" नवी क्रांती घडवायची आम्हाला "
————————————————
हवी आमच्या हक्काची भाकर,
नकोय तुमची भिक आम्हाला !!
हवय आमच्या मेहनतीच मोल,
नकोय लाखोचे दान आम्हाला !!
हवय शेतीला चांगल बी बियाणे,
नकोय तुमची आश्वासने आम्हाला !!
हवाय पिकाला योग्य हमीभाव,
नको नावापुरत पॅकेजआम्हाला !!
भरायच पोट आम्हा जगातील प्रत्येकाच,
कारण जगाची काळजी आहे आम्हाला !!
करायच भारताच नाव मोठ,
नका करुडिवचण्याचा प्रयत्न आम्हाला !!
आम्ही नाही करणार आत्महत्या,
कारण मुलाबाळासाठी जगायच आम्हाला !!
आमचीनका करुकाळजी तुम्ही,
कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !!
—————————————————
————————————————— @@ कवी @@
संजयरा. कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
💬 प्रतिसाद
(8)
व
विजुभाऊ
गुरुवार, 01/15/2015 - 13:02
नवीन
संजयजी. दिवास्वप्ने रम्गवण्यापेक्षा प्रॅक्टीकली काहितरी करणे हेच महत्वाचे आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्या बाजारपेठीय आणि सामाजीक अर्थव्यवस्थेमुळे / रुढींमुळे होतात त्याना तुम्ही कितपत बदलू शकता?
भाजप किंवा काँग्रेस हे त्याबाबतीत एकाच माळेचे आहेत
- Log in or register to post comments
S
Sanjay Kokare
गुरुवार, 01/15/2015 - 13:31
नवीन
शेतकर्याने हार मानन्यापेक्षा त्याच्या स्थितीला जबाबदार असणार्या नेत्यांना विचारायला हवा अस माझ मत आहे भाउ
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/15/2015 - 15:35
नवीन
@आमचीनका करुकाळजी तुम्ही,
कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !! >>> बरं! घडवा!
.
.
.
.
फ़क्त एक दहा कॉमेंट्स आल्या... , कीच घडवा!
- Log in or register to post comments
S
Sanjay Kokare
गुरुवार, 01/15/2015 - 16:06
नवीन
अहो शेतकर्यांचा विचार करणारी लोक नाही उरलीत म्हणुन
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 01/15/2015 - 16:42
नवीन
अहो काहीही काय? "गं.मु."त करू नका. जुने धागे पहा.
- Log in or register to post comments
S
Sanjay Kokare
गुरुवार, 01/15/2015 - 17:05
नवीन
आदबाहु साहेब कोणाला म्हणताय आपण
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Fri, 01/16/2015 - 11:46
नवीन
कविता छान ! स्वाभिमानी शेतकर्याचा आवाज वाटतोय..
खरेच सबसिडी.. पॅकेज खरे तर हे शेतकर्यांपर्यंत पोहचतच नाही..
खरे तर त्याला ह्याची भुक नाहिये..
त्याला हवा एक प्रेमाचा मायेचा हक्काचा सहारा.. फुकटाचे त्याला देण्यापेक्षा .. त्याला योग्य मदत मिळाली पाहिजे .. जेनेकरुन त्याचा प्राण फुकट जाता कामा नये
- Log in or register to post comments
S
Sanjay Kokare
Fri, 01/16/2015 - 12:25
नवीन
नक्कीच गणेशा सर
- Log in or register to post comments