

ग — गंगाधर मुटे, गुरुवार, 01/08/2015 - 04:52
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने

अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने

वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने

लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने

जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने

                             - गंगाधर मुटे 'अभय'
--------------------------------------------------


प्रतिक्रिया द्या
12457 वाचन

💬 प्रतिसाद (27)
स
सुनील गुरुवार, 01/08/2015 - 05:22 नवीन
कालच्या पॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाचनात आलेला हा अग्रलेख.
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 01/08/2015 - 10:01 नवीन
सोडून शेतकीचे आवेशपूर्ण गाणे! स्वीकारतोच आता शहरी काव्य-लेणे!! गाऊन दाखवीन असे सुरेल गाणे ! आता दिसेल तुम्हा साक्षात चांदणे !! नकोच खप्प मर्जी तुमच्या संपादकाची! पुरवीन आस आता गाऊन गाणी तुमची!! लागे न माळ आता शहरी प्रतिसादकाची ! मिळ्वीन पूर्ण खात्री माला आता कौतुकाची !! पुरेत हे प्रहार शिणलो प्रतिवाद करता! आता हवेत हार -साठी कवन करता !! मुटे कुल-सुताची ही स्वीकार मुक्त कविता! आवडेल नक्की तुजला थांबतो नक्की आता !! ओ मुटे , ह. घ्या , भांडायला येऊ नका !
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 01/08/2015 - 11:34 नवीन
तुमची कविता मी 'गे माय भू तुझे मी' च्या चालीवर म्हणून बघितली. ठिक बसतीये मीटरमध्ये :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/08/2015 - 12:26 नवीन
सुखकर्ता-दुखःहर्ता ची चाल जास्त फिट्ट बसते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 01/08/2015 - 13:50 नवीन
गे माय भू तुझे मी हे राष्ट्र देवतांचे आणि ही गझल एकाच वृत्तात (आनंदकंद) आहे. त्यामुळे चाल समान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
व
वैभव जाधव गुरुवार, 01/08/2015 - 13:54 नवीन
"अए दिल मुझे बता दे, तू किस पे आगया है" ह्याच्या चालीवर बसतेय बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
क
काळा पहाड गुरुवार, 01/08/2015 - 14:31 नवीन
"आठशे खिडक्या नऊशे दारं" ही चाल पण चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
स
सतिश गावडे गुरुवार, 01/08/2015 - 14:46 नवीन
अल्ताफ राजाच्या "तुम तो ठेहरे परदेसी" गाण्यातील "अब याद आ रहा हैं वो माहे जनवरी था" या चालीवरही परफेक्ट जमतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सूड गुरुवार, 01/08/2015 - 15:23 नवीन
मी तर 'या गो दांड्यावरना नवरा कुणाचा येतो' च्या चालीवर पण गाऊन पाह्यलं. पर्फेक्ट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
आ
आदूबाळ गुरुवार, 01/08/2015 - 15:47 नवीन
याचा अर्थ "हे राष्ट्र देवतांचे" हे "या गो दांड्यावरना" या चालीतही म्हणता येईल! विटूकाका आणि इतरांची क्रिएटिविटी जबरदस्त आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 01/08/2015 - 16:10 नवीन
@वैभव जाधव, "ये दिल मुझे बता दे, तू किस पे आगया है" या गीतात थोड्याफार मात्रा कमी जास्त आहेत पण या ओळींची जवळीक आनंदकद या वृत्ताशी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/08/2015 - 12:51 नवीन
मला वाटतय , मुटे सरांच्या मागील धाग्यातील प्रतिसादातील ज्ञानयज्ञामुळे पब्लिक इथे प्रतिसाद द्यायचं टाळतय , दुष्ट कुठले :-\ ह्यानिमिताने शेतकर्‍यांच्या कवितांना किमान ३० प्रतिसादांचे पॅकेज द्यावे असे मी संपादक मंडळाला आवाहन करीत आहे :D
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 01/08/2015 - 20:34 नवीन
नवीन लेखकांना देखील असे ५० प्रतीसादांचे पॅकेज मिळावे अशी जोडमागणी करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
कपिलमुनी गुरुवार, 01/08/2015 - 14:45 नवीन
लेखकाचा प्रत्येक धागा वेगळी कलाकृती / लेखन म्हणून घ्यावा . बाकीच्या धाग्यांवरचे पडसाद इतरत्र नसावेत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/08/2015 - 15:37 नवीन
सहमत....! कवितेवर प्रतिसाद अपेक्षित. बाकी मुटेंची रचना आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/09/2015 - 07:05 नवीन
ओके . पॉईट टेकन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ए
एस गुरुवार, 01/08/2015 - 15:45 नवीन
नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने
ह्या ओळी आवडल्या. पण कदाचित जिथे अशी अनुकूल परिस्थिती नाही तिथेही नव्या ज्ञानाच्या जोपासनेसाठी मशागत करणे हेही लेखणीचेच काम म्हटले पाहिजे. कविता छान आहे. पुलेशु.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sat, 01/10/2015 - 12:13 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
आ
आयुर्हित गुरुवार, 01/08/2015 - 15:55 नवीन
अभिजात सृजनासाठी लागणाऱ्या मशागतीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sat, 01/10/2015 - 12:14 नवीन
धन्यवाद सर. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
व
वेल्लाभट Fri, 01/09/2015 - 06:55 नवीन
वा वा वा वा ! जाम आवडली ! क्या बात ! सहीच.....
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sat, 01/10/2015 - 12:14 नवीन
धन्यवाद सर. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
पैसा Sun, 01/11/2015 - 09:37 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 01/11/2015 - 17:12 नवीन
धन्यवाद मॅडम. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गंगाधर मुटे Tue, 01/13/2015 - 05:10 नवीन
धन्यवाद मॅडम. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ग
गणेशा Sat, 01/24/2015 - 10:52 नवीन
खुप वर्षानी आपली कविता वाचली. मस्त वाटली पुर्वी सारखीच
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 01/25/2021 - 11:06 नवीन
न्यावा शिवाररानी जागर सरस्वतीचा ईडापिडा अव्यक्ती पुरण्यास लेखणीने
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा