Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खाद्यभ्रमंती - पुणे

न
नांदेडीअन
गुरुवार, 01/22/2015 - 06:46
🗣 251 प्रतिसाद
खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ? बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल. थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल. चला, सुरूवात मीच करतो. - चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.

- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.

- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !


प्रतिक्रिया द्या
124207 वाचन

💬 प्रतिसाद (251)
म
मदनबाण गुरुवार, 01/22/2015 - 07:40 नवीन
पहिले ३ फोटो पाहुन मला भस्मा अ‍ॅटॅक झाल्याची जाणिव झाली आहे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 01/22/2015 - 07:41 नवीन
अरे हो... एक राहिलच... मी पहिला ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मृत्युन्जय गुरुवार, 01/22/2015 - 07:48 नवीन
१. तुम्ही सांगितलेल्या टेस्टी टंग्स मध्ये डॉलर जिलबी आणि मालपुआ अप्रतिम मिळतो. गुलाबजामही अतिशय सुंदर २. आपटे रोडवरच्या शाहजी पराठा हाउस मध्ये पराठे अप्रतिम मिळतात. थोडे महाग आहेत. पण वर्थ व्हिजिट. साधा अँबियन्स चालणार असेल तर त्यांची मूळ शाखा लक्ष्मी रोडवर आहे. तिथे किंमती कमी आहेत. इथला चुर चुर नान, अमृतसरी नान आणि बनारसी आलू पराठा केवळ अप्रतिम. दाल लसूनी पराठीही उत्तम. लस्सी देखील सुंदर. ३. कोथरुडला (पौड रोड) स्ट्यु आर्ट हे अतिशय अप्रतिम छोटेसे हॉटेल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्यु अतिशय दर्जेदार मिळतात. हंगेरियन गुलाश खास प्रसिद्ध. ४. कोल्हापुरचे राजमंदिर आइसक्रीम आता पुण्यात सुरु झाले आहे. कोथरुड डीपी रोड (म्हातोबा मंदिरापासुन गणंजय सोसायटीवर जाणारा रस्ता) वर आहे. येथील रेड पेरु आइसक्रीम केवळ अप्रतिम. बाकीचीही आइसक्रीम बरी आहेत. पायना स्ट्रॉबेरी हा एक वेगळा फ्लेवरही मिळतो इथे. ५. ढोले पाटील रोडवर द्रविडा'स बिस्ट्रो नव्याने सुरु झाले आहे. सिटी पॉइंट मध्ये. उत्कृष्ट दाक्षिणात्य पदार्थ मिळतात. इथली थाळी देखील सुंदर. ६. रोल्स मॅनियाच्या शाखा ठिकठिकाणी आहेत. त्यांचे सगळेच रोल्स सुंदर आहेत. ७. औंधला स्किप्स नावाचा कॅफे आहे. येथील ब्रेकफास्ट आणि सँडविचेस अतिशय सुंदर. ८. कोथरुडला करिष्माच्या येथील खाऊ गल्लीत सिन सिटी नावाची बेकरी आहे. येथील सर्वच केक्स सुंदर. खास करुन इटालियन कसाटा, हनी अल्मंड तर लय भारी. ९. कोथरुडला कोकण एक्स्प्रेसच्या गल्लीत मस्ती मिसळ आणि पौड फाट्यावर किमायाच्या पुढच्या (कोथरुड कडुन नळ स्टॉप कडे जाताना) गल्लीतली कोल्हापुरी मिसळ निरातिशय सुंदर. १०. बावधनला त्रिकाया नावाचे हॉटेल आहे. अँबियन्स दर्जेदार. जेवण आवडेलच असे नाही. पण येथील लेमन कॉरियंडर सुप अतिशयच दर्जेदार. ११. ठिकठिकाणी डेयरी डॉन आइसक्रीम आहे. यांच्या कडे डेयरी डॉन स्पेशल आणी अमेरिकन नट सुंदर मिळते. १२. भांडारकर रोडवर एक फ्रेंच बेकरी आहे. नाव नीट्से आठवत नाही (ले प्स्लेजर की कायसे नाव आहे). येथील मेकरुन आणि चीझकेक खुप सुंदर. १३. भाउ पाटील चौकात दिल्ली चाट दरबार सुरु झाले आहे. अस्सल दिल्ली साएड चाट आणि छोले भटुरे मिळतात (इथे काळे छोले असतात आणि ते काळा मसाला वापरतात. त्यामुळे सर्वांनाच आवडेल असे नाही) बाकी नंतर सांगेन
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 01/22/2015 - 07:54 नवीन
अजुन ३: १४. मॉडेल कॉलनीत ऑरियँटल वोक आहे. इथले बर्मीज खाउ सी जरुर ट्राय करावे. १५. मॉडेल कॉलनीतच हॉल्ली क्रेप्स आहे. इथले क्रेप्स सुंदर. अर्थात क्रेप्स हा प्रकार सगळ्यांना आव्डेल असे नाही. आपल्याला डोसे ठराविक प्राकारातच खायला आवडतात. क्रेप्स म्हणजे अगदी डोसे नसले तरीही हा प्रकार याच कारणाने अनेकांना आवडत नाही. १६. करिष्मा लेनमध्ये आणि शबरी, एफ सी रोडच्या बाहेर पुर्वी स्पाइस आइस्क्रीम मिळायचे. आताचे माहित नाही. काही फ्लेवर्स खुपच सुंदर होते. मिळत असेल अजुनही तर नक्की ट्राय करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 01/22/2015 - 07:55 नवीन
अजुन १: १७. जे जे गार्डनचा वडापाव पुण्यात प्रसिद्ध आहेच. त्यांची एक शाखा आता नळ स्टॉप वर समुद्रच्या लायनीत, कॉटनकिंगच्या बाजुला सुरु झाली आहे. वडापाव अप्रतिम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नांदेडीअन गुरुवार, 01/22/2015 - 07:57 नवीन
हा वडापाव फेमस आहे हो खूप. फेमस जागांची नावं मुद्दाम दिली नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 04/20/2021 - 08:39 नवीन
गार्डन वडापाव खायचा असेल तर कॅम्पात जा, न पेक्षा कोथरुड महेश विद्यालयजवळचा कोथरुड वडापाव ट्राय करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
ग
गवि Wed, 01/28/2015 - 09:12 नवीन
आपटे रोडवरच्या शाहजी पराठा हाउस मध्ये पराठे अप्रतिम मिळतात. थोडे महाग आहेत. पण वर्थ व्हिजिट. साधा अँबियन्स चालणार असेल तर त्यांची मूळ शाखा लक्ष्मी रोडवर आहे. तिथे किंमती कमी आहेत. इथला चुर चुर नान, अमृतसरी नान आणि बनारसी आलू पराठा केवळ अप्रतिम. दाल लसूनी पराठीही उत्तम. लस्सी देखील सुंदर.
असहमत.. बरे आहेत पराठे पण अप्रतिम किंवा उल्लेखनीय नाहीत. जाडेभरडे वाटले. चुरचुर नान बरे, पण मेथी पराठा म्हणजे खुसखुशीत मेथी तोंडात येणारा ठेपला नसून अगदीच पालेभाजीची हिरवी प्युरी माफक प्रमाणात कणकेत एकजीव मिसळून नुसता हिरवा रंग आणलेली जाडी चपाती वाटली. आलू, गोबी पराठ्याचेही तसेच. तव्यावरचा पातळसर अन खुसखुशीत पराठा जास्त छान लागतो. यांचे तसे नव्हते. अर्थात पसंद अपनी अपनी हे शेवटी आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Sat, 01/31/2015 - 07:42 नवीन
शाहजीज चे पराठे पातळ नाहित हे नक्कीच. किंबहुना त्याच कारणासाठी मला ते जास्त आवडले. स्टफिंग सढळ हस्स्ते वापरले जाते. मेथी पराठी बद्दल माझा पास. सगळ्या प्रकारच्या पराठ्यांमध्ये हा स्गळ्यात जास्त नावडता, कधीच खात नाही (अपवाद घरी करुन ताटात कंपल्सरी वाढलाच जातो तेव्हाचा). पुर्वी मी चैतन्यच्या पाराठ्यांचा चाहता होतो. पण त्यांची क्वालिटी पारच ढासळली आहे. तरीही बरे असतात तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अनुप ढेरे गुरुवार, 01/22/2015 - 07:56 नवीन
बेष्ट धागा...
१२. भांडारकर रोडवर एक फ्रेंच बेकरी आहे. नाव नीट्से आठवत नाही (ले प्स्लेजर की कायसे नाव आहे). येथील मेकरुन आणि चीझकेक खुप सुंदर.
होय, ला प्लेझीर नावाचं हाटील. छोटसं आहे. पण मस्तं (आणि महाग). सँडिविचं खाल्ली होती दोन. लय भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ज
जॅक डनियल्स Sat, 01/24/2015 - 01:26 नवीन
ला प्लेझीर, हे एका आपल्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी माणसाचे फ्रेंच हॉटेल आहे. सिद्धार्थ महाडिक - राष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि नंतर मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी शेवटी सिडनी मधून बेकरीचे शिक्षण ! या भांडवलावर याने भांडारकर रस्त्यावर फ्रेंच बेकरी टाकली आणि यशस्वी करून दाखवली. खूप प्रयोग करत राहणे हा या बेकरी चा आत्मा ...त्यामुळे खाणे थोडे महाग असले तरी समाधान देऊन जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 09:44 नवीन
द्रविडा'ज बिस्त्रो हे ईअरमार्कवल्या गेले आहे. नक्की जाऊन पाहीन. बहुत धन्यवाद. लझीझदेखील लवकरच ट्राय औट करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 02/03/2015 - 19:06 नवीन
द्रविडाज बिस्ट्रो इयरमार्कवले आहेस म्हणुन थोडेफार सांगतो: १. हे जरी दाक्षिणात्य हॉटेल असले तरी ते ऑर्गॅनिक फूडसाठी जास्त प्रसिद्ध आहे. २. मला त्यांची कंसेप्ट आवडली. मस्त टोपलीत वगैरे खाद्यपदार्थ आणुन ठेवतात. ३. स्टाफ हा नौकरवर्ग न वाटता सगळे मालक आहेत असे वाटते. अ‍ॅटिट्युडमुळे नाही तर सर्व्ह करण्याच्या त्यांच्या मनापासूनच्या इच्छेमुळे. सर्व्हिस प्रॉम्प्ट नाही म्हणता येणार पण आतिथ्यशील वाटते. माझा घसा खराब आहे म्हटल्यावर त्याने कुठल्यासे हर्ब्स मिसळुन फिकट गुलाबी रंगाचे पाणी गरम करुन आणुन दिले (गुड फॉर सोर थ्रोट यु नो. आवर शेफ सजेस्टेड दिस फॉर यु). (हे फुकट होते हे जास्त महत्वाचे. फुकट ते असेही पौष्टिक) ४. चव थोडी सपक आहे. मी रस्सम नाही चाखु शकलो. पण बाकी पद्दार्थ थोडे माइल्ड क्याटेगरीतले होते. ५. ते जवळजवळ प्रत्येक गोष्ट कस्टमाइझ करुन देतात. सॅलेड, इडली, डोसा, उत्तपा, पराठा सगळे कस्टमाइझ करुन देतात. ६. बर्‍याच गोप्ष्टी ते पॉर्शन बेसिस वर देतात. पॉर्शन म्हणजे मध्यम (छोटी ते मध्यम या मधली खरे म्हणले) आकाराची वाटी. हाफ बिर्याणी म्हणजे एक मिडीयम बाउल वगैरे. पॉर्शन बेसिस वर अस्ल्ल्याने क्वांटिटी गंडते. आपण समजा फ्राइड पनीर सागितले की तो पनीरचे ३ आयताकृती तुकडे आणुन ठेवतो. चव चांगली होती आणि पोर्शन कमी होते तशी किंमत पण कमी होती. पण आपला क्वांटिटीचा अंदाज त्यामुळे चुकु शकतो. ७. या पॉर्शन आणि कस्टमाइझच्या भानगडीत ते बराच घोळ घालतात. उदा. एखादे स्पेशल चाय हॉटेल असेल तर ते असा गोंधळ घालतील: १. ब्लॅक टी की रेग्युलर २. रेग्युलर असेल तर मसाला की बिन मसाला. ३. साखरेचा की बिनसाखरेचा ४. ब्लॅक हवा असेल तर लेमन की दार्जीलिंग की अर्ल ग्रे की जस्मिन की आसाम की अजुन काही ५. ब्लॅक विथ शुगर की विदाउट शुगर ६. रेग्युलर डिप की लाँग डिप ७. दूध हवे असेल तर डेयरी व्हाइटनर की साधे दूध ८. साधे दूध हवे असेल तर गाईचे की म्हशीचे की शेळीचे. ९. म्हशीचे हवे असेल तर चितळे की गोकुळ की वारणा की कात्रज १०. गाईचे हवे असेल तर काठेवाडी की जर्सी. शेवटी तुम्ही वैतागता. पण मला हा असा चॉइसचा खेळ आवडला. मला इथली बिर्याणी आणि फ्राइड पनीर मनापासून आव्डले. किंमत रास्त होतीणिसर्व्हिस तत्पर नसली तरीही आगत्यशीर होती. रचना आणि प्रेझेंटेशन आवडले. फूड बाबत म्हणाल तर दक्षिणायन याहुन १०० पट जास्त उत्तम पदार्थ द्यायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अनुप ढेरे Wed, 02/04/2015 - 05:28 नवीन
परवाच जाऊन आलो. रस्सम भारी होतं. बिर्याणी देखील अप्रतीम. पण सर्वीस खूSSSSप स्लो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/05/2015 - 13:48 नवीन
मुद्दाम कालच जाऊन आलो. रस्सम- ऑस्सम. थोऽडे अजून टँगी चालले असते. पण कपात घेऊन चहासारखे पिताना जाम मज्या आली. सांबार- अजून बरेच मसालेदार पायजे होते. सपक वाटले. मालकाला सांगितल्यावर तो म्हणाला की भातासोबत वेगळे अन इडलीसोबत वेगळे सांबार देतो. इडली घेतल्यामुळे सपक सांबार नशिबी आले. चटण्या- लाल टोम्याटो चटणी ओक्के ओक्के. नारळ चटणी छान होती. आप्पम व व्हेज स्ट्यू- गंडलेला प्रकार होता. आप्पमच्या कडा छान जाळीदार होत्या पण सेंटरला ओलाकच्च लागत होता. व्हेज स्ट्यूदेखील जरा गंडलेला होता. याच्या तुलनेत सौथ इंडीजमधला व्हेज स्ट्यू म्हणजे वर्ल्ड अपार्ट. बट देन किंमतीतही फरक आहेत. उत्ताप्पा- नथिंग टू ग्रेट. ताक- अप्रतिम. असे ताक लै कमी ठिकाणी प्यालोय. बहुधा हलकी फोडणी टाकत असावेत असे वाटले. जे काय असेल ते असो, पण जे कै पेय समोर आले ते अप्रतिम होते. आणि दक्षिणायनच्या आठवणीने खरेच हळवा झालो. काय क्वालिटी होती च्यायला. ते बंद व्हायला कारणीभूत असलेल्यांना माझा तळतळाट लागणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Sat, 02/07/2015 - 08:46 नवीन
आणि दक्षिणायनच्या आठवणीने खरेच हळवा झालो. काय क्वालिटी होती च्यायला. ते बंद व्हायला कारणीभूत असलेल्यांना माझा तळतळाट लागणार आहे. खरं आहे रे. ती क्वालिटी इतर कुठेच नाही. साउथ इंडिज मध्ये पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/09/2015 - 10:51 नवीन
अगदी अगदी. साऊथ इंडीजमधला तो कै करी स्ट्यू फक्त ट्रेडमार्क आहे. तो आणि आप्पम हे पदार्थ तिथे जगात भारी. बाकी काही लय खास नाही. दक्षिणायनमध्ये जी क्वालिटी होती त्याच्यापेक्षा भारी क्वालिटी सौथमध्येही दिसली नाही. सौथमध्ये त्याच्या तोडीचे होते आजवर पाहिले ते सर्व. दक्षिणायन बंद झाल्यापासून हॉटेलोहॉटेली भटकतो आहे पण अत्रुप्त आत्म्यासारखी स्थिती झालीये. आमचे वैकुंठ काही सापडायला तयार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रचेतस Sat, 02/07/2015 - 12:17 नवीन
आणि दक्षिणायनच्या आठवणीने खरेच हळवा झालो. काय क्वालिटी होती च्यायला. ते बंद व्हायला कारणीभूत असलेल्यांना माझा तळतळाट लागणार आहे. आम्हालाच तळतळाट लागणार रे तुझे ;) बाकी ते दक्षिणायन लै बकवास होतं. अशी माजुरडी हाटेलं बंदच व्हायला हवीत. पैशे ढिगाने घ्यायचे पण क़्वांटीटी अगदीच कमी, बरे निदान क्वालिटी तरी हवी ना तर तीही नाही. सालं त्या दिवशी दक्षिणायन मधून अर्धपोटी बाहेर पडून नंतर मग संगली स्पेशल भेळपुरी आणि मराठवाडा पेश्शल लोणी धपाटे खावे लागले. किमान ७ ते ८ मिपाकर साक्षी आहेत ह्या गोष्टीला. पण ह्या बाट्याला दक्षिणायनचं लैच कौतुक :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/09/2015 - 10:52 नवीन
बाकी काहीही बोल पण क्वालिटीबद्दल बोलायचं काम नाय सांगून ठिवतो हां. अर्धपोटी बाहेर पडला ते क्वांटिटीमुळे, क्वालिटीमुळे नव्हे. श्या घालायच्या तर नेमक्या आणि योग्य मुद्यावर घातल्या पायजेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 02/09/2015 - 10:56 नवीन
अरे क्वालिटी पण आवडली नै रे इतकी. सौथैंडीज लैच उजवं वाटलं त्यापेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/09/2015 - 11:02 नवीन
शेवटी आवडनिवड ही सब्जेक्टिव्ह असते म्हणा. पण दक्षिणायन रसम विरुद्ध सौथिंडीज रसम दक्षिणायन मुळगापुडी इडली विरुद्ध सौथिंडीज मुळगापुडी इडली आणि एकूणच दक्षिणायन डोसा विरुद्ध सौथिंडीज डोसा अशा स्नॅक बेस्ड तुलनेत दक्षिणायन कोसो आगे आहे. तेच आप्पम इ. मध्ये सौथिंडीज पुढे आहे. शिवाय दक्षिणायनमधले टोम्याटो राईस, पुळिओगरे, बिशिबेळेभात, हे सौथिंडीजमध्ये मिळतही नाहीत तिथल्या लंचमध्ये. सांबाराबाबतीत दोन्ही मोर ऑर लेस सेम. सेम अबौट चटण्या. इडली, डोसा, उत्तप्पा, भात, रसम या पाच प्रकारांत दक्षिणायन उजवे तर आप्पम, स्ट्यू, इ. मध्ये सौथिंडीज उजवे. सबब, तुलनाच करायची झाली तर क्वालिटीच्या बाबतीत दक्षिणायनचा नाद नाही. असो, अजून हळवे नको व्हायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 02/09/2015 - 11:19 नवीन
हाहाहा. बाकी दक्षिणी पदार्थांबद्दलच बोलायचं तर हैद्राबादेतील चटणीज चा नादच खुळा. इतकं भारी जगात कुठंच नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/09/2015 - 11:25 नवीन
याबद्दल बरेच ऐकले आहे. गेल्याने जात आहे रे, आधी गेलेचि पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मृत्युन्जय Mon, 02/09/2015 - 12:04 नवीन
चटणीज ला नाही गेलास अजुन? अर्रे केवळ त्यासाठी हैद्राबाद ची एक ट्रिप मार. चार चटण्या + मुळगापुडी + सांबार. सगळे अनलिमिटेड. दैवी चव. घासाघासात निव्वळ ...... हैद्राबादेत जाउन एकवेळ बिर्याणी नाही खाल्ली किंवा कराचीची बिस्कीटे नाही चाखली किंवा मोती नाही घेतले तरी चालतील पण चटणीज इज अ मस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/09/2015 - 13:36 नवीन
अरे बापरे. तोंडातून ओहोळ वाहू लागले. नको नको, मी जातो मी जातो मी जातो............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
त
त्रिवेणी Mon, 06/13/2016 - 09:48 नवीन
Image removed. चटनीज ची इडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कपिलमुनी Mon, 02/09/2015 - 14:32 नवीन
पेसर अट्टू ! अहाहा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
र
रेवती Mon, 02/09/2015 - 16:11 नवीन
चटनीज हाटेलाच्या आठवणी लै जुन्या आहेत. उ. गृहाचे बांधकाम चालू असल्यापासून बघितले आहे. मग त्यांचे उद्घाटन झाले. कोणताही पदार्थ सुरेखच असतो असा अनुभव आला होता. चिरंजीवी दोसा की अशाच नावाचा कोणतातरी एक पदार्थ माझा आवडता. चटनीजमध्ये न जाऊन १० वर्षे तरी झाली असतील, किंवा जास्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Mon, 02/09/2015 - 12:01 नवीन
चेन्नैच मुरुगन देखील खासच. चटणीज एवढेच मल तेही आवडते. दाक्षिणायन मला त्याच लीगमधले वाटायचे. सांबर, रस्सम आणि चटणीज बद्दल बोलायचे झाल्यास. अर्थात चटणीज आणी मुरुगन दक्षिणायन पेक्षा खासच आहेत हे मान्यच करावे लागेल. निव्वळ सुख आहे ते. आणी हो. दक्षिणायन बद्दल काय पण बोलायचे नाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 02/09/2015 - 12:21 नवीन
:) चेंनैच्या मुरुगनबाबत बरंच ऐकलेले आहे. कधी योग आला तिकडे जायचा तर अवश्य जाऊच. बाकी चटनीज म्हणजे निव्वळ अप्रतिम रे. अगदी घासाघासात सुख. इकडे औंधला बनाना लिफ नावाची सौथींडीयन आंध्रा स्टाईल मेस आहे. अप्रतिम रस्सम, सांभार आणि केळफ़ुलाची भाजी मिळणारी. कुणी गेलंय का तिथे? एक मित्र प्रचंड तारीफ़ करत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बॅटमॅन Mon, 02/09/2015 - 13:35 नवीन
बनाना लीफ औंधमध्ये आहे का? आता जातोच. बहुत धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मृत्युन्जय Mon, 02/09/2015 - 14:37 नवीन
बनाना लीफ बंद झाले बहुधा. एकदा गेलो होतो मी शटर डाउन बघुन परत आलो. बादवे "इकडे औंधला" या शब्दांचा अर्थ काय? तु औंधात कुठे असतोस की काय कामाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 02/09/2015 - 14:42 नवीन
अरे ते दुपारीच चालू असते फ़क्त. मी हिंजवडीला आहे रे. पण बनाना लिफ ला गेलो नाही कधी. बाकी नावावर जाऊ नकोस. नाव जरी लै भारी वाटत असलं तरी ती आंध्रा स्टाइल लहानशी मेस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Mon, 02/16/2015 - 09:36 नवीन
बनाना लीफला जाउन आलो. माझे मतः १. इडली / मेदु वडा उपलब्ध नव्हता कारण तो फक्त दुपारी १२ पर्यंतच असतो. नंतर बॅटर तितकेसे चांगले उरत नाही असे हॉटेल चे मत होते. २. डोसा उत्तम होता. पण फक्त त्यासाठी मी फार मोठा प्रवास करणार नाही. बर्‍याच ठिकाणी चांगले डोसे मिळतात. ३. चटण्या (लाल आणी पांढरी) चांगल्या होत्या. पण परत तेच, केवळ चटण्यांसाठी फार पाय तुडवत जाण्यासारखे काही नाही. ४. रस्सम ठीकठाक होता. दक्षिणायन मध्ये यापएक्षा १०० पट चांगला रस्सम मिळायचा. थोडी टँगी थोडी तिखट अशी जी चव हवी ती दोन्ही थोडी कमी होती. ५. सांबार चांगला होता. पण मला स्वतःला शिवसागर चा सांबार अधिक आवडतो (दक्षिणायन तर प्रश्नच नाही). सांबर मध्ये सुद्धा तो टँगी पंच मिसिंग होता (योग्य मराठी शब्द कोणीतरी सुचवा रे). ६. फिल्टर काप्पी अप्रतिम होती. केवळ याच साठी लांबवर प्रवास करायला लागला तरी हरकत नसावी. ७. मी इडली / वडा खाउ न शकल्याने त्याबद्दल फारशी प्रतिक्रिया देउ शकत नाही. \ ८. स्वच्छतेला १० /१० ९. किंमतीत १० पैकी ९ मी परत जाइन का? नक्की जाइन की. माझ्या हापिसापासुन २ मिनिटाच्या अंतरावर आहे. तत्पर सर्विस आहे, अतिशय रास्त दरात उत्तम पदार्थ मिळतात, वेगळे बरेच पदार्थ जे इतर दाक्षिणात्या हाटेलात मिळत नाहित ते इथे चाखता येतील. चवीच्या बाबतीत जरी मला इतरही बरीच चांगली उपहारगृहे माहिती असतील तरी बनाना लीफ बाबत तक्रार करायला फार जागा नाही, चव चांगलीच आहे (याहुन चांगली इतर ठिकाणी असते ही गोष्ट वेगळी. थोडक्यात म्हणजे कंप्लिट व्हॅल्यु फॉर मनी आहे. माझे हापिस इथुन उठुन कोथरुडात गेले तर मात्र मुद्दाम वाट वाकडी करुन जाइन की नाही हे सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
त
त्रिवेणी Mon, 06/13/2016 - 09:51 नवीन
बनाना लीफ विश्रांतवाडी मध्ये आहे. औंधवाल्यांचीच ब्रांच आहे की कुणाची ते माहित नै पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नांदेडीअन गुरुवार, 01/22/2015 - 07:56 नवीन
@ मृत्युन्जय जी खूप खूप धन्यवाद. यातल्या २-३ ठिकाणीच गेलोय. एक-एक ट्राय करतो आता. :)
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 01/22/2015 - 08:04 नवीन
हा धागा दखल मध्ये आणता येईल काय संपादक मंडली?
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/22/2015 - 08:06 नवीन
लै भारी धागा ! धन्यवाद श्रेष्ठी :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/22/2015 - 08:31 नवीन
एक विनंती लोकांनी जेथे काही खाल्ले असेल तेथिल वर्णन फोटोसकट टाकावे. अन्यथा असे मुंबईतील ७५ ठिकाणांचे शाकाहारी पदार्थांचे वर्णन माझ्या कडे व्हाट्स अप्प वर पण आहे मग त्याला मजा येत नाही. नुसतेच मधुबालाबद्दल वर्णन करायचे आणि फोटो टाकायचे नाही यात मजा नाही यासारखे.मग लोकांनी आपल्या कल्पनांचे मनोरे रचा.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 01/22/2015 - 08:43 नवीन
बरोबर आहे. नुसतीच लिस्ट देउन मजा येत नाही. पण ही (मी दिलेली) वॉट्सअ‍ॅपची लिस्ट नाही हो. मी सगळीकडे जाउन आलेलो आहे. अन्न पुढ्यात आल्यावर ते फोटो काढण्याइतके पेशन्स नसतात माझ्याकडे. पुढच्या वेळेस पासुन ट्राय करेन खरे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 01/22/2015 - 19:17 नवीन
द्या ना ते मग. हा डाॅक्टरी सल्ला आवर्जून पाळू आम्ही!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 01/22/2015 - 20:13 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/22/2015 - 08:41 नवीन
आशा डायनिंग हॉल्,सुवर्णरेखा डायनिंगहॉल खूप जुने ,बहुदा आपटेरोड वरचे.कोथरूड वाढले व पुण्यात खाण्याची मजा गेली असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
उ
उदय के'सागर गुरुवार, 01/22/2015 - 09:46 नवीन
सुवर्णरेखा डायनिंग हॉल ला लोक का गर्दी करतात ठाऊक नाही. दैनंदिनी खानावळ म्हणून जात असाल तर चांगलं आहे पण हॉटेल म्हणून जात असाल तर फार काही ग्रेट नाही. महाविद्यालयीन जीवनात माझी हीच खानावळ होती त्यामुळे रोजरोज तिथे खाल्ल्याने मला विशेष वाटत नसावं पण ऐरवी जायलाही तिथे का जावं असा प्रश्न पडतो. आपल्या घरी जे जेवण असतं तेच तिथं मिळतं साध्या भाज्या, चटण्या, कोशिंबीरी (श्रेयस किंवा दुर्वांकूर सारखं लग्नबाज जेवणही नसतं). पोऴ्या म्हणजे तर, झटकून घ्याव्या लागतात एवढं पीठ असतं त्यावर, अगदी रखरखीत कोरड्या. गरम खाल्ल्या तर ठीक नाहीतर थोडा जोर देऊन तोडून खायच्या. पण तिथला गरम-गरम भात-आमटी, केवळ अहाहाहा :) महाराष्ट्रीय थाळीच्या बाबतीत आत्तापर्यंत श्रेयस आवडलं (दुर्वांकूर मात्र आजीबात आवडत नाही, त्यांचा दहीवडा आणि बटाटेवडा अपवाद).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
सविता००१ गुरुवार, 01/22/2015 - 10:19 नवीन
बद्दल प्रचंड सहमत बंडल आहे अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 01/22/2015 - 19:15 नवीन
लग्नबाज!रोफललो! दगाबाज, रं*बाज तसा लग्नबाज!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर
व
विजुभाऊ Sat, 01/24/2015 - 07:58 नवीन
सुवर्णरेखा बद्दल सहमत एखाद दिवस तेथेले जेवण बरे वाटते. मात्र सुवर्णरेखा (प्रभात रोडवर) स्वच्छतेचा अभाव आढळला. चमचे वाट्या नीट धुतलेल्या नसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर
म
मृत्युन्जय Sat, 01/24/2015 - 08:10 नवीन
सुवर्णेरेखा ही खानावळच आहे. बरी खानावळ इतकेच. हॉटेलची अपेक्षा घेउन तिकडे जाउच नये. मला व्यक्तिशः अजिबातच आवडत नाही. त्यापेक्षा आशा कितीतरी चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
असंका गुरुवार, 01/29/2015 - 11:10 नवीन
सुवर्णरेखा हे प्रभात रोडवर आहे की होते? असल्यास कुठे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 01/29/2015 - 11:15 नवीन
प्रभात रोडवरच आहे. प्रभात पोलिस चौकीवरुन डेक्कन कडे येताना चौक पार केल्यावर २-३ बिल्डींग सोडुन उजव्या हाताला सापडेल. पैसे वाया आहेत. एक पोटभरु खाणावळ यापेक्षा जास्त काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा