Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उत्कंठावर्धक 'बेबी'

उ
उडन खटोला
Sun, 01/25/2015 - 09:51
🗣 51 प्रतिसाद
'बेबी'हा सिनेमा २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला ,तो काल पाहिला .'अ वेडनस्डे' आणि 'स्पेशल २६ 'सिनेमानंतर दिग्दर्शक नीरज पांडे यांचा 'बेबी'हा जबरदस्त चित्रपट आहे . 'बेबी' हे एक अंडरकव्हर युनिट आतंकवाद नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे. या युनिटचा मुख्य फिरोज खान (डॅनी डेन्जोंगपा) आणि अजय सिंह राजपूत (अक्षयकुमार) त्याच्या विश्वासातील काऊंटर इंटेलिजेन्ट एजेंट असतो. पाच वर्षांत दहशतवाद नष्ट करण्याचे त्यांच्या युनिटचे लक्ष्य असते. दुसरीकडे, सीमेवर बसलेला मास्टर माइंड आतंकवादी मौलाना मोहम्मद रहमान (पाकिस्तानी अभिनेता रशीद नाज) भारतात राहाणार्‍या मुस्लिमांना जिहादी बनवण्यासाठी प्रयतत्नशील आहे . सिनेमात जिहादच्या मुद्दावर जास्त भर देण्यात आला असून यात डॅनी डेंझोप्पा (बेबी चा टॉप बॉस) च्या तोंडी एक डायलॉग आहे. त्याचा मतितार्थ हा आहे की आता दहशतवादी संघटनांना भारतातूनच मुले रिक्रुट करणे सोपे जात आहे कारण भारतातील मुस्लिम समाजात हा देश आपला नाही ही भावना बळावत चाललेली आहे व पार्ट ऑफ द रिझन इज या दहशतवादी संघटनांनी तसे त्यांना कन्व्हिन्स केलेले आहे व त्याचा परिणाम म्हणून (फुटिरतावादी कारवाया होऊ शकत नाहीत अँड देअरफोर) दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुलं मिळतात व हा त्या दहशतवादी संघटनांचा विजय आहे व "आपला" पराजय आहे. अजय सिंह राजपूत आणि टीम मौलाना मोहम्मद रहमानद्वारा पसरल्या जाणार्‍या आतंकाला संपवण्यासाठी नेपाळ आणि सौदी पर्यंत धडक मारतात. चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक असून क्लायमॅक्स खरोखरच ब्लडप्रेशर वाढवणारा आहे ! सर्वानी जरूर बघावा. पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते . बॅनर : टी-सीरिज सुपर कैसेट्स इंडस्ट्रीज लि., ए फ्रायडे फिल्मवर्क्स, क्राउचिंग टायगर मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स दिग्दर्शक : नीरज पांडे संगीत : मीत ब्रदर्स कलाकार : अक्षय कुमार, तापसी पन्नू, राणा दग्गुबाती, अनुपम खेर, डॅनी, केके मेनन, मधुरिमा टुली, रशीद नाज, सुशांत सिंह सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 घंटे 39 मिनट 42 सेकंड्स रेटिंग : ४/५

प्रतिक्रिया द्या
11052 वाचन

💬 प्रतिसाद (51)
ज
जेपी Sat, 02/07/2015 - 02:59 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.उडनखटोला आणी समस्त मिपाकरांचा सत्कार आज थेट्रात पिच्चर बघुन करण्यात येईल. शुभेच्छुक -जेपी आणी ..... *wink*
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा