Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रश्न असा की......

च — चुकलामाकला, Sat, 01/17/2015 - 18:04
प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे कधीच नसते सुचले उत्तर प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे प्रश्नातच दडलेले उत्तर.. प्रश्न असा की मनात येता डोळे अलगद भरून यावे दुखरे आणिक हळवे उत्तर अश्रूंमध्ये वाहून जावे.. प्रश्न असा की सात्विक, दाहक, तेजस्वी कृष्णेसम कणखर प्रभेत त्या प्रश्नाच्या व्हावे द्रोण, भीष्म अन कृपही निरुत्तर.. प्रश्न असा की रुढींचा मृत सागर त्याने ढवळून जावा सत्य शुद्ध अन मांगल्याचा अभंग त्यातून तरून यावा.. प्रश्न असा की विश्वाच्या गर्भाला त्याने स्पर्शून जावे उत्तर त्याचे शोधू जाता सिद्धार्थांचे गौतम व्हावे..

प्रतिक्रिया द्या
2652 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
सुचेता Sun, 01/18/2015 - 11:32 नवीन
प्रश्न आवडला.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 01/18/2015 - 13:05 नवीन
सुरेख रचना.आवडली कविता.
  • Log in or register to post comments
अ
अजब Mon, 01/19/2015 - 03:16 नवीन
रचना आवडली.
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 01/19/2015 - 05:24 नवीन
मस्तच वेगळीच रचना
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 01/19/2015 - 06:50 नवीन
छान रचना!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Mon, 01/19/2015 - 07:12 नवीन
छान प्रश्न
प्रश्न असा की विश्वाच्या गर्भाला त्याने स्पर्शून जावे उत्तर त्याचे शोधू जाता सिद्धार्थांचे गौतम व्हावे..
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 01/19/2015 - 07:18 नवीन
खूप छान कविता!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/19/2015 - 08:20 नवीन
प्रश्न असा की रुढींचा मृत सागर त्याने ढवळून जावा सत्य शुद्ध अन मांगल्याचा अभंग त्यातून तरून यावा..
हे फारच छान !
  • Log in or register to post comments
क
कहर Mon, 01/19/2015 - 10:51 नवीन
सुन्दर
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Tue, 01/20/2015 - 14:51 नवीन
धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 01/24/2015 - 10:40 नवीन
प्रश्न असा की रुढींचा मृत सागर त्याने ढवळून जावा सत्य शुद्ध अन मांगल्याचा अभंग त्यातून तरून यावा.. आवडेश .. एक वेगळी कवी कल्पना म्हणुन जास्त आवडली.. खरेच प्रश्न असेच असले तर ?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 01/24/2015 - 10:42 नवीन
कवीची वेगळी कल्पना म्हणुन जास्त आवडली.. असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
च
चुकलामाकला गुरुवार, 01/29/2015 - 14:15 नवीन
:):):) धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा