" आईले विचारल म्या "
आईले विचारल म्या आपलीपरिस्थिती एवढी गरीब कौन असते?,
आईन सांगितल मलेआपनशेतकर्याच्या एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!!
आईले विचारल म्या लोक तं आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते,
आईनं सांगितले कारण त्याईच्या ईथची पोई आपल्या ईथचपिकते !!!
आईलाविचारल म्या त्या नेत्याच्या अंगावरले कपडेएवढे पांढरे कसेकाय असते,
आईने सांगितले कारण त्यांईच्या कपडाचा कापुस पणआपल्याच मिळते!!!
आईले विचारल म्या मग माया अंगावरचे कपडे कौन मयकलेअसते,
आईन सांगितले कारण तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!!
आईले विचारल म्या मलेशाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते,
आईने सांगितल कारण आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!!
आईलाविचारल म्या आये मग आपल्याजवळ पैसे कौन नसते,
आईन सांगितल मलेकारण आपल्या वाटणीचा हिस्सा हे पुढारी लोकच खाउन घेते!!!
आईले विचारल म्या कौन वर्गातले पोरं म्हले तुया बापान आत्महत्या केली असम्हणते,
आईने सांगितले मलेकारण तुया बापान शेती करुनदुसर्याच पोट भरल असते!!!.....
........................................................
........................................................
कवी.............
संजयरा. कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
Facebook: Www.facebook.com/sanjaykokare
कविते मध्ये शुद्धलेखन कस करणार भौमी राहून राहून या प्रश्नाचा विचार करतोय. कविला नक्की काय म्हणायचय तेच कळत नाहीये. म्हणजे शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत आणि शुद्धलेखन? की 'शुद्धलेखन (?) नक्की काय , म्हणायचय तरी काय तुम्हाला ?