Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टोपणनाव

प
पगला गजोधर
Fri, 01/30/2015 - 08:09
🗣 121 प्रतिसाद
नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात. काय कारण असावे ? आंतरजालावर टोपणनाव घेणार्यांना, नाव आडनाव शहर धंदा दिला की लोकं लगेचच, त्या व्यक्तीचे/चा/ची, जात, धर्म,आहारपद्धती, व्याकरण, राजकीय-मत, बद्दल मनात पूर्वग्रह बनवून मोकळे, एवढंच काय तुम्ही कुठल्या पेठेत, मध्यवर्ती कि उपनगर, आलेल्या पाहुण्यांना चहा देता कि नाही, देशभक्त आहात कि नाही, जातीयवादी आहात कि नाही, अस्सल मराठी आहात कि नाही, इस्राइल-पालेस्टेन संघर्षाबाबत तुमचा stand, वैगरे बाबत ठरवून मोकळे होतात कि काय, असे वाटूनच टोपणनाव धारण करताना ‘लोकांनी आपल्या विचारांवरून आपल्याला ओळखावे, उगा आपलं नाव गावच्या फंदात पडू नये’, असं तर वाटत नसेल ना ? खर्या नावाने वावरणार्यांना, ‘टोपणनाव वापरुन लिहीणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अपत्याचे पितृत्त्व दुसर्यास बहाल करण्यासारखे’ तर वाटत नसेल ना ? प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ नेहमी म्हणतात, की "माणसाला व्यक्त व्हायला आवडतंच, नव्हे हा तर त्याचा बेसिक Instinct आहे". आंतरजालाने व्यक्त होण्याची हि सुविधा दिलेली आहे, पण काहीजन टोपणनाव घेऊन व्यक्त होतात. ५ जुलै १९९३ रोजी 'न्यू यॉर्कर' मधे, प्रसिध्द झालेले व्यंगचित्र, आजसुद्धा लागू आहे. [संधर्भ “”http:://en.wikipedia.org/wiki/On_the_Internet,_nobody_knows_you%27re_a_dog””] ऐका आंतरजालीय रिसर्चमध्ये असे आढळले कि ऐकून ४०% आंतरजालीय टोपणनावाने वावरतात, १०० आंतरजालीय पुरुषांमध्ये ६६%+ टोपणनावाने वावरतात, तर १०० आंतरजालीय महिलांमागे ३०% पेक्षा कमी महिला टोपणनावाने वावरतात. म्हणजेच एकुणात पुरुषांची महिलांच्या तुलनेत टोपणनावाने वावरण्याची प्रवृत्ती अधिक असते. वयापरत्वेही टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होतो, त्यातल्या त्यात फक्त पुरुष सभासदांच्या वयाचा अभ्यास केला असता, जसे की सरासरी वय (३९ वर्षे ) - टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्ती (६७ %+ पेक्षा जास्त) , (३० वर्षे )- (३३-६६%) , (४५+ वर्षे )- (३३% - पेक्षा कमी) त्या रिसर्चमध्ये असे आढळल की लोकं नाव लपवण्यासाठी नाही तर (ऐकून टोपणनाव घेणाऱ्यात ७०%)प्रायवसीसाठी टोपणनाव धारण करतात. What makes this finding interesting is that there is an increased desire for identity control across all major social networks as people become more privacy conscious. उरलेली लोक संवेदनशील विषयावर व्यक्त होता यावे, किंवा आपले खरे नाव, आपल्यात दडलेल्या 'स्व'ला योग्य न्याय देवू शकत नाही असे वाटते म्हणून टोपणनाव धारण करतात. (उदा एखादे काल्पनिक ४० वर्षीय श्री गंगाधर त्रंबकजी घोडनदिकर, उभी हयात भाषेचे प्राध्यापक म्हणून समाजात वावरत असले, तरी त्यांच्या दडलेल्या स्व मध्ये ते स्वतःला, ‘गरीबांचा कैवारी दुर्जन्नांचा संहारी’ वैगरे वैगरे पाहत असतील तर ते टोपणनाव सुपरम्यान, रॉबिन-हूड तत्सम प्रकारातील घेतील) त्यांची सार्वजनिकपणे व्यक्त होण्याच्या प्रक्रियेतला हा मोठा प्रोत्साहक असतो, कि जे खऱ्या नावानिशी शक्य नाही असे कदाचित त्यांना वाटत असावे. सर्वेमधील जवळ जवळ ९५% आंतरजालीय लोकांनी सांगितले की, टोपणनावाकडून मिळणारा सल्ला व खर्या नावाकडून मिळणारा सल्ला, एकसारखाच विश्वसनीय असतो, म्हणजेच टोपणनाव वापरल्यामुळे व्यक्तीच्या आंतरजालावरील विश्वासार्ह्यतेत अजिबात फरक पडत नाही. Have you ever discovered new product, service or business through online comments ? या प्रश्नावर जवळजवळ ६०% लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. नावात काय आहे ? हे लिहिणारा प्रसिद्ध नाट्यलेखक 'विलीयम शेक्सपियर', हे देखील ऐक टोपणनावच होते. माझे टोपणनाव हे माझे व्यक्तिमत्व लपवण्यासाठी केलेला उपद्व्याप नसून, मुळी तेच माझे व्यक्तिमत्व आहे.---पगला गजोधर

प्रतिक्रिया द्या
24966 वाचन

💬 प्रतिसाद (121)
म
महेश अशोक खरे Fri, 01/30/2015 - 10:01 नवीन
माणसं टोपणनाव का घेतात हा एक मस्तच प्रश्‍न श्री. पगला गजोधर यांनी मांडला आहे. माझ्या मते जेव्हा स्वतःची ओळख न लपवता आपण आपले मत मांडले तर त्यामुळे समोरची व्यक्ती / समोरच्या व्यक्ती दुखावतील, त्यांची प्रतिकूल प्रकिक्रिया येईल या भितीतून टोपणनावाने लिखाण करण्याची सुरुवात झाली असावी. कोणत्याही प्रकारचे दडपण नसलेल्या समाजात टोपणनाव घेण्याची आवश्यकताच राहणार नाही. व्यक्तिशः मला टोपण नाव घेणे कमकुवतपणाचे - दुदैवी वाटते. जसे मला विग घालणारी, केसांना रंग लावणारी माणसे दुदैवी वाटतात, तसेच आहे. हे माझे मत आहे. याविषयी टोपणनाव घेणार्‍यांची, विग घालणार्‍यांची, केसांना रंग लावणार्‍यांची आणि हे सर्व न करणार्‍यांचीही वेगवेगळी मते असू शकतात. पण चर्चा चांगली होईल. एक मुद्दा असाही टाईपता टाईपता सुचला की वि. वा. शिरवाडकरांनी ‘कुसुमाग्रज’, राम गणेशांनी ‘गोविंदाग्रज’ अशी टोपणनावेच घेऊन काव्यनिर्मिती का केली असेल?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Fri, 01/30/2015 - 10:37 नवीन
मोठ्या विषयाला हात घातलास रे गजोधरा...ह्या विषयावर परिसंवाद व्हायला हवा असे परवाच आमचे हे म्हणत होते ... माई मोड ऑफ
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/30/2015 - 11:21 नवीन
चांगला लेख आणि उत्तम विश्लेषण ! खरं तर, आंतरजालावर जोपर्यंत "संस्थळ प्रत्येक सभासदाला विश्वासू सचित्र ओळखपत्र (उदा. पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, इ) दाखवून त्यावरचेच नाव आयडी म्हणून घेण्याची सक्ती करत नाही" तोपर्यंत स्वतःची प्रत्यक्ष खात्रीची ओळख नसलेल्या सर्व सभासद व्यक्ती (व्यक्तीचे खरे असलेले नाव या अर्थाने) आयडी की (व्यक्तीचे खरे नसलेले नाव या अर्थाने) डूआयडी आहेत, हा केवळ पुस्तकी प्रश्न राहणार आहे. आंतरजालासारख्या खुल्या माध्यमावर जर कोणी सुरक्षा, अनामिकता किंवा इतर कोणत्या कारणाने स्वतःचे खाजगी अस्तित्व गुप्त ठेवू इच्छित असेल तर ते सावधगिरीचे आहेच आणि अवैध तर नक्कीच नाही. बहुतेक सर्व संस्थळावर तरुण/वयस्क लोक वयस्क/तरूण नावे घेऊन आणि स्त्रिया/पुरुष पुरुष/स्त्रियांची नावे घेऊन वावरत असल्याचे दावे/संशय सतत व्यक्त होत असतात. गमतीने असो की इतर काही कारणाने पण तशी नावे घेणे कायदेशीर आहे या वस्तुस्थितीला कोणीही नाकारू शकत नाही. याशिवाय, सर्वसामान्यपणे पटणारे नाव घेतले म्हणून ती आयडी लगेच विश्वासू कशी काय बनते बुवा ?... असे समजणाराच 'बनत' नाही याची काय शाश्वती आहे ?! :) म्हणजे उद्या मी इस्पीकचा एक्का (जे माझ्या पासपोर्टवरचे नाव नाही) ही आयडी सोडून श्रीकांत मुंबईकर (हे सुद्धा माझ्या पासपोर्टवरचे नाव नाही) अशी आयडी घेतली की नविन आयडी आणि तिचे लेखन लगेच ताबडतोप जास्त अ/विश्वासू होणार की काय ?!!! *ROFL* असे असेल तर टोपणनावाने प्रसिद्ध असलेले सर्व भूत/वर्तमान कवी आणि लेखक अविश्वासू/भ्याड/अजून काही म्हणायचे की काय ? आणि मग सर्व बँकांनी सगळ्या ग्राहकांना त्यांचे खरे नाव हाच त्यांचा यूजर आयडी असावी अशी जबरदस्ती करायला हवी, नाही का ? :) आंतरजालाच्या मूलभूत व्यवहारपद्धतीमुळे, टोपणनाव वापरल्याने, त्यावरचे लेखन व विचार व्यक्तीकेंद्रित न राहता मजकूर(मुद्दा)केंद्रित असतात... म्हणजेच, कोणी लिहिले आहे यापेक्षा काय लिहिले आहे याला जास्त महत्त्व येते. यामुळे एका अर्थाने आंतरजाल मानवी मनात येणार्‍या पूर्वग्रहांना (उदा. लिहिणार्‍याचा देश, धर्म, जात, लिंग, राजकीय पार्श्वभूमी, रंग, जवळीक, इ इ इ ना) अडवणारी चाळणी बनून केवळ लिखाणातील मुद्द्यांवर नजर केंद्रित करायला मदत करते. हा आंतरजालाचा एक फार मोठा गूण आणि मोठी ताकद आहे. अर्थातच, ज्यांच्या मानसिकतेत "काय लिहिले आहे" यापेक्षा "कोणी लिहिले आहे" हे जास्त महत्त्वाचे आहे आणि त्यावर ज्यांची प्रतिक्रिया अवलंबून असते, त्यांना आंतरजालावरची सर्वच आभासी असणारी / वाटणारी नावे अडचणीची वाटणारच... तोही एक मानवी स्वभावच आहे, नाही का ? :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/30/2015 - 11:42 नवीन
अर्थातच, ज्यांच्या मानसिकतेत "काय लिहिले आहे" यापेक्षा "कोणी लिहिले आहे" हे जास्त महत्त्वाचे आहे आणि त्यावर ज्यांची प्रतिक्रिया अवलंबून असते, त्यांना आंतरजालावरची सर्वच आभासी असणारी / वाटणारी नावे अडचणीची वाटणारच...
आंगाश्शी!!!! मिपावर या बाबतीत तारे तोडणार्‍यांची संख्या कमी नाही. त्यांची वृत्ती नेमकेपणी अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नाखु Sat, 01/31/2015 - 04:31 नवीन
चार पैसे..
आंतरजालाच्या मूलभूत व्यवहारपद्धतीमुळे, टोपणनाव वापरल्याने, त्यावरचे लेखन व विचार व्यक्तीकेंद्रित न राहता मजकूर(मुद्दा)केंद्रित असतात... म्हणजेच, कोणी लिहिले आहे यापेक्षा काय लिहिले आहे याला जास्त महत्त्व येते. यामुळे एका अर्थाने आंतरजाल मानवी मनात येणार्‍या पूर्वग्रहांना (उदा. लिहिणार्‍याचा देश, धर्म, जात, लिंग, राजकीय पार्श्वभूमी, रंग, जवळीक, इ इ इ ना)
मुळात समक्ष चर्चेत्-वाद्-विवादातही धर्म, जात, लिंग, राजकीय पार्श्वभूमी अध्यारुत्/काही ठोकताळे मनात ठेवूनच प्रतिक्रिया दिल्या जातात. मिपावरच काही व्यावसायिकांना जणू ते त्या व्यवसायाचे "अधिकृत प्रतिनिधी" म्हणून्च आले आहेत असे समजून शेरे/टोमणे वाचले आहेत. तस्मात आपली ओळख गोपनीय ठेऊन "टोपण नाव" घेणे रास्तच आहे. गुरुकूल-होस्टेल-शाळेपासून कॉलेजपर्यंत किमान ८-१० टोपणनावांनी ओळखला गेलेला पण तरी मूळ प्रतिमा अबाधित राहिलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
महेश अशोक खरे Fri, 01/30/2015 - 13:49 नवीन
श्री. इस्पिक एक्का यांच्या काही मुद्द्यांशी मी सहमत आहे. नावाला (विशेषतः आडनावाला) चिकटलेल्या जात / विचार / वर्ग यांच्या रंगांमुळे मांडत असलेल्या मद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचे अनुभव (ब्राह्मण या तथाकथित उच्चवर्णीय जातीत जन्मल्याने व खरे हे आडणाव ऍफिडेविट करून बदलावे असे वाटत नसल्याने) येत असतात. लोकशाही हे उत्तम मूल्य आहे आणि भारतासारख्या देशात कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती केली जात नाही व जाऊही नये. मात्र टोपणनावाने गोष्टी प्रसिद्ध केल्या की काहीही व्यक्त करता येते अशा अविर्भावाने काही जण वागतात असेही वाटते. अर्थात फारच चुकीच्या गोष्टी झाल्या तर त्यावर संपादक मंडळ योग्य ती कारवाई करत असेलच. टोपणनावाने लिहिण्याचा मला अनुभव नसल्याने तसे करण्याच्या मानसिकतेविषयी कुतुहल वाटले. ज्यांचा तो अनुभव आहे त्यांनी त्याविषयी लिहून आमच्या माहितीत भर घालावी. त्याच हेतूनी आधीच्या प्रतिक्रियेत शिरवाडकर, गडकरी यांची नावे घेतली होती. माझ्या आठवणीप्रमाणे प्रचंड वादळी व्यक्तिमत्त्व असलेले आचार्य अत्रेही केशवकुमार या टोपणनावाने कविता करत होते. अत्र्यांवर भ्याडपणाचा आरोप त्यांचे शत्रूही करू शकणार नाहीत. असो. त्यामुळे टोपणनाव घेणार्‍यांवर टीका करण्याचा कोणताही हेतू नाही एवढेच सांगू इच्छितो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/30/2015 - 14:59 नवीन
आपल्या नावाला कोणते टोपण लावता येईल हे न समजल्याने खरे नावच लिहिणारा खरे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 01/30/2015 - 15:10 नवीन
गगनविहारींचे गवि, मुक्तविहारींचे मुवि, चेतन सुभाष गुगळे चे चेसुगु झाले तसेच तुम्हीए सुबोध खरे : सुख हे टोपणनाव घ्यावे एवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तिमा Sun, 02/01/2015 - 12:38 नवीन
महेश खरे यांनी मखरे हे टोपण नांव घ्यावे असा तिसरा शब्द जोडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ब
बॅटमॅन Sun, 02/01/2015 - 13:38 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
आ
आदूबाळ Sun, 02/01/2015 - 16:25 नवीन
त्याच धर्तीवर जे लोक महेश, सुबोध किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे खरे नाहीत त्यांनी "न-खरे" हा आयडी घ्यावा असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
आ
आनन्दिता Sun, 02/01/2015 - 20:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बॅटमॅन Sun, 02/01/2015 - 22:33 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
क्लिंटन Mon, 02/02/2015 - 07:33 नवीन
मी खरे असूनही टोपणनाव वापरतो. मग मी खरे की नखरे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/02/2015 - 08:36 नवीन
खरे खरे असुनही टोपणनावाचे नखरे करणारे खरे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/02/2015 - 11:04 नवीन
@ त्यांनी "न-खरे" हा आयडी घ्यावा>>> =)))))) ए.......ढिश्क्यांव!!! =)) ढिश्क्यांव!!! =)) ढिश्क्यांव!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/02/2015 - 12:09 नवीन
खरे सांगु का आता? डॉक तुमच्या मागे बंदुक घेउन लागणारेतं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सूड Mon, 02/02/2015 - 15:03 नवीन
डॉक तुमच्या मागे बंदुक घेउन लागणारेतं.
ते 'शांतपणे' सांगतात, दोन्त योउ क्नोव चिमणराव? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/02/2015 - 18:40 नवीन
हओ वुद आय नो सुदकाका? नो वन तोल्द मी सो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ह
हाडक्या Mon, 02/02/2015 - 21:22 नवीन
ह्या ह्या ह्या... अरे ये पीएस्स्पीओ नै जानता..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 10:16 नवीन
आपल्या नावाला कोणते टोपण लावता येईल हे न समजल्याने खरे नावच लिहिणारा खरे.
आणि मी म्हणजे खरे नाव वापरावे की नाही हे न समल्यामुळे टोपण नाव वापरणारा खरे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/31/2015 - 10:18 नवीन
खरेपणाची हद्द झाली +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 10:24 नवीन
:) आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ए
एस Sat, 01/31/2015 - 11:56 नवीन
हे बाकी अगदी खरे आहे हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/31/2015 - 20:01 नवीन
@खरेपणाची हद्द झाली >> =)) खरे'च झाली! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Fri, 01/30/2015 - 15:11 नवीन
सुख के सब साथी दुख मी न कोई
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/30/2015 - 19:49 नवीन
बरे झाले तुमचे नाव दुष्यंत नाही. उगाच आम्ही एका चांगल्या मिपाकराला मुकलो असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
स्थितप्रज्ञ म्हैस Fri, 01/30/2015 - 17:32 नवीन
मलापण टोपणनावाने लिहायला अजाबात आवडत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/30/2015 - 18:56 नवीन
खरं आहे. परवा रावडी रेडा भेटला होता तेव्हा त्याने हे सांगितले होते ;) +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ म्हैस
अ
अजया Sat, 01/31/2015 - 05:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Sat, 01/31/2015 - 05:35 नवीन
एक्का साहेब तुम्ही म्हणजे हसत हसत एखाद्याच्या चड्डीला हात घालता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अस्वस्थामा Sat, 01/31/2015 - 15:09 नवीन
हसत हसत एखाद्याच्या चड्डीला हात घालता.
नक्की कोण हसत असतं हो खरे साहेब.. नै म्ह्ंजे घोटाळा व्हायचा... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बॅटमॅन Sat, 01/31/2015 - 08:20 नवीन
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
र
रेवती Fri, 01/30/2015 - 17:41 नवीन
एकसारख्या नावांमुळेही प्रश्न उद्भवू शकतात. कित्येक देशपांडे, कुलकर्णी, जाधव, पाटील यांची अजय, विजय, संजय, स्वाती, स्मिता, वैशाली अशी नावे असल्यास वेगळे नाव घेणे अपरिहार्य ठरते. मिपावरच स्वातीदिनेश, स्वातीराजेश, स्वातीमहेश, स्वाती२ असे आयडीज आहेत. प. ग., माहिती मनोरंजक वाटली.
  • Log in or register to post comments
स
संचित Fri, 01/30/2015 - 18:56 नवीन
व. पु म्हणतात तस "आपल नाव म्हणजे आपण नसतो . बारश्याला नाव ठेवतात ते आपल्या शरीराच नाहीतर उल्हास नावाचा माणूस कायम टवटवीत दिसला असता." शिवाय मिपावरील टोपण नावे फार interesting असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 02:17 नवीन
प्रचंड आवडतं वाक्य. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संचित
इ
इरसाल Sat, 01/31/2015 - 11:03 नवीन
या आणी अशाच कारणाने वर्जिनल नाव न्हाई घेतलं....म्हटलं स्वभाव आहे तसं घेवु नाव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 19:08 नवीन
आंतरजालासारख्या जगामधे मला तरी टोपणनावाच्या मास्कमागे लपायला आवडतं....तेवढाचं बसल्या जागी "व्हिजीलांते" असल्याचा थोडाफार आनंद मिळतो. आणि गुप्तता राखायच्या धोरणांबद्दल म्हणाल तर मी कोण आहे, काय करतो हे इथल्या ज्या लोकांवर माझा विश्वास आहे त्यांना माहित आहेचं. (मुखवट्याआडच्या मुखवट्यामागचा) कॅप्टन जॅक स्पॅरो, राहणार "ब्लॅक पर्ल" टोर्टुगा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/30/2015 - 19:41 नवीन
आमचे आंजा नाव तरी आम्हाला सुट होते, असे भेटणारे म्हणतात. (हे विश्र्वची माझे घर, असे म्हणणारा आणि तसाच वागणारा) मुवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ब
बॅटमॅन Sat, 01/31/2015 - 08:21 नवीन
शेम हिअर. -वाल्गुदाचार्य गौतमहळ्ळीकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 01/31/2015 - 04:17 नवीन
टोपण नावाने जात/धर्म इत्यादी लपत असले तरी काही काही आयडी आपली मानसिक विकृती लपवायला ह्याचा गैरफायदा घेतात हा आत्ताच इथल्याच एका भक्तिरसा च्या धाग्या चा वानरविचका पाहुन काढलेला निष्कर्ष आहे माझा
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/31/2015 - 05:26 नवीन
+ १... आणि अशाच लोकांना अवतार घ्यायला लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/31/2015 - 09:40 नवीन
या जगात हे होणारच. या जगात १००% सफेद अथवा १००% काळे काहीच नाही... सगळा करड्या रंगाचा वर्णपट आहे... आपण शक्य तेव्ढे सफेदीच्या बाजूला राहायचे / निवडायचे / समर्थन द्यायचे इतकेच आपल्या हातात आहे. : इस्पीकस्वामी एक्काचार्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 01/31/2015 - 10:16 नवीन
मान्य!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पगला गजोधर Sat, 01/31/2015 - 11:01 नवीन
ल. तों. मो. घा. ………. पण काळा = दुष्ट, वाईट, पाशवी, तिरस्करणीय सफेद = सुष्ट, चांगला, दैवी, स्पृहणीय असा रंगविषयक पूर्वग्रह आपल्या लोकांमध्ये कसा रूढ झाला ? (अती अवांतर (ह. घ्या.): पत्त्यांमध्ये इस्पिक काळा रंगाने दर्शिवितात नं ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/31/2015 - 14:39 नवीन
पत्त्यांमध्ये इस्पिक काळा रंगाने दर्शिवितात नं ? १. तोही चांगल्याने वाईटावर मात करण्यासाठी घेतलेला एक (टोपणनावाप्रमाणेच) बुरखा आहे. झोरो वगैरेचे पिक्चर बघितले नाहित का ?! :) २. पांढर्‍या रंगाचे कपडे राजकारणात फार्फार आवडते आहेत हे ध्यानात असेलच ;) (अवांतर : "दिसते तसे नसते..." या विषयावर एक लेख पाडण्याचे बरेच दिवस मनात आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अजया Sat, 01/31/2015 - 05:33 नवीन
मनोरंजक माहिती!स्त्रियांनी टोपणनावे घेण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा बरंच कमी आहे ही माहिती रोचक आहे!जालावर वावरताना मला व्यक्तिशः टोपणनाव बरे वाटते.बाकी इ ए काकांच्या प्रतिसादाशी सहमत! रच्याकने- व्यवसायावर आधरित काय टोपणनाव घेऊ शकते मी(दंतोत्पाटिका?)या विचारात दंग टोपणनावधारी अजया ^_~
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 07:53 नवीन
=)) पेशंट कमी येतील ओ यायचे अश्यानी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 07:54 नवीन
कमी होतील असे वाचावे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/31/2015 - 09:45 नवीन
इंग्लंडमधल्या तुमच्या एका व्यवसायबंधूंच्या चारचाकीवर "2THDOC" अशी नंबरप्लेट होती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा