ओबामा उवाच
वॉशिंग्टन डीसी मध्ये फेब्रुवारीच्या पहील्या गुरूवारी "राष्ट्रीय प्रार्थना न्याहारी" ;) अर्थात "National Prayers Breakfast" म्हणून सोहळा असतो. १९५३ पासून तो चाललेला आहे. जवळपास ३५०० अतिमहत्वाच्या व्यक्ती/उच्चभ्रू त्यासाठी येतात. एक वक्ता हा अमेरीकन राष्ट्राध्यक्ष असतो तर दुसरा त्या दिवशी सकाळपर्यंत गोपनीय ठेवलेला असतो. इंटरनेट, विकी आणि गुगलच्या जमान्यात एक गंमतीशीर निरीक्षण करता आले. या सोहळ्याविषयी काही माहिती मिळते का ते पहायला गेलो तर विकीवर (वर दिलेली) त्रोटक माहिती मिळाली. १९५३ सालपासून जरी चालू असला तरी विकीपानावर केवळ १९७३ पासूनचे वक्तेच लिहीलेले आहेत. त्यांचे स्वत:चे म्हणून संस्थळ देखील नाही. लिडरशीप डेव्हलपमेंट यांनी हा कार्यक्रम चालू केल्याचे लक्षात आले.
आज सगळी अचानक उचकाउचकी होण्याचे कारण म्हणजे अमेरीकेचे (गॅलप पोल प्रमाणे) ४५% लोकमान्य असलेले लाडके नेते श्री. बराक ओबामा यांचे तेथले वक्तव्य. त्यात केलेला भारताचा धर्मासंदर्भातला उल्लेख आणि त्या संदर्भात आत्ता जे काही होत आहे ते पाहून ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठ्ठा हातभार लावला त्या गांधीजींना आज कित्ती त्रास झाला असता असे म्हणणे. ह्यामुळे अपेक्षित पणे भारतात आणि भारतीयांंमधे गदारोळ उठला आहे. आत्ता भारतात जाऊन केवळ हैद्राबाद हाऊस मधे या महोदयांसाठी देशातर्फे इतके खाणे केले गेले होते. आणि मग "ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी" असेच झाले की राव! - असे अनेकांचे मत आहे. तर इतर अनेकांचे मत झाले - बरे झाले नमोंची जिरली! :D मी त्यातला नाही, हे आधीच सांगतो. ;)
"Obama smacks down India for religious intolerance, says Gandhi would have been shocked" असे भारतीय वृत्तपत्रातले मथळे वाचून तर नक्कीच या महाशयांनी या न्याहारीच्या वेळेचा उपयोग, भारताबद्दल बोटे मोडायला केला असे वाटले. पण म्हणलं, हीच वृत्तपत्रे/माध्यमे इतरवेळेस देखील (विशेष करून मोदी, संघ वगैरे विषय आले की) संदर्भहीन अर्थात आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बातम्या देतात. मग येथे नक्की काय असेल हे शोधावे असे वाटले. त्यामुळे मग ओबामांच्या घराच्या संस्थळावर गेलो. तेथे त्यांचे संपूर्ण भाषण मिळाले. आता या भाषणातल्या ज्या परीच्छेदात भारत, गांधीजी, यांचा उल्लेख आला आहे तो खाली चोप्य पस्ते केला आहे. तो कृपया वाचावात: (काही भाग मुद्दाम हायलाईट करत आहे)
Humanity has been grappling with these questions throughout human history. And lest we get on our high horse and think this is unique to some other place, remember that during the Crusades and the Inquisition, people committed terrible deeds in the name of Christ. In our home country, slavery and Jim Crow all too often was justified in the name of Christ. Michelle and I returned from India -- an incredible, beautiful country, full of magnificent diversity -- but a place where, in past years, religious faiths of all types have, on occasion, been targeted by other peoples of faith, simply due to their heritage and their beliefs -- acts of intolerance that would have shocked Gandhiji, the person who helped to liberate that nation.संपूर्ण भाषण वाचलेत तर विशिष्ठ धर्मियांना म्हणून केवळ मुस्लीम आणि ख्रिश्चनांनावरच प्रत्यक्ष टिका आहे. त्यावरून (ख्रिश्चनांवरील उल्लेखावरून) या भाषणावर अमेरीकेत अधिक टिका होत आहे. ज्यू, हिंदू आणि बुद्ध यांच्यावर या भाषणात प्रत्यक्ष काहीच म्हणलेले नाही. आता हे काही ओबामांची बाजू घेण्यासाठी म्हणत नाही.... तरी देखील संपूर्ण वाचल्यावर असे वाटते की त्यांनी राजकारणी म्हणून सर्वांना समाधानी ठेवायला म्हणून ख्रिश्चनांनंतर अप्रत्यक्षपणे हिंदूंना नाव ठेवली असे आपण फारतर म्हणू शकतो. मोदी आणि संघविरोधक भारतीय माध्यमे उगाच त्याचा वापर करत आहेत, झाल.. कारण शेवटी भारतभेट म्हणजे काही सर्वधर्मसमभाव कसा चालला आहे याचे इन्स्पेक्शन नव्हते. तर सर्व अमेरीकन धंद्यांना भाव मिळेल का ह्याच्या चाचपणीसाठी होती, भारताच्या बाजूने देखील स्वतःचे (राष्ट्रीय) स्वार्थासाठी होती आणि अर्थातच दोन्ही बाजूंनी संबंध हळूहळू अजून वृद्धींगत करत आंतर्राष्ट्रीय राजकारणात संदेश देण्यासाठी देखील होती. तेव्हढेच त्याचे दोन्ही बाजूंनी महत्व होते आणि राहील.
💬 प्रतिसाद
(34)
अ
अर्धवटराव
Fri, 02/06/2015 - 23:27
नवीन
:)
आजकाल हि नवीन फॅशन आलि आहे मिपावर.
मला प्रथम वाटलं होतं कि ओबामा केजरीवालांना समर्थन द्यायला म्हणुन असल्या कांड्या पिकवताहेत कि काय ;) केजरीसाहेबांचा इतका हुच्च आंतरराष्ट्रीय प्रभाव बघुन ऊर भरुन आला होता. पण तुम्ही फुगा फोडला आमच्या भ्रमाचा :(
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 02/07/2015 - 00:37
नवीन
इतके सपष्ट लिहून टाकल्यावर आता कसलं काय. :)
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sat, 02/07/2015 - 02:05
नवीन
धर्मनिरपेक्षतेचे, सहिष्णूतेचे पुन्हा पुन्हा पान्हे फुटणार्या ओबामा साहेबांना भारतभेट अर्धवट टाकून सौदी अरेबियाला जावे लागले. त्या देशाचा ह्या सहिष्णुतेच्या उहापोहात काहीही उल्लेख नाही हे उल्लेखनीय आहे!
भारतातील जातीय हिंसेमुळे गांधीना होणार्या क्लेषाविषयी गहिवरून येणार्या बराकजींना आजच्या सौदी अरेबियातील महिलांची व अन्य धर्मियांची, अल्पसंख्यांकाची स्थिती बघून प्रेषित महंमदसाहेबांना किती क्लेष होत असतील असे म्हणावेसे का वाटले नाही बरे?
मिशेल ओबामाने सौदी अरेबियाला गेल्यावर डोके न झाकण्याचे अक्षम्य पाप केले त्यावर तिथे मोठा गदारोळ झाला. असली कोती मनोवृत्ती बाळगणारे देश हे अमेरिकेचे मोठे मित्र देश म्हणवतात. त्यांना डोस पाजायचे धारिष्ट्य ह्या महासत्तेच्या सर्वश्रेष्ठ नेत्याला का झाले नाही बरे?
मऊ लागते म्हणून कोपराने खणा असे धोरण सर्वशक्तिमान लोकही अवलंबतात हे विशेष म्हटले पाहिजे!
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Sat, 02/07/2015 - 02:15
नवीन
स्वतः अमेरिका मध्यपूर्वेतील जवळपास सर्व देशांत हिंसाचार करत आहे. अंतर्गत अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अन्याय वाढत आहेत. यावेळी ओबामांनी भारतासंबंधी पिंक मारण्याची काहीही गरज नव्हती असे वाटते. भारतानेही लगेच उठून 'आमची संस्कृती सहिष्णू आहे' वगैरे स्पष्टीकरण विशेषतः अमेरिकेला द्यायची गरज नव्हती.
जर वरील लेखानुसार ओबामांना हिंदू आणि भारत अभिप्रेत नव्हते तर जेटली वगैरेंना एवढी प्रतिक्रिया द्यायची काय गरज आहे हे समजले नाही.
- Log in or register to post comments
स
सव्यसाची
Sat, 02/07/2015 - 04:15
नवीन
http://www.ndtv.com/india-news/for-obamas-remarks-on-religious-intolerance-a-jibe-from-government-737491?pfrom=home-lateststories
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 02/07/2015 - 15:16
नवीन
जर वरील लेखानुसार ओबामांना हिंदू आणि भारत अभिप्रेत नव्हते तर जेटली वगैरेंना एवढी प्रतिक्रिया द्यायची काय गरज आहे हे समजले नाही.
वरील लेखात म्हणल्याप्रमाणे आणि वास्तवात देखील ओबामांच्या वक्तव्यात भारत आहे हिंदू नाही. जेटलींनी प्रतिक्रीया मला वाटते (नक्की माहीत नाही) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला दिली आहे. आपणहून ट्वीट केलेली नाही. उद्या (किंचित अतिशयोक्ती) पुतिनना शिंका का आल्या म्हणून कोणी विचारले तर "त्यांना सर्दी झाली असावी" इतकी प्रतिक्रीया देण्या इतकेच त्याचे महत्व आहे.
- Log in or register to post comments
H
hitesh
Sat, 02/07/2015 - 07:46
नवीन
ओबामा हा मोदींचा भाट म्हणुन आला नव्हता. ( ते काम करायला मिपा व माबो वर खंडीभर लोक आहेत की.)
मग इनाकारण का धागा काढला ?
- Log in or register to post comments
H
hitesh
Sat, 02/07/2015 - 08:03
नवीन
कार्यक्रमाला कुणाला बोलावले म्हणजे तो आपला भाटच झाला या मग्रुरीत ' हे ' लोक का असतात समजत नाही.
ठाकरेंच्या काळातही पुलं लोकशाही / ठोकशाही वक्तव्यावरुन अडचणीत आले होते... आँ ! आम्ही यान्ना बोलावलं , पुरस्कार दिला , आता यानी आमच्यावर स्तुतीसुमनेच उधळायची ना ? की टीका करायची ? आँ !!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Sat, 02/07/2015 - 08:06
नवीन
टीका भारतावर झाली आहे असे माझे आपले मत आहे. ओबामा अमेरिकन असल्याने तो भारताचा भाट असणे अपेक्षित नाहिच.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Sat, 02/07/2015 - 08:05
नवीन
पण मी काय म्हणतो, तो ओबामा तिकडे काय बोलतो त्यामुळे मला शष्प फरक पडत नाही. इथे भारतात काय जळते त्यामुळे पडतो.
बाकी गांधींना काही शॉक बसला नसता. ४७ साली फाळणी काय कबुतरं उडवुन झाली होती? तेव्हा काय गांधी नव्हते भारतात? (इथे भारत + पाकिस्तान = भारत असे म्हटले आहे हे सूज्ञास वेगळे सांगणे न लगे)
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 02/07/2015 - 09:29
नवीन
चेपू वर ह्याच आशयाची प्रतिक्रिया मी दिली होती.
गांधी ह्यांच्या हयातीत आंबेडकर ह्यांना इंग्रजांना देशाबाहेर घालविण्यापेक्षा स्वतःच्या लोकांना उच्च वर्णी यांच्या जाचातून बाहेर काढणे गरजेचे वाटते ह्यातच सारे काही आले. दंगलीत झालेला हिंसाचार जर पाकिस्तान निर्मितीस मान्यता दिली नसती तर गांधी हे ह्या हिंसेच्या विरुद्ध आहेत हे माहिती असून देशभरात नवीन नवीन भागात दंगली उसळत हो त्या
ह्या दंगली थांबविण्यासाठी एकच मार्ग पाकिस्तानची निर्मिती न करता म्हणजे हिंसेला त्याच भाषेत उत्तर देणे होते.
शीख हिंदूंच्या पुढे मुसलमान अल्पसंख्याक होते. ते दिल्ली मार्गे लाहोर व पुढे पाकिस्तानात गेले असते चित्र वेगळे असते.
बाकी ओबामा चे सांगायचे तर धंदा करायचा तर धंदा करा
फुकटचे सल्ले देणे थांबवा
अवांतर
अफगाणी तालिबान ची बोलणी कुठपर्यंत आली आहेत , आत ते गुड तालिबान झालेत का
अती अवांतर
ह्या चीन दौर्यात भारत चीन सोबत ऐतिहासिक करार करून सीमा प्रश्नांवर निकाल काढेल असा माझा होरा आहे.
ब्रिक राष्ट्रांचे वाढते महत्त्व त्यांना खुपत आहे.
- Log in or register to post comments
'
'पिंक' पॅंथर्न
Sat, 02/07/2015 - 08:10
नवीन
खरं म्हणजे आज अमेरिकेला स्वतःची 'सुपर पॉवर' ही बिरुदावली टिकवण्यासाठी धडपडावं लागतायं. जगावरची त्यांची पकड हळु हळु सैल होत चालली आहे आणि कदाचित त्यामुळेच कि काय पुर्वीपासुनच अनेक बाबतीत असलेली अमेरीकेची दुप्पटी धोरणं स्पष्टपणे दिसुन येत आहेत.
सौदी अरेबियात जाऊन तेथिल सामाजिक परिस्थितीवर किंचीतही न बोलणे हा त्याचाच एक भाग आहे.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 08:25
नवीन
वाईट याच वाटत कि ओबामा च्या विधानाचा निषेध करण्याच धैर्य पण या नेभळट सरकार कडे नाही . हे म्हणे पाकिस्तान आणि चीन ची खोड मोडणार . बोलाची कढी आणि बोलाचाच भात
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 02/07/2015 - 08:35
नवीन
सरकारला धैर्य देशातले लोक कसे वागतात त्यावरूनच येते...साले इथे सरकारी कार्यालयातल्या लोकांना कामे करायला लाऊ शकत नाहीत आणि म्हणे आम्रिकेला दम भरणार...आत्तापर्यंत दम असणारे फार थोडे नेते होउन गेले भारतात....सरदार पटेल आणि इंदिरा गांधी बास्स्स
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 08:41
नवीन
अहो अस काय करता ते कोन्ग्रेस्स चे होते *lol*
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sat, 02/07/2015 - 12:18
नवीन
त्यातल्या त्यात इंदिरा गांधी जास्त दमाच्या होत्या अस वाटतयं.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 02/07/2015 - 15:55
नवीन
याला पास कारण मी दोघांनाही बघितलेले नाही...पण मिपाचा इतिहास बघता या वाक्याने धागा १००+ करायची शक्यता कित्तेक पटीने वाढली आहे ;)
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 16:01
नवीन
तुम्ही यात आधुनिक लोहपुरूष जे की मोदींचे नावडते अडवाणीजी आणि आधुनिक नमोजी (ज्यांची तुलना भक्तांसाठी कुणाशीच होत नाही ) यांचे नाव न घेतल्याने तुमच्यावर इथल्या अंध भक्तांची इतराजी होऊ शकते . मी आपल सावध करण्याच काम केल *lol*
- Log in or register to post comments
अ
अवतार
Sat, 02/07/2015 - 08:32
नवीन
ओबामा भारतात येण्याच्या वेळीच अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी हल्ले न करण्याची तंबी दिली होती (म्हणजे आम्ही असेपर्यंत गप्प बसा. नंतर वाट्टेल तो धुमाकूळ घाला ).
त्यात भर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थेट भारताच्या प्रजासत्ताक दिनालाच हजेरी लावून गेले. जाहीर भाषणात "नमस्ते" वगैरे म्हणून अणुकरार पदरात पाडून गेले. ह्या सर्व घटनांचा अर्थ अमेरिकेने पाकिस्तानची साथ सोडून उघडपणे भारतातील हिंदुत्ववादी धोरणाचे समर्थन केले असा केला जाऊ नये म्हणूनच पाकिस्तानला चुचकारण्यासाठी ही पुडी सोडली असावी.
- Log in or register to post comments
स
स्पा
Sat, 02/07/2015 - 09:08
नवीन
लय भारी निरीक्षण विकास दा
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 10:48
नवीन
याच विषयावर Newyork Times मध्ये संपादकीय आल आहे . त्यात पण बर्याच कानपिचक्या दिल्या आहेत . बरेच मुद्दे पटण्यासारखे आहेत
http://mobile.nytimes.com/2015/02/07/opinion/modis-dangerous-silence.html?referrer&_r=0
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 02/07/2015 - 15:03
नवीन
आवडो अथवा न आवडोत, पटोत अथवा न पटोत पण ओबामांच्या वक्तव्यास आणि न्यू यॉर्क टाईम्स अथवा एकंदरीतच प्रसिद्धीमाध्यमांमधील वक्तव्यास मोदी परीस्थितीमुळे खालील उत्तर देण्यास शिकले आहेत... (आणि हो तेच उत्तर अमेरीका जेंव्हा सारे जग अमेरीकेवर टिका करते तेंव्हा देते)

- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 15:07
नवीन
हे वाक्य सगळ्याच निर्ढाव्लेल्या आणि गेंड्याची कातडी असणारया नेत्यांना लागू पडत नाही का ? मग ते कलमाडी असोत , राजा असोत , अमित शाह असोत वा मोदी . सिस्टम ला फाट्यावर मारण्याची कला याना चांगली अवगत झाली असते . नाही का ?
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 02/07/2015 - 18:20
नवीन
खरे आहे... तेच एखाद्या उद्योगपतीचे अथवा उद्यमशील (entrepreneur) व्यक्तीचे देखील असते. "लोकं काय म्हणतील" या भितीने जगत नसल्यामुळेच ते तसे वागू शकतात. पण त्यातून ते नक्की दिशा देतात का दशा करतात ह्यावर तो गूण "सत्" अथवा "दु:" ठरतो.
तीच अवस्था सोनीया गांधींची झाली. जो पर्यंत "मी नाही त्यातली" होते तो पर्यंत सगळा वरकरणी आदर्शवादाचा देखावा चालू शकला. पण जेंव्हा सक्रीय राजकारणात प्रवेश केला, तेंव्हा इतर सर्वच राजकारण्याप्रमाणे वागणे गरजेचे भाग पडले. पण त्यांच्या निर्ढावलेल्या वृत्तीने, देशाला सोडा, साधे स्वतःला केवळ एका कुटूंबाची सून झाल्याने वडीलोपार्जित संपत्तीसारख्या मिळालेल्या पक्षाला देखील दिशा देण्याऐवजी, दशा करून दाखवली. असो.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 15:13
नवीन
आणि हो अमेरिकेचे अध्यक्ष पण आहेतच त्या यादीत . तेवढंच भक्ताना समाधान . आपला नेता अमेरिकेच्या अध्यक्ष एकाच 'लेवल ' चे म्हणून *lol*
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 02/07/2015 - 15:27
नवीन
लेखाचा उद्देश बराक ओबामा यांच्या वक्तव्यापेक्षा आपल्याकडील माध्यमे कशी अर्धवट बातम्या देतात हा होता. ओबामा जे काही बोलले ते चूकच होते. पण त्याला अनुल्लेखाने मारणे गरजेच होते आणि (एक जेटली काय म्हणले ते सोडल्यास) सरकारी पातळीवर तसेच अनुल्लेखाने मारले गेले आहे असे वाटते.
असे होण्याचे अजून एक कारण वाटते: ओबामा भारतभेटीच्या वेळेस पत्रकार परीषदेत सर्व गोडगोड बोलले गेले. अणूव्यवहार पण झाला म्हणून सांगितले गेले. पण अजून तो बोलाची कढीच आहे. कुठेतरी वाटते की भारत सरकार अमेरीकेच्या सर्व अटी मान्य करत नसावे. अर्थात हे पडद्यामागे चालू आहे. पण स्टेट ऑफ दी युनियन भाषण पेश्शल लवकर आटपून, कुठेतरी इतका खर्च करून बायको सकट भारतभेट केली पण तोंडघशी पडलो अशी ओबामांची भावना झाली असावी. त्याला कुठेतरी वाट करून देणे गरजेचे होते. आता प्रार्थना करताना अशा अडीअडचणी अप्रत्यक्षपणे सांगत जर वाट करून दिली तर योग्य असे वाटले असेल... स्पष्ट राजकारणपण नाही पण बोलायचे ते बोलता पण आले. असे काहीसे.
थोडक्यात या सगळ्याचा संबंध हा केवळ धंद्याशी आहे. धर्माशी नाही. नाहीतर माणूसकीचा कळवळा असलेल्या शांततेचे नोबेल पुरस्कार विजेत्या ओबामांनी वाट्टेल तशी द्रोण टाकून अतिरेक्यांबरोबरच त्याहूनही अधिक सामान्य मुस्लीमांना आणि मुस्लीम बायका-पोरांना मारण्याचे पाप केले नसते.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 15:39
नवीन
थोडक्यात या सगळ्याचा संबंध हा केवळ धंद्याशी आहे. धर्माशी नाही.
तेच सांगत आहे हो . मोदी , ओबामा , राजा , कलमाडी आपल्या आपल्या लेवल ला हीच गोष्ट follow करतात . भक्तांना हे कळत नाही . आपला लीडर कसा दोन dont give a damn असा आव आणतात
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 02/07/2015 - 18:32
नवीन
तेच सांगत आहे हो
चर्चाप्रस्तावात/लेखातच आम्ही सांगितलेले परत तुम्ही लिहीणार आणि शोध लावला म्हणणार का? ;)
आपला लीडर कसा दोन dont give a damn असा आव आणतात
वाव आणण्याचा प्रश्न नाही... ते वास्तव आहे.
- Log in or register to post comments
स
साती
Sat, 02/07/2015 - 15:52
नवीन
ओबामाचे केस इतके काही लांब नाहीत आणि टिपीकल अफ्रिकन वंशाच्या लोकांप्रमाणे दाट कुरळेही नाहीत.
तरिही ओबामाला उवाच झाल्या?
कमाल आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 02/07/2015 - 18:25
नवीन
केस स्टडी जोरात केलेला आहे. :)
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Sat, 02/07/2015 - 18:41
नवीन
या चर्चेत इतर कोणी न मांडलेला मुद्दा इथे मांडत आहे.
ओबामांनी उल्लेख केलेल्या इतर घटना (क्रुसेड वगैरे) अनेक शतकांपूर्वी होऊन गेल्या.इतकेच काय तर अमेरिकेतल्या गुलामगिरीविषयी त्यांनी म्हटले पण ती गुलामगिरी सुध्दा १५० वर्षांपूर्वीपर्यंत होती.पण भारताचा उल्लेख करताना मात्र ’गेल्या काही वर्षात’ असा उल्लेख केला. याचे कारण काय असावे? म्हणजे हे चुकून झाले की भारताला उद्देशून मुद्दामून केले असावे?
आणि हो. ओबामांनी विनाकारण भारताच्या अंतर्गत कारभाराविषयी भाष्य केल्यामुळे भारताचा उपमर्द झाला आहे.तेव्हा नरेंद्र मोदींची कशी जिरली असे कोणाला वाटत असल्यास तसे वाटणे अत्यंत गैर आहे हे नमूद करू इच्छितो.आमचे आपापसात कितीही मतभेद असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर ’वयं पंचाधिकं शतम’ या बाण्याने नरेंद्र मोदी (आपल्याला कितीही आवडत नसतील तरी) हे भारताचे पंतप्रधान आहेत याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 02/07/2015 - 19:17
नवीन
ओबामांनी उल्लेख केलेल्या इतर घटना (क्रुसेड वगैरे) अनेक शतकांपूर्वी होऊन गेल्या.इतकेच काय तर अमेरिकेतल्या गुलामगिरीविषयी त्यांनी म्हटले पण ती गुलामगिरी सुध्दा १५० वर्षांपूर्वीपर्यंत होती.
सहमत. (केवळ माहीती करता :) त्यातील जिम क्रो चा जो उल्लेख आहे ते जिम क्रो लॉज १९६५ पर्यंत अस्तित्त्वात होते.
पण भारताचा उल्लेख करताना मात्र ’गेल्या काही वर्षात’ असा उल्लेख केला.म्हणजे हे चुकून झाले की भारताला उद्देशून मुद्दामून केले असावे?
चांगले निरीक्षण. ’गेल्या काही वर्षात’ म्हणजे मोदी/भाजपा सरकार येण्याआधी पासून म्हणायचे असेल. ;) जोक अपार्ट, ते "हिंदू आक्रमकतेच्या संदर्भात आहे असे गृहीत धरले", तर एक शक्यता अशी देखील आहे की विशेष करून ख्रिश्चन धर्मसंस्थांकडून ओबामावर अप्रत्यक्ष / प्रत्यक्ष दडपण आले असेल. पोप आता लवकरच अमेरीका भेटीला येणार आहेत, त्यांचे अमेरीकन काँग्रेसमधे भाषण आहे तसेच व्हाईट हाऊस मधे देखील विशेष निमंत्रण आहे. ओबामा स्वतःस फार ख्रिश्चन समजतात असे वाटत नाही... त्यांचे पुढचे वाक्य पहा:
थोडक्यात ओबामाचे ख्रिस्तीकरण आणि बॉबी जिंदालचे ख्रिस्तीकरण यात तत्वतः फरक नसावा. तत्व - राजकीय महत्वाकांक्षा... त्यामुळे भारतासंदर्भात कानपिचक्या तर करायच्या आहेत, पण पंगा पण घेयचा नाही आहे तेच उलटीकडे ख्रिश्चनांच्या संदर्भात, अशी सगळी तारेवरची कसरत. अर्थात हे मला वाटते.
आमचे आपापसात कितीही मतभेद असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर ’वयं पंचाधिकं शतम’ या बाण्याने नरेंद्र मोदी (आपल्याला कितीही आवडत नसतील तरी) हे भारताचे पंतप्रधान आहेत याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
सहमत. या संदर्भात जेंव्हा २००५ मधे मोदींना व्हिसा नाकारला गेला होता तेंव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वक्तव्य बघण्यासारखे आहे:
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/08/2015 - 10:32
नवीन
>>> but a place where, in past years, religious faiths of all types have, on occasion, been targeted by other peoples of faith, simply due to their heritage and their beliefs -- acts of intolerance that would have shocked Gandhiji, the person who helped to liberate that nation.
वरील वाक्यातील religious faiths of all types हे शब्द पुरेसे बोलके आहेत. परंतु काही जणांनी हे ऐकल्याऐकल्या लगेचच "मोदींना टोला हाणला" असा प्रचार सुरूसुद्धा केला.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 02/09/2015 - 01:04
नवीन
अमेरिका आता काही जगाची राजा राहिलेली नाही. उगाच ओबामांच्या विधानाचे काय मनावर घ्यायचे. माझ्या लहानपणी पेक्षा आज हिदू मुस्लीम दंगे कमीच होतात. काही ठिकाणी स्थनिक कारणामुळे काही घडले तर त्यास एखादा पूर्ण देश जबाब्दार आहे असे मानण्याचे कारण अजिबात नाही.
- Log in or register to post comments