च वै तू हि आणि मराठी मालिका ....
संस्कृत काव्यामध्ये च वै तू हि ह्याचे अनन्यसाधारण महत्व आहे ...फिलर्स म्हणून अतिशय कामास येणारे
हल्ली मराठी मालिकांमधील काही संवाद ... अत्यंत फुटकळ बाबही काहीतरी विशेष महत्वाची असल्यासारखे दाखवणे ...तसेच काही दृश्यांकने ह्या फिलर्स सारखे पण अत्यंत डोक्यात जाणारे
१. कुणीही कुठूनही बाहेरून आले कि : तू 'फ्रेश' होऊन ये ...अरे तो/ती फ्रेशच दिसत असतांना पुन्हा काय ...आणि हात पाय धुवून घे असे सोपे वाक्य नाही ...फ्रेश होऊन ये
२. कोणताही तणाव आला कि : त्याला / तिला थोडा वेळ दे
किंवा
तू आधी/थोडी शांत हो
३. अत्यंत फालतू समस्या मांडली तरी "मी समजू शकतो"
४. कसल्याहि फालतू विधानावर स्क्रीनवरच्या प्रत्येकाच्या चेहेर्यावर हलका प्रकाश झोत आणि त्यांची प्रतिक्रिया ...
५. काही ठिकाणी पांचट तकिया कलाम
-"नानामृत (नाना +अमृत)...मला पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला भलतेच वाटले होते "
-"शोधलं कि सापडते"
तरी हल्ली ते 'त्रिवार नकार' किंवा त्रिवार होकार with slight एको फार ऐकू येत नाहीत ...
"तुम!"
आणि एपिसोड संपायचा. दाराबाहेर कोण असावं या उत्कंठेने पुढचा एपिसोड लावावा, तर सिलेंडरवाला, रद्दीवाला वगैरे असायचा!