Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सामंत

च — चाणक्य, गुरुवार, 01/22/2015 - 12:32
'गांधी येडा होता रे' सामंत नेहमी म्हणतो आणि मग फोडला पायजे...XXत दम...ईस्रायल... असं कायकाय बोलत राहतो दोन पेग चढवलेले असतील तर सामंत अध्यात्म, सेक्स, मायन संस्कृती, काश्मीर प्रश्न यावर पण बोलतो 'नेहरू एक्झॅक्टली कुठे चुकला' हे सांगतो मग तो. सामंतला ब-याच गोष्टींबद्दल माहिती असते ....वरवरची आणि माहिती नसलेल्या गोष्टींबाबत सामंत 'अमेरीकेचा गेम आहे सगळा' असं म्हणतो अमेरीका नक्की काय करते ते त्यालाही माहिती नसतं पण त्याने त्याला काही फरक पडत नसतो खरंतर, कुणालाच काही फरक पडत नसतो कारण 'अमेरीका गेम करते' म्हणल्यावर सगळे माना डोलावतात. सामंत बोलतो... माहिती असो वा नसो ...सामंत बोलतो आणि बेधडक आपली मतं ठोकून मोकळा होतो सामंत नेहमी घाईत असतो त्यामुळे त्याला विचार वगैरे करायला वेळ मिळत नसावा सिग्नलला पण तो हिरवा दिवा लागायची वाट बघत नाही शेवटचे दहा सेकंद बाकी असतानाच गाडी दामटतो पोलिसांनी पकडलं तर शंभराची नोट देऊन सुटतो आणि मग पोलिस कसे पैसे खातात हे ऎकवतो पण सामंतला एकूणच सिस्टीमच्या विरोधात वागायला बोलायला आवडतं आणि लोकांनाही आवडत असावं... सिस्टीमच्या विरोधात कोणी बोललेलं सामंत सगळीकडे असतो आॅफिस मधे, लग्नकार्यात, सोसायटीच्या मिटींगमधे, हाॅटेलात आजूबाजूला सगळीकडे कधी कधी तर मला सामंत माझ्यात असल्याचा पण भास होतो कारण मी ऎकलंय मला बोलताना...'गांधी येडा होता रे'

प्रतिक्रिया द्या
6195 वाचन

💬 प्रतिसाद (28)
ए
एस गुरुवार, 01/22/2015 - 12:40 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 01/22/2015 - 13:44 नवीन
कडकच
  • Log in or register to post comments
ज
जेम्स बॉन्ड ००७ गुरुवार, 01/22/2015 - 14:19 नवीन
पण सामंतला एकूणच सिस्टीमच्या विरोधात वागायला बोलायला आवडतं आणि लोकांनाही आवडत असावं... सिस्टीमच्या विरोधात कोणी बोललेलं
*BRAVO* *good*
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 01/22/2015 - 14:57 नवीन
छान कविता. आवडलीच. लखू रिसबूडची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/22/2015 - 17:48 नवीन
लखू रिसबूडची आठवण झाली. >> +++++१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सौन्दर्य गुरुवार, 01/22/2015 - 18:50 नवीन
एकदम परफेक्ट.फर्स्टक्लास.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 19:04 नवीन
भारीये... :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/22/2015 - 21:14 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ब
बोबो गुरुवार, 01/22/2015 - 22:41 नवीन
कडक
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/23/2015 - 02:12 नवीन
जबरदस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
  • Log in or register to post comments
म
माझा मिच Fri, 01/23/2015 - 06:06 नवीन
अतिशय छान कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 01/23/2015 - 06:18 नवीन
जबरी ...
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 01/23/2015 - 08:17 नवीन
एकदम शॉल्लीट्ट..
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/23/2015 - 08:42 नवीन
जबरदस्त लिहिलंय!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 01/23/2015 - 09:51 नवीन
(आ)सामंत व्यापणारी कवीता..
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/23/2015 - 17:30 नवीन
कविता मस्त आहे. वसंत बापटांच्या "सावंत" या कवितेची आठवण झाली!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 01/24/2015 - 04:58 नवीन
मस्त गांधी येडा होता रे असे म्हणनाऱ्यांची या देशात काही कमी नाही. तुम्ही आम्ही सारे सारखेच.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 01/24/2015 - 10:34 नवीन
कविता छान. सामंत य व्यक्तीरेखेद्वारे तुम्ही कॉमन माणुस दाखवलाय असे वाटत असतानाच तसाच शेवट तुम्ही केला हे पाहुन आनंद वाटला. फक्त गांधी येडा होता रे हे सोडले तर असेच भाव माझ्या ही मनात नेहमी असतात
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 01/26/2015 - 19:34 नवीन
फार दिवसांनी तुमची कविता वाचायला मिळाली.. खणखणीत..
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 01/27/2015 - 04:22 नवीन
जबरदस्त कविता.आवडलीच.
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 01/27/2015 - 11:16 नवीन
कवितेचा आशय आवडला.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Tue, 01/27/2015 - 11:23 नवीन
मस्त हो.. अगदी चपखल..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 01/27/2015 - 12:04 नवीन
मस्तच रे चाणक्या.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 01/27/2015 - 12:13 नवीन
मजा आली वाचताना...भेटा एकदा एफ्.सी. वनला चहाला :)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 01/28/2015 - 12:29 नवीन
अहो आमची उचलबांगडी झाली फेज १ ला. कधी आलात ईकडे तर फोन करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
इ
इन्दुसुता Wed, 01/28/2015 - 05:15 नवीन
कविता आवडली. सामंत अंतर्मुख होतो त्याबद्दलही लिहायचं होतत हो! कधी कधी अगदी कळवळतो देखील...
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 01/28/2015 - 12:27 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 01/29/2015 - 14:11 नवीन
सामंत! लय भारी! जिंकलत!!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा