मटार - पनीर पुलाव
Primary tabs
साहित्यः
१. मोकळा शीजवलेला भात
२. उभे चीरलेले कांदे - २
३. उभी चीरलेली सीमला मीरची - १
४. वाफवलेले किंवा फ्रोझन मटार - १/२ वाटि
५. बारीक चीरलेले टोमॅटो - ३ ते ४
६. पनीर क्युब्स - १ पाकिट
७. पेस्ट - २ चमचे (२ पाकळ्या लसूण, पेरभर आलं, २ हिरव्या मिरच्या, कोथींबीर)
८. बटर क्युब्स - ३
९. तेल - २ चमचे (म्हणजे बटर जळणार नाहि)
१०. गरम मसाला - १/२ चमचा
११. धणे पावडर - १.५ चमचा
१२. लाल तिखट - १ चमचा
१३. बिर्यानी मसाला - १/२ चमचा (एच्छिक पण छान फ्लेवर येतो)
१४. चवीनुसार मीठ
१५. बारीक चीरलेली कोथींबीर/किसलेलं पनीर
कृती:
१. फ्रोजन पनीर क्युब्स वापरणार असाल तर थोडया वेळ गरम पाण्यात घालून ठेवा जेणेकरुन मउ होतील. हे क्युब्स किंचीत मोठे असतात म्हणुन त्यांचे मधून दोन भाग करा. थोडे क्युब्स बाजूला ठेवुन बाकिचे आवडत असल्यास शॅलो फ्राय करुन घ्या. बाजूला ठेवलेले क्युब्स किसुन ठेवा.
२. मंद आचेवर नॉन स्टिक कढई/वोक/पॅन मधे बटर क्युब्स घाला. लगेच दोन चमचे तेल घाला. तेल तापलं कि उभा चीरलेला कांदा घालून परता. कांदा साधारण तपकिरी झाला कि वाटलेली पेस्ट घाला. पेस्टचा कच्चा वास गेला कि उभी चीरलेली सीमला मीरची घालून परता
३. सीमला मीरची मउ झाली कि आता बारीक चीरलेला टोमॅटो घाला. वाफा देत देत टोमॅटो पुर्णपणे शीजला कि वाफलेले मटार घाला. मटार घालून १-२ मि. परतलं कि सगळे मसाले / चवीनुसार मीठ घाला.
४. पाण्याचा हलका हबका मारा जेणेकरुन मसाले खाली लागणार/चीकटणार नाहित. एक ४-५ मि. शॅलो फ्राय केलेलं पनीर, किसलेलं थोडसं पनीर आणि कोथींबीर त्यात घाला. कढईवर झाकण ठेवून एक ४-५ मि. पनीर मधे सर्व मसाले मिसळून जाउ दया. अर्थात भाजी मधे मधे ढवळत रहा.
५. पाणी पुर्ण आटुन भाजी सुकि झाली कि गॅस बंद करा. आता त्यात मोकळा शीजवलेला भात हलक्या हाताने मिक्स करा.
६. बारीक चीरलेली कोथींबीर आणि किसलेलं पनीर पेरुन गर्मागरम मटार - पनीर पुलाव आवडत्या चटणी/रायतं किंवा लोणच्या सोबत पेश करा.
अवांतरः पनीर शॅलो फ्राय केलेलं पॅन काळच / ग्लेझ उडालेलं आहे. त्यावर कोणी ताशेरे ओढू नये हि विनंती.
हा भात आयता करून मिळाल्यास मजा येईल. ;) कृती चांगली वाटतिये. फोटू आवडला पण आधी खोबरे घातलेय काय असे वाटले. नंतर ते पनीर असल्याचे समजले.
दिपक कुवैत म्हटल्यावर ते पनीरच्च असणार ही खात्री होती. ;)
+१००
नायतर लोकांनी "हे पनिर घालून करता येईल का ?" असं विचारलं असतंच :)
भारी झालाय. :)
पुलाव ला आलेला रंग विशेष आवडला आहे.
पनीर किंग इज बॅक ;)
मटर-पनीर पुलाव छान दिसतोय, मस्तं पाककृती व झक्कास फोटू :)
बायकोने त्याला, "मटार-उसळ आणि भात" असे नांव दिल्याने, नंतर त्या भानगडीत पडलो नाही.
बादवे,
सोमवारच्या ऐवजी, रविवारी पा.क्रु. टाकल्याने, "भाते" ह्यांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.
झकास
उद्याच करते!
मस्तच !!
(सध्या पाकशाळा-प्रवेश झालेला असल्यामुळे.... लवकरच करून बघण्यात येइल..असे म्हणण्याची रिस्क घेतो! :) )
एकाच वाक्यात बरेच मतितार्थ लक्षांत आले...
कुणाचं शरीर धरलतं हो बुवा??
@कुणाचं शरीर धरलतं हो बुवा??>> खि खि खि!!! =))
माझ्या'च दहावर्षापूर्वीच्या मनोकायिकात-शिरण्याचा प्रयत्न करतोय हल्ली! ;)
सोमवार ऐवजी रविवारी पाकृ टाकल्यापध्दल धन्यवाद! आणि
(मिपाच्या भाषेत) बऱ्याच मोठया कालखंडानंतर पुन्हा एकदा पाकृ विभागात परत आल्यापध्दल अभिनंदन!
वरचेवर अशाच पाकृ रविवारी टाकत रहा हि सुचना!
फोटो आणि पाकृ दोन्ही झक्कास.
सुचना पें जरुर गौर फरमाया जायेगा! हम अपनी तर्फसे पुरी पुरी कोशीश करेंगे|
स्लssssssर्प ! यापेक्षा जास्त अजून काय ?!
कढई आणि वोक मधे नेमका काय फरक असतो? फ्लॅट बॉटमचा वोक मिळतो का? (चिन्यांच्या दुकानात पाहिलेले राउंड बॉटम होते)
छान सोपी पाकृ !
दीपकभौ पाकृ विभागात लै दिवसांनी दिसले याचा आनंद झाला =)
झकास!
नेहमीप्रमाणेच छान.
वाचखूण साठवली आहे!
मस्तच रे. आजच करणार
हा भात आणखी रिच बनवायाचा असेल तर चीज़ क्यूब अथवा खिसुन घालवे.
खूप दिवसानी आली रेसिपी.मस्त फोटो आणि सोपी पाकृ.करुन पहाते.
मस्तच.
कालच करुन पाहिला...आणि भात म्हटल्यावर नाक मुरडणाऱ्या नवऱ्यानी चक्क आज डब्ब्यात नेला! त्याच्या ऑफिस मधे पण सुपरहिट झाला! रंग पण असाच दिलखेचक आला होता. धन्यवाद, एका सोप्प्या आणि टेस्टी पाककृती बद्दल!!
तृतीया विभक्ती:
एकवचनः ने ए शी
बहुवचनः नी ही ई शी
ईतका भरपूर पण नव्हता बनवला हो...एकवचनीच बनवला होता!
भाताबद्दल नाही , नवर्याबद्दल आहे
*YES*
ठरवा आता ब्वॉम तुमचं तुम्हिच!!! :D
पनीर सोडून पाकृ आवडली.
-नॉनव्हेज न खाणारा असल्यानं पर्यायी पनीर चे प्रकार खाऊन कंटाळलेला प्यारे
काल केला ,मस्त झालेला .धन्यवाद .
पुलाव करुन आवर्जून कळवणार्यांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे सर्वांचे मनापासून आभार. मस्त खा आणि स्वस्थ रहा.
स्वःगतः रच्याकने माझा आयडि बदलून आता दिपक.पनीर हा आयडि घ्यावा काय?? :)
तसं पण मी तुला दिपक.पनीर च म्हणते;)
मस्त झाला रे. घरी जाम आवडला सगळ्यांना.
धन्स
आवडला ना सगळ्यांना??? मग झालं तर.
मी पनीर न घालता करणार.
दीपकभाऊ, आज मोठ्या उत्साहात रेसिपी करायला घेतली. पण मेला भात काही मोकळा झाला नाही. त्यामुळे चव उत्तम येऊनही पुलाव प्रेक्षणीय झाला नाही :(
चव मात्र घरात सर्वांना खूप आवडली.
हरकत नाहि नेक्स्ट टाईम परत प्रयत्न कर. भात मोकळा कसा करावा याबद्दल टिप्स हव्या असतील तर मी पोस्ट केलेल्या "तवा पुलाव" चे प्रतिसाद बघ. ऑल दि बेस्ट.
आज केला.
सध्या मटारचा सुक्काळ असल्यामुळे,
भातात मटार घातलाय का मटारात भात असा प्रश्न पडला.पनीर उगी उगी खाल्ल
बाकी रेशीपी आवडली
फोटु नाय काडला.
पहिलाच फटु बघून चकले. पुलावात खोबरं काय करतंय म्हणून! ते पनीर आहे हे नंतर कळलं!
मस्त!
फोटोपण छान आलेत.
वाह वाह ! क्या पुलाव है :)
( कृतीच्या फोटो मध्ये इतके मटारअन फायनल फोटुत
एकही मटार दिसत नाही , चुन चुन के खाये क्या मटार दिपक भाय तुमने :p )
कि पुलाव के उपर जो पनीर किसके डाला है ना उसीके नीचे ये कंबखक्त मटर भी छुप गये है....जालीम उपर दिखनेका नाम हि नहि लेते....पर है अंदर (मटर...सग्गळ्ळं कसं डिट्टेल मधे लिहायला लागतं बाबा नाहितर मिपाकर टपून बसलेच आहेत)...फिक्किर नको करु.
छान दिसतोय पुलाव.. करुन बघेन. :)
पुलाव आवडला आहे.
स्वाती
आम्ही पण काल रात्री केला होता हा भात. फार सुंदर चव आली. मी फक्त हिरव्या सिमला मिरची ऐवजी पिवळी घातली जरा वेगळा रंग यायला आणि वाटणात थोडा पुदिना चुरुन घातला, मस्त अरोमा आला. आणि साईड म्हणून आस्परागस सलाड घेतलं.
काल आमच्याकडे १५ तास स्नो झाला , तेवढ्या थंडीत तुमच्या या स्पाईसी भाताने फार मजा आणली. कालच्या डिनर ला मिळालेले सगळे कौतुक शेरे तुमचे तुम्हाला पोहोचवते :)
वॉव....भुरुभुरु पडणार्या बर्फात हा स्पायसी पुलाव खायला खुपच मजा आली असेल. मस्त. पुदिना अॅडिशनहि छान. आता मी पण एकदा पुदिना घालून परत करतो पुलाव.
ओह ओके, तुमच्याकडे स्नो झाला तर !!
उपहासाने बोललचं पाहिजे असं काहि नाहिये. १५ तास स्नो झाला हे अगदि आपल्याकडे भारतात..."काल दिवसभर पाउस कोसळत होता" हे सांगण्याएवढचं साहजीक आहे. असो. जास्त काहि बोलत नाहि. तु सुजाण नक्किच आहेस.
दिपक, तुम्ही म्हणता ते खरं आहे. सूड अत्यंत सुजाण आहेत. आता हेच बघा ना , हा आहे पाक्रु चा धागा. पण पाकृ वर काही प्रतिसाद देण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. जे बाकीचे सांगणारच अशा गोष्टींमध्ये का अमुल्य वेळ घालवा? तो वेळ ते सत्करणी लावतात लोकांचे विभक्ति प्रत्यय सुधारण्यात , पुर्ण प्रतिसादामधलं एखादंच वाक्य संदर्भाशिवाय बाहेर काढून त्याचा अनर्थ करणं या सारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामात. आता हे शेरे इथे किती प्रयोजन-लेस आहेत हा मुद्दा वेगळा. त्यांनी पाकृ मध्ये रस दाखवायचं काय कारण ना ? असले पदार्थ काय कुणी ही करेल, त्याचं प्रामाणिक कौतूक पण काय कुणीही करेल पण कामं - धंदे सोडून पाकृच्या धाग्यावर असले उच्च कोटीचे अवांतर करायला कुणी तरी तितकाच सुजाण आयडी पाहीजे सूड सारखा , नाही?
*dash1* *DASH* *WALL*
+१
माझ्याकडुन सुडास सप्रेम भेट :)
हा हा !! ;)
काय बनावतोस रे तू !!!!, जबऱ्याच.
बिनकामी भूक चाळवल्याबद्दल निषेध. झक मारत कैतरी बनवावं लागतं असलं जीवघेणं काही पाहिलं की.
मरी गयो रे ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }