खरड फळा रे खरड फळा
खरडफळा रे खरडफळा,
जरी तुझा रंग नाही काळा,
तुझ्या अंगी विविध कळा,
येथेच होते सुरुवात मिपाकरांची अभिवादनाने,
मुख्य धाग्यापेक्षा इथेच जास्त खडाजंगी घडे,
कोणी काढतो इथे दुसर्याच्या नावे गळा,
पॉपकॉर्न खात जग बघती तेवढाच विरंगुळा,
पडिक मिपाकरांचा हा जालिय मेळावा,
अहोरात्र इथे केव्हाही टंकाळा,
खरडफळा रे खरडफळा,
जरी क्षणिक लाभले आयुष्य तुझला,
तरी मिपाचा तु भरजेरी शेला.
खरडफळा रे खरडफळा.
💬 प्रतिसाद
(13)
प
प्रचेतस
गुरुवार, 02/05/2015 - 12:46
नवीन
झकास हो देर्देकर.
बाकी ह्या खरड'फ़ळ्या' मुळे फळा ह्या लोकप्रिय कवितेची आठवण झाली।
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 02/05/2015 - 12:59
नवीन
बा लीलाधरा, कुठे आहेस तू ? =D
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/05/2015 - 13:17
नवीन
+++++११११११ कचकुन सहमत हाय!
मात्र त्या काव्याचे जनक .. श्री. लीलाधर स्वामी महाराज हे सध्या प्रा"पंचिक सुखात विहरत असल्यामुळे, त्याच्या(प्रत्यक्ष मिळालेल्या :-D ) परिणाम रूपावर भाळुन लळा ,नावाची एक गोंडस बालकविता पाडण्यात व्यस्त आहेत,असे कळले आहे!
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 02/05/2015 - 13:46
नवीन
थाळीपेक्षा फुटाणे बरे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 02/05/2015 - 15:06
नवीन
पण कधी-कधीच
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 02/06/2015 - 11:12
नवीन
थाळी =पुर्ण लेख
फुटाणे =चटपटीत छोटा विचार
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 02/05/2015 - 14:05
नवीन
चचुकडीची आठवण झाली दर्दुकाका!!
- Log in or register to post comments
ल
लीलाधर
गुरुवार, 02/05/2015 - 16:23
नवीन
फळा फळा रे फळा फळा
येथे जमतो नव कवींचा मळा
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 02/05/2015 - 16:33
नवीन
गोड माझा बाळा, त्याचा लागला लळा
आला उमाळा, प्रतिभा वाहिली भळाभळा
बदलायला मी दुपटी रोज, शिकतोय मी बाळा
सोनुलं तुजला बघून लागला मज लळा
- Log in or register to post comments
अ
अजया
गुरुवार, 02/05/2015 - 16:36
नवीन
दोनोळींनी काम नाही चालायचं.लिलाध्रा,फुल कविता पाड.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/05/2015 - 16:43
नवीन
++++११११११११
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/05/2015 - 19:07
नवीन
छान ..
खरडफळा खरेच असा आहे काय ?
- Log in or register to post comments
ब
बहीरखेडकर
Tue, 02/10/2015 - 18:30
नवीन
गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला
लागला तुझा लळा..
कवि...
- Log in or register to post comments