Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अशांतिचे गाणे... (गीत.)

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 01/09/2015 - 20:06
(चाल-​ ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है ) होतोच एकटा मी,राहिन एकटा ही मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि॥धृ॥ तेथून गार वारा,शिडकावतो मनाही निपचीतं शांत निजल्या,बोलावितो तनाही आता कळून चुकले,काहिच शांत नाही॥१॥ मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥ शांती कशात आहे?,नक्की कुठे कळे ना! देवात शोधली ती...सुरंहि तिथे जुळे ना! वळले मलाहि तेथे,ती शोधण्यात नाही॥२॥ मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥ गेलो तिच्याही पाठी, नक्की कुठे कशी ती? सारी मनुष्य जाती, वेडी तिच्याच साठी कळले ही धावते ती,आमुच्या पुढे..न पाठी॥३॥ मन हे असेच वेडे,सांगेलं गूज गाठी॥धृ॥ सोडून नाद सगळा,ध्यानस्थ बैसलो मी शांतीत काय आहे?,शोधुन भागलो मी शांती मला म्हणे बा,तू स्वस्थ फक्त राही॥४॥ मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥ बोलावितो मला ही,तो शांत शांत तारा खुणवून दाट आहे,आकाशिचा पसारा म्हणतो खुळ्या अरे का?तू गप्प गप्प राही॥५॥ बोलून टाक सगळे,गेली अशांतता ही............॥धृ॥ https://lh3.googleusercontent.com/-onoRACleFm4/VLAj22RviRI/AAAAAAAAGt8/-EB_xxpQ98Y/w314-h405-no/shukra%2Btara.jpg ============= अतृप्त.. . . . . (प्र.चि. - अं.जा.वरून..)

प्रतिक्रिया द्या
8869 वाचन

💬 प्रतिसाद (27)
प
प्रचेतस Sat, 01/10/2015 - 00:37 नवीन
अतिशय सुंदर आणि लयबद्ध.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 01/10/2015 - 02:02 नवीन
आपण गीताची जन्मकथा सांगितल्याने विशेष भावलं. अफाट आहे तुमची काव्यप्रतिभा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा Wed, 01/14/2015 - 10:00 नवीन
गीता, प्रतिभा, कविता, शांति. नेमके कोण? 'कविता' छानच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कंजूस Sat, 01/10/2015 - 03:09 नवीन
गेय कविता दुर्मिळ होत चालल्या आहेत ?नाही, ही एक पाहा आशयगर्भ. वेरुळालेण्यांत सापडेल का शांती ?डोळे भरून पाहा १ते ३४लेण्यांत.प्रतिभा असतांना शांतीची सवत कशाला पाहिजे ? अप्रतिम बुवा. सोमवारी लेख नको महाकाव्य हवे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/10/2015 - 04:28 नवीन
@कंजूस काका >> बाप रे!!! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
स्पंदना Sat, 01/10/2015 - 04:35 नवीन
कूठे चालला आत्मुस? अन ही शांती कोण? कोण ही शांती? कोण शांती ही? लय भारी कविता, मस्त फोटोची निवड!!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 01/10/2015 - 04:55 नवीन
आता बापरे! नको. फक्त शरणम गच्छामि, नम: शिवा , णमो आदिनाथा॥ शांति शांति शांति
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 01/10/2015 - 05:17 नवीन
चांगलीय !! शांतीवरची कविता !!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/10/2015 - 11:28 नवीन
प्रत्यक्षाहून प्रतीमा उत्कट. तळटीप :शब्दजुळारींना ही कवीता सिलॅबसला लावू काय?
  • Log in or register to post comments
ग
गौरी लेले Sat, 01/10/2015 - 15:07 नवीन
सुंदर कविता अतृप्त आत्माजी पुढील लेखनास शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/10/2015 - 19:27 नवीन
बादवे, आजकाल कविता बर्‍याच करत आहात. तुमची "स्फुर्ती-प्रेरणा" कोण?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/11/2015 - 01:43 नवीन
नाखु(न)काका-- हां भावानुवाद नाही.. फ़क्त त्या चालिवारून सुचलेली आहे. मूवी-- तुमची "स्फुर्ती-प्रेरणा" कोण? >>> नेहमीचीच! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
टवाळ कार्टा Sun, 01/11/2015 - 07:42 नवीन
नेहमीचीच! >> औं?? तांब्या??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 01/11/2015 - 18:26 नवीन
मराठी व्याकरण विसरलास का बे? तांब्या नेहेमीचा असेल का नेहेमीची? =)) पेर्णा=स्त्रिलिंग (नेहेमीची) तांब्या= पुल्लिंग (नेहेमीचा) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हाडक्या Tue, 01/13/2015 - 13:16 नवीन
ट़का.. बुवांनी ताम्रकलश वापरलाय हो. उगी तांब्या म्हणायचं काम नाय.. ;) @ बुवा, मस्त हो . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
H
hitesh Sun, 01/11/2015 - 18:23 नवीन
छान. आनंदकंद वृत्त. एका तळयात होती बदके पिले सुरेख. चूडी मझा न देगी कंगन मझा न देगा
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/12/2015 - 05:35 नवीन
थँक्यू!!! एका तळयात होती बदके पिले सुरेख.>>>हीच चाल जास्त मॅच होते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
क
कंजूस Mon, 01/12/2015 - 07:41 नवीन
लाजून हासणे अन हासून ते पाहाणे ॥मी ओळऽखून आहे साऽरे तुझे बहाणे -ही चाल अन आशय फिट्ट बसतोय का ते सांगा ना ऽऽगडे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/12/2015 - 08:24 नवीन
वृत्त तेच म्हटल्यावर चाल बसणारच पण तिच्यातून शब्द-उभे राहिले पाहिजेत..ते काम हितेसभाय म्हणतात त्यातच परफेक्ट होते आहे..म्हणून अनुमोदन त्यासच कायम ठेवत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सूड Mon, 01/12/2015 - 10:39 नवीन
ओह्ह ओक्के!! शांती!!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 01/13/2015 - 09:46 नवीन
बुवा का ब्र शांतीच्या मागे लागले असावेत? Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/13/2015 - 12:19 नवीन
@बुवा का ब्र शांतीच्या मागे लागले असावेत?>> गाणं नीट वाचल/ऐकलं नैत बहुतेक! ;) अहो सोप्पं आहे..अशांतीच्या शोधासाठी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
स
सुचेता Wed, 01/14/2015 - 17:42 नवीन
गेयताप्र्धान कविता, आवड्ली
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 01/24/2015 - 10:48 नवीन
सोडून नाद सगळा,ध्यानस्थ बैसलो मी शांतीत काय आहे?,शोधुन भागलो मी शांती मला म्हणे बा,तू स्वस्थ फक्त राही॥४॥ मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥ मस्त एकदम .. पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी... --- अवांतर : शांती म्हणे न जेंव्हा काही.. तेंव्हा अशांतीची सुरुवात असेन ती.
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sat, 01/24/2015 - 11:35 नवीन
पोत्यानी होती गीते, मी श्राव्य शोधताहे हितगूज जे वदे ते, मी गीत शोधताहे शांतीस साक्ष व्हावे, ही आस धरून राही मन हे असेच वेडे, सांगून गूज पाही
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/24/2015 - 16:05 नवीन
व्वाह!!! :HAPPY:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
ख
खमक्या Sat, 01/24/2015 - 17:19 नवीन
बुवांना तांबीय संप्रदायात खुपच 'शांती' लाभलीय बहुतेक. म्हणूनच आता ते अशांतीच्या मागे लागले असावेत. -शांत खमक्या
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा