मागे राहिली आवली ......
तिच्या डोळ्यातली व्यथा , कुणी नाही रे जाणली
तुका वैकुंठासि गेले, मागे राहिली आवली
सावधान म्हणताच, पाशातून सुटलात
तुम्ही झालात समर्थ, ती गजाआड खोळंबली
तिची प्रीती तिची भक्ती, काळापार कान्ह्यासाठी
एका हाकेवर भोज ,त्याला मीरा ना लाभली
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
त्याचे घर भोगी पण, निजसूर्याची काहली
विशाल वृक्षाखालच्या गवतावर नेहमीच कमी सूर्यप्रकाश पडतो..मान्य. गंमत या गोष्टीची वाटते की त्यात ना वृक्षाचा दोष असतो ना गवताला त्याची खंत असते. पण जेव्हा काहीजण शेकडो वाटसरुना सावली देणाऱ्या वृक्षाला त्याने गवताला मिळणारा सूर्यप्रकाश अडवला म्हणून दोष देतात किंवा तोडायला निघतात तेव्हा मात्र त्या वेडेपणाचे नक्कीच हसु येते.मिराबैंच्या बाबतीत हे उदाहरण झाड - गवत असे न ठरता झाड - बांडगूळ असे ठरते. हे लक्षात आले म्हणजे मग मिराबैला दोष देणे चुकीचे ठरत नाही. पण धर्म , देव ही झापड लावलेली असली की मग झाड - गवत हाच दृष्टांत आठवणार . असो.हेच उलट म्हणायचे झाल्यास, जर सारासारविचार बुद्धीचा वापर केला तर देव, धर्म या गोष्टी फार मागे राहतात. पण तुमचे झालेय काय? की तुम्ही नाही नाही म्हणता म्हणता या गोष्टींमध्ये (विरुद्ध बाजुने का असेना) पण इतके अडकला आहात की एखाद्या गोष्टीतली सौंदर्यस्थळे शोधण्यापेक्षा दोषच शोधायला लागता. शुभेच्छा !सौंदर्यस्थळाने स्वतःच्या जिवावर जगावे , दुसर्यावर बांडगूळ होऊन नव्हे.स्वतःचा मुर्खपणा सिद्ध करण्याची एवढी कसली हौस म्हणतो मी. 'सौंदर्यस्थळं' हा शब्द मी मीरेच्या साहित्याबद्दल वापरला होता. तुम्ही पुन्हा स्वतःला सोयिस्कर तो अर्थ घेतलात. म्हणूनच म्हटलं होतं मी "तुम्हाला सौंदर्यस्थळे शोधण्यापेक्षा त्यातले दोष शोधण्यातच जास्त स्वारस्य असते." बाकी मीरेने किंवा तिच्या नवर्याने किंवा कुणीही कसे जगावे , काय करावे हे सांगण्याचा मला काय किंवा तुम्हाला काय, कुणालाच कसलाही अधिकार नाही? आणि मीरेमुळे तिच्या नवर्याला पर्याय मिळू शकला नाही हे कुठल्या आधारावर म्हणताय तुम्ही? तीचं संसारात ल़क्षच नव्हतं हे अगदी तिची चुक म्हणून जरी कबूल केलं तरी मग तिच्या नवर्याने अजुन चार लग्ने केली असती तर तिला काहीच फरक पडण्यासारखा नव्हता. अहो स्त्रीयांना किंमत देणारे नवरे आजसुद्धा रेअरली सापडतात ( अगदी तुम्ही सुद्धा आपल्या पत्नीबाबत एक विक्षीप्त विधान करुन त्या मावलीची चारचौघात शोभा केलीत)( .. बहिणीच्या नवर्याला संपुर्ण पगार देणार , त्याच्यावर सर्वस्व अर्पणार वगैरे बाता मारुन ,संसार सोडुन , मिरेची 'कृष्णभक्ती ' स्वीकारुन , नवरा सोडलेल्या व चार वर्षानी ' उंबरठा ' षिनेमाच्या निराश स्मिता पाटीलप्रमाणे पुन्हा संसारात परतलेल्या आधुनिक मिराबैचा दु:खी नवरा ..उर्फ.. हितेशभौ ! ).आणि तुम्ही त्या काळी स्त्रीयांना फार मान वगैरे असेल अशी अपेक्षा करताय? स्वतःवरुनच ठरवा की.... शुभेच्छा !नवरा चार बायका करु शकतो , मग एका बैचे संसारात लक्ष नसले तर बिघडले कुठे ?काय गैर आहे त्यात? एक स्त्री म्हणून तिलासुद्धा तेचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहेच की.