Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी

व
वेल्लाभट
Wed, 01/28/2015 - 11:45
🗣 176 प्रतिसाद
मला कल्पना नाही इथे किती ऑडियोफाइल मंडळी आहेत. किंवा कितींना मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायला/ऐकवायला आवडतात. पण कॅजॅस्पँचा धागा वाचताना व त्यावर प्रतिसाद देताना कल्पना आली की या विषयी एक वेगळा धागा काढू. अर्थातच मला गाणी मोठ्याने ऐकायला आवडतात. मुझिक सिस्टिम आवडीचा विषय. असो. तर फुल टू दणदणाट करून तुमचे गाडितले किंवा घरातले स्पीकर/वूफर शो ऑफ करण्यासाठी माझ्या पसंतीची गाणी खालीलप्रमाणे. सॅडनेस - एनिग्मा आजा वे माहिया - इमरान खान मरहबा - जानशीन मधलं बार्बी गर्ल - अ‍ॅक्वा आय वॉन लव यू - अ‍ॅकॉन टेम्परेचर - शॉन पॉल मिस्टिरियस गर्ल - पीटर अँड्रे डायमंड्स - रिहाना मिस्टर सॅक्सोबीट - अलेक्झांड्रा स्टॅन बिकमिंङ इनसेन - इन्फेक्टेड मशरूम बारटेंडर - अ‍ॅकॉन (अ‍ॅकॉनची बरीचशी मस्त आहेत. अगदी छम्मक छल्लो सुद्धा) व्हेअर'ड यू गो - फोर्ट मायनर इन स्टिरियो - फोर्ट मायनर हिमेश गुरुजींना वगळलंच मुद्दाम. मी काय लिहिणार त्यांच्या गाण्यांबद्दल. अनेक गाणी आहेत, पण आत्ता आठवली ही इतकी लिहिली. बाकी धागा वाजत; आय मीन वाढत राहील अशी अपेक्षा. म्हणजे कसं कलेक्शन वाढवायला बरं.

प्रतिक्रिया द्या
78128 वाचन

💬 प्रतिसाद (176)
ग
गवि Wed, 01/28/2015 - 11:53 नवीन
कदाचित विश्वास बसणार नाही पण.. तम्मा तम्मा लोगे - बप्पीदा. धिधा धिधा धिधा असा जो दणक्यात तीनदा ड्रम वाजतो आणि मग जे काही साउंड इफेक्ट्स येतात ते बंद हार्टलाही चालू करतील. शिवाय बॉन जोव्ही - "इन दीज आर्म्स" हे गाणं अत्युत्कृष्ट साउंड सिस्टीमवर आवर्जून मोठ्या आवाजात ऐकण्यासारखं आहे. किती किती वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्याच्या बॅकग्राउंडला. बेस गिटारचा ट्रॅक पकडायचा आणि तोच फोलो करत एकदा ऐकायचं.. मग दुसरी कोणतीतरी लय पकडून.. धाग्याचा विषय आवडला. ही गाणी तथाकथित उच्च दर्जाची, सुरेल , गोड किंवा समाजमान्य असतीलच असं नाही, पण दणदणाटी साउंड सिस्टीमला न्याय देणारी असतात. तो बसक्या आवाजाचा लांब केसवाला मायकेल बोल्टनच ना? "कॅन आय टच यू देअर" वाला ?!! खूप वर्षं झाली. हवा भरुन फुल्ल व्हॉल्यूममधे ते गाणं ऐकल्याला. एकदम बसका आवाज बेकार. पण मस्त वाटतं ऐकताना.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 01/29/2015 - 20:35 नवीन
तम्मा तम्मा गवी क्या बात कही हे घ्या तम्मा चे लाइव रेकोर्डिग त्यावर एक आख्खा लेख येऊ शकतो. विविध वयोगटातील स्त्री पुरुषांचा कोरस रंगात आलेले बप्पीदा गोड गळ्याची अनुराधा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
य
यसवायजी गुरुवार, 01/29/2015 - 20:42 नवीन
गाने मणातले ऊपट्सुम्भ - Tue, 23/09/2008 - 21:15 तू प्रेमि ..... आ .......हा .... मै प्रेमि ....... आ ~~ह्हा... फिर कया डॅडी क्या अम्मा ............... ईक बस तू ही ..... प्यार के काबील ... सारा जहा है निकाम्मा ........ ... ... तम्मा तम्मा लो गे ....... ..... तम्मा तम्मा लो गे ...तम्मा :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
श
शिद Fri, 01/30/2015 - 00:22 नवीन
च्यायला, भारीच आहे तो प्रतिसाद आणि त्यावर आलेले उपप्रतिसाद तर आणखीन कहर. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 02:49 नवीन
रिक्शा साँग्स/अचरट साँग्स प्रकारावर वेगळा धागा येऊ शकतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/30/2015 - 07:55 नवीन
तम्मा तम्मा माझ्या फेवरेट गाण्यांपैकी एक. लाईव रेकॉर्डिंग पहाताना फारच मजा वाटली. भलतेच वेंजॉय केले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ग
गवि Wed, 01/28/2015 - 11:56 नवीन
"ब्रिगेडियर सबारी", "लिक इट", "बॉन जोव्ही- डेड ऑर अलाईव", "यंग गन्स - ब्लेझ ऑफ ग्लोरी", "ब्लाईंड मेलन- नो रेन" हेदेखील सुचवून पाहतो.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Wed, 01/28/2015 - 12:00 नवीन
माझी आवडती गाणी १) वु आर द वर्ल्ड वु आर द नेशन - मायकल जॅक्सन २) वेलकम टु दि हॉटेल कॅलिफोर्नीया- माहित नाही ३) वन मोअर टाईम - ब्रिटनी स्पीअर ४) ब्राझील - वेंगा बॉईज ५) सुझेना आय एम क्रेझी लव्ह इन यु- माहित नाही ६) मरिहा कॅरीची सगळी यॉडलींग असलेली ७) ला इसला बोनिटा - मडाना ८) हील द वर्ल्ड - मायकल जॅक्सन ९) बॅड / डेंजरस - मायकल जॅक्सन अजुनही बरीच आहेत आठवली की अ‍ॅडवतो रे अपुर्व.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/28/2015 - 12:06 नवीन
हील द वर्ल्ड.. आहा. माजॅची आठवण काढलीत म्हणून.. विल यू बी देअर. दे डोंट रियली केअर अबौट अस गिव्ह इन टु मी. .... तुमच्या गाळलेल्या जागा: हॉटेल कॅलिफोर्निया हे ईगल्स या ग्रुपचं गाणं आहे. सुझॅना हे "आर्ट कंपनी" नावाच्या बँडचं गाणं आहे. तुमची प्लेलिस्ट झकास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
व
विजुभाऊ Wed, 01/28/2015 - 12:31 नवीन
ए आर रहमानचे "दिल है छोटासा " वाजवून पहा लो फ्रेक्वेन्सी च्या कित्येक नोट्स ची नजाकत समजून येईल तेही बास चा तोरा न मिरवता. ए आर रहमानची काही गाणी उदा: आवारा भवरे जो होले होले गाये, इश्क बीना क्या जीना यारो आणि विशेषतः मधुबन मे जो कन्हैया किसी गोपीसे मिले, या गाण्यातील मिक्सींगची मजा अनुभवण्यासाठी जरूर ऐका. जुन्या गाण्यापैकी "प्यार मे मे दिलपे मार दे गोली" हे गाणे ( चित्रपट :महान ) हे गाणे त्यातील गोळीचा आवाज ऐकण्यासाठी ऐका. अक्षरशः गोळी या कानातून त्या कानात आरपार जाताना अनुभवायला मिळते. नव्यापैकी "मनाली ट्रान्स " ऐकायचे धाडस होत नाही. पण लो वॉल्यूम वर ऐकायला मजा येईल.
  • Log in or register to post comments
अ
अदि गुरुवार, 01/29/2015 - 06:52 नवीन
ए आर रेहमान च्या गाण्यामध्ये एखादा स्पेशल मुसिक पीस अस्तोच. जोधा अकबर मधला "मनमोहना " गाणं ऐकलय?? त्यातली शेवटची बासरीची धून केवळ अप्रतिम .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रमोद देर्देकर Wed, 01/28/2015 - 12:32 नवीन
धन्यवाद गवि साहेब. मला कॉलेजला जाण्याच्या दिवसांत वेळातच जी काही गाणी तेव्हा एम टीव्ही वर लागायची तीच काय ती करमणुक. यात पहिले हिंदी गाणं प्रसिध्द झाले ते बाबा सैगलचं "दिल धडके". मग अक्षय खन्ना व्हीजे असताना आणखीन इंग्लीश गाण्याची आवड निर्माण झाली. त्यात मायकल जॅ. सर्वात प्रथम क्रमांकावर. त्याच्या बरोबर गाणी गायला यावीत म्हणुन मी त्या गाण्याचं पुस्तकही आणलं होतं त्यात निवडक २५ गाणी होती. सगळी तोंडपाठ झाली. आणि मग जॉर्ज मायकल, ब्रिटनी स्पियर, मरिहा कॅरी, वेंगा बोईज, त्यानंतर जेनिफर लोपेझचं "Ain't It Funny" ने वेड लावले. शेवटचे एकले ते रिकी मार्टिनचे "Livin' La Vida Loca" तेव्हा पासुन कोणतीच इंग्लीश गाणी ऐकाविशी वाटत नाहीत. इन्स्ट्रुमेंटलमध्ये एक केनीजीची (Kenny G)फ्लुट रात्रीच्या शांत वातावरणात लावावी काय मस्त फिल येतो.
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 01/28/2015 - 15:15 नवीन
रिकी मार्टिनचे "Livin' La Vida Loca" बद्दल तीव्र सहमती.माझी पण प्ले लिस्ट टाकतेच.या गाण्याबाबत वाचुन न राहावुन कामात असताना लिहुन जातेय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
व
विजुभाऊ Wed, 01/28/2015 - 12:33 नवीन
अरे हो मराठीत " अप्सरा आली " ऐका स्टीरीओची मजा काय असेल ते अनुभवायला मिळेल. आणि र्‍हदयनाथ मंगेशकरांची " चला वाही देस" अख्खी रेकॉर्ड ऐकण्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 01/28/2015 - 12:34 नवीन
तुम्ही "आबा "चे हनी हनी किंवा "फर्नांडो." ऐका.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/28/2015 - 12:37 नवीन
फर्नांडो... नॉस्टाल्जियाचे मोहोळ फोडलेत विजुभौ.. वैट्ट आहात. कॅन यू हियर द ड्रम्स फर्नांडो..म्हणताना मागे जे ड्रम वाजतात ते.. अ‍ॅबाच्या "आय डू आय डू आय डू" ने कायतरी वेगळ्या जमान्यात पोचल्याचा भास होतो.. "निना प्रेटी बॅलेरिना"ही तसंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गवि Wed, 01/28/2015 - 12:35 नवीन
एम्पईथ्री किती केबीपीएसची आहे त्यावर आवाजाची स्पष्टता आणि बारकावे असतात ना? हा त्या एमपीथ्रीचा फ्लो रेट किंवा इमेजच्या रिझोल्यूशनसारखा भाग असतो का? म्हणजे तितके बाईट डेटा प्रत्येक सेकंदासाठी दिलेला असतो ?
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 01/28/2015 - 13:12 नवीन
320 बिटरेट वाली एमपी३ पुरेशी क्लरिटी देते. १२८ वाली तितकी नाही. साभ्यस्ती हा फरक कळणारही नाही पण हाय फ्रिक्वेन्सी साउंड जसं की सिम्बल, किंवा झांज इत्यादी याकडे लक्ष दिलं तर कळू शकेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुखी Wed, 01/28/2015 - 13:17 नवीन
बरोबर. flac (Free Lossless Audio Codec) या प्रकारामधे जर फाइल मिळाली तर Hi-Fi system वर आइकुन पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
नाखु Wed, 01/28/2015 - 12:44 नवीन
"शान"मधील दोस्तोंसे हे गाणे आवडले होते ऐकले म्यु.सि. वर (अर्थात मित्राच्या)
  • Log in or register to post comments
स
सुखी Wed, 01/28/2015 - 13:30 नवीन
१. The Shruti Box मधल Nadia २. I'm Shipping Up To Boston - Dropkick Murphy (गिटार नाद्या बाद आहे) ३. Ian Ritchie - Lonely Planet Theme (बरीच variety आहे)
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Wed, 01/28/2015 - 13:39 नवीन
Poets of the fall Lincin park nickelback यांच कुठलंही गाणं . आणि मग रेहमान . . आणि किंवा मग सरळ "माझे माहेर पंढरी " लावा . तेवढेच खुश करून गेले . तर साउंड सिस्टीम साउंड आहे
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 05:19 नवीन
पोएट्स ऑफ द फॉल आणि लिंकीन पार्क बद्दल सहमत. ह्यामधे सिस्टीम ऑफ अ डाऊन, फोर्ट मायनर आणि ग्रीनडे पण अ‍ॅड करा माझ्या बाजुनी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
व
वेल्लाभट Wed, 01/28/2015 - 13:46 नवीन
कोक स्टुडियोतील काही निवडक गाणी पाकिस्तानमधल्या को.स्टु मधील आबिदा - निगाह-ए-दरवाईशां बुल्लेया जुगनी या तीन गाण्यांनी तुम्हाला ट्रान्स मधे 'नाय' नेलं तर सांगा. आपल्या कोक स्टुडियोतील ज़रिया - ए आर रेहमान (एकच कल्ला गाणं) सुंबरान - नंदेश उमप
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 01/28/2015 - 13:53 नवीन
तूनळी सोडून दुसरी लिंक देता येईल का? हपीसात तूनळीला बूच मारलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 01/28/2015 - 13:55 नवीन
नाहीतर ईमेल द्या गाणी पाठवण्यात येतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 01/29/2015 - 07:28 नवीन
@ आदुबाळः- अहो मग cooltoad1.com ला जावुन बघा नक्की चालेल ती साईट. सगळ्या भाषेतील गाणी आहेत त्या साईटवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आनन्दिता Wed, 01/28/2015 - 16:04 नवीन
जरिया खरच कहर गाणं आहे. ऐकता ऐकता च वेड लागेल असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ह
हाडक्या Wed, 01/28/2015 - 17:23 नवीन
या बाबतीत अगदी बाडिस हो.. मी तर ऐकल्यावर येता जाता सगळ्यांना ऐकवत होतो. (बायको वैतागली होती ऐकून ऐकून ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
व
वेल्लाभट Wed, 01/28/2015 - 13:49 नवीन
मोठ्ठ्या आवाजातच ऐकायला मस्त असं सूफी गाणं. सूफी म्हणा, उपशास्त्रीय म्हणा.... माहीत नाही. पण आबिदाचा आवाज आणि गायकी वेड लावते. गाण्याचं नाव - रांझण (मेंडा दिल रांझण रावल मंगे) रांझा रांझा करदी ..नव्हे. झांज कसली वाजते समेवर..... आहाहा !
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 01/28/2015 - 14:47 नवीन
१. वी विल रॉक यु ---क्वीन्स २. हॉटेल कालीफोर्निया - इगल्स ३. इट्स बिन हार्ड डेज् नाईट - बीटल्स ४. बोहेमियन ऱ्हांप्सोडी, डा हस्त ५. पापा डोंट प्रीच, अमेरिकन लाइफ - मडोना ६. स्वे विथ मी - डीन मार्टिन ७. स्ट्रेंजर्स इन द नाईट - फ्रांक सिनात्रा ८. आय कान्ट गेट यु औट ऑफ माय हेड - कायली मिनोग ९. व्हेनेव्हर व्हेरेवर, धिस टाईम फोर आफ्रिका -- शकिरा १०. उप्प्स आय डीड इट अगेन - ब्रिटनी स्पिअर्स ११. आय म कमिंग उप, सो बेटर गेट दिस पार्टी स्टार्तेड -- पिंक १२. बेबी टोक टू मी - जेनिफर लोपेझ . . … क्रमश:
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 01/28/2015 - 14:50 नवीन
गवि, आबाचं " द विनर टेक्स इट्स ऑल" ऐकले असेलच. आणखी "मामा मिया ,पीपल नीड होप.." वगैरे वर लिहुया का एकदा
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Wed, 01/28/2015 - 17:25 नवीन
गवि, आबाचं " द विनर टेक्स इट्स ऑल" ऐकले असेलच.
माझ्या मते, गविंचा (की वल्लींचा?) एक अख्खा लेख या गाण्यावर वाचल्याचं स्मरतंय.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गवि गुरुवार, 01/29/2015 - 06:13 नवीन
वल्ली? तो औरंगजेब कसला लिहितोय गाण्याविषयी!? हां वल्लीनं लिहिलंन तर एकाच गाण्याविषयी लिहील "गीत गाया पत्थरोंने" (हे गाणं नसेल तर चुभूदेघे) प्रासचा असेल तो लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Fri, 01/30/2015 - 18:01 नवीन
औरंगजेब
अस्सं नका हो बोलू. बर्‍याच जणांचा फेवरिट आगोबा आहे तो. ;)
हां वल्लीनं लिहिलंन तर एकाच गाण्याविषयी लिहील "गीत गाया पत्थरोंने" (हे गाणं नसेल तर चुभूदेघे)
हा याबद्दल सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रचेतस Sat, 01/31/2015 - 04:54 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
प
पगला गजोधर Wed, 01/28/2015 - 14:56 नवीन
१३. व्हेन आय गेट ओल्डर …. वेव्हीन द फ्लाग ---के नान १४. उन दोस त्रेस … मारिया -- रिकी मार्टिन . . … क्रमश:
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 01/29/2015 - 06:23 नवीन
वाव दोन्ही खलास गाणी ! वेव्हिंग फ्लॅग तर....... अर्र्र्र.... शब्द खुंटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 01/28/2015 - 14:58 नवीन
१५. ऑल नाईट ऑल राईट ---पीटर आंद्रे . … क्रमश:
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 01/28/2015 - 15:05 नवीन
१६. मस्ती की पाठशाला, चित्रलेखा (चोर चोर - ठीरुडा ठीरुडा (तमिळ)), तुमको टाडा --- ऐ आर रेहमान … क्रमश:
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव गुरुवार, 01/29/2015 - 15:14 नवीन
चित्रलेखा नाही हो. चन्द्रलेखा. (गाण्याचे नाव कोंजम कोंजम) पिक्चर तमिळ मध्ये थिरुडा थिरुडा. तेलुगु मध्ये दोंगा दोंगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
व
वैभव जाधव गुरुवार, 01/29/2015 - 15:15 नवीन
आणि त्यातली डान्सर हिरवीन अनु अगरवाल. (पहिल्या आशिकीतली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
प
पगला गजोधर गुरुवार, 01/29/2015 - 15:30 नवीन
चंद्रलेखा…. ड्यूली नोटेड …. भावनेच्या भरात टायाप्ताना गडबडलो … धन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
प
पगला गजोधर Wed, 01/28/2015 - 15:08 नवीन
१७. हाय रामा ये क्या हुआ, जान में दम --- ऐ आर रेहमान … क्रमश:
  • Log in or register to post comments
अ
अदि गुरुवार, 01/29/2015 - 06:14 नवीन
हाय रामा ये क्या हुआ गाण्यात मधे एक म्युझिक पीस आहे. वीणा, सतार, सरोद काय आहे ते सम्जत नाही, पण ए. आर रेहमान टच आहे.. निव्वळ अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 01/28/2015 - 15:15 नवीन
तोबा तेरा जलवा, तेरा इमोसनल अत्याचार --(चित्रपट: देव डी ) … क्रमश:
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 01/29/2015 - 07:48 नवीन
१९. धिस इज द एंड- स्कायफॉल - ऐडल २०. टायटल सॉंग - लॉ अन्ड ओर्डर (ओरीजनल ) , लॉ अन्ड ओर्डर (क्रिमिनल इंटेन्षण ) २१. टायटल सॉंग - शेरलॉक होल्म्स (ग्रेनाडा १९८७-९२) क्रमशः …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर गुरुवार, 01/29/2015 - 15:34 नवीन
तोबा तेरा जलवा, तोबा तेरा प्यार …। तेरा इमोसनल अत्याचार --(चित्रपट: देव डी ) आर कोनतरी बोल्ला राव या गाण्यावर …. माझ्या अमेरिकन मित्रांना हे गान आईकावतो म्या…म्यारेज सॉंग म्हनून .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/28/2015 - 15:54 नवीन
मलाही घरी मस्त निवांत असलो की जरा म्हणजेच मोठ्या आवाजात गाणी ऐकायला आवडतात. वर उल्लेख झालाय तसा सुफी गाणी आवडतात, (नुसरत फतेह अली तर लै म्हणजे लै भारी) ढोलकी आणि आवाज. कव्वाल्याही वाजवायला आवडतात. वादा करके न आना बहुत बुरी बात है, मैने मासुम बहारोमे तुम्हे देखा है. कैलाश खेर... असं बरेच काही. आवडीने लिहूच... छान धागा. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 01/28/2015 - 16:09 नवीन
कितने अरमाण माण माण माण.. जाने तेरे वास्ते सोणिये होले होले, मुझको याद सताये तेरी झांझरीया उसकी छनक गयी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा