वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?
शब्दात गझल वेड्या गावेल का कधी रे?
मोजून फक्त मात्रा साधेल का कधी रे?
करतोस काय गप्पा नुसत्याच काफियांच्या?
वगळून आशयाला चालेल का कधी रे?
नाही मनात श्रद्धा, अन् हात जोडलेले
दगडात देव आहे वाटेल का कधी रे?
खुर्चीच माय झाली स्वार्थांध मानवाची
सत्तेशिवाय त्याचे भागेल का कधी रे?
टाळून याचकाला, अभिषेक सावळ्याचा
वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?
व्हावे 'विशाल' आता, कोतेपणा गळावा
वृत्ती मनामधे ही बाणेल का कधी रे?
विशाल...
💬 प्रतिसाद
(16)
ग
गणेशा
Sat, 01/24/2015 - 10:24
नवीन
गझल आवडली. मस्त एकदम.
बाणेल हा शब्दप्रयोग पहिल्यांदा वाचला, अर्थ मला माहिती नाही. स्पष्ट अर्थ सांगताल का ?
- Log in or register to post comments
क
काकाकाकू
Sat, 01/24/2015 - 14:54
नवीन
बाणणे म्हणजे बिंबणे, मनात धारण करणे उदा. "आपल्या समाजाच्या उन्नतीची आस त्याच्या मनात उपजतच बाणलेली होती.", "महाराज आपल्यासारख्या रयतेचं संरक्षण करतील असा विश्वास त्यांच्या मनात बाणला होता". वगैरे.
का कुणास ठाउक पण "ग्रूपमधल्या त्या एकट्याच्याच मनात, 'निरनिराळी लोकोपयोगी अॅप्स तयार करून सर्वसामान्यांचं काम हलकं करीन' हा आत्मविश्वास पुरेपूर बाणलेला होता" हे वाक्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर असलं तरी थोडं खटकतं. जुना शब्द निव्वळ वापरात नसतो म्हणून असं होतं का?
असो, विशाल, गझल सुरेख आहे.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Sun, 01/25/2015 - 05:34
नवीन
धन्यवाद काकाकाकू, माझं काम सोपं केल्याबद्दल.
- Log in or register to post comments
ख
खमक्या
Sat, 01/24/2015 - 17:22
नवीन
मस्त उत्तम गझल
-गझलेचा प्रियकर खमक्या
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 01/24/2015 - 18:32
नवीन
क्लास!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 01/24/2015 - 18:51
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
H
hitesh
Sun, 01/25/2015 - 04:47
नवीन
सुंदर
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Sun, 01/25/2015 - 05:35
नवीन
मन:पूर्वक आभार मंडळी _/\_
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 01/26/2015 - 12:58
नवीन
खूप सुंदर रे भावा!
प्रतिसाद द्यायलाच लावणारी रचना. :-)
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Tue, 01/27/2015 - 05:52
नवीन
धन्यवाद राघवभाऊ _/\_
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Mon, 01/26/2015 - 19:50
नवीन
ओघवती रचना. सुंदर.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Tue, 01/27/2015 - 05:52
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Tue, 01/27/2015 - 14:09
नवीन
मस्त!!!
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 01/28/2015 - 04:43
नवीन
किमान शब्द कमाल आशय.
पुलेशु
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 01/28/2015 - 11:13
नवीन
मस्त लिहिलीय!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/29/2015 - 07:30
नवीन
आभार्स मंडळी _/\_
- Log in or register to post comments