Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा

व — विदेश, गुरुवार, 01/29/2015 - 09:38
नकोच सोने हिरे जवाहिर देऊ तू मजला देवा एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा .. निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा .. गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा .. गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा .. भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा .. .

प्रतिक्रिया द्या
2150 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ग
गणेशा गुरुवार, 02/05/2015 - 11:20 नवीन
छान कविता .. प्राथनेसम आहे कविता
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 02/06/2015 - 04:30 नवीन
सुंदर आशयगर्भ कविता!
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 02/10/2015 - 00:49 नवीन
गणेशा, पाषाणभेद - प्रतिसादाबद्दल आभार !
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/12/2015 - 05:51 नवीन
"पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी" आठवलं!
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/12/2015 - 07:47 नवीन
कविता आवडली, परंतु बदललेल्या वास्तवीक सामाजिक परिस्थितीशी तुलना करण्यासाठी नकोच सोने हिरेजवाहिर -स्वप्नमयकल्पना आणि बदललेल्या काळातील लाकूडतोड्याची गोष्टीचे वास्तव हा स्वतंत्र धागा काढत आहे.
  • Log in or register to post comments
व
विदेश Fri, 02/13/2015 - 11:12 नवीन
पैसा... धन्यवाद ! माहितगार ... ही कविता आवडून, तुलना करण्यासाठी इतर आणखी चांगल्या कवितांचा संदर्भात आपण वापरली. छान वाटले. आभार !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा