Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डु आयडी आणी चपला

म
मृत्युन्जय
Wed, 01/28/2015 - 14:09
🗣 83 प्रतिसाद
आज बर्‍याच काळाने सुहासची आठ्वण झाली म्हणुन म्हटले एक खरड टाकुयात. आजकाल त्याचे प्रतिसादही दिसत नाहित. त्याच्या नावावर टिचकी मारली तर कळाले की मला त्याच्या खवत डोकावयाचा अधिकार नाही. थोडीफार इकडे तिकडे विचारणा केली असता असे कळाले की सुहास बॅन आहे. हे मला नविनच होते. सुहासने बॅन होण्यासारखे नक्की काय केले हे कळेना. तसा तो थोडा फटकळ आहे पण बॅन करावे असे काही त्याने केले असेल असे माहिती नव्हते. थोडी अजुन चौकशी करता कळाले की विमे आणि संक्षी सुद्धा बॅन आहेत. विमेंचेही तेच. फटकळ आहे पण भाषा नेहमीच जपुन वापरतो. मग एकदम काय झाले? एकीकडे तर मिपावर प्रवेश संपादित असुनही भारंभार डु आयडी निघतात आणि दुसरीकडे जेन्युइन लोक बॅन होतात. हे काय गौडबंगाल आहे? त्यातपरत सुहास, विमे, संक्षी वगैरे डु आयडी घेउन काड्या घालणार्‍यातले नाहित म्हणजे मग या कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आहेत त्या यांच्या नाहित. जर हे डु आयडी चालतात तर मग जेन्युइन लोक का नाहित? मिपावर प्रवेश संपादित असतानाही (आता नसेल तर मला माहिती नाही. पुर्वी तरी होता) हे डु आयडी (सरळसरळ नामसाधर्म्य असणारे) कसे तयार होउ शकतात? मिपावर जर लोक बॅन होणार असतील तर त्यांना का बॅन केले आणि कधी (आणी कोणाकोणाला) हे देखील लोकांना कळायला हवे. किमान इतर लोक त्याच चुका परत करणार नाहित. डु आयडींना पायघड्या आणि इतरांना चपला असा प्रकार मिपावर जाणुनबुजुन होणार नाही ही कल्पना आहे. पण मग जालीय हत्या झालेल्या आयडींचे अपराध तरी लोकांना कळाले पाहिजेत आणि डु आयडींना बॅनही केले गेले पाहिजे असे मला तरी आपले वाटते. सुहास, संक्षी, विमे वगैरे बॅन नसतील आणी माझी माहिती / समजूत चुकीची असेल तर आनंदच होइल. इतरांची मते जाणुन घेण्यास उत्सुक आपलाच नम्र मृत्युं जय

प्रतिक्रिया द्या
29690 वाचन

💬 प्रतिसाद (83)
स
सूड गुरुवार, 01/29/2015 - 09:38 नवीन
>>उजळमाथ्याने ओळख दाखवायची म्हणजे नेम्कं काय करायचे ? प्यान कार्ड आधार कार्ड तुम्हाला दाखवायचे का ?
हो!!
↩ प्रतिसाद: hitesh
श
शिद गुरुवार, 01/29/2015 - 13:47 नवीन
खाई त्याला खवखवे, चोराच्या मनात चांदणं, इ.इ. म्हणी आठवल्या.
↩ प्रतिसाद: hitesh
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/29/2015 - 07:12 नवीन
"सर्वप्रथम हे सांगु इच्छितो की हा धागा कुठल्याही संपादकावर किंवा संमं वर टीका करण्यासाठी काढलेला नाही." ते जाणवले, म्हणूनच प्रतिसाद देत आहे.दंगा न करता प्रामाणिक पणे मत प्रदर्शित करणे, हीच खरी लोकशाही. "माझ्यापुरते बोलायचे झाल्यास विमेचे प्रतिसाद मला आवडायचे. म्हणजे तो माझ्या बाजूणे गोग्गोड प्रतिसाद वगैरे टाकायचा असे काही नाही. त्याने वेळोवेळी माझ्याही धाग्यांवर किंवा प्रतिसादांवर तिरकस प्रतिसाद दिले. पण माणूस उपद्रवमूल्य असणारा नाही आणि स्वतःच्या मतांशी रीझनेबली ठाम आहे." प्रचंड सहमत, कारण मी पण विमेंना भेटलो आहे.आधीच सांगीतल्या प्रमाणे, विमेंना निदान २-३ वेळा प्रत्यक्ष भेटल्याशिवाय विमे कळत नाहीत. "मी कधीच त्यांचे धागे किंवा प्रतिसाद नीट वाचले नाही. मला ते काय लिहितात हेच कळायचे नाही पण लिहिताना ते मर्यांदांचे भान ठेउन लिहितात इतके समजायचे." +१... सहमत. संक्षींना ह्यावेळी भेटायचा नक्कीच प्रयत्न करणार. म्रुत्युंजय, एक कट्टा तेरे नाम.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
स्पा गुरुवार, 01/29/2015 - 07:25 नवीन
क्या बात हे मूवी , विमे भरून पावला असेल एवढे कौतुक ऐकून
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/29/2015 - 08:25 नवीन
त्याची मते ठाम आहेत पण तो ती आक्रस्ताळेपणे मांडत नाही आणि वैयक्तिक पण तर नाहीच नाही. कदाचित मला सुरुवातीला झाला तसा, भास इतरांना पण झाला असेल. असो, मी माझा विमेंच्या बाबतीतला अनुभव सांगीतला, इतरांना कदाचित विमेंना भेटून वेगळा अनुभव पण आला असेल.
↩ प्रतिसाद: स्पा
य
योगी९०० गुरुवार, 01/29/2015 - 07:31 नवीन
मी सुद्धा विमेंना भेटलो आहे. त्यांनी काही आक्षेपार्ह टाकले असावे असे वाटत नाही.
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/29/2015 - 08:12 नवीन
तसा मी आधीही मुवींचा फॅन होतोच आता ह्या वाक्या मुळे ए सी झालो आहे
दंगा न करता प्रामाणिक पणे मत प्रदर्शित करणे, हीच खरी लोकशाही.
आणि ह्यात थोडीशी भर घालु इच्छितो की " दुसर्‍याचे मत विरुध्द असेल आणि आपल्याला अजिबात पटत नसेल तरीही इथे प्रत्येकाला विचार आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे , तुझे मत तुला लखलाभ असो असे बोलुन शांत चित्ताने मत वैविध्य जोपासणे हाही एका प्रगल्भ लोकशाहीचा भाग आहे !"
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/29/2015 - 08:18 नवीन
तुझे मत तुला लखलाभ असो." + १....
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सूड गुरुवार, 01/29/2015 - 09:40 नवीन
बाकी एरवी निपचित पडून असणार्‍या रामपूरीसारख्या आयडींना या धाग्यावर लिहीतं झालेलं बघून मौज वाटली.
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 01/29/2015 - 10:01 नवीन
ऑ संक्षी बॅन झाले? काय सांगता काय? बरं मग आमचे परममित्र निराकार गाढवरावांचे काय झाले? जोक्स अपार्ट इतर अनेक आय.डींना बॅन करूनही ते दुसर्‍या नावाने इथे परत येऊ शकत असतील आणि विमेंसारख्याला परत येता येत नसेल तर ते चुकीचे आहे.त्याविषयी काहीतरी करायला हवे.
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 01/29/2015 - 10:04 नवीन
तात्यांच्या कार्यकाळापासूनच, 'मिसळपाव' हे वैयक्तिक आणि खाजगी संस्थळ आहे आणि आपण इथे पाहुणे आहोत हा विचार मी माझ्या मनांत रुजविला आहे. पाहुण्याने पाहुण्यासारखे राहावे. यजमानांच्या घरचे नियम कटाक्षाने पाळावेत. जर पटत नसतील तर त्या घरातून निघून जावे किंवा स्वतःचे घर बांधून त्यात सुखनैवं राहावे. हल्ली कामाच्या व्यस्ततेमुळे मी मिसळपाववर जास्त नसतोच. पण टोपणनांवाने लिहावे असे कधी वाटले नाही. मी 'प्रभाकर पेठकर' आहे आणि 'प्रभाकर पेठकर' नांवानेच मिसळपाव, फेसबुक, वॉट्सअ‍ॅप वर वावरतो. टोपणनांवाने, आपल्या मतांशी विरोध दर्शिविलेल्या, सदस्यावर वैयक्तिक पातळीवर आगपाखड करणे केंव्हाही गैरच. मुळात टोपणनांव का घ्यावे लागते? त्या मागे उद्देश काय असतो? हेच मला उमगलेलं नाही. पण असते एकेकाची आवड असे म्हणून मी सोडून दिले. उथळ धागे, उथळ प्रतिसाद, भडक मतमतांतरे आणि जिव्हारी लागणारे विषारी शब्द ह्याने काय साध्य होतं? अशा संवादात मी स्वतः लक्ष्य नसलो तरीही 'अ' आणि 'ब' मधील अत्यंत हीन पातळीवरील चर्चा, वाद वाचण्याचा शेवटी उबगच येतो. गढूळलेल्या डबक्यात कुठेतरी 'मोती' सापडेल म्हणून चिखल चिवडत बसणे मला रुचत नाही. माझ्या मतांनुसार हे जग चालणार नाहीये (आणि तशी माझी अपेक्षाही नाही) हे ध्यानात धरून जेंव्हा जेंव्हा मिपाचे वातावरण गढूळते मी मिपापासून स्वतःला दूर ठेवतो. असो. पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना...! मिसळपावचे वातावरण जास्त गढूळणार नाही ह्याची काळजी संपादक मंडळ घेत असतेच. संपादक मंडळाचे निर्णय योग्य की अयोग्य ह्यावर मी विचार करीत नाही. 'घरमालकांनी' त्यांना नेमले आहे. त्यांचे निर्णय पटले नाहीत तर मी मिसळपावच्या बाहेर पडेन. ह्या घराचे नियम ठरवायचा प्रयत्न मी करणार नाही.
प
पिंपातला उंदीर गुरुवार, 01/29/2015 - 10:05 नवीन
छान प्रतिसाद
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
असंका गुरुवार, 01/29/2015 - 10:14 नवीन
फारच रोखठोक. पण विचार करायला भाग पाडलंयत...धन्यवाद!
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/29/2015 - 10:21 नवीन
मिसळपावचे वातावरण जास्त गढूळणार नाही ह्याची काळजी संपादक मंडळ घेत असतेच. संपादक मंडळाचे निर्णय योग्य की अयोग्य ह्यावर मी विचार करीत नाही. 'घरमालकांनी' त्यांना नेमले आहे. त्यांचे निर्णय पटले नाहीत तर मी मिसळपावच्या बाहेर पडेन. ह्या घराचे नियम ठरवायचा प्रयत्न मी करणार नाही.
+ १००% ! हेच म्हणतो !
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 01/29/2015 - 12:41 नवीन
सहमत हेच मत माझ्या प्रतिसादात मांडले आहे , आपण सामान्य मिपाकर आहोत सर्व सामान्य असे नियम मला लागू होतात ,मी येथे जास्त पावसाळे पहिले , देवी सरस्वती माझ्या लेखणीत वसते . किंवा इतर अनेक कारणांनी मी स्वतःला जेष्ठ समजत नाहीत आणि कुणाला ज्येष्ठ मानून घेत नाही. म्हणून कंपूबाजीस सपशेल नालायक आहे, संपादक मंडळाचा निर्णय शेवटचा अर्थात व्यक्ती पेक्ष्या पदाला मान देण्याकडे माझा कल आहे त्यामुळे जास्त राडे विदुषकी चाळे करणे तत्त्वात बसत नाही.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सुबोध खरे गुरुवार, 01/29/2015 - 14:52 नवीन
क्या बात है पेठकर साहेब, आपला तुम्हाला सलाम अगदी माझ्या मनातील सही सही लिहलेत( आणी माझे टंकण्याचे कष्ट वाचवलेत) धन्यवाद
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/29/2015 - 10:16 नवीन
आयला!! हे अजूनही चालूच आहे का इथे?
क
कपिलमुनी गुरुवार, 01/29/2015 - 10:18 नवीन
पैला राडारॉक्स मिपा आता राहिला नाही
ज
जेम्स बॉन्ड ००७ गुरुवार, 01/29/2015 - 12:23 नवीन
खरंय भो
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुहास झेले गुरुवार, 01/29/2015 - 10:19 नवीन
चला ह्या धाग्याच्या निमित्ताने अनेक नवीन-नवीन आयडी नजरेस पडले ;-)
द
दिपक.कुवेत गुरुवार, 01/29/2015 - 10:52 नवीन
संपादकांची काय प्रतिक्रिया आहे? त्यांचं काय म्हणणं आहे? अजून एका तरी संपादकाचा प्रतिसाद/स्पष्टिकरण आहे का ईथे?
प
पदम गुरुवार, 01/29/2015 - 12:33 नवीन
डू आयडी म्हणजे डुप्लीकेट आयडी का?
स
सूड गुरुवार, 01/29/2015 - 12:38 नवीन
नाही डू आयडी म्हणजे दुष्ट आयडी!! काही लोकांना 'द' टाईप करता येत नाही, ते 'ड' टाईप करतात. त्यावरुन हा अपभ्रंश अस्तित्त्वात आला आहे.
↩ प्रतिसाद: पदम
ज
जेम्स बॉन्ड ००७ गुरुवार, 01/29/2015 - 12:44 नवीन
हो हो. त्यांच्या या ऐदी पणावरुनच आयदी आणि मग आयडी असा शब्द निर्माण झालाय.. -पुन्हा ओक
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/29/2015 - 13:11 नवीन
ठ्ठो =)) वारल्या गेले आहे. =))
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 01/29/2015 - 13:59 नवीन
=))
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
आ
आदूबाळ गुरुवार, 01/29/2015 - 13:47 नवीन
डुक्कर आयडी
↩ प्रतिसाद: पदम
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 01/29/2015 - 12:42 नवीन
पदम ह्यांच्यावर शाब्दिक सूड कम आसूड ओढला आहे.
स
स्पा गुरुवार, 01/29/2015 - 13:21 नवीन
सूड कम आसूड ओढला आहे.
अह ओढल्या गेल्या आहे
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
प
पदम गुरुवार, 01/29/2015 - 13:44 नवीन
माहीत नव्हत म्हणुन विचारल. बाळ अजुन लहान आहे ह्या क्षेत्रात.
ज
जातवेद गुरुवार, 01/29/2015 - 14:30 नवीन
*lol*
↩ प्रतिसाद: पदम
म
मी-सौरभ गुरुवार, 01/29/2015 - 14:12 नवीन
तुमि मजा बघुन र्हायले बाप्पा पन पब्लिकला काय कळ्ळा तर बरं व्हील ना :)
स
संपादक मंडळ गुरुवार, 01/29/2015 - 15:37 नवीन
मिपाच्या धोरणानुसार काही आयडींवर वेळोवेळी शिस्तभंगाची कारवाई वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी केली जाते. बहुतेकवेळा सतत असांसदीय भाषा वापरणे, खेळीमेळीचे वातावरण बिघडवणे अशी कारणे असतात. मात्र तात्पुरती कारवाई असेल तर परत येताना त्या सदस्यांना अपमानास्पद वाटू नये म्हणून दर वेळी अशी कारवाई जाहीर केली जात नाही. या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली आहे. त्यामुळे धागा आता वाचनमात्र करत आहोत. सामंजस्याने चर्चा केल्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद! मात्र यापुढे कोणाला कसलीही शंका असल्यास सं मं आयडी किंवा नीलकांत आयडीला व्यनि करावा ही विनंती.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा