Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पोरगीपटाव शास्त्रानंतर...

ज
जेम्स बॉन्ड ००७
गुरुवार, 01/22/2015 - 11:19
🗣 76 प्रतिसाद
पोरगीपटाव शास्त्र शिकुन पोरगी पटवली कि पटावपोरगीटिकाव शास्त्राचा अभ्यास सुरु होतो. कितीही कंटाळा आला तरी ओपन मार्केट काँपिटीशन असल्याने या शास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. पटलेली पोरगी टिकवण्यासाठी आपण तसेही प्रयत्न करतोच; पण जेव्हा पोरगी A किंवा B कॅटेगरीतली असेल तेव्हा पोरगी पटलेली असुनही आउटसाईड काँपिटीशनला तोंड द्यावे लागते. आपण जरी तिला कितीही खुश ठेवत असलो, तिच्यावर विश्वास असला तरीही जेव्हा आपल्या समोरच कोणीतरी तिच्याशी फ्लर्ट करत असेल तर आपल्या अंगाचा तिळ्पापड होतोच.. तर अशा वेळी काय करावे? असे अनुभव सदस्यांना नक्कीच आले असतील. या वेळी तुम्ही काय करता? आणि अशा परिस्थीतीत मुलींना आपण काय करणे अपेक्षित असते आणि त्या या परिस्थीतीकडे कशा प्रकारे बघतात?

प्रतिक्रिया द्या
21097 वाचन

💬 प्रतिसाद (76)
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 15:37 नवीन
ओ छुपे सनातनी, जरा आमच्या सल्ल्याचं अगत्य ठेवा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/22/2015 - 15:39 नवीन
ओके ओके सल्ला लक्षात घेण्यात आला आहे , डोक्यात फॉर्मॅट होताच आता जरा घरी जावुन लिहायचा प्रयत्न करतो =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 15:40 नवीन
अनेक धन्यवाद! लेखाची वाट पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 15:03 नवीन
त्या मिपामित्राचा सल्ला तूर्तास फाट्यावर मारा असा आमचा कळकळीचा सल्ला आहे. महाभारत घडून गेलेले आहे. उद्या एखादे नवे हस्तलिखित उजेडात आले तरच काय ते फेरफार होतील, तोवर गीता ७०० श्लोकवालीच आहे, युद्ध १८च दिवसांचे आहे आणि पांडवच जेते आहेत. त्यामुळे द्वापरयुगातल्या महाभारतापेक्षा कलियुगातील महाभारताकडे लक्ष द्यावे असा कळकळीचा विनंतीवजा सल्ला देत आहे. ज्ञानेश्वरमाऊलींनीच म्हटले आहे- "राजहंसाचे चालणे" इ.इ. त्यामुळे ते महान योद्धे आणि त्यांची युद्धे महान आहेतच, पण आपापल्या जीवनातील युद्धेही आपल्याकरिता तितकीच महान आहेत. ;) तस्मादुत्तिष्ठ प्रसाद, लेखाय कृतनिश्चयः!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
पैसा गुरुवार, 01/22/2015 - 15:05 नवीन
नायतर मालिका अर्धी टाकून पळणार्‍यांच्या यादीत बॅटमॅन नाव आलेले पाहून त्या खर्‍या बॅटमॅनला यमयातना होतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 15:09 नवीन
आमची गोष्ट अंमळ वेगळी आहे ओ. पण याची अर्जन्सी अजून जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 15:45 नवीन
खिक्क...अग्दी अग्दी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जेम्स बॉन्ड ००७ गुरुवार, 01/22/2015 - 15:42 नवीन
मुद्दा १: मी विचार नसेन कदाचित पण समस्या मांडली आहे ज्यावर चर्चा होउ शकते त्यामुळे 'काथ्याकूट' चा उद्देश पुर्ण होतोय, सो, तुमचा मुद्दा १ गंडला आहे. मुद्दा २:
मुलगी पटवली कि दोन महिन्यात लग्न करायचे किंवा पुढे अडीच वर्ष आत करता येणार नाही अशा अटी घालायच्या. हजार हिश्शाने दोन महिन्यात बार उडतो. एकदा मंगळसूत्र गळ्यात अडकवले कि मग धास्ती नाही
याला तुम्ही सडेतोड उत्तर म्हणत असाल तर एकदा रिचर्डभाउ गेर यांचा Unfaithful बघावा असे मी सुचवेन. मुद्दा ३: त्या मिपामित्रावर "बसवला टेंपोत" महामंत्राचा प्रयोग करुन लेख लवकर येउद्यात. मुद्दा ४: जोरदार सहमती *dance4* मुद्दा ५: असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/22/2015 - 17:17 नवीन
असे रागेजु नका हो बॉन्डराव ! आम्ही आपलं चेष्टेत लिहिलं ! स्वारी ...एकडाव माफी लगेच गोळी मारु नका ! लेख लिहायला घेतो आता =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 01/23/2015 - 04:34 नवीन
रागवु कसे आम्ही गिरीजाकाकुंवर.. पण ते गोळीचं ध्यानात ठेवा लेख लिहिला नाहीत तर तो उपाय आहेच आमच्याकडे.. *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सुबोध खरे गुरुवार, 01/22/2015 - 18:44 नवीन
बोंड साहेब हा प्रतिसाद आमच्या बालबुद्धीला सुचेल असा लिहिला होता. तो एकमेव पर्याय नाही हे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. पण तो एक नक्की उपाय आहे हे सत्य आहे कोल्ह्याच्या शंभर युक्त्यांपेक्षा मांजराची एक युक्ती बरी. बाकी इतर काय काय उपाय आहेत ते तरी लिहा कि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 01/23/2015 - 04:38 नवीन
बोंड *ROFL* *ROFL* *ROFL* *ROFL* साहेब काय नि बालबुद्धी काय? का उगाच आम्हाला इमोशनल करुन र्‍हायले राव? बाकी
पण तो एक नक्की उपाय आहे हे सत्य आहे
यावर अजुन सहमत नाही. आणि इतर उपाय इतर जाणकार देतीलच, त्यावर आम्ही देउ थोडेसे काँट्रीब्युशन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 15:45 नवीन
पुरुषांच्या त्यातही खासकरुन लग्नाळु पुरुषांच्या स्वतंत्र समस्या असतात आणि त्यावर पुरुषांना चर्चा करुन उत्तरे शोधावीशी वाटतात किमान समदु:खी सापडला कोणी तर १-२ पेग सुखाने रिचवुन वस्तुस्थितीचा विसर पाडता येतो
रात्रकट्ट्याला आहात का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/22/2015 - 19:02 नवीन
टक्या एकदा तुच ये एकडे ! इथे चिंचवडात लय मोठ्ठा कंपु आहे आपला ! त्यात अगदी २० २२ वर्षांच्या निरागस पोरांपासुन ६०-६५ चे चावट म्हातारे ही आहेत तेव्हा इथेच जोरदार कट्टा करुयात एकदा =)) तोवर मी एल पी कोठे मिळते ते शोधुन ठेवतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/23/2015 - 04:58 नवीन
चिंचवडाच्या कंपुत मलाबी घ्या की गिर्जाकाका!!! जवळचेचं आपण!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सतिश गावडे Fri, 01/23/2015 - 05:57 नवीन
टक्या आता पुण्यात येईल असं वाटत नाही. पुण्यातील एका भटजींचा त्याला खुप वाईट अनुभव आला म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 01/23/2015 - 06:00 नवीन
पुण्यातील एका भटजींचा त्याला खुप वाईट अनुभव
*biggrin* *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सूड Fri, 01/23/2015 - 10:23 नवीन
पुण्यातील एका भटजींचा त्याला खुप वाईट अनुभव आला म्हणे.
आंवयस!! त्याला पण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा Fri, 01/23/2015 - 10:53 नवीन
खिक्क...त्ये भडजी सगा आणि वल्लीबुआ यांची गाठ घालून देणार होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रचेतस Fri, 01/23/2015 - 11:17 नवीन
ते भडजी बहुधा त्याच दिवशी टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहायला का कुठे असे कायसे गेले होते म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 01/23/2015 - 06:06 नवीन
हायला...येतो की...रहायची सोय नाही कुठे त्यामुळे कट्टा अर्धवट सोडून जावे लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रचेतस गुरुवार, 01/22/2015 - 16:22 नवीन
कोण म्हणे हा मिपामित्र ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सतिश गावडे गुरुवार, 01/22/2015 - 19:43 नवीन
जो कोणी असेल त्याला झाला उलटा टांगून खालून मिरच्यांची धुरी द्या. दांभिक कुठले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ह
हाडक्या Fri, 01/23/2015 - 17:03 नवीन
मिपामित्र
हे वाचून सर्पमित्र या जमातीची आठवण झाली.. का कै म्हैत.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ख
खमक्या गुरुवार, 01/22/2015 - 16:25 नवीन
अशावेळी अंगाचा तीळपापड होत असेल तर भाजून अथवा तळून खाणे. व तिच्याशी फ्लर्ट करणार्यास कच्चा खाण्यात यावे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 01/23/2015 - 07:35 नवीन
या निमीत्ताने काश्मीरदर्शन झालं :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा