Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इनवेस्टमेंट

च
चित्रार्जुन
Sun, 01/11/2015 - 19:54
🗣 104 प्रतिसाद
नमस्कार मित्रानो. मला इनवेस्टमेंट .संदर्भात माहिती हवी आहे ती पण मराठीत कारणकी माझया मते सर्व साधारण मराठी कुटुंबात या बद्दल खूप कमी माहिती आहे ती सर्व सामान्य माणसाना कलावी या साठी हा धागा उघडला आहे म्हणून यावर लवकरात लवकर प्रतिसाद द्यावेत ही नम्र विनंती. गुंतवणूक हा एक अतिशय संवेदनशील विषय असल्याने यावर नकीच मिसळ पाव वर चर्चा होणे आपेखित आहे. यात गुंतवणुकीचे प्रकार, त्यातील वैविध्या उदा. लिक्विड फंड, शेर मार्केट, डेट फंड, कॅपिटल फंड, बॉन्ड्स, म्यूचुयल फंड, एट्सेटरा. त्यातील फायदे तोटे, एत्यादी माहिती द्यावी. तसेच त्यावरील मराठीतील पुस्तके, मराठीतील ब्लॉग्स, अर्थविषयक साप्ताहिके, किंवा संदर्भ ग्रॅंता विषयी माहिती द्यावी.

प्रतिक्रिया द्या
66051 वाचन

💬 प्रतिसाद (104)
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 01/11/2015 - 20:27 नवीन
गुंतवणूकीसाठी माझी पहिली पसंत आहे ती म्हणजे पी पी एफ { लोक भविष्य निधी } सुरवातीची मुदत जरी १५ वर्षे असली तरीही वर्षभरात किमान ५०० रुपये आणि कमाल १,५०,०००/- ( १ एप्रिल २०१४ पासुन वाढवलेली मर्यादा )रुपये यात भरता येतात पंधरा वर्षानंतर वाटले तर मुदत आणखी पाच पाच वर्षे वाढविता येते पोष्टासह राष्ट्रीयकरण झालेल्या सर्व बँकेत खाते उघडता येते आयकरात सुट मिळते खाते सुरु केल्यानंतर पहिली सहा वर्षे काहीही रक्कम काढता येत नसली तरीही शक्यतोवर यातून रक्कम काढण्यापेक्षा , भरण्यावरच भर द्य्यावा हे उत्तम दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत रक्कम जमा केली, तर त्या महिन्याचे व्याज खात्यात जमा होते सध्या यात जमा होणार्‍या व्याजावर ८.५० % टक्के दराने व्याज मिळते महत्वाची बाब म्हणजे या रकमेवर कोर्टाची जप्ती आणता येत नाही म्हणून अधिक सुरक्षित आहे. मी १९८९ पासून खाते सुरु केले आहे आणि पाच पाच वर्षे वाढवीत , आता इतकी रक्कम गुंतविली आहे कि मला येथुन पुढे दर वर्षी एक लाख रुपये निव्वळ व्याजापोटी मिळत रहातील. पुर्वी एजंट लोकांना कमिशन मिळत असे , आता तेही बन्द केले असल्याने , एजंट याबाबत अधिक माहिती सांगावयास तयार होत नाही एका व्यक्तीस एकच खाते सुरु करता येते कळत नकळत या खात्यामध्ये धीरे धीरे भरपूर बचत होते आमच्या दहा जणांच्या कुटुंबात नऊ जणांच्या नावे पी पी एफ ची खाती मी सुरु ठेवली आहेत तेंव्हा बचतीची सुरवात पी पी एफ पासून करावी हे उत्तम
  • Log in or register to post comments
H
hitesh Sun, 01/11/2015 - 22:42 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 01/11/2015 - 20:58 नवीन
ज्यांच्या पगारातून भविष्य निधी { सह वर्गणी द्वारा ) म्हणजे जितकी रक्कम कर्मचार्र्‍याची कपात केली जाते , तितकीच रक्कम जर मालकाकडून कर्मचार्‍याच्या खात्यात जमा केली जात असेल तर , रिटायरमेंटला काही वर्षे शिल्लक असतांना साधारण ३ वर्षे अगर ५ वर्षे आपल्याला झेपेल एव्हढी रक्कम , स्वत:ची म्हणुन जादा कपात करुन घेण्याची व्यवस्थापकास लेखी विनंती करावी.त्यामुळे गुंतवणुक तर होते, वर व्याजही मिळू शकते. ही रक्कम सुद्धा सुरक्षित असते मी शेवटच्या तीन वर्षात रु.३०००/- ते ७०००/ ज्यादा भविष्य निधी मध्ये ( एकतर्फी ) गुंतविली होती, त्यावर मला घसघशीत व्याज मिळाले, जर खरोखर गरज नसेल तर , ९०% भविष्य निधी साठी लगेचच अर्ज करु नये. व दहा टक्के सुध्दा मागू नये लक्षात ठेवा तुम्ही अर्ज केला तरच सरकारी यंत्रणा हालते , अन्यथा ती रक्कम तशीच पडून असते रिटायरनंतर मी दोन वर्षापर्यन्त थांबलो आणि घसघशीत व्याज प्राप्त केले आहे
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 01/12/2015 - 08:24 नवीन
जर निवृतीनंतर आपण १० वर्ष पैसे काढलेच नाही तर १० वर्षांचे व्याज मिळते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
ट
टवाळ कार्टा Mon, 01/12/2015 - 08:52 नवीन
मी पण हाच प्रश्न विचारायला आलेलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
स
सुनील Mon, 01/12/2015 - 09:08 नवीन
नाही. पूर्वी मिळत असे. गेल्या ४-५ वर्षांपासून त्यांनी भरणा नसेल तर व्याज देणे बंद केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/12/2015 - 09:23 नवीन
म्हणजे २० वर्षांनंतरसुध्धा पैसे भरता येतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 01/12/2015 - 09:36 नवीन
समजले नाही. PF मध्ये पैसे तुम्ही भरतच नाही. कंपनी भरते. जर कंपनी सोडली तर भरणा बंद होईल. पैसे तसेच राहतील पण त्यावर व्याज नाही मिळणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सतिश गावडे Mon, 01/12/2015 - 09:38 नवीन
PF मध्ये पैसे तुम्ही भरतच नाही. कंपनी भरते.
पैसे जरी कंपनी भरत असली तरी तो आपल्या "पॅकेज"चा भाग असतो. कंपनी काही त्यांच्या पदरचे पैसे देत नाही आपल्या पीएफ खात्यात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 01/12/2015 - 09:39 नवीन
बरोबर. मुद्दा तो नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा Mon, 01/12/2015 - 09:55 नवीन
आय माय स्वारी...मला PPF बद्दल माहिती विचारायची होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 01/12/2015 - 10:22 नवीन
ओके. PPF मध्ये पहिले १५ वर्षे भरणा करीत रहावाच लागतो. त्यानंतर ५-५ वर्षांसाठी मुदतवाढ घेत राहता येते. मुदतवाढीत तुम्हाला पर्याय असतो - भरण्यासहित अथवा भरण्याविरहीत. मात्र एकदा एका पद्धतीने मुदतवाढ घेतली की ५ वर्षांपर्यंत त्यात बदल करता येत नाही. व्याज दोन्ही बाबतीत मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/12/2015 - 10:43 नवीन
५ वर्षे मुदतवाढ किती वेळा करता येते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 01/12/2015 - 10:56 नवीन
होय. कितीही वेळा मुदतवाढ करता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
R
ravi bhagwat गुरुवार, 01/22/2015 - 03:34 नवीन
मी पूर्वी काम करीत असलेल्या कंपनीमध्ये माझा भविष्य निधी जमा होत असे. आता मी कंपनी सोडली. आता मी सेवा उद्योगात आहे. मात्र निधी तसाच आहे. तो मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज वगैरे उपलब्ध आहे का? असल्यास माहिती द्यावी. नसल्यास निधी मिळविण्यासाठी काय पद्धत आहे याची माहिती द्यावी, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
H
hitesh Sun, 01/11/2015 - 22:59 नवीन
बहुतेक ब्यान्कातुन हल्ली सेविंग अकाउंटला एफ एफ डी किंवा स्वीप इन / आउट फ्यासिलिटी मिळते. त्यामुळे सेविंगच्या पैशावर एफ डी चा व्याजदर मिळतो.
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 01/12/2015 - 05:33 नवीन
वर सांगितल्याप्रमाणे पी पी एफ हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित उपाय आहे. जर ३० वर्षांसाठी दरवर्षी १ एप्रिल ला ७०००० रु. गुंतविले तर आपली गुंतवणूक २१००००० एवढी होते. ३० वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला एकरकमी ८४००००० रु . मिळतील. पण पी पी एफ मध्ये पैशे अडकून पडतात आणि गरज असल्यावर काढता येत नाहीत हा एक तोटा आहे . म्यूचुयल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे . एकरकमी गुंतवणे शक्य नसल्यास Systematic investment Planning (SIP) द्वारा दरमहा गुंतवणूक करावी. मला या गुंतवणुकी द्वारे जवळपास ३०% रिटर्न मिळालेत . गुंतवणूक करण्याआधी अभ्यास जरूर करावा
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 01/12/2015 - 07:33 नवीन
मी नुकताच एक SIP प्लान एका ब्यांकेकडून घेतला. एका मित्राशी चर्चा केली असता तो म्हणाला की माझा प्लान "रेग्युलर" प्लान असून तुझ्या परताव्याचा काही भाग दलालास जातो. मी म्हटले की मी हे ब्यांकेत जाऊन केले यात दलाल कुठे आला. त्याच्या म्हणण्यानुसार ही ब्यांकेची मखलाशी आहे. रेग्युलर प्लानसोबत दलाल येतो. त्याने यावर सुचवलेला उपाय म्हणजे मी माझा रेग्युलर प्लान "डायरेक्ट प्लान" मध्ये रुपांतरीत करून घ्यावा. याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Mon, 01/12/2015 - 07:49 नवीन
तुमच्या मित्राचे म्हणणे बरोबर आहे. "रेग्युलर" प्लान मध्ये आपण त्या म्यूचुयल फंड कंपनीशी दलालाद्वारे व्यवहार करतो . साहजिकच त्याला कमिशन मिळते ( जवळपास ०.५ %). "डायरेक्ट प्लान" मध्ये आपण थेट कंपनीशी व्यवहार करतो. आता तुम्ही "डायरेक्ट प्लान" मध्ये रुपांतरीत करताना काही आर्थिक नुकसान होते का याविषयी मला माहिती नाही. जर होत असेल तर मी असं सुचवेल की रुपांतर करू नका . मात्र पुढल्या वेळेस काळजी घ्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चिनार Mon, 01/12/2015 - 07:57 नवीन
Birla Sun Life Frontline Equity Fund - Plan A - Growth HDFC Equity Fund - Growth Kotak Select Focus Fund - Grow SBI Magnum Bluechip Fund - Growth HDFC Mid-Cap Opportunities Fund - Growth ICICI Prudential Value Discovery Fund - Growth ICICI Prudential Dynamic Plan - Gro Reliance Equity Opportunities Fund - Growth Axis Long Term Equity Fund - Growth ICICI Prudential Taxplan - Growth Reliance Tax Saver (ELSS) Fund - Growth
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
स
सतिश गावडे Mon, 01/12/2015 - 08:04 नवीन
हे चांगले फंड आहेत का? मी ICICI Prudential Value Discovery Fund - Growth घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Mon, 01/12/2015 - 08:20 नवीन
ICICI Prudential Value Discovery Fund - Growth हा फंड चांगला आहे . त्यातून मला ३८% रिटर्न मिळाले . अर्थात पुढील वाटचाली विषयी सांगता येणार नाही . ICICI prudential focussed blue chip fund-Growth, Birla Sunlife frontline equity fund-Growth हे सुध्दा चांगले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Mon, 01/12/2015 - 07:59 नवीन
माझा एकच हप्ता गेला असल्यामुळे आता होणारे नुकसान हे एकुण नुकसानीच्या तुलनेत खुपच कमी असेल. त्यामुळे हे रुपांतरण मी आताच करून घेईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
अ
अनुप ढेरे Mon, 01/12/2015 - 07:52 नवीन
http://www.valueresearchonline.com/story/22511
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सुबोध खरे Mon, 01/12/2015 - 06:58 नवीन
http://www.jagoinvestor.com/ येथे आपल्याला गुन्तवणुकीबद्दल साद्यंत माहिती मिळेल. वेळ काढून वाचत रहा.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 01/12/2015 - 07:36 नवीन
आर्थिक साक्षरतेसाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. त्यांचे स्मार्टफोन ऍप असून त्यात या संकेत्स्थळावरील १०० ताज्या नोंदी उतरवून घेता येतात. अतिशय साध्या सोप्या भाषेत विविध आर्थिक बाबींवर चर्चा तसेच विश्लेषण असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सतिश गावडे Mon, 01/12/2015 - 08:25 नवीन
जीवन विमा पॉलिसी ही आर्थिक गुंतवणूक नव्हे. समजा कुणी मनीबॅक किंवा एंडोवमेंट प्रकारातील पॉलिसी गुंतवणूक + विमा अशी घेतली असल्यास त्यातील परतावा अतिशय कमी आहे (साडे तीन चार टक्के)
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 01/12/2015 - 09:17 नवीन
जीवन विमा पॉलिसी ही आर्थिक गुंतवणूक नव्हे.!!!! १००% मान्य ! पण मानसिक समाधान आणी कुटुंबियाच्या सुरक्षेसाठी जीवन विमा पॉलिसी नक्की काढावी असं माझं मत आहे आणी कुटुंबियांना त्याची कल्पना आणि माहिती द्यावी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Mon, 01/12/2015 - 09:42 नवीन
कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी "टर्म पॉलिसी" हा जीवन विम्याचा प्रकार निवडावा. मनीबॅक आणि एंडोवमेंट प्रकारातील पॉलिसी आपल्या गळयात मारण्याचा प्रयत्न करणार्‍या एजंटना फाटयावर मारावे. जो पैसा आपण मनीबॅक आणि एंडोवमेंट पॉलिसीत टाकणार असू तो गुंतवणुकीच्या इतर चांगल्या पर्यायात टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
ग
गवि Mon, 01/12/2015 - 09:26 नवीन
..लहान आकाराच्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करायची असल्यास कुठे जास्तीतजास्त वाव आहे? (सध्या किंमत कमी आणि चांगले वाढीचे पोटेन्शियल) साधारण दरही माहीत असल्यास शेअर करावेत आपापल्या गावातले. टुरिस्ट लोकेशन्समधे घर घेणे हे बरे की तापदायक?
  • Log in or register to post comments
H
hitesh Mon, 01/12/2015 - 09:37 नवीन
या हिकडे. बेलापुर - उरण - जे एन पी टी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 01/12/2015 - 09:45 नवीन
..आधीच वाढून बसलेत ना रेट्स.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Mon, 01/12/2015 - 10:01 नवीन
नाय हो. अजुन बेसलाइन किमती हैत. दहा लाख.. एक गुंठा प्लॉट http://www.misalpav.com/node/29565 वन आर के .. सात लाख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सिरुसेरि Mon, 01/12/2015 - 10:51 नवीन
म्यूचुयल फंड बद्दल काही शंका - माझे काही सिप म्यूचुयल फंड चालु आहेत . आता मला १ ,२ डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड सिप चालु करायचे आहेत . तर त्यासाठी चांगले डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड कसे ठरवायचे / निवडायचे ? सध्या कोणते डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड चांगले आहेत ? डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड यामध्ये सिप पर्याय का लम्प्सम पर्याय चांगला ? जीवन विमा पॉलिसीमध्ये माझी मनीबॅक पॉलिसी गेली १० वर्षे चालु आहे . तर आता त्यातुन बाहेर पडता येइल का ?
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 01/12/2015 - 11:13 नवीन
http://www.moneycontrol.com/ इथे बऱ्यापैकी माहिती मिळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सामान्य वाचक Mon, 01/12/2015 - 11:48 नवीन
म्हणजे काय Mf मधे ग्रोथ आणि dividend ऐसा पर्याय असतो. जर दर वर्षि पैसे ( व्याजा प्रमाणे ) लागणार नसतील तर ग्रोथ पर्याय घ्यावा. कारण dividend दिला की काही % administrative charges म्हणून वाजा होते. ग्रोथ मधे तुम्हला गरज असेल तेंव्हा आणि तेव्हढि यूनिट्स तुम्ही विकू शकता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सतिश गावडे Mon, 01/12/2015 - 12:38 नवीन
जीवन विमा पॉलिसीमध्ये माझी मनीबॅक पॉलिसी गेली १० वर्षे चालु आहे . तर आता त्यातुन बाहेर पडता येइल का ?
होय. जीवन विमा पॉलिसीमधून केव्हाही बाहेर पडता येते. पर्याय साधारणपणे असे असतात: १. तीन वर्षांचे हप्ते पुर्ण भरावयाच्या आत बाहेर पडल्यास आपली पॉलिसी बंद होते. आपल्याला काहीही मिळत नाही. तीन वर्ष भरलेले हप्ते वाया जातात. २. दुसरा पर्याय पॉलिसीचे हप्ते तीन वर्ष भरुन नंतर पॉलिसी बंद करता येते. यात पहिल्या वर्षी भरलेले विम्याचे हप्ते विमा कंपनी एजंटचे कमिशन तसेच इतर चार्जेस म्हणून पुर्णपणे कापून घेते. आणि उरलेल्या पैशांच्या विशिष्ट टक्के रक्कम आपल्याला मिळते. पॉलीसी तीन वर्षांनंतर लगेच बंद केल्यास ही रक्कम आपण तीन वर्ष भरलेल्या हप्त्यांच्या एकुण रकमेच्या तुलनेत नगण्य असते. ३. तिसरा पर्याय असतो पॉलिसी पेड अप करणे. यात तीन वर्षांपर्यंत पॉलिसीचे हप्ते भरुन नंतर केव्हाही हप्ते भरणे बंद करायचे. आणि भरलेले पैसे पॉलिसीचा कालावधी पुर्ण होईपर्यंत विमा कंपनीकडेच ठेवायचे. असे केल्याने पॉलिसी "पेड अप" आपोआप अवस्थेत जाते मध्ये जाते. पेड अप पॉलिसीवर भरलेल्या हप्त्यांच्या प्रमाणात रिस्क कव्हर मिळते. आणि पॉलिसीची मुदत संपताच ती पॉलिसी मनी बॅक किंवा एंडोव्हमेंट पॉलिसी असल्यास भरलेल्या हप्त्यांच्या प्रमाणात पैसे मिळतात. या तिन्ही प्रकारात विमा कंपनीचा लॉयल्टी बोनस मिळत नाही. तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये "पॉलिसी टर्मिनेशन" चा क्लॉज असेल. किंवा विमा कंपनीला फोन करुन त्यांना पॉलिसी क्रमांक सांगून ती पॉलिसी बंद करायची असल्यास कोनते पर्याय आहेत ते विचारा. ** ही सर्वसाधारण माहिती आहे. पॉलिसी टर्मिनेशनचे क्लॉजेस विमा कंपनी आणि पॉलिसीनुसार बदलू शकतात. नेमक्या माहितीसाठी विमा कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सामान्य वाचक Mon, 01/12/2015 - 12:02 नवीन
सर्व साधारण पणे १०० - तुमचे वय = जी संख्या येईल तेव्हडी % गुंतवणूक मार्केट मध्ये ( म्हणजे जास्त जोखीम आणि जास्त परतावा) . मार्केट म्हणजे शेअर्स , मुचुअल फंड etc उरलेली गुंतवणूक सुरक्षित, जसे कि बँक मुदत ठेवी, पोस्ट, PPF etc मध्ये, जिथे परतावा तुलनेने कमी, पण जोखीम पण खूपच कमी असते. हा अर्थातच जनरल नियम आहे. तुमच्या जोखीम घेण्याच्या हिंमती प्रमाणे हे सूत्र बदलू शकते. मुच्युअल फंड निवडताना शक्यतो sector फंड टाळावेत . कारण इकोनॉमी ची नस सापडणे कठीण असते. म्हणजे कुठला सेक्टर वरती जाइल , हे भाकित अवघड असते. त्यामुळे diversified फंड निवडावेत .
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 01/12/2015 - 12:12 नवीन
उत्पन्नाच्या साधारण किती % गुंतवणूक असावी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक Mon, 01/12/2015 - 12:21 नवीन
जास्तीत जास्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
स
सामान्य वाचक Mon, 01/12/2015 - 12:08 नवीन
शक्यतो sip हा पर्याय चांगला . कारण त्यामुळे आपली गुंतवणुक सरासरी ने होते. आपण एकदम मोठी रक्कम गुंतवली आणि त्यानंतर मार्केट पडले तर आपले नुकसान जास्त होते. ते SIP मध्ये कमी होते कारण तुम्ही थोडी थोडी रक्कम ठराविक काळाने गुंतवता . त्यामुळे सरासरी वर गुंतवणूक होते
  • Log in or register to post comments
श
शिद Mon, 01/12/2015 - 12:36 नवीन
चांगली चर्चा. वाचत आहे व वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 01/12/2015 - 13:08 नवीन
खूपच माहितीपूर्ण सल्ले आहेत. पण गुंतवणूक म्हणजे भविष्याचा विचार. त्यामुळे भविष्यात काय होऊ शकते त्याचा सध्याच्या ट्रेंडवरुन अदमास बांधला पाहिजे आधी. पुढची पंचविस वर्षे गेल्या पंचवीस वर्षांसारखीच असतील असे नाही. त्यामुळे येत्या पंचवीस वर्षात काय-काय होऊ शकते ते ढोबळ मानाने कोणी सांगू शकेल काय?
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Mon, 01/12/2015 - 13:31 नवीन
कारण भले भले तत्ज्ञ्य भविष्यात काय होणार हे नक्की सांगू शकत नाहीत त्यामुळे असे गृहीत धरू कि भविष्य काल हा सर्व साधारण असेल. जर काही फार वेगळे , जसे कि तिसरे महायुद्ध, घडले तर तसे हि आपल्या प्लानिंग चा काहीही उपयोग नाही. dont put all eggs in one basket , हे कायम लक्षात ठेवावे. साधारण गुंतवणूक ३ भागात करावी ० - ५ वर्षे : शोर्ट टर्म ५ ते १५ वर्षे : मिडीयम टर्म १५ ते पुढे : लॉंग टर्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
च
चित्रार्जुन Mon, 01/12/2015 - 15:47 नवीन
.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 01/12/2015 - 16:47 नवीन
स्कॉट अॅडम्स (dilbert.com) यांचा खालील सल्ला उत्तम आहे. Everything you need to know about financial planning* Make a will. Pay off your credit cards. Get term life insurance if you have a family to support. Fund your 401(k)/IRA/PF 1 to the maximum. Buy a house if you want to live in a house and you can afford it. Put six months’ expenses in a money market fund. Take whatever money is left over and invest 70% in a stock index fund and 30% in a bond fund through any discount broker and never touch it until retirement. 1. PF/PPF चा पर्याय अमेरिकेतील 401(k) आणि IRA सारखाच आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रार्जुन Mon, 01/12/2015 - 17:55 नवीन
च्रर्चा छान चालु आहे, पण मराठितील पुस्तके सुचवलितर खुप छान.. "आर्थिक साक्षरतेसाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. त्यांचे स्मार्टफोन ऍप असून त्यात या संकेत्स्थळावरील १०० ताज्या नोंदी उतरवून घेता येतात. अतिशय साध्या सोप्या भाषेत विविध आर्थिक बाबींवर चर्चा तसेच विश्लेषण असते." कुठला अ‍ॅप जरा लिन्क देता का?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 01/12/2015 - 19:09 नवीन
कुठला अ‍ॅप जरा लिन्क देता का?
अँड्रॉईड अ‍ॅप इथे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रार्जुन
य
योगेश९८८१ Tue, 01/13/2015 - 17:14 नवीन
८०'c करिता ४ दिवसांपूर्वी MF - axis bank long term ELSS - growth मध्ये १,००,०००/- गुंतवणूक केली आहे. मला त्यांनी सांगितले कि lumpsum तुमच्यासाठी जास्त योग्य पर्याय आहे कारण SIP मध्ये तुम्हाला ८०'c tax बेनिफेत मिळणार नाहि (विश्वास ठेवला) मी PPF मध्ये हि २५K टाकले आहेत. share बाजारात सुद्धा गुंतवणूक करण्याची इच्चा आहे (स्वतः deal). मागच्या वर्षी मोठ्या उत्साहात एका नामांकित बँकेत ट्रेडींग खात पण चालू केल पण नीट माहित नसल्याने १ वर्षात बंद केल. (काही न करता :( ) सुरुवातीला शिकण्यासाठी का होईना पण ३००० - ५०००/- नुकसान सुद्धा मला चालेल … पण नक्की सुरुवात कुठून आणि कशी करायची तेच काळत नाही. त्या बद्दल थोड मार्गदर्शनाची अपेक्षा ….
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 01/13/2015 - 17:22 नवीन
सुरुवातीला One up on wall street हे पुस्तक वाचा, छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश९८८१
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा