Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी?

च
चलत मुसाफिर
Sun, 01/25/2015 - 06:40
🗣 73 प्रतिसाद
मित्रहो, बेळगाव प्रश्न या विषयावर इथे पूर्वी चर्चा झालेली असणार यात तिळमात्र संदेह नाही. परंतु मला या भांडणाचा उलगडा अद्याप झालेला नाही, म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतो. बहुतांश आयुष्य महाराष्ट्राबाहेर (जरी भारतातच) काढलेले असल्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न हा मला एक निरुद्योगी (किंवा मतलबी) लोकानी जाणूनबुजून धुमसत ठेवलेला मुद्दा वाटतो. याची कारणे खालीलप्रमाणे: १. आजच्या भ्रमणध्वनी, उपग्रह वाहिन्या, आंतरजाल या सुविधांनी युक्त अशा जीवनाने भौगोलिक सीमा हा प्रकार (निदान देशांतर्गत तरी) रद्दबातल ठरवलेला आहे. बेळगाव (सामील निपाणी, कारवार, हुबळी, विजापूर इ.) जरी कर्नाटकात असले तरी तेथील मराठीभाषिक जनतेला आपली संस्कृती जपणे अशक्य आहे असे मुळीच नाही. महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राहणारे अमराठी लोक आपली ओळख सांभाळून असतात (नोंदः यात त्यांच्यावर टीका करण्याचा जराही हेतू नाही), तर कर्नाटकातील मराठी लोकांनाही हे करता येईल. आणि ते करत असणारच. २. बेळगाव हे काही मराठी वस्ती असलेले महाराष्ट्राबाहेरील एकमेव शहर नव्हे. इंदूर, बडोदा, सुरत, गोवा, रायपूर, जबलपूर भोपाळ, हैदराबाद, बंगलोर अशा अनेक ठिकाणी मराठी जनता बहुसंख्येने राहते. ग्वाल्हेर, झांसी, जयपूर, कोटा, वाराणसी अशा अनेक उत्तर भारतीय शहरांतही मराठीजन स्थायिक होऊन राहिलेले आढळतात. केवळ या एका कारणावरून ही शहरे महाराष्ट्राला जोडावी ही मागणी करणे हास्यास्पद आहे. ३. "कर्नाटक सरकारने केले मराठी जनतेवर अमानुष अत्याचार", "कर्नाटकातील मराठी जनतेचा वाली कोण?" किंवा "कर्नाटक पोलिसांकडून मराठी जनतेची मुस्कटदाबी" असे मथळे काही (कोणत्या ते सांगणे नलगे!) वर्तमानपत्रांतून दिसत असतात. ते शुद्ध अतिरंजन असते हे खालील मजकूर वाचताच उमगते. ४. बेळगाव महाराष्ट्रात आलेच पाहिजे अशी साम्राज्यवादी मागणी करण्यापेक्षा कर्नाटकाला आपल्या मर्‍हाटी रंगात रंगवून टाकणे हाच मराठी संस्कृतीचा खरा विजय ठरेल अशी माझी समजूत आहे. यामागेही कानडी जनतेचा दुस्वास मुळीच नाही हे पुन्हा एकदा नमूद करतो. ५. बेळगाव महानगरपालिकेवर महाराष्ट्रवादी पक्षांचा वरचश्मा असतो. तिथे मराठी फलक लावणे, मराठीतून कारभार चालवणे अशा मुद्द्यांवरून वाद होत असतात. हे कर्नाटक राज्याचे अंतर्गत मुद्दे आहेत आणि ते चर्चेने सोडवणे मुळीच कठीण नाही असे मला वाटते. ---- वरील विवेचनात काही चुका असू शकतात. नव्हे, असणारच. कारण मी अनिवासी मराठी आहे. या मुद्द्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी मी मुद्दामच बाजूला ठेवलेली आहे. पूर्वी, भूतकाळात, मराठी जनांवर तिथे अन्याय झाला असेलही. पण त्या जखमा किती दिवस गोंजारत बसणार, असे मला प्रामाणिकपणे वाटते. "इथले लोक बाहेर पळायची संधी शोधतायत आणि तुम्हाला कशाला महाराष्ट्रात यायचंय? लाईट नाही, पाणी नाही, नोकर्‍या नाहीत, नेते सगळे चोर......." इ. निराशावादी आणि आततायी विचार मी अर्थातच मांडू इच्छित नाही, कारण मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही. तरी जाणकारांनी सदर वादावर अन्य अंगांनी प्रकाश टाकावा ही विनंती. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
46214 वाचन

💬 प्रतिसाद (73)
H
hitesh Mon, 01/26/2015 - 05:35 नवीन
बेळगाव कर्नाटकात हवे असे सांगुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बोल्ले होते की नावातील पहिल्या दोन अक्षरानी तयार होणारा शब्द बेळी हा कन्नड आहे. आचार्य अत्रे बोल्ले .. हा युक्तिवाद मान्य करायचा असेल तर लंडन महाराष्ट्रात सामील करावे लागेल.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 01/26/2015 - 06:04 नवीन
कीत्ती कीत्ती जुने विनोद सांगतोस रे हीतेशदादा !! नवीन असतील तर सांग ना !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
य
यसवायजी Mon, 01/26/2015 - 06:08 नवीन
The following are the summary of Mahajan committee report. Belgaum to continue in Karnataka Around 247 villages/places including Jatta, Akkalakote, Sholapur to be part of Karnataka Around 264 villages/places including Nandagad, Nippani Khanapur to be part of Maharastra Kasaragod (of Kerala) to be part of Karnataka
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 01/27/2015 - 19:19 नवीन
राज्य पुनर्निर्माण आयोगांनी नवीन प्रांत रचना करताना जिल्हा हे मुख्य युनिट वापरले होते. यामुळे कन्नड बहुभाषी बेळगाव जिल्हा कर्नाटकात गेला. त्यानंतर ओडीसा आणि मध्य प्रदेश यांच्या मध्ये सरहद्दीच्या जवळच्या गावांना त्यांच्या प्रांतात सामील करण्याविषयी वाद होता. यावर पाटसकर यांनी गाव भाषा हे विभाजनाचे युनिट वापरून , त्या त्या राज्याला जोडून असलेली गावे त्या त्या राज्यात जावी असा तोडगा दिला आणि त्या प्रमाणे दोन्ही राज्यातील सरहद्द नव्याने ठरवली गेली. हाच तोडगा आता बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी वापरून महाराष्ट्राला सलग्न असलेली गावे त्या मध्ये जोडून हा प्रश्न निकालात काढावयास ह्वा. सध्या बेळगावचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे -म्हणजे नक्की काय आहे हे कोणी सांगू शकेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
म
मराठी_माणूस Tue, 01/27/2015 - 10:54 नवीन
Sholapur ?
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 01/27/2015 - 12:39 नवीन
बेळगाव पाहिजे असेल तर सोलापूर द्यावे लागेल असे वाचले आहे. सुशील कुमार शिंद्यांना मग कन्नड शिकावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
व
वैभव जाधव Tue, 01/27/2015 - 14:04 नवीन
येते हो त्यांना. सोलापूरात सगळ्यांनाच स्वल्प स्वल्प बरतद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
अ
अद्द्या Wed, 01/28/2015 - 07:23 नवीन
बेळगावातच वाढलो असल्यामुळे काही गोष्टी सांगू शकतो . कुठल्याही गावात / देशात आपली संकृती जपणे कधीच कठीण नसावं (मुस्लिम देशांचा अपवाद वगळता ) . पण . . शहरात / जिल्ह्यात एखाद्या भाषेचे ३०% पेक्षा जास्ती लोक आहेत . तिथे त्या लोकांच्या भाषेत सरकारी कागदपत्रे उपलब्ध करून देणे गरजेचे असते . बेळगावात मराठी लोक ६०% आहेत . इथे राहत असलेल्या जवळपास सगळ्या मागच्या पिढ्याचं शिक्षण मराठी भाषेत झालंय . . इतिहास / भूगोल तुम्हाला माहिती असेलच . . बेळगाव पूर्वीच्या मुंबई राज्यात होतं . . ज्याचे दोन तुकडे होऊन गुजरात आणि महाराष्ट्र राज्ये निर्माण झाली . . तुमच्या जन्म दाखल्या पासून मृत्यू दाखल्या पर्यंत कागदपत्र कन्नड मधेच मिळतात . मागून सुद्धा मराठी . इतकंच काय हिंदी / इंग्रजीत सुद्धा नाही मिळत . . आता म्हणाल "मग शिका कन्नड" . शिकलो . नवीन भाषा शिकायला काहीच कधीच हरकत नाही . . अतिशय सुंदर भाषा आहे कन्नड . . पण त्या अरेरावी चालते . ती नाही मान्य . कर्नाटक सरकारने बेळगाव शहराचं सरसकट कानडीकरणाचे बरेच प्रयत्न केलेत आणि करतच राहतील . त्याविरोधात कायद्याने संमत मार्गाने लोक काहीना काही लढा देतच असतात . . आणि देताच राहतील . . बाकी वृत्तपत्रातल्या गोष्टींना "अतिरंजित कहाण्या" म्हणत असाल तर खरच म्हणेन . . ' जिथे आहात तिथे सुखी असा . उगा माहित नसलेल्या गोष्टीत बोलू नये माणसाने ' . मूक मोर्च्यावर काहीही कारण नसताना लाठीमार करणे . मोर्च्यात सामील झालो म्हणून राजद्रोह / खुनाचे प्रयत्न (मारणाऱ्या पोलिसाची लाठी हाताने अडवली म्हणून ) सारख्या गुन्ह्याचे खोटे खटले भरून जेल मध्ये टाकणे इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष बघितल्या शिवाय खऱ्या वाटणाऱ्यातल्या नाहीत . . पण एक गोष्ट नमूद करावी वाटते . . जे चांगलं त्याला चांगलं म्हणावंच . बेळगाव आणि कोल्हापूर जवळपास एकाच आकाराची आणि जुळी म्हणता येतील अशी शहरं आहेत . . आणि दोन्ही कडच्या रस्ते , वीज पाणी अश्या अगदी सुविधांच्या अनुभव घेतल्या म्हणू शकतो . . कि बेळगाव बरंच पुढे आहे आपल्या शेजारच्या पेक्षा . . . काही अपवाद वगळता चांगले रस्ते . चोवीस तास पाणी . आणि उन्हाळ्यात सुद्धा २फक्त १-२ तास वीज कपात . या गोष्टी कर्नाटक सरकारने केल्या आहेत . . हे सगळं पाहता . बेळगाव महाराष्ट्रात घ्याच हे मी कधीच म्हणणार नाही . . फक्त . . कन्नड भाषेची जबरदस्ती नका करू . लोकांना त्यांच्या भाषेत शिकण्याच्या , कागदपत्रे बनवण्याच्या हक्क आहे . घेता कामा नये .
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 01/28/2015 - 09:52 नवीन
प्रतिसाद आवडला. याविषयीच मिपावर पूर्वी झालेल्या अनेक चर्चांपैकी एका चर्चेत लिहिलेला माझा प्रतिसाद जसाच्या तसा चोप्य-पस्ते करतो: "मला पण बेळगावातल्या मराठी लोकांना खरोखरच महाराष्ट्रात यायचे आहे का हा प्रश्न पडला होता. काही वर्षांपूर्वी मी या विषयी माझ्या बेळगावच्या एका मराठी मित्राच्या वडिलांशी बोललो. ते शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. म्हणजेच माझे याविषयीचे बोलणे एका जबाबदार व्यक्तीशीच झाले होते. त्यांचे स्वत:चे मत होते ’महाराष्ट्र काय आणि कर्नाटक काय आम्हाला काहीही फरक पडत नाही’. त्यांनी पुढे जे सांगितले ते मात्र धक्कादायक होते. ते म्हणाले की याविषयी प्रत्येकाचे मत वेगळे असू शकेल पण महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांना मात्र बेळगाव कधीच महाराष्ट्रात सामील होऊ नये असे वाटते.याचे कारण म्हणजे हा प्रश्न तापता ठेऊन त्यांना नगरसेवक, आमदार अशा निवडणुका जिंकणे सोपे जाते. समजा उद्या बेळगाव महाराष्ट्रात सामील झाले तर त्यांचा हक्काचा मुद्दा हिरावून घेतला जाईल आणि त्यांना निवडणुका जिंकणे सोपे जाणार नाही. अर्थात हे मत माझ्या मित्राच्या वडिलांचे झाले. ते कितपत प्रातिनिधिक आहे याची कल्पना नाही. पण ते सत्य असेल तर राजकारणी लोक स्वत:च्या स्वार्थासाठी किती घाणेरडे खेळ खेळू शकतात याचे ते एक आणखी एक उदाहरण आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
म
मराठी_माणूस Wed, 01/28/2015 - 12:46 नवीन
......महाराष्ट्रात सामील होऊ नये असे वाटते.....
हे त्यांचे मत आहे, वस्तुस्थिती काही वेगळीच असु शकते. त्यातल्या काहीना प्रत्यक्ष असे घडावे असे मनापासुन/प्रामाणिक पणे वाटु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
अ
अद्द्या Wed, 01/28/2015 - 13:27 नवीन
ते म्हणाले ते पूर्ण खोटं आहे असं नाही म्हणू शकत :) समितीत सुद्धा २-३ गट आहेत / काहीना खरोखरंच प्रश्न सुटावा असं वाटतं . . मग त्यात मग त्यात ७८-८० वर्षाचे म्हातारे गृहस्थ जे म्हणतात "माझं गाव महाराष्ट्रात गेल्याशिवाय मारणार नाही " असे लोक आहेत . . दुसरा गट . कन्नड सक्ती नका करू . आणि महाराष्ट्रात जमत नसेल केंद्रशासित तरी करा म्हणणारा आहे . तिसरा गट म्हणताय तसा आहे . . प्रत्येक पार्टीत असे लोक असतातच . . काही सत्तेला हपापलेले . . जे खुर्चीसाठी पार्टीच्या आणि जे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांचं नुकसान करतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 01/28/2015 - 10:05 नवीन
आपल्याकडे जशी बेळगाव महाराष्ट्रात पाहिजे की कर्नाटकात यावर हमरीतुमरीवर येऊन चर्चा चालते तशी परदेशात चालत असेल का? उदाहरणार्थ ऑस्ट्रीयातील साल्झबर्ग आणि जर्मनीतील फ्रीलासिंग (बहुदा शहराचे नाव बरोबर लिहिले असावे) ही शहरे जवळपास एकसलगच आहेत.या दोन्ही शहरात भाषा एकच असली (जर्मन) तरी देश मात्र वेगवेगळे आहेत. मग "साल्झबर्ग आमचेच" ही मागणी जर्मनीत किंवा "फ्रीलासिंग आमचेच" ही मागणी ऑस्ट्रीयात उठत असल्याचे ऐकिवात नाही. सॅन सेबॅस्टिअनमध्ये तर काही भाग फ्रान्समध्ये तर काही भाग स्पेनमध्ये आहे. तरीही तिथे "सगळ्या सॅन सेबॅस्टिअनसकट संयुक्त फ्रान्स झालाच पाहिजे" किंवा "सगळ्या सॅन सेबॅस्टिअनसकट संयुक्त स्पेन झालाच पाहिजे" अशा स्वरूपाच्या मागण्या उठतात असे मी तरी वाचलेले नाही (चू.भू.दे.घे).हे वेगळे देश असूनही अशा मागण्या तिथे उठत नाहीत पण भारतात मात्र एकाच देशातील दोन राज्ये असूनही अशा मागण्या अगदी हिरीरीने उठतात.त्यामुळे हिंसाचारही होतो.याचे कारण काय असावे याविषयी पूर्वी मिपावरच लिहिलेला एक प्रतिसाद जसाच्या तसा चोप्य-पस्ते करतो: "मला वाटते की स्वातंत्र्योत्तर काळात सरकारला मोठ्या प्रमाणावर समतोल आर्थिक विकास घडवता आला असता तर भाषावार प्रांतरचना यासारख्या मुद्यांना फारसे महत्व मिळाले नसते.अर्थात सरकारपुढे मोठ्या प्रमाणावर अडचणी होत्याच पण आपले जीवनमान भरभर उंचावत आहे असे लोकांना जाणवले असते तर अशा वेगवेगळ्या मागण्यांना समर्थन मिळाले नसते. एक उदाहरण द्यायचे झाले तर युरोपचे उदाहरण घेता येईल.वरकरणी युरोपात भाषेच्या आधारावर राष्ट्रे आहेत असे वाटू शकते.पण ते १००% बरोबर नाही.स्वित्झर्लंडमध्ये अर्ध्या भागात जर्मन तर उरलेल्या अर्ध्या भागात फ्रेंच भाषा बोलली जाते.बेल्जियममध्ये तर डच,फ्रेंच आणि जर्मन या तीन भाषा बोलल्या जातात.युरोपात जर भाषा हा एकच घटक देशांच्या सीमा ठरविण्यात असता तर स्वित्झर्लंड, बेल्जियम यासारख्या देशांचे अस्तित्व राहिले नसते आणि स्वित्झर्लंडचा फ्रेंच भाषिक प्रदेश फ्रान्सला आणि जर्मनभाषिक प्रदेश जर्मनीला जोडला गेला असता.पूर्वीच्या काळी ज्या कोणत्या कारणामुळे त्या देशांच्या सीमा ठरविल्या गेल्या त्या त्यांनी तशाच ठेवल्या.आज फ्रान्स,जर्मनी,स्वित्झर्लंड या तीनही देशांचा आर्थिक विकास चांगलाच झाला आहे.तेव्हा स्वित्झर्लंडमधील लोकांना आपण स्वीस नागरीक असलो काय आणि फ्रेंच/जर्मन नागरीक असलो काय त्याचा काहीही फरक पडणार नाही म्हणून आहे ती रचना मुद्दाम बदलण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. आता भारताच्या प्रश्नाकडे बघितले तर असे लक्षात येते की स्वातंत्र्य मिळाले तेव्हा लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर होत्या.लगेच आपल्याला महालात राहायला मिळेल अशी अपेक्षा कोणी केली नसेल पण दोन वेळचे अन्न,प्यायला पुरेसे पाणी,डोक्यावर घराचे छत्र आणि घालायला पुरेशी वस्त्रे आणि या सगळ्या गोष्टींसाठी हाताला काम एवढी माफक अपेक्षाही दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलेली नाही.तेव्हा अशा पार्श्वभूमीवर लोकांना ’अरे तू मराठी किंवा इतर भाषिक, तू अमक्या जातीचा किंवा अमक्या धर्माचा म्हणून तुझ्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणूनच सरकार तुझ्या माफक अपेक्षाही पूर्ण करत नाही’ असे सांगून आकर्षित करणे खूप सोपे असते.लोकांच्या अपेक्षा वेळीच पूर्ण झाल्या असत्या आणि त्यांचे जीवनमान भरभर उंचावत गेले असते तर स्वतंत्र राज्यासाठी आंदोलने,इतर आंदोलने यासारख्या गोष्टींना लोकांचे समर्थन आज मिळते तितक्या प्रमाणात मिळाले नसते.आणि आजही राजकारणी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या मागे न लागता विविध आंदोलनांच्या आगीत तेल घालतात, वातावरण तापवून आपली पोळी भाजून घेतात हेच दुर्दैव." (या धाग्याच्या निमित्ताने मला माझेच दोन जुने प्रतिसाद जसेच्या तसे चोप्य-पस्ते करता आले :) )
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/28/2015 - 14:20 नवीन

चलत मुसाफ़िर

आत्ता काय चालू आहे? सद्यःस्थिती काय? वर्तमान काय? हे जाणून घेणं आपला उद्देश आहे ना? मग काय आकलन झालं आपल्याला आत्तापर्यंत??? सांगा बरं. आता बरच चित्र स्पष्ट झालं आहे- आत्ताचं/सद्यःस्थितीचं/वर्तमानाचं !!! मग आता आपलं मत,एका निश्चित-बाजुला, आलेलं असायला पाहिजे? मग कुठे आहात आपण(आत्ता)?

सांगा?

सांगा?

सांगा?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/28/2015 - 19:04 नवीन
अआ, तुम्ही तुमचा पॉईंट एको पॉईंटवरून ओरडून का बरे सांगत आहात...

का ?

का ?

का ?
;) +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/28/2015 - 19:11 नवीन
हा....
हा....

हा....

=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
काळा पहाड Wed, 01/28/2015 - 19:19 नवीन
तीनच एको का बरे?

तीनच एको का बरे?

तीनच एको का बरे?

तीनच एको का बरे?

तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/28/2015 - 19:32 नवीन
बुवा माथेरानच्या एको पॉईंटवरून ओरडतायत आणि तुम्ही ग्रँड कन्यानच्या... म्हणून...

म्हणून...

म्हणून...

म्हणून...

म्हणून...
म्हणून...
(मी तुमच्या जवळच उभा आहे +D )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
य
यसवायजी Wed, 01/28/2015 - 19:47 नवीन

धागा कुठला?? चाल्लंय काय??

धागा कुठला?? चाल्लंय काय??

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चलत मुसाफिर Fri, 01/30/2015 - 10:44 नवीन
बहुसंख्येने प्रतिसाद देऊन उत्साहवर्धन केल्याबद्दल समस्त मिपाकरांचे धन्यवाद. शीर्षकात सूचित केलेल्या प्रश्नाचे अनेकांनी अनुमोदन केलेले आहे. जे विरोधात आहेत, त्यांनी दिलेली कारणे मला समाधानकारक वाटलेली नाहीत. अतएव, माझे या विषयावरील मत अजूनही कायम आहे. बेळगाव महाराष्ट्रात आले काय किंवा कर्नाटकात राहिले काय, मोठासा काही फरक पडत नाही असे मला वाटते. बेळगाव भारतात आहे, आणि राहणार आहे, इतके मला पुरेसे आहे. लोभ असावा ही विनंती! :)
  • Log in or register to post comments
प
प्रणवजोशी Tue, 02/09/2016 - 02:27 नवीन
भाषावार प्रांतरचनेच्या वेळी प्रादेशिक सल्लगनेतेचे तत्व वापरले गेले होते. बेळगावातील जनतेला पहिल्यापासुन महाराष्ट्रात यायचे होते. पण त्यांचे मत गाडुन टाकले गेले.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/07/2020 - 11:31 नवीन
संचारबंदीला वैतागलेले मिपाकर या लेखावर त्वेषाने तुटून पडतील व प्रतिसादांचे घमासान होईल या निखळ प्रामाणिक आशेने धागा वर काढत आहे. लोभ असावा. :-)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 04/07/2020 - 13:10 नवीन
महाराष्ट्र एसटीचे पगार काढायला पैसे नाहीत. मुंबइची बेस्ट मरणपंथाला. रस्ते - गोवा रस्ता बनवता येत नाही. त्यावर संबंधितांची एक पिढी मोठी झाली तरी पनवेल पेण होत नाही. एसटी डेपो पाहा. यावर आणखी कोस्टल रोड, टोलनाके नावाचे कामधेनू चानेल. शाळेच्या ग्रांट/अनुदान उडले आहे. कर्नाटकात खाजगी बस वाहतूक असूनही सरकारी रेड् बस जोरात. डेपो पाहा. रस्ते पाहा. कुठे भ्रष्टाचार असला तरी चार पैसे खर्च केलेले दिसत आहेत. यातून मला बेळगाव प्रश्न पुढे रेटणाऱ्या नेत्यांची कीव येते. काय देणार तुम्ही त्यांना? एक साहित्य संमेलन?
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 12/09/2022 - 16:21 नवीन
गेले आठ-दहा दिवस चालू झालेले तेच ते जुने सीमावादाचे राजकारण पाहता हा धागा वर काढणे महत्वाचे वाटले. येऊ द्या प्रतिसाद :-)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा