(लेखणीने)
काथ्याकुटास व्हावे तय्यार लेखणीने
भक्षण घटीपळांचे करण्यास लेखणीने
स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे
माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने
मसीहा चितारण्याची अवगत कला करावी
औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने
अफवादि निर्मितेला जेथे उभार तेथे
पेरुन बीज यावे रुजण्यास लेखणीने
भाकड-वृथा कथांच्या कक्षेमध्ये फिरावे
अभिजात सृजनाला डसण्यास लेखणीने
वाणी अरण्यरुदनि शिरजोर होई तेव्हा
संपादकांनी यावे धरण्यास लेखणीने
जेव्हा सदस्य करिति वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय म्हणावे पळण्यास लेखणीने
-अंगावर उठे 'शबय शबय'
जरा ओरिजनल लिवा कीला दणकून अनुमोदन ! लै पावर दिसतिया लेखणीत :)