उत्कंठावर्धक 'बेबी'
'बेबी'हा सिनेमा २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला ,तो काल पाहिला .'अ वेडनस्डे' आणि 'स्पेशल २६ 'सिनेमानंतर दिग्दर्शक नीरज पांडे यांचा 'बेबी'हा जबरदस्त चित्रपट आहे . 'बेबी' हे एक अंडरकव्हर युनिट आतंकवाद नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे.
या युनिटचा मुख्य फिरोज खान (डॅनी डेन्जोंगपा) आणि अजय सिंह राजपूत (अक्षयकुमार) त्याच्या विश्वासातील काऊंटर इंटेलिजेन्ट एजेंट असतो. पाच वर्षांत दहशतवाद नष्ट करण्याचे त्यांच्या युनिटचे लक्ष्य असते. दुसरीकडे, सीमेवर बसलेला मास्टर माइंड आतंकवादी मौलाना मोहम्मद रहमान (पाकिस्तानी अभिनेता रशीद नाज) भारतात राहाणार्या मुस्लिमांना जिहादी बनवण्यासाठी प्रयतत्नशील आहे . सिनेमात जिहादच्या मुद्दावर जास्त भर देण्यात आला असून यात डॅनी डेंझोप्पा (बेबी चा टॉप बॉस) च्या तोंडी एक डायलॉग आहे. त्याचा मतितार्थ हा आहे की आता दहशतवादी संघटनांना भारतातूनच मुले रिक्रुट करणे सोपे जात आहे कारण भारतातील मुस्लिम समाजात हा देश आपला नाही ही भावना बळावत चाललेली आहे व पार्ट ऑफ द रिझन इज या दहशतवादी संघटनांनी तसे त्यांना कन्व्हिन्स केलेले आहे व त्याचा परिणाम म्हणून (फुटिरतावादी कारवाया होऊ शकत नाहीत अँड देअरफोर) दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुलं मिळतात व हा त्या दहशतवादी संघटनांचा विजय आहे व "आपला" पराजय आहे.
अजय सिंह राजपूत आणि टीम मौलाना मोहम्मद रहमानद्वारा पसरल्या जाणार्या आतंकाला संपवण्यासाठी नेपाळ आणि सौदी पर्यंत धडक मारतात. चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक असून क्लायमॅक्स खरोखरच ब्लडप्रेशर वाढवणारा आहे ! सर्वानी जरूर बघावा. पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते .
बॅनर : टी-सीरिज सुपर कैसेट्स इंडस्ट्रीज लि., ए फ्रायडे फिल्मवर्क्स, क्राउचिंग टायगर मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स
दिग्दर्शक : नीरज पांडे
संगीत : मीत ब्रदर्स
कलाकार : अक्षय कुमार, तापसी पन्नू, राणा दग्गुबाती, अनुपम खेर, डॅनी, केके मेनन, मधुरिमा टुली, रशीद नाज, सुशांत सिंह
सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 घंटे 39 मिनट 42 सेकंड्स
रेटिंग : ४/५
💬 प्रतिसाद
(51)
ज
जातवेद
Sun, 01/25/2015 - 10:05
नवीन
चित्रपट चांगला असला तरी हॉलीवुड्चा प्रभाव जाणवत राहतो. नीरज पांडे कडून कथा 'झिरो डार्क थर्टी', 'अर्गो' सारख्या चित्रपटांवरून घेण्याची अपेक्षा नव्हती.
- Log in or register to post comments
र
राही
Sun, 01/25/2015 - 11:04
नवीन
वॉर फिल्म्स किंवा सस्पेन्स थ्रिलर्स आणि सोशिअल एन्टर्टेनर्स ही वेगवेगळी जॉन्र आहेत्.त्यांत तुलना होऊ शकत नाही. म्हणजे संहिता किंवा हाताळणीच्या दृष्टीने.बाकी अभिनय, संगीत वगैरेमध्ये तुलना होउ शकते. त्यामुळे दोन भिन्न पठडीतल्या चित्रपटांना उद्देशून 'ह्याच्यापेक्षा तो बघा' असे तुलनात्मक सांगणे योग्य वाटत नाही.
जाता जाता, आणि वैयक्तिक मत, चित्रपटांचा चांगलेवाईटपणा मोजण्यासाठी 'देशभक्ती' हे मूल्य असावे असे वाटत नाही. हे आपण थेट सूचित केलेले नाही हे मान्य.
- Log in or register to post comments
H
hitesh
Sun, 01/25/2015 - 11:19
नवीन
ते पाकिस्तानच्या विरोधात डायल्वाग आहे ना , म्हणुन हा चित्रपट त्यांच्या मते देशभक्तीचा.
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Sun, 01/25/2015 - 12:47
नवीन
उत्तम चित्रपट आहे, कालच बघितला
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
Sun, 01/25/2015 - 12:59
नवीन
आमच्या ईथेही हा पिक्चर प्रदर्शित झाला याचं आश्चर्य वाटलं होतं...पण 'पाकिस्तानात अतिरेकि नाहिच्चेत मुळी. ते भारतातूनच येतात, ईथे फक्त शिकून जातात..' असा काहितरी विचीत्र अर्थ काढून इकडे लावण्यात आला बहुतेक. किंवा आमच्याकडे काटाकुट करुन जितका प्रदर्शित झालाय त्यातून हाच अर्थ लागला. हा सिनेमा साधारण ३ तासांचा आहे ना..? आमच्याकडे तो अवघ्या २ तास आणि काही मिन मधे आटोपला. बरेच की-डाय्लॉग्झ, संवेदनशील द्रुष्ये बहुतेक छाटली गेली असावीत.
बाकी, मला अत्यंत बोर झालं. स्पेशल २६ बराच बरा होता यामानानी.
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Sun, 01/25/2015 - 13:00
नवीन
इथे म्हणजे कुठे?
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Sun, 01/25/2015 - 19:39
नवीन
थिएटर मध्ये दाखवताना खूप काटछाट केली आहे, कारण सौदी चा सन्दर्भ आहे
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
Sun, 01/25/2015 - 13:03
नवीन
दोहा, कतार.
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Sun, 01/25/2015 - 13:09
नवीन
मग तिकडे काटछाट करूनच दाखवणार ! टोरेन्ट किम्वा मुव्हिरुल्झ.कॉम ट्राय करा ... अतिशय उत्तम फिल्म आहे
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
Sun, 01/25/2015 - 13:10
नवीन
एक उदाहरण सांगते, म्हणजे ईथे जरा संवेदनशील सिनेमे कसे लावले जातात हे समजेल.
क्विन मधली विजयलक्ष्मी जशिच्या तशी दाखवली कारण ती भारतीय रुट्स असलेली होती. पण अॅमस्टर्डॅमची ती पोल डान्सर आणि तो पोल डान्स हा सगळा भाग कापून टाकला होता. भारतात परत हाच सिनेमा पाहिला तेंव्हा मला कळलं ते, आणि अर्थातच कारनही समजलं.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sun, 01/25/2015 - 15:09
नवीन
आंजा चा वेग चांगला असेल तर डेली मोशन वर अत्यंत सुस्पष्ट सिनेमाची प्रत आहे ती अंतर्धान पावण्याच्या आंत रेषेवर सिनेमा पाहून घेणे. असे सिनेमे तुमच्या थेटरात पाहू नका , माझा अबुधाबी चा अनुभवावर सांगतो ,
त्यापेक्ष्य पिके सारखे आवर्जून पहा त्यात काही कापाकापी करणार नाहीत.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 01/25/2015 - 18:40
नवीन
लिंक व्यनी करता का :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/26/2015 - 02:39
नवीन
निनाद मु... लिंक प्लीज.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sun, 01/25/2015 - 18:39
नवीन
चित्रपट पाहीला. अतिशय छान चित्रपट आहे. अतिरेक्याची भूमिका एका पाकीस्तानी अभिनेत्याने केलीय हे माहीत नव्हते. आता त्याचं काही खरं नाही. :) खानावळीचे चित्रपट बघण्यापेक्षा असे चित्रपट केव्हाही चांगले. त्यातल्या त्यात आमीर खानने एकदा सरफरोश केला होता.
पण आजकाल त्याची "मुसलमान कभी धोका नही देता" ही वाक्ये डोक्यात जातात. (विषयांतराबद्दल क्षमस्व)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 01/25/2015 - 18:43
नवीन
माझे काही अगदी सज्जन मुसलमान मित्र आहेत...आत्तापर्यंतचा अनुभव हाच आहे की शिकलेल्या मुसलमानांमध्ये खाल्या ताटात घाण करायची सवय कमी असावी
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sun, 01/25/2015 - 18:51
नवीन
हो, माझेही मुसलमान मित्र आहेतच की. पण एखाद्या पाकीस्तानी माणसाबद्दल परग्रहावरुन आलेला माणूस एवढे सरसकट विधान कसे काय करु शकतो?
तसं म्हणायला मी सुध्दा म्हणू शकतो की "हींदू कभी धोका नही देता"
धोका देणे कींवा न देणे हे प्रत्येक माणसावर आणि परीस्थीतीवर अवलंबून आहे. त्यामुळे सरसकट विधान पटले नाही.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 01/25/2015 - 19:26
नवीन
हे पटले
पण "हींदू कभी धोका नही देता" हे ऑलरेडी अझ्युम्ड आहे म्हणून कोणी त्याचा डायलॉग नाही बनवत
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 01/27/2015 - 08:19
नवीन
हिंदु धोका देत नाहीत तर हिंदुंसाठी इंडियन पिनल कोड ४२० लिहायची गरज काय होती ?
ते इतिहासात धर्मवीर म्हणुन एक राजे होऊन गेले. ते तिसाव्या वर्षी बलिदान करुन बसले .. धोकेबाज माणसांमुळेच ना ?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 01/27/2015 - 08:33
नवीन
बरं मग काय करुया आता ?
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 01/25/2015 - 18:54
नवीन
बेबी जालावर आली की/ आला की बघीन. ;)
पिके ठीकठाक होता. ग्रेट नाही.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sun, 01/25/2015 - 19:16
नवीन
ही घ्या बेबीची लींक !!
http://www.desirulez.net/threads/724711-Baby-2015-Watch-Online-Download
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 01/26/2015 - 01:53
नवीन
धन्यवाद हो खटपट्याजी! बघितल्यावर कळविनच.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 01/26/2015 - 10:37
नवीन
लिंक अधिकृत आहे का?
की पायरेटेड आहे??
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 01/27/2015 - 00:17
नवीन
फुकटात चित्रपट दाखवणार्या सर्व सायटी पायरेटेड असतात.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/27/2015 - 00:28
नवीन
आपली टोरँट पण ह्यातच मोडते का?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 01/27/2015 - 00:41
नवीन
माझ्या मते जेव्हा तुम्ही टोरेंट्वरून एखादी फाईल डाउनलोड करत असता तेव्हा तुमची मशीन इन्टरनेटवर ओपन करत असता. म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी डाउनलोड करता तेव्हा कोणतरी तुमच्या मशीनमधून काहीतरी डाउनलोड करत असतो. हा सगळा गीव आणि टेक चा मामला आहे. त्यामुळे मी टोरेन्ट टाळतो. अधिक माहीती खालील लिंकवर मिळेल. यात व्हायरसचा धोका असू शकतो.
http://www.engineersgarage.com/mygarage/how-torrent-works?page=2
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/27/2015 - 00:55
नवीन
मग उत्तम साईट कुठली?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 01/27/2015 - 01:13
नवीन
ईंग्रजी चित्रपटासाठी मी putlocker.is हे साईट वापरतो. नाहीतर गूगलमधे watch online movie असे करतो ज्या काही लिन्क येतात त्यावर कुठेतरी सिनेमा मिळतोच.
हिंदीसाठी desirulez.net आणि einthusan.com या साईटी वापरतो.
मराठीसाठी apalimarathi.com आहेच.
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 01/26/2015 - 12:18
नवीन
या लिंकेवरील बेबी १५ मिनिटे रांगली व नंतर बंद पडली. आता पुढील विकांती बघते. १५ मिनिटे तरी बरा होता शिनेमा.
- Log in or register to post comments
श
शिद
Sun, 01/25/2015 - 22:46
नवीन
कालच पाहिला...एक्दम जबरदस्त आहे.
+१००
म.टा.वर आलेलं परीक्षण येथे वाचता येईल.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 01/26/2015 - 08:20
नवीन
असा चित्रपट मल्टीप्लेक्स ला पहायचा असतो त्याप्रमाणे आज सकाळी मुलीबरोबर पाहिला. हा एक चांगला सिनेमा बर्याच दिवसानी आला आहे. सिनेमात ताण ,उत्सुकता याच बरोबर हलके फुलके विनोदी पंचेस ही आहेत. मुख्य म्हणजे कथा पटकथा बांधीव असली की हीरो हीरोईनची गरज नसते. अर्थात यात याक्शन हीरो आपला राजीव भाटिया आहेच. पटकथा दिगदर्शन संवाद व कॅमरा ही चारही अंगे एकदम मस्त जमलीयत. यातील काही तांत्रिक गोष्टींचे स्प्ष्टीकरण देण्याचा प्रयत्न संवादातून दिसतो पण त्याच्या फार खोलात न जाता आनंद घ्यावा. वेडनेसडे पाहिल्यामुळे इथे या चित्रपटाला दुसरा क्रमांक मात्र द्यावा लागतो.
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Mon, 01/26/2015 - 10:07
नवीन
छान आहे चित्रपट!!
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Mon, 01/26/2015 - 20:03
नवीन
हि घ्या लिंक
सदर सिनेमावर अपेक्षेप्रमाणे पाकिस्तान मध्ये बंदी आहे.
त्याच्या वाहिन्यांवर शरीफ ह्यांनी चांगले वाईट असा मतभेद न करता दहशतवादी संघटनेचा निःपात करण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. एकीकडे तेहेरीके तालिबान वर कारवाई व दुसरीकडे जमाते उद्दावा वर मेहेर नजर त्यांच्या कराची येथील मेळाव्यासाठी साठी सरकारी रेल्वे गाड्या सोडणे असे दुटप्पी धोरणावर टीका होत असतांना ह्या समस्येवर उत्तर देण्याचा बेबी प्रयत्न करतो.
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 01/27/2015 - 06:02
नवीन
या लिंकेवर दिसतोय व शिनेमा भारी आहे.
- Log in or register to post comments
र
रोहन अजय संसारे
Tue, 01/27/2015 - 06:53
नवीन
उत्तम चित्रपट आहे, कालच बघितला. एक चांगला सिनेमा बर्याच दिवसानी आला आहे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 01/27/2015 - 07:59
नवीन
मी सुद्धा पाहिला.. खरंच छान पिक्चर आहे. मौलानाची भुमिका केलेला कलाकार कोण आहे? अत्यंत सुंदर काम केलंय...
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Tue, 01/27/2015 - 16:19
नवीन
तो रशीद नाझ म्हणून एक पाकिस्तानी अभिनेता आहे. मी चकित झालो होतो पहिल्यांदा समजले तेव्हा..
- Log in or register to post comments
य
योगी९००
Tue, 01/27/2015 - 08:09
नवीन
आपल्या मि.पा वरून अशा लिंका देणे म्हणजे पायरसीला निमंत्रण देणे आणि promote करणे. या गोष्टीचा निषेध.
उद्या कोणीही आपल्या मिपावर केस घालू शकतो...
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Tue, 01/27/2015 - 16:21
नवीन
कुणी केस नाय घालू शकत ओ.
पण नैतिकदृष्ट्या आपला विरोध असेल तर निषेध करु शकता अथवा मिपाचा याला विरोध असेल तर ते निषेध करु शकतात तसेच ते प्रतिसाद उडवू शकतात.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 01/27/2015 - 18:19
नवीन
आंतरजालावर जेजे दीसतंय ते बघायला कोणीच आपल्याला अडवू शकत नाही. डाउनलोड करुन ठेवणे व दुसर्याला देणे हा गुन्हा आहे. हेच नीळ्या चित्रपटांना लागू होते.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Wed, 01/28/2015 - 00:44
नवीन
तुम्ही दुवा दिलात तर तुम्हाला कोणी काही बोलू शकत नाही. जर प्रत्यक्ष तुमच्या हार्ड-ड्राईव्ह वर असेल, सीडीवर असेल तर तुम्ही गुन्हेगार. इतर वेळी लिंका पाठवणे गुन्हा होत नाही हाच मुद्दा होता. त्यांनी त्या होस्ट केल्या आहेत त्यांना जबाबदार धरले जाते.
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Sat, 01/31/2015 - 09:33
नवीन
प्रत्येक देशातले कायदे वेगळे असतात. मिपा कोणत्या देशात रगिस्टर्ड आहे?
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Mon, 02/02/2015 - 12:45
नवीन
भारतात, युरोपात आणि आम्रविकेत याच प्रकारचा नियम आहे. अजून कुठे जर मिपामालक गेले असतील रजिस्टर करायला तर माहीत नाही ब्वा.. ;)
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Tue, 01/27/2015 - 21:12
नवीन
डेली मोशन वर जगभरातून नवीन सिनेमाच्या चांगली किंवा थेटरात रेकॉर्ड केलेली फिल्म टाकली जाते व सिनेमाच्या मालकाने तक्रार केल्यावर ती लगेच काढली जाते.
ह्या सिनेमाची तक्रार केलेली नाही म्हणूनच तो उपलब्ध आहे.
माझ्यामते हा सिनेमा जगभरातील भारतीयांनी पहावा हाच हेतू त्यामागील असावा.
भारतीयांनी दुसर्या देशात जाऊन मोसाद सारख्या कारवाया
केलेल्या भारतीय लोकांना पाहायला आवडते. सिनेमात पंतप्रधान
हेर खात्याच्या अधिकाराच्या ,तुम्ही काय स्वतःला मोसाद समजतात का असे वैतागून विचारतात तो प्रसंग मस्तच
भविष्यात अनेक कोवेर्ट ऑपरेशन भारतातर्फे राबविली गेली पाहिजे ,
गुजराल ह्यांनी अनके वर्षापासून चालू असलेली कोवेर्ट ऑपरेशन
रद्द करून आपल्या देशाचे अतोनात नुकसान केले होते.
मनोहर पर्रीकर ह्यांनी हेच सुचित केले होते.
- Log in or register to post comments
य
यमगर्निकर
गुरुवार, 01/29/2015 - 11:02
नवीन
मी परवाच बेबी पिक्चर बघीतला. लै भारी वाटला, लोकानि हा पिक्चर थियेटर मध्ये जाउन पहावा, त्या शिवाय ह्या पिक्चरचि मजा येनार नाहि. आणि बी. पी. च्या पेशन्टनि हा पिक्चर चूकुनहि पाहु नये..
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
गुरुवार, 01/29/2015 - 14:31
नवीन
हा धागा वाचून काल हा पिक्चर पहिला. ठीक आहे. हॉलिडे यापेक्षा बरा होता असे वाटले.
पिक्चर वाईट नाहीये पन कहानी किंवा अ वेन्सडे च्या लेव्हल चा नव्हता.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 01/29/2015 - 14:53
नवीन
हा धागा पाहून मी काल रेषेवर हा सिनेमा पाहिला , आवडला पण काही कच्चे दुवे- उदा. हानी महंमदच्या पात्राला थोडे अजून फूटेज चालले असते.
वेन्स्डे जास्त आवडला होता.
स्वाती
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 02/06/2015 - 20:07
नवीन
बेबी कालच बघितला. उत्तम सिनेमा. आमिरपेक्षा अक्षय सरस नक्कीच
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Fri, 02/06/2015 - 21:00
नवीन
उत्तम चित्रपट.. बर्याच दिवसातून एक उत्तम चित्रपट पाहायला मिळाला.. मस्ट वॉच! नीरज पांडे आणि अक्षयचे अभिनंदन!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 02/07/2015 - 02:30
नवीन
ऐसाच बोल्ताय! +++१११
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »