Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मेक्सिको: भाग १ : प्रस्तावना

स
समर्पक
Sun, 02/01/2015 - 08:35
💬 20
या लेखमालेत एका नव्या देशाविषयी. भारताशी खूप साधर्म्य असलेले काही देश आहेत त्यातील हा एक. सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय समृद्ध वारसा असलेला, भौगोलिक वैविध्य असलेला, चविने खाणा-यांचा, विविधरंगी देश! भारताप्रमाणे लोकसंख्या, प्रदूषण, गरिबी, बेकारी, अमली पदार्थांचा वाढता व्यापार इ. ला तोंड देत उदयाला येणारी एक महत्वाची बाजारपेठ! थोडा इतिहास भूगोल, अतिप्राचीन नागरी संस्कृती जन्माला घालणा-या मोजक्या प्रदेशांपैकी हा एक. अॅझ्टेक, टोल्टेक, ओल्मेक, झापोटेक, माया हे काही महत्वाचे ऐतिहासिक समाज घटक. त्यातील माया व अॅझ्टेक हे त्यावेळच्या उपलब्ध साधनांचा वापर करून उत्कर्षाच्या परमावधीपर्यंत पोहोचले. पुढे माया संस्कृती बव्हंशी अज्ञात कारणाने उतरणीला लागली तर अॅझ्टेक लोक स्पॅनिश आक्रमणाचे बळी ठरले. माया जीवनपद्धती अजूनही जिवंत आहे, बाकी सगळे इतिहासजमा. हेमांगीके यांनी मिपावर याआधी मध्य अमेरिकेच्या इतिहासावर सखोल लेखन केले असल्याने त्यातील पहिल्या भागाचा दुवा देउन पुनर्लेखन टाळतो. पुढे वेळोवेळी त्या लेखमालेचा संदर्भ घेउच… मेसोअमेरिका - एक दृष्टिक्षेप हा प्रदेश उत्तर व दक्षिण अमेरिकेला जोडतो. १९व्या शतकात जवळजवळ एक तृतीयांश मूळ मेक्सिको अमेरिकन संघराज्याने गिळंकृत केला. आज आपण त्या भूभागाला पश्चिम टेक्सास, न्यू मेक्सिको, अॅरिझोना व कॅलिफोर्निया या नावांनी ओळखतो. स्पॅनिश प्रभाव तिथे आजही आढळतो. उर्वरित भूभाग पॅसिफिक व अॅटलांटिक सागराच्या मधोमध दक्षिणेकडे निमुळता होत कर्कवृत्त ओलांडतो, दक्षिण-पूर्वेकडे घनदाट जंगलं, उत्तरेकडे वाळवंट तर मध्यावर उत्तुंग ज्वालामुखीय शिखरे, तो आजचा मेक्सिको, उर्फ 'मेह्हीको'. सांप्रत ३१ राज्यांत विभागलेल्या या देशातील सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ८ राज्यांतील हा एकल प्रवास. मेक्सिको चा भौगोलिक इतिहास (संदर्भ: विकी; जीआयएफ सपोर्टींग ब्राउझर मध्ये पहा)
यूएसनिवासी लोकांसाठी महत्वाची माहिती; H1/L1/GC असेल तर या देशासाठी वेगळा व्हिझा लागत नाही, जमल्यास जरूर भेट द्या. मेक्सिको चा भौगोलिक संदर्भ: भाग २: मेरिदा, भाग ३: ऊश्माल व कबाह भाग ४: चिचेन ईत्झा
  • मेक्सिको: भाग २ : सफरीची सुरुवात - मेरिदा
  • मेक्सिको: भाग ३ : 'माया'वी जगात प्रवेश
  • मेक्सिको: भाग ४ : चिचेन ईत्झाची आश्चर्यनगरी

Book traversal links for मेक्सिको: भाग १ : प्रस्तावना

  • मेक्सिको: भाग २ : सफरीची सुरुवात - मेरिदा ›

प्रतिक्रिया द्या
11036 वाचन

💬 प्रतिसाद (20)
स
सुहास झेले Sun, 02/01/2015 - 10:31 नवीन
वाह .... नयनरम्य अद्भुत फोटोग्राफी आणि सुंदर लेखमालेची मिपाकरांना मेजवानी निश्चिती :) पुढील भागाच्या प्रतीक्षेत :)
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 02/03/2015 - 11:41 नवीन
असेच म्हणतो. तेवढा भारताचा नकाशा सोडला तर बाकी प्रस्तावना सुंदर आहे आणि पुढील लेखांची आवर्जून वाट पाहिली जाईलच याची खात्री!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
स
समर्पक Tue, 02/03/2015 - 18:40 नवीन
पहा बरं एकदा... आता ठीक आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Wed, 02/04/2015 - 17:30 नवीन
होय, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
र
रेवती Sun, 02/01/2015 - 13:33 नवीन
वाचतिये.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 02/01/2015 - 14:35 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 02/01/2015 - 15:20 नवीन
वा वा ! अनेक संस्कृत्यांनी भरलेल्या देशाबद्दलच्या मालिकेचे स्वागत... होऊद्या बैजवार विस्तृत माहिती आणि बक्कळ प्रकाशचित्रांसह. *good*
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 02/01/2015 - 17:57 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 02/01/2015 - 18:06 नवीन
खूप छान मालीका वाचायला मिळणार.. हेमांगीके यांच्या लेखाचा जो दुवा आहे, त्यामधे नरबळीचे जे चित्र आहे, ते जसेच्या तसे "अ‍ॅपोकॅलीप्टो" या चित्रपटात रंगवलेले आहे. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
भ
भुमन्यु Mon, 02/02/2015 - 11:17 नवीन
खूप छान मालीका वाचायला मिळणार..+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अर्धवटराव Sun, 02/01/2015 - 19:18 नवीन
पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Mon, 02/02/2015 - 09:56 नवीन
पु.भा.प्र.आणि फोटोंच्या प्र.
  • Log in or register to post comments
म
मॅक Mon, 02/02/2015 - 12:09 नवीन
सुरवात खुप छान..... पुढील भाग लवकर येऊ देत.....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/03/2015 - 10:10 नवीन
वाचतोय .. पुढील भाग येवुद्या
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 02/03/2015 - 11:00 नवीन
हेमांगी के यांचा लेखहीसुंदर. ह्याच्या दुसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 02/03/2015 - 17:28 नवीन
उत्सुकतेने वाट बघत आहे!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/03/2015 - 17:42 नवीन
मेक्सिकोला भेट देण्यासाठी जिसी असणार्‍यांना मेक्सिकन व्हिसा लागत नाही हे ठाऊक होते पण एच १ किंवा एल १ वर अमेरिकेत राहणार्‍यांसाठीही लागत नाही ही माहिती नवी आहे. मी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये सॅन्टा अ‍ॅना येथे राहिलोय. तेथील बर्‍याच ठिकाणी मेक्सिकोमध्ये असल्याचा भास व्हायचा (स्थापत्य व इंग्लिश ऐवजी स्पॅनिशचा अधिक प्रभाव). पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 02/04/2015 - 03:40 नवीन
ऐकीव माहिती - उत्तरेहून कॅनडा बॉर्डरवरून निघणारा I-5 महामार्ग, दक्षिणेकडे पार मेक्सिकोच्या आत शिरतो. जर योग्य त्या ठिकाणी एक्झिट घेतले नाही तर, थेट मेक्सिकोत पोहोचाल आणि मग परत येण्याची भानगड होईल असा सल्ला दिला गेला होता, त्याची आठवण आली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/04/2015 - 03:52 नवीन
मी कॅलिफोर्नियामध्ये असताना मलाही असाच सल्ला मिळाला होता. सॅन डिएगोपासून काही मैलांवर जो बॉर्डर चेकपोस्ट आहे तो दैनंदिन आवागमनाच्या बाबतीत जगातील सर्वाधिक व्यस्त आहे असे ट्रॅव्हल चॅनेलवरील कार्यक्रमात पाहिले होते. रोज सकाळी हजारो मेक्सिकन नागरिक रोजगारासाठी अमेरिकेत येतात अन संध्याकाळी परत जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
समर्पक Wed, 02/04/2015 - 07:48 नवीन
हो आणि एकदाका मेक्सिको मध्ये पोहोचलात कि मैलोनमैल लांब ट्राफिक मध्ये थांबल्याशिवाय परती अशक्य. पुन्हा कागदपत्र नसतील तर होणारा गोंधळ आणि त्रास वेगळाच; (कदाचित डीपोर्ट…) एकदा तिह्हुवाना बॉर्डर च गूगल नकाशातील उपग्रहीय चित्र पहा. ती लांबच लांब गाड्यांची रांग सहज दिसून येते https://www.google.com/maps/@32.5414717,-117.0293265,677m/data=!3m1!1e3
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा