छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६ निकाल - व्यक्तिचित्रण
नमस्कार मिपाकरांनो!
सर्वप्रथम मी येथे, आज या ठिकाणी, आजच्या या दिवशी, आजच्या प्रसंगी (इत्यादी इत्यादी) सर्व मिपाकरांचे आभार मानतो. या स्पर्धेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात, एकसे एक प्रवेशिका पाठवल्यात, त्यांना दादही दिलीत, आणि स्पर्धेच्या बदललेल्या स्वरूपाचे खुल्यादिलाने (बेशर्त??) स्वागत केलेत. त्याबद्दल धन्यवाद!
संपादक मंडळाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली आणि तेवढा विश्वास दर्शवला त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत! अर्थात्, 'संपादक मंडळ' या आयडीकडून व्यक्तिगत संदेश आल्याचा विरोप (इमेल) पाहिल्यावर आधी थोडा दचकलोच. त्यात मिपा उघडेना. मग अरेच्चा, आपलं काय चुकलंय बरं, आयडी उडतोय की काय अशा शंकाकुशंका वगैरेंनी बराच वेळ डोक्याचे रे-मार्केट केल्यावर प्रत्यक्ष मिपा उघडल्यावर पाहिले आणि जीव भांड्यात पडला. पण तोही थोडासाच वेळ. मिपाच्या पुढील छायाचित्रण स्पर्धेचे परीक्षक व्हाल का अशी विचारणा. अरे बापरे. मला छायाचित्रणातलं एवढं कधीपासून कळायला लागलं असा प्रश्न स्वतःलाच विचारून झाला.
विषय काय द्यावा हेही माझ्याच गळ्यात मारलं होतं, मग या संधीचा फायदा घेऊन व्यक्तिचित्रण ही माझ्या जिव्हाळ्याची बाब मी निवडली. यानिमित्ताने छायाचित्रणातल्या या प्रकारातले थोडेसे ज्ञान पाजळता आले. :-) आणि जास्तीत जास्त मिपाकरांना या स्पर्धेत भाग घेता यावा हाही महत्त्वाचा हेतू होता. व्यक्तिचित्रण हा छायाचित्रणातला सुपरस्पेशालिटी प्रकारातला भाग म्हणता येईल. तुम्हांला आश्चर्य वाटेल कदाचित, पण खरे व्यावसायिक व्यक्तिचित्रण हे अगदी फुलफ्रेम डीएसएलआरनेही केले जात नाही. त्यासाठी मीडियम फॉरमॅटसारखे भलेथोरले कॅमेरे वापरले जातात. कारण त्यासारखी 'डायनॅमिक रेंज' किंवा रंगछटाव्याप्ती ही कुठल्याच डीएसएलआरने मिळू शकत नाही. अलबत, शेवटी कॅमेरा कुठला का असेना, छायाचित्रकाराचे कौशल्य जास्त महत्त्वाचे.
स्पर्धेच्या निकषांबद्दलही असेच करायचे ठरले. तांत्रिकता आणि छायाचित्रणातील ज्या बाबी कॅमेरा-लेन्स इत्यादी उपकरणांच्या उत्कृष्टतेवर अवलंबून असतात, उदा. नॉइज कंट्रोल, इत्यादींपेक्षा तुम्ही छायाचित्रकार म्हणून तुमच्या विषयवस्तूंमध्ये काय वेगळं पाहता आणि ते कसे टिपून जगासमोर सादर करता (अभिव्यक्ती) याला जास्त महत्त्व दिले गेले. त्यामुळेच तुम्ही काढलेले फोटो हे डीएसएलआरने, प्राइमलेन्सने काढले आहेत की मोबाइलने हे बघत न बसता तुम्ही स्वतःतील छायाचित्रकाराच्या आणि कॅमेर्याच्या दृश्य मर्यादांच्या पलिकडे जाऊन कितपत प्रयत्न केलाय, एरवी सर्वचजण जसे फोटो काढतील त्यापेक्षा वेगळे काही करण्याचा प्रयत्न केलाय का, एखादा वेगळा कोन तुम्हांला साधलाय का, रचनाविचार कसा ठेवलाय, प्रकाशाच्या दिशेचा, तीव्रतेचा योग्य असा वापर केलाय का या आणि अशाच निकषांना मी इथे प्राधान्य दिले आहे. छायाचित्रण ही एक 'सब्जेक्टिव' स्वरूपाची कला आहे. एकाला जे आवडेल, रुचेल ते दुसर्यालाही तसेच आवडेल असे नाही. त्यामुळे ज्यांच्या प्रवेशिका पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवू शकलेल्या नाहीत त्या वाईट होत्या असे समजू नका.
स्पर्धेतील प्रवेशिकांबाबत - मला सर्वच प्रतिमांमध्ये काही-ना-काही चांगले शिकण्यासारखे सापडले. एकूण २२ वैध प्रवेशिका मुदत संपेपर्यंत आल्या. १६ तारखेलाही एक प्रवेशिका आली. एक अपवाद म्हणून तीही विचारात घेतली आहे. (चालतंय इतकं, होय ना? :-) ) प्रकाशाचा समाधानकारक म्हणता येईल अशा प्रकारे उपयोग खूपशा प्रतिमांमध्ये केला गेला. परंतु रचनाविचार ह्या निकषावर मला आवडतील अशा थोड्याच प्रतिमा दिसल्या. निदान जी गोष्ट पूर्णपणे आपल्या हातात असते तिच्यावर प्रभुत्व मिळवायला हवे. तरच तुमचे तुमच्या कॅमेरा-लेन्स-प्रोसेसिंग या तंत्रावर असलेले कौशल्य उठून दिसेल.
प्रवेशिका कोणाची आहे ह्याचा अजिबात विचार न करता सर्व प्रतिमा मी आधी हार्ड-डिस्कवर उतरवून घेतल्या. प्रत्येक प्रतिमा एनलार्ज करून पुनःपुन्हा नीट पाहिली. कंपॅरिजन किंवा तुलना करण्याचे बरेच राउंड घेतले. प्रत्येक राउंडमधून थोड्याथोड्या प्रवेशिका गळत गेल्या. शेवटी उरलेल्या पाच-सहा प्रतिमांतून विजेत्या प्रवेशिका निवडणे फारच कठीण गेले आणि खूपच लहानसहान खुसपटे काढून झाल्यावर, प्रत्येक प्रवेशिकेची तुलना त्या-त्या प्रकारातल्या जगात नावाजलेल्या दिग्गज छायाचित्रकारांच्या तशाच उत्तमोत्तम प्रतिमांबरोबर करून मगच अंतिम विजेत्या प्रवेशिका निश्चित झाल्या. माझी निवड काही व्यावसायिक छायाचित्रकार मित्रांचे निष्पक्ष मत मागवून पारखून घेतली, आणि शेवटी आज, या ठिकाणी (वगैरे वगैरे) निकाल जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
सर्व एकत्रित प्रवेशिका खालीलप्रमाणे-
मला प्रत्येक प्रवेशिकेवर विस्तृत भाष्य करणे शक्य होणार नाही. काही निवडक प्रतिमांबद्दल एकदोन वाक्ये त्यांच्या खाली देत आहे.
1. दुर्लक्षामागचा दृष्टिकोन - ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती ह्यांनी घेतलेल्या ह्या प्रतिमेत सर्वात परिणामकारक काय असेल तर ती प्रकाशयोजना. अदितीने ज्याला 'रेम्ब्रा' लाइटिंग म्हणले जाते त्या प्रकाशयोजनेत 'इम्प्रोवाइज' केले आहे हे मला खूपच आवडले. रेम्ब्रा ह्या प्रख्यात चित्रकाराने वापरलेली ही नैसर्गिक प्रकाशशैली चटकन ओळखण्याची खूण म्हणजे चेहर्याच्या अप्रकाशित भागात गालावर प्रकाशझोताचा एक त्रिकोण तयार होतो. अदितीच्या प्रतिमेत ह्याच त्रिकोणावर फोकस केले आहे. अनावश्यक भागही व्यवस्थित कातरला आहे. अशा वेळी चेहर्याचा क्लोजअप शॉट घेताना थोडे लहान अॅपर्चर वापरले पाहिजे म्हणजे पूर्ण चेहरा फोकस होतो. प्रतिमेतील डोळ्यांचा भाग थोडा ब्लर आल्यामुळे परिणामकारकता थोडी कमी झाली आहे.
2. गोंधळी - वेल्लाभट
वेल्लाभट आणि मनरंग ह्यांच्या प्रवेशिकांमध्ये साधर्म्य म्हणजे पिकासामधील सेंटर ब्लरचा वापर. असे डीफोकसिंग तितकेसे नैसर्गिक वाटत नसले तरी प्रतिमेचा एकूण प्रभाव व्यक्त करण्यासाठी हा दृष्टिकोनही चांगला आहे. गोंधळी अगदी रंगात येऊन त्याची कला सादर करतोय हे खूपच छान पकडले आहे चौकटीत.
3. कर्जत स्टेशनचा वडेवाला - मदनबाण
मदनबाण ह्यांचा हा मीडिअम शॉट पार्श्वभूमी इन्क्लूड केल्यामुळे परिणामकारक झाला आहे. नेहमीच्या उभ्या फ्रेमिंगऐवजी आडव्या फ्रेमिंगमुळे रेल्वेरूळ एक प्रकारचा बंदिस्तपणा आणतात. फक्त त्या वडेवाल्याच्या पेटार्यातील वडेही फ्रेममध्ये अजून घ्यायला हवे होते असे वाटले. प्रकाश तसा हार्श असल्याने अशा प्रकारचे फोटो घेणे अवघड असते.
4. अनामिक आजी - नांदेडीअन
स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे विषयवस्तूचा एकूण दृश्यपरिणाम हा कॅमेर्याच्या चौकटीत कैद करणे ही अभिव्यक्ती महत्त्वाची आहे, हे इथे पुरेपूर जाणवते. चित्रचौकट फारच उभट वाटली. डावीकडे थोडी निगेटिव्ह स्पेस सोडायला हवी होती, जेणेकरून आजीच्या उभ्या आयुष्यासारख्याच उभ्या प्रतिमेला बॅलन्स करणारा एक घटक चित्रात आला असता. दर्शकांच्या संवेदनशीलतेला स्पर्श करणार्या अशा काही गोष्टी आवर्जून वापराव्यात.
5. सुरवात - अत्रुप्त आत्मा
रचनाविचार चांगला आहे. किंचित हेडरूम क्रॉप करता आली असती. अगेन्स्ट द लाइट प्रतिमा घेतल्यामुळे चेहरा थोडा अंडरएक्स्पोज झाला आहे.
6. खरवंडी गावातला गाववाला - कंजूस
डावीकडे आणि डोक्याच्या वरच्या बाजूला अनावश्यक जागा सुटली आहे. तेवढी क्रॉप करून एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन थोडे वाढवता आले असते.
7. आई - विशाल कुलकर्णी
आईच्या एकसष्टीची प्रसन्न आणि समाधानी मुद्रा चांगली टिपली आहे. चौकोनी फ्रेमिंगऐवजी थोडे व्हर्टिकल फ्रेमिंग घेऊन मीडिअम क्लोजअप् शॉट घ्यायला हवा होता.
8. पडू दे बर्फ - जुइ
अशा फोटोंमध्ये एक करता येते, नेहमीसारखे आपण सरळ उभे राहून आपल्या आय-लेव्हलने फोटो घेण्याऐवजी थोडे कंबरेच्या लेव्हलने फोटो घेतल्यास चित्रचौकटीत अनावश्यक डिस्ट्रॅक्ट करणारे घटक टाळता येतात, चित्राला एक प्रकारची डेप्थही मिळते. मागच्या बाजूची बर्फ संपल्याची सीमा आहे ती व्हर्च्युअल होरायझन आहे. असे आभासी क्षितिज हे मॉडेलच्या गुढघ्याच्या आसपास येईल अशा बेताने फोटो घेऊन पहा.
9. नववधू - सौरभ उप्स
मॉडेलच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्या चेहर्यावरील भावना अचूक टिपणे हे फार खुबीने दाखवले आहे. प्रेक्षकांची नजर पहिल्याच फटक्यात मॉडेलच्या डोळ्यांवर स्थिरावते आणि पूर्ण चेहरा दिसत नसला तरी त्या वधूचे आभासी व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या मनःपटलावर कोरले जाते हे ह्या फोटोचे यश आहे. अतिशय वेगळा आणि कल्पक शॉट. थोडे डोळे शार्प आले असते तर अजून खुलून दिसले असते.
10. रुबाबदार बी.एस.एफ. जवान - विनोद१८
उभी चित्रचौकट घ्यायला हवी होती. फोटो छान सुस्पष्ट आला आहे. जवान रूबाबदार म्हणण्यापेक्षा थोडा विचारमग्न वाटतो आहे. हे आय-लेव्हलच्यावरून फोटो घेतल्याने झाले आहे.
11. कडकलक्ष्मीवाला - स्पा
विनेटिंग (vignetting) परिणाम नंतर पोस्टप्रोसेसिंगमध्ये दिला आहे. त्यामुळे मूळ विषयवस्तूचा भाव खुललाच आहे. कपाळावरील पट्टी आणि गंधपट्ट्याच्या फिकट रंगाला ते कॉम्प्लिमेंटरी वाटते आहे. फ्रेमिंगही अचूक आहे. उभ्या चित्रचौकटीऐवजी आडवी चित्रचौकट घेण्यात एक प्रकारचा धोका असतो. तो पत्करूनही रचनाविचार प्रभावी ठेवण्यात चांगलेच यश मिळवले आहे.
12. अंदमानची पंचायत सदस्य - आतिवास
अगेन्स्ट-द-लाइट फोटो घेताना कॅमेर्याच्या मर्यादांमुळे फ्लेअर आले आहेत. विषयवस्तू काहीशी (कॅमेर्याच्या) डावीकडे पाहत असताना उजवीकडे जास्त मोकळी जागा सोडणे योग्य नाही.
13. सासवड चे आजोबा - येडाखुळा
काही प्रमाणात लॉन्गशॉट म्हणता येईल अशी विषयवस्तू आणि आजूबाजूचे दृश्य ह्या दोन्हींना सारखेच स्थान देणारी प्रतिमा. यात अजून काही प्रयोग करता आले असते. उदा. हॉरिझॉन्टल पर्स्पेक्टिवऐवजी वर्म-व्ह्यू पर्स्पेक्टिव इत्यादी.
14. मुलगा आणि लेडी डायनॅसॉर - मुक्त विहारि
हा मजेचा क्षण छान पकडला आहे. फ्लॅश वापरताना विषयवस्तूच्या डोळ्यांतून तो परावर्तित झाल्यास ते तितकंस चांगलं दिसत नाही, म्हणून फ्लॅश एकतर बाउन्स करावा किंवा मॉडेल्सना थेट कॅमेर्याकडे पाहू देऊ नये.
15. अत्रुप्त आत्मा - वल्ली
प्रतिमाविचार चांगला आहे. दोन वेगवेगळ्या प्रतलांमधील विषयवस्तू एकाच वेळी शार्प फोकसमध्ये येण्यासाठी थोडे लहान अॅपर्चर वापरावे, तसेच शक्यतो मॅन्युअल फोकसिंग करून दोन्ही मॉडेल्स सुस्पष्ट येतील हे पहावे.
16. गानयोगिनी श्रीमती धोंडुताई कुलकर्णी - मोहन
अतिशय छान प्रतिमा व रचनाविचार. साधासाच, परंतु प्रभावी. किंचित उजवीकडे जास्त जागा सोडून प्रेक्षकांच्या नजरेला व्यवस्थित गाइड करायला हवे होते.
17. तबला नवाझ सुप्रीत देशपांडे - वाचक
प्रभावी प्रकाशयोजनेचे छान उदाहरण. मीडिअम क्लोजअप शॉट. योग्य दिशेला जास्त जागा मोकळी सोडली आहे. त्यामुळे प्रतिमेत चांगला समतोल निर्माण झाला आहे. 'की लाइट' आणि 'हेअर लाइट' यांचा खूपच प्रभावी वापर आहे.
18. प्रवेशिका - बेमिसाल
अनावश्यक मोकळी जागा जास्त झाली आहे. चित्रचौकटीत प्रखर प्रकाशाचा स्रोतही आल्यामुळे कॅमेर्याने प्रतिमा अंडरएक्स्पोज केली. अशा वेळी फ्रेममध्ये प्रकाशस्रोत येणार नाही अशा कोनातून फोटो घ्यावा.
19. शेगावच्या देवळाबाहेरचे बाबा - मनरंग
आडव्या चित्रचौकटीचा वापर व्यक्तिचित्रणात करताना रचनाविचारात समतोल साधण्याची कसरत करणे फारच अवघड होऊन बसते. येथे उभे फ्रेमिंग जास्त परिणामकारक ठरले असते असे वाटते. त्याचबरोबर डावीकडे जास्त जागा सोडायला हवी होती.
20. रसाळगडाच्या वाटेवर - शलभ
प्रतिमा किंचित धूसर आहे. डावीकडे अजून किंचित क्रॉप करता आले असते.
21. किल्लेदार - राघव
अ टिपिकल पोर्ट्रेट शॉट. हेडरूम आवश्यक तितकीच सोडली आहे. डावीकडची आउट-ऑफ-फोकस पार्श्वभूमी ही फिकट येईल याकडे मुद्दाम लक्ष पुरवले आहे हे लक्षात येते. येथे अगदीच 1x1 चौकट ठेवण्याऐवजी 4x6 या प्रमाणात फ्रेमिंग केले असते आणि उजवीकडे हाताच्या कोपरापर्यंतच फ्रेम ठेवली असती तर अजून वेगळा परिणाम मिळाला असता असे वाटले. पण अर्थात ही चौरसाकृती मीडिअम फॉरमॅटसारखी चित्रचौकटही चांगली दिसतेय.
22. आजी - चौकटराजा
अगदी सॉफ्ट लाइटिंग आणि तसाच मृदू चेहरा यामुळे हे पोर्ट्रेट परिणामकारक झाले आहे. चेहरा किंचित तिरपा असल्याने एकदमच ठोकळेबाज चित्रचौकट होण्याचा धोका टळला आहे.
23. द्रो-दुल-शोर्टेन - rahulvg
लॉन्गशॉट चांगला आहे. पुन्हा एकदा, विषयवस्तूच्या डोळ्यांच्या पातळीत कॅमेरा ठेऊन अशा वेळी फोटो घ्यावा. बसायच्या बाकाच्या इतके समोरून फोटो घेण्याऐवजी बाक कॅमेर्याला समांतर येईल असा एका टोकाकडून फोटो काढून पहा. मस्त बोके मिळेल.
21. किल्लेदार - राघव
द्वितीय क्रमांक - 11. कडकलक्ष्मीवाला - स्पा
प्रथम क्रमांक - 9. नववधू - सौरभ उप्स

अॅण्ड द विनर्स आर...तृतीय क्रमांक विभागून - 17. तबला नवाझ सुप्रीत देशपांडे - वाचक
21. किल्लेदार - राघव
द्वितीय क्रमांक - 11. कडकलक्ष्मीवाला - स्पा
प्रथम क्रमांक - 9. नववधू - सौरभ उप्स
सर्वांचे अभिनंदन! :-)
💬 प्रतिसाद
(53)
च
चौकटराजा
Sat, 01/24/2015 - 16:26
नवीन
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sat, 01/24/2015 - 16:27
नवीन
https://www.facebook.com/163522990382045/photos/a.163523920381952.41820.163522990382045/806759492725055/?type=1&theater
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sat, 01/24/2015 - 16:36
नवीन
फेस बुक वर Watercolour Artist Rajkumar sthabathy असा शोध द्या व एकसोएक व्यक्तिचित्रे वाटरकलर मधे पहा !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2