सांज
सांज बावरी, सांजेला कळते ना काही
शांत बाह्यतः, आतुन ही घोंगावत राही
सांज बोचरी, काळोखाची पूर्वकल्पना
वर केशरिया, अंतरात दडल्यात वेदना
सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी
नेत्र पश्चिमी, मन पूर्वेच्या क्षितिजापाशी
सांज हरीच्या बाहूंमधली राधा भोळी
मोहनरंगी रंगुन बनते रात्र सावळी...
अदिती जोशी
💬 प्रतिसाद
(7)
च
चुकलामाकला
Wed, 01/14/2015 - 04:59
नवीन
आहा! सुन्दर !
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 01/14/2015 - 07:05
नवीन
अतिशय सुंदर रचना. तुमच्या रचना नेहमीच सुखावुन जातात.
अवांतरः सांज म्हटल की मला सर्वप्रथम सुधिर मोघ्यांची 'सांज ये गोकुळी' च आठवते, आता हे ही आठवत राहील.
दिर्घकाळ मनात रुंजी घालत राहील ही रचना
व्वाह... क्या बात!! __/\__
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/15/2015 - 06:06
नवीन
मि.का. शी संपूर्ण सहमत! :Happy:
- Log in or register to post comments
स
सुचेता
Wed, 01/14/2015 - 08:37
नवीन
सुरेख ग सांज रेंगा़ळली मनी
- Log in or register to post comments
च
चाणक्य
गुरुवार, 01/15/2015 - 01:35
नवीन
वरती मिका म्हणाल्याप्रमाणे तुमच्या रचना नेहमीच सुंदर असतात
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 01/24/2015 - 10:56
नवीन
सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी
नेत्र पश्चिमी,मन पूर्वेच्या क्षितिजापाशी
सांज हरीच्या बाहूंमधली राधा भोळी
मोहनरंगी रंगुन बनते रात्र सावळी...
---------------------
अतिशय आशय पुर्ण कविता ..
कविता वाचुन खुप छान वाटले.
वाखुसाआ
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 01/24/2015 - 16:52
नवीन
रचना प्रचंड आवडली. सोबतचे चित्रही खूप छान!
- Log in or register to post comments