क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५
क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची ११ वी विश्वचषक स्पर्धा शनिवार १४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीला न्यूझीलँड वि. श्रीलंका हा स्पर्धेतील सर्वात पहिला सामना खेळला जाईल. १८-२१ मार्च या चार दिवशी ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत, उपांत्य फेरीचे २ सामने २१ मार्च व २४ मार्च रोजी आहेत व अंतिम सामना रविवार २९ मार्च या दिवशी खेळला जाईल.
ही स्पर्धा न्यूझीलँड व ऑस्ट्रेलिया हे दोन देश संयुक्तपणे आयोजित करीत आहेत. यापूर्वी १९९२ मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा याच देशांनी संयुक्तपणे आयोजित केली होती.
पहिल्या १० स्पर्धांची संक्षिप्त माहिती अशी आहे.
(१) वर्ष - १९७५, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - ऑस्ट्रेलिया
(२) वर्ष - १९७९, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - इंग्लंड
(३) वर्ष - १९८३, यजमान - इंग्लंड, विजेता - भारत, उपविजेता - वेस्ट इंडीज
(४) वर्ष - १९८७, यजमान - भारत व पाकिस्तान, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - इंग्लंड
(५) वर्ष - १९९२, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - पाकिस्तान, उपविजेता - इंग्लंड
(६) वर्ष - १९९६, यजमान - भारत, पाकिस्तान व श्रीलंका, विजेता - श्रीलंका, उपविजेता - ऑस्ट्रेलिया
(७) वर्ष - १९९९, यजमान - इंग्लंड, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - पाकिस्तान
(८) वर्ष - २००३, यजमान - द. आफ्रिका, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - भारत
(९) वर्ष - २००७, यजमान - वेस्ट इंडीज, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - श्रीलंका
(१०) वर्ष - २०११, यजमान - भारत, बांगलादेश व श्रीलंका, विजेता - भारत, उपविजेता - श्रीलंका
(११) वर्ष - २०१५, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - ?, उपविजेता - ?
________________________________________________________________________________
१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ
बसलेले (डावीकडून) - दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, कपिलदेव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावसकर, मदनलाल
उभे (डावीकडून) - पी आर मानसिंग (संघ व्यवस्थापक), यशपाल शर्मा, कृष्णम्माचारी श्रीकांत, बलविंदरसिंग संधू, रवी शास्त्री, संदीप पाटील, रॉजर बिन्नी, कीर्ति आझाद, सुनील वॉल्सन
________________________________________________________________________________
२०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ
(डावीकडून) - झहीर खान, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुनाफ पटेल, गौतम गंभीर, श्रीशांत, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, सुरेश रैना, पियूष चावला, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, आशिष नेहरा, रविचंद्रन अश्विन, युसुफ पठाण
________________________________________________________________________________
पूर्वीच्या स्पर्धांवर नजर टाकली तर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसतात.
- ऑस्ट्रेलिया सर्वाधिक म्हणजे ४ वेळा विजेते ठरले आहेत. त्याखालोखाल भारत व वेस्ट इंडीजने ही स्पर्धा प्रत्येकी २ वेळा जिंकली आहे.
- ऑस्ट्रेलिया २ वेळा उपविजेता सुद्धा आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया १० पैकी ६ वेळा अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत.
- इंग्लंड ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचून सुद्धा त्यांना विजेतेपद मिळविता आलेले नाही. श्रीलंका व भारत देखील ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचले होते. श्रीलंकेने एकदा तर भारताने दोन वेळा अंतिम फेरीत विजय मिळविला आहे.
- पहिल्या ३ स्पर्धात वेस्ट इंडीजचा जबरदस्त दबदबा होता. तीनही स्पर्धात ते अंतिम फेरीत पोहोचले व २ वेळा विजेते झाले. त्यानंतर त्यांची कामगिरी एकदम ढेपाळली व नंतरच्या ७ स्पर्धात ते एकदाच १९९६ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २०८ धावांचा पाठलाग करताना जेमतेम ५ धावांनी त्यांचा पराभव झाला होता.
- न्यूझीलँड १० पैकी ६ स्पर्धात उपांत्य फेरीत पोहोचले होते. परंतु उपांत्य फेरीचा अडथळा त्यांना पार करता आलेला नाही.
- १९९२ पासून स्पर्धेत सामील झालेल्या द. आफ्रिकेने खेळलेल्या ६ पैकी ३ स्पर्धात उपांत्य फेरी गाठली. परंतु त्यांना देखील उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. महत्त्वाच्या सामन्यात मोक्याच्या वेळी नेहमीच कच खाल्ल्यामुळे त्यांचा संघ चोकर्स म्हणून ओळखला जातो.
- पाकिस्तानचा जावेद मियांदाद (१९७५-१९९६) व भारताचा सचिन तेंडुलकर (१९९२-२०११) हे दोघे प्रत्येकी ६ स्पर्धा खेळलेले आहेत. वेस्ट इंडीजचा शिवनरीने चंद्रपॉल, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन व केनयाचा थॉमस ओडोयो हे प्रत्येकी ५ स्पर्धा खेळलेले आहेत.
- कोणत्याही स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या करण्याचा मान कॅनडाकडे आहे. कॅनडाचा संघ दोन वेळा (एकदा श्रीलंकेविरूद्ध व १९७९ मध्ये इंग्लंडविरूद्ध) ४५ धावसंख्येवर बाद झाला होता. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या भारताने केलेली आहे (२००७ मध्ये बर्म्युडाविरूद्ध ४१३ धावा).
- भारत व पाकिस्तान एकमेकांविरूद्ध एकूण ५ सामने खेळलेले आहेत. सर्व सामने भारताने जिंकले आहेत. ४ सामन्यात प्रथम फलंदाजी करून व एका सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करून भारताने विजय मिळविला होता. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकर खेळला होता व त्यापैकी २ सामन्यात त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला होता. या स्पर्धेतसुद्धा भारत वि. पाकिस्तान ही लढत होणार आहे व प्रथमच भारत सचिनशिवाय सामन्यात खेळेल.
- मागील ५ स्पर्धांमध्ये अंतिम फेरीतील किमान १ संघ हा आशियातील संघ आहे.
- २००७ मध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने द. आफ्रिकेविरूद्ध लागोपाठ ४ चेंडूवर ४ बळी मिळविले होते.
_________________________________________________________________________________
२०१५ मधील विश्वचषक स्पर्धा एकूण १४ संघात खेळली जाईल. संघांची विभागणी २ गटात करण्यात आली आहे.
'अ' गट - न्यूझीलँड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्कॉटलँड, अफगाणिस्तान, बांगलादेश
'ब' गट - द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, झिंबाब्वे, आयर्लँड, संयुक्त अरब अमिराती
_________________________________________________________________________________
स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.
बसलेले (डावीकडून) - दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, कपिलदेव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावसकर, मदनलाल
उभे (डावीकडून) - पी आर मानसिंग (संघ व्यवस्थापक), यशपाल शर्मा, कृष्णम्माचारी श्रीकांत, बलविंदरसिंग संधू, रवी शास्त्री, संदीप पाटील, रॉजर बिन्नी, कीर्ति आझाद, सुनील वॉल्सन
________________________________________________________________________________
२०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ
(डावीकडून) - झहीर खान, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुनाफ पटेल, गौतम गंभीर, श्रीशांत, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, सुरेश रैना, पियूष चावला, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, आशिष नेहरा, रविचंद्रन अश्विन, युसुफ पठाण
________________________________________________________________________________
पूर्वीच्या स्पर्धांवर नजर टाकली तर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसतात.
- ऑस्ट्रेलिया सर्वाधिक म्हणजे ४ वेळा विजेते ठरले आहेत. त्याखालोखाल भारत व वेस्ट इंडीजने ही स्पर्धा प्रत्येकी २ वेळा जिंकली आहे.
- ऑस्ट्रेलिया २ वेळा उपविजेता सुद्धा आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया १० पैकी ६ वेळा अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत.
- इंग्लंड ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचून सुद्धा त्यांना विजेतेपद मिळविता आलेले नाही. श्रीलंका व भारत देखील ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचले होते. श्रीलंकेने एकदा तर भारताने दोन वेळा अंतिम फेरीत विजय मिळविला आहे.
- पहिल्या ३ स्पर्धात वेस्ट इंडीजचा जबरदस्त दबदबा होता. तीनही स्पर्धात ते अंतिम फेरीत पोहोचले व २ वेळा विजेते झाले. त्यानंतर त्यांची कामगिरी एकदम ढेपाळली व नंतरच्या ७ स्पर्धात ते एकदाच १९९६ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २०८ धावांचा पाठलाग करताना जेमतेम ५ धावांनी त्यांचा पराभव झाला होता.
- न्यूझीलँड १० पैकी ६ स्पर्धात उपांत्य फेरीत पोहोचले होते. परंतु उपांत्य फेरीचा अडथळा त्यांना पार करता आलेला नाही.
- १९९२ पासून स्पर्धेत सामील झालेल्या द. आफ्रिकेने खेळलेल्या ६ पैकी ३ स्पर्धात उपांत्य फेरी गाठली. परंतु त्यांना देखील उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. महत्त्वाच्या सामन्यात मोक्याच्या वेळी नेहमीच कच खाल्ल्यामुळे त्यांचा संघ चोकर्स म्हणून ओळखला जातो.
- पाकिस्तानचा जावेद मियांदाद (१९७५-१९९६) व भारताचा सचिन तेंडुलकर (१९९२-२०११) हे दोघे प्रत्येकी ६ स्पर्धा खेळलेले आहेत. वेस्ट इंडीजचा शिवनरीने चंद्रपॉल, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन व केनयाचा थॉमस ओडोयो हे प्रत्येकी ५ स्पर्धा खेळलेले आहेत.
- कोणत्याही स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या करण्याचा मान कॅनडाकडे आहे. कॅनडाचा संघ दोन वेळा (एकदा श्रीलंकेविरूद्ध व १९७९ मध्ये इंग्लंडविरूद्ध) ४५ धावसंख्येवर बाद झाला होता. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या भारताने केलेली आहे (२००७ मध्ये बर्म्युडाविरूद्ध ४१३ धावा).
- भारत व पाकिस्तान एकमेकांविरूद्ध एकूण ५ सामने खेळलेले आहेत. सर्व सामने भारताने जिंकले आहेत. ४ सामन्यात प्रथम फलंदाजी करून व एका सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करून भारताने विजय मिळविला होता. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकर खेळला होता व त्यापैकी २ सामन्यात त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला होता. या स्पर्धेतसुद्धा भारत वि. पाकिस्तान ही लढत होणार आहे व प्रथमच भारत सचिनशिवाय सामन्यात खेळेल.
- मागील ५ स्पर्धांमध्ये अंतिम फेरीतील किमान १ संघ हा आशियातील संघ आहे.
- २००७ मध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने द. आफ्रिकेविरूद्ध लागोपाठ ४ चेंडूवर ४ बळी मिळविले होते.
_________________________________________________________________________________
२०१५ मधील विश्वचषक स्पर्धा एकूण १४ संघात खेळली जाईल. संघांची विभागणी २ गटात करण्यात आली आहे.
'अ' गट - न्यूझीलँड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्कॉटलँड, अफगाणिस्तान, बांगलादेश
'ब' गट - द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, झिंबाब्वे, आयर्लँड, संयुक्त अरब अमिराती
_________________________________________________________________________________
स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.
प्राथमिक फेरीतील सामने
(१) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. श्रीलंका, स्थळ - ख्राईस्टचर्च (२) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, स्थळ - मेलबोर्न (३) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. झिंबाब्वे, स्थळ - हॅमिल्टन (४) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. पाकिस्तान, स्थळ - अॅडलेड (५) सोमवार १६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), आयर्लँड वि. वेस्ट इंडिज, स्थळ - नेल्सन (६) मंगळवार १७ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (७) बुधवार १८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. बांगलादेश, स्थळ - कॅनबेरा (८) गुरूवार १९ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), यूएई वि. झिंबाब्वे, स्थळ - नेल्सन (९) शुक्रवार २० फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. इंग्लंड, स्थळ - वेलिंग्टन (१०) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज, स्थळ - ख्राईस्टचर्च (११) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, स्थळ - ब्रिस्बेन (१२) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. श्रीलंका, स्थळ - ड्यूनेडीन (१३) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. द. आफ्रिका, स्थळ - मेलबोर्न (१४) सोमवार २३ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. स्कॉटलँड, स्थळ - ख्राईस्टचर्च (१५) मंगळवार २४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), वेस्ट इंडीज वि. झिंबाब्वे, स्थळ - कॅनबेरा (१६) बुधवार २५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. यूएई, स्थळ - ब्रिस्बेन (१७) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (१८) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), श्रीलंका वि. बांगलादेश, स्थळ - मेलबोर्न (१९) शुक्रवार २७ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. वेस्ट इंडीज, स्थळ - सिडने (२०) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. ऑस्ट्रेलिया, स्थळ - ऑकलँड (२१) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. यूएई, स्थळ - पर्थ (२२) रविवार ०१ मार्च, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. श्रीलंका, स्थळ - वेलिंग्टन (२३) रविवार ०१ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), पाकिस्तान वि. झिंबाब्वे, स्थळ - ब्रिस्बेन (२४) मंगळवार ०३ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. आयर्लँड, स्थळ - कॅनबेरा (२५) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. यूएई, स्थळ - नेपिअर (२६) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, स्थळ - पर्थ (२७) गूरूवार ०५ मार्च, वेळ - सकाळी ३:३० (भाप्रवे), बांगलादेश वि. स्कॉटलँड, स्थळ - नेल्सन (२८) शुक्रवार ०६ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. वेस्ट इंडीज, स्थळ - पर्थ (२९) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. द. आफ्रिका, स्थळ - ऑकलँड (३०) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. झिंबाब्वे, स्थळ - होबार्ट (३१) रविवार ०८ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. अफगाणिस्तान, स्थळ - नेपिअर (३२) रविवार ०८ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, स्थळ - सिडने (३३) सोमवार ०९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), इंग्लंड वि. बांगलादेश, स्थळ - अॅडलेड (३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन (३५) बुधवार ११ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्कॉटलँड वि. श्रीलंका, स्थळ - होबार्ट (३६) गूरूवार १२ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. यूएई, स्थळ - वेलिंग्टन (३७) शुक्रवार १३ मार्च, वेळ - सकाळी ०६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. बांगलादेश, स्थळ - हॅमिल्टन (३८) शुक्रवार १३ मार्च, वेळ - पहाटे ९:३० (भाप्रवे), अफगानिस्तान वि. इंग्लंड, स्थळ - सिडने (३९) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), भारत वि. झिंबाब्वे, स्थळ - ऑकलँड (४०) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलँड, स्थळ - होबार्ट (४१) रविवार १५ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), यूएई वि. वेस्ट इंडीज, स्थळ - नेपिअर (४२) रविवार १५ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. पाकिस्तान, स्थळ - ओव्हल _______________________________________________________________________________उपांत्यपूर्व फेरीतील सामने
(१) बुधवार १८ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना ('अ' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ) , स्थळ - सिडने (२) गुरूवार १९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना ('अ' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - मेलबोर्न (३) शुक्रवार २० मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा सामना ('अ' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - अॅडलेड (४) शनिवार २१ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील चौथा सामना ('अ' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ) , स्थळ - वेलिंग्टन ________________________________________________________________________________उपांत्य फेरीतील सामने
(१) मंगळवार २४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील पहिला सामना, स्थळ - ऑकलँड (२) गुरूवार २६ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील दुसरा सामना, स्थळ - सिडने ________________________________________________________________________________अंतिम सामना
रविवार २९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्थळ - मेलबोर्न ________________________________________________________________________________ २०११ व २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेतील नियमातील फरक खालीलप्रमाणे - (१) २०११ ची स्पर्धा - २०११ मध्ये सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असायचा. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. नंतर षटक क्रमांक ११ ते ५० या दरम्यान ५ षटकांचे २ पॉवरप्ले असायचे व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ५ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. २०१५ ची स्पर्धा - २०१५ च्या स्पर्धेत सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असेल. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. नंतर षटक क्रमांक ११ ते ४० या दरम्यान ५ षटकांचा एकच पॉवरप्ले असेल व तो फलंदाजी करणार्या संघाला आपल्या सोयीने घेता येईल. ३६ व्या षटकाच्या आधी पॉवरप्ले घेतलाच नाही तर षटक क्रमांक ३६-४० ही पॉवरप्लेची षटके असतील व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३५ षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक असल्याने फलंदाज वर्तुळाच्या बाहेर उंच फटके मारण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अर्धवेळ गोलंदाज तसेच फिरकी गोलंदाज कमी वापरले जातील. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या तशाही फिरकी गोलंदाजांना फारशी साथ देत नाहीत. त्यामुळे फिरकी गोलंदाज एकंदरीतच कमी वापरले जातील. (२) २०११ ची स्पर्धा - एकच पांढरा चेंडू ५० षटके वापरला जात असे. जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी व फिरकी गोलंदाजांना चेंडू जुना झाल्यावर फायदा मिळे. जर खराब व्हायला लागला किंवा खूप ओला झाला तर ३४ षटकानंतर तितकाच झिजलेला वेगळा चेंडू वापरला जात असे. २०१५ ची स्पर्धा - - विकेटच्या दोन्ही बाजूने २ नवीन पांढरे चेंडू वापरले जातील. ५० व्या षटकापर्यंत कोणताही चेंडू जास्तीत जास्त २४-२५ षटके वापरला गेला असेल. जलदगती गोलंदाजांना याचा फायदा मिळेल. फिरकी गोलंदाजांना व जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी फारसा फायदा नाही. ________________________________________________________________________________स्पर्धेतील संघ
(१) भारत महेंद्रसिंग धोनी*, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहीत शर्मा, मोहम्मद शमी भारताने २०११ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. सर्वात धक्क्कादायक बातमी म्हण्जे त्या विजयी संघातील १५ खेळाडूंपैकी फक्त ४ च खेळाडू या संघात आहेत (धोनी, कोहली, रैना, अश्विन). इतर कोणत्याही देशाच्या संघात मागील स्पर्धेतील संघातील इतके कमी खेळाडू आताच्या संघात नसावेत. या चौघांपैकी रैना ९ पैकी फक्त ४ सामने खेळला होता तर अश्विन फक्त २ सामने खेळला होता. कोहली व धोनी सर्व ९ सामने खेळले होते. भारताची फलंदाजी बर्यापैकी दिसत असली तरी गोलंदाज अत्यंत निष्प्रभ आहेत. या संघात स्टुअर्ट बिन्नीची निवड सर्वात धक्कादायक आहे. त्याचे वडील रॉजर बिन्नी निवडसमितीत आहेत हा योगायोग नसावा. स्टुअर्ट बिन्नीऐवजी सध्या रणजी स्पर्धेत असलेला युवराज सिंग संघात हवा होता. परदेशात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या शिखर धवनऐवजी सध्याच्या रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करत असलेला सेहवागला घेता आले असते किंवा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत यशस्वी ठरलेल्या मुरली विजयला घेता आले असते. तसेच रायडूऐवजी रॉबिन उथप्पा हवा होता. रविंद्र जडेजा सध्या जायबंदी आहे. जायबंदी असल्याने त्याला ऑस्ट्रेलियातील कसोटी व तिरंगी स्पर्धेतील ४ पैकी ३ एकदिवसीय सामने खेळता आले नाहीत. जो एकमेव सामना तो खेळला त्यातही तो अपयशी ठरला. यावर्षीच्या रणजी स्पर्धेतील एकही सामना तो खेळलेला नाही. थोडक्यात गेले अनेक महिने तो एकही स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेक महिने सरावाशिवाय असलेल्या या जायबंदी खेळाडूला कशाला घेतले? स्पर्धा सुरू होईपर्यंत तो तंदुरूस्त झाला नाही तर पंचाईत आहे. अश्विन, रोहीत शर्मा हे परदेशात फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. त्यांच्याऐवजी इतर खेळाडूंचा विचार करायला हवा होता. भारत यावेळी उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे. (२) ऑस्ट्रेलिया मायकेल क्लार्क*, जॉर्ज बेली, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॅडीन, जॉश हॅझलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन ऑस्ट्रेलियाचा संघ अत्यंत समतोल आहे. या संघात स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, शेन वॉटसन, मिचेल जॉन्सन, मायकेल क्लार्क, जेम्स फॉकनर अशा अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ हे फलंदाजीत तुफान फॉर्मात आहेत, तर गोलंदाजीत मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क फॉर्मात आहेत. तरीसुद्धा या संघात रायन हॅरिस व नेथन लायन ची उणीव जाणविते. ऑस्ट्रेलिया यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. (३) इंग्लंड ऑईन मॉर्गन*, मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, ईयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, स्टिव्हन फिन, अॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स मॉर्गन, जो रूट, ईयान बेल आणि जॉस बटलर हे चांगले फलंदाज इंग्लंडच्या संघात आहेत. जेम्स अँडरसन, फिन आणि ब्रॉड हे चांगले गोलंदाज देखील आहेत. मोईन अली व रवी बोपारा हे उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहेत. इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे. (४) न्यूझीलँड ब्रँडन मॅकलम्*, कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, ग्रँट ईलियट, मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, मिचेल मॅकलेंघॅन, नेथन मॅकलम्, कायल मिल्स, अॅडम म्लाईन, ल्यूक राँकी, टीम साउदी, रॉस टेलर, डॅनियल व्हिटोरी, केन विल्यमसन किवीज सध्या तुफान फॉर्मात आहेत. ब्रँडन मॅकलम् ने २०१४ मध्ये २ त्रिशतके, १ द्विशतक, एकदा १९५ अशी तुफान वेगवान शतके केली आहेत. केन विल्यमसन देखील जबरदस्त फॉर्मात आहे. कोरी अँडरसन, टॉम लॅथम, ल्यूक राँकी हे देखील भरात आहेत. तुफान फटकेबाज रॉस टेलर हा माझा अत्यंत आवडता खेळाडू. परंतु तो अजून फारसा भरात नाही, परंतु घरच्या मैदानावर तो कधीही फॉर्मात येऊ शकतो. किवींची गोलंदाजी फलंदाजीच्या तुलनेत जरा दुर्बळ वाटते. बोल्ट बर्यापैकी फॉर्मात आहे. परंतु इतर गोलंदाज तितके चांगले वाटत नाहीत. तरीसुद्धा जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलँड यावेळी चमत्कार करून दाखवतील असं वाटतंय. न्यूझीलँड यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात यावेळी प्रथमच न्यूझीलँड अंतिम फेरीत दिसेल असाही माझा अंदाज आहे. (५) पाकिस्तान मिसबाह उल हक*, अहमद शेहझाद, एहसान आदिल, हॅरिस सोहेल, नासिर जमशेद, मोहम्मद इरफान, सर्फराजअहमद, शाहीद आफ्रिदी, सोहेब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल, वहाब रियाझ, यासीर शाह, युनिस खान या संघात बर्याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. कर्णधार मिसबाह हा ४० वर्षांचा असून युनिस खान (३७ वर्षे), मोहम्मद हफीझ (३४ वर्षे), मोहम्मद इरफान (३२ वर्षे), शाहीद आफ्रिदी (३४ वर्षे), सोहेल खान (३० वर्षे) असे अनेक ३०+ वयाचे खेळाडू या संघात आहेत. पाकिस्तान हा अत्यंत बेभरवशाचा संघ आहे. हा संघ एखाद्या दिवशी तुफान कामगिरी करून लगेच दुसर्याच दिवशी अत्यंत खराब कामगिरी करून दाखवू शकतो. अत्यंत गुणी खेळाडू असूनही सातत्याचा अभाव व खेळाडूंना बेटिंग आणि मॅचफिक्सिंगचे लागलेले ग्रहण यामुळे या संघाबद्दल कोणताच अंदाज करता येत नाही. दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच या संघाकडे देखील जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत. शाहीद आफ्रिदीसारखा जबरदस्त फटकेबाज असलेला अष्टपैलू या संघात आहे. परंतु अत्यंत बेभरवशाची फलंदाजी असल्याने पाकिस्तान कधीही अपेक्षित कामगिरी करीत नाही. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा पाकिस्तानने नशीबाची जबरदस्त साथ मिळाल्याने जिंकली. त्या स्पर्धेत प्रत्येक संघाला ८ सामने खेळायचे होते. पहिल्या ५ सामन्यांपैकी पाकिस्तान ४ सामन्यात पराभूत होता. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची अवस्था सर्वबाद ८७ अशी दयनीय होती. पाकिस्तानच्या सुदैवाने मध्यंतरापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने इंग्लंडला फलंदाजी करताच आली नाही व सामना अनिर्णित घोषित होऊन दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला होता. पाकिस्तानने नंतर उर्वरीत तीनही सामने जिंकले. परंतु उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंडविरूद्ध नशीबाने मिळालेल्या १ गुणाचा फायदा झाला होता. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान ५ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने जिंकले आहेत. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरूद्ध १५ फेब्रुवारीला आहे व यावेळी सचिन नाही. या सामन्याची तिकिटे ऑनलाईन विक्री सुरू झाल्यावर काही मिनिटातच संपलेली आहेत. बघूया यावेळी काय होतंय ते. अत्यंत बेभरवशाचा संघ असल्याने यावेळी पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करेल की नाही हे नक्की सांगता येणे अवघड आहे. (६) दक्षिण आफ्रिका एबी डी व्हिलिअर्स*, हशीम आमला, कायल अॅबॉट, फरहान बेहार्डिअन, क्विंटन डी कॉक, जीन पॉल ड्युमिनी, फाफ डू प्लेसि, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, वेन पार्नेल, एरॉन फांगिसो, व्हरनॉन फिलँडर, रिली रॉसॉ, डेल स्टेन अत्यंत समतोल आणि जबरदस्त संघ. याही संघात बर्याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. तब्बल ९ खेळाडू ३०+ वयाचे आहेत. अत्यंत जबरदस्त गोलंदाज व जबरदस्त फलंदाज हे या संघाचे वैशिष्ट्य. एबी डी व्हिलिअर्स, आमला, फाफ डू प्लेसि, रॉसॉ, डेव्हिड मिलर इ. फलंदाज तुफान फॉर्मात आहेत, तर मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन, फिलँडर हे फलंदाजांना धडकी भरविणारे वेगवान गोलंदाजही भरात आहेत. या संघाचे क्षेत्ररक्षण देखील अत्यंत उच्च दर्जाचे आहे. अत्यंत गुणी खेळाडू असूनही महत्त्वाच्या सामन्यात आयत्यावेळी कच खाऊन अनेकवेळा या संघाने सामने गमाविलेले आहेत. अनेकवेळा नशीबाने देखील या संघाला तडाखा दिलेला आहे. विश्वचषक स्पर्धेत १९९२ पासून ६ वेळा सहभागी होऊन त्यात ३ वेळा उपांत्य फेरी गाठूनही या संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलेले आहे. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-द. आफ्रिका ३ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने गमावले आहेत. या सर्व ३ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा दुसरा सामना द. आफ्रिकेविरूद्ध आहे आणि यावेळी सचिन नाही. बघूया यावेळी काय होतंय ते. या स्पर्धेत हा संघ नक्कीच उपांत्य फेरीत प्रवेश करेल. बहुतेक प्रथमच अंतिम फेरीत सुद्धा असेल आणि कदाचित यावेळी प्रथमच विश्वचषकावर आपले नाव कोरेल असा अंदाज आहे. (७) श्रीलंका अँजेलो मॅथ्यूज*, लाहिरू थिरीमाने, दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगाना हेराथ, माहेला जयवर्धने, दिमुथ करूणारत्ने, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, जीवन मेंडीस, थिसारा परेरा, धम्मिका प्रसाद, कुमार संगक्कारा, सचित्र सेनानायके श्रीलंका संघाची कामगिरी लक्षात घेताना १९९२ पूर्वी व १९९२ नंतर (म्हणजे १९९६ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९९२ पर्यंत श्रीलंका हा एक अत्यंत दुर्बल व अतिसामान्य संघ म्हणून ओळखला जात होता. परंतु अचानक नशीबाची साथ मिळून १९९६ ची विश्वचषक स्पर्धा श्रीलंकेने जिंकली आणि त्या संघाने एकदम कात टाकली. तेव्हापासून हा संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. १९९६ पासून झालेल्या ५ विश्वचषक स्पर्धांमध्ये ४ वेळा हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. त्यापैकी ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचला व एकदा अंतिम फेरी जिंकली. आताच्या संघात एकाहून एक जबरदस्त फलंदाज आहेत. कुमार संगक्कारा व दिलशान जबरदस्त फॉर्मात आहेत. यांच्या जोडीला अत्यंत शैलीदार व सभ्य फलंदाज जयवर्धने सुद्धा आहे. जयवर्धने हा माझा अत्यंत आवडता फलंदाज आहे. संघात अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा व कुलसेकरा सारखे अष्टपैलू आहेत. मलिंगासारख्या अत्यंत भेदक यॉर्कर टाकून हमखास बळी घेणारा गोलंदाज आहे. हेराथ सारखा खडूस फिरकी गोलंदाजही आहे. परंतु या संघाची गोलंदाजी खूपच दुर्बल वाटते. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. (८) वेस्ट इंडीज जेसन होल्डर*, मर्लॉन सॅम्युअल्स, सुलीमान बेन, डॅरेन ब्राव्हो, जोनाथन कार्टर, शेल्डन कॉटरेल, ख्रिस गेल, दिनेश रामदीन, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, जेरोमी टेलर वेस्ट इंडीज संघाची कामगिरी लक्षात घेताना १९८३ पूर्वी व १९८३ नंतर (म्हणजे १९८७ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९८३ पर्यंत विंडीज हा एक एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यातील सर्वाधिक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जात होता. १९७५ व १९७९ अशा दोन्ही विश्वचषक स्पर्धा या संघाने जिंकल्या. १९८३ च्या स्पर्धेत देखील हा संघ अंतिम फेरीत आला होता. परंतु अचानक दुर्बल समजल्या जाणार्या भारताने तो सामना जिंकला आणि तेव्हापासूनच विंडीजची सर्व प्रकारच्या सामन्यात घसरण सुरू झाली. १९८७ पासून २०११ पर्यंत फक्त एकदाच १९९६ मध्ये हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. इतर सर्व स्पर्धात हा संघ उपांत्य फेरीपूर्वीच गारद झालेला आहे. आताच्या संघात खरं तर जबरदस्त खेळाडू आहेत. परंतु एक संघ म्हणून त्यांची एकत्रित कामगिरी होताना दिसत नाही. ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, डॅरेन सॅमी हे अत्यंत स्फोटक फलंदाज आहेत. आंद्रे रसेल, सॅम्युअल्स यासारखे तुफानी अष्टपैलू खेळाडू आहेत. डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स हे उपयुक्त फलंदाज आहेत. परंतु गोलंदाजी अत्यंत कमकुवत आहेत. नियामक मंडळाशी झालेल्या मतभेदामुळे ड्वेन ब्राव्हो व किरॉन पोलार्ड या अत्यंत जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान न देण्याचा धक्कादायक निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. त्यात भर म्हणून जादूभरा फिरकी गोलंदाज सुनील नारायण त्याच्या शैलीविषयी शंका व्यक्त केली गेल्यामुळे स्वतःहूनच बाहेर पडला. या ३ खेळाडूंची अनुपस्थिती विंडीजला खूपच महागात जाणार आहे. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची फारशी शक्यता वाटत नाही.लिंबूटिंबू संघ
(९) बांगलादेश मुश्रफ मोर्तझा*, अल-अमीन होसेन, अनामूल हक, अराफत सनी, महंमदुल्ला, मोमिनूल हक, मुशफिकर रहीम, नासिर होसेन, रुबेल होसेन, सब्बीर रहमान, शकीब अल हसन, सौम्य सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इक्बाल, टस्किन अहमद बांगलादेश कडे काही चांगले खेळाडू आहेत. कर्णधार मुश्रफ मोर्तझा, शकीब अल हसन, तमीम इक्बाल, मुशफिकर रहीम, महंमदुल्ला या खेळाडूंवरच या संघाची मदार आहे. तसा हा लिंबूटिंबू संघ आहे, परंतु काहीवेळा या संघाने बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पहिल्याच सामन्यात बांगलादेशाकडून झालेला पराभव व त्यामुळे प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेला भारतीय संघ ही कटू आठवण भारतीय कधीच विसरणार नाहीत. तरीसुद्धा हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१०) आयर्लँड विल्यम पोर्टरफील्ड*, अँडी बॅलबर्नी, पीटर चेस, अॅलन कुसॅक, जॉर्ज डॉकरेल, एड जॉईस, अँडी मॅकब्राईन, जॉन मूनी, केव्हिन ओ'ब्रायन, नील ओ'ब्रायन, मॅक्स सोरेनसेन, पॉल स्टर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन, क्रेग यंग, टीम मर्टाघ आय्रलँडने २००७ व २०११ या दोन्ही स्पर्धात काही बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पाकिस्तान व बांगलादेशाला पराभूत करून झिंबाब्वेबरोबर सामना बरोबरीत सोडवून त्यांनी धक्के दिले होते. २०११ मध्ये इंग्लंडच्या ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना केव्हिन ओ'ब्रायन ने केवळ ५० चेंडूत शतक झळकाविले होते. यांच्याकडे ब्रायन बंधू, पोर्टरफील्ड, कुसॅक, जॉन मूनी इ. चांगले खेळाडू आहेत. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (११) झिंबाब्वे एल्टन चिगुंबुरा*, रेजिस चकाब्वा, टेंडाई चटारा, चामू चिभाभा, क्रेग एरविन, टफाड्झ्वा कामुंगोझी, हॅमिल्टन मसाकाड्झा, स्टुअर्ट मॅट्सिकेन्येरी, सॉलोमन माईर, तवांदा मुपारिवा, तिनाशी पन्यानगारा, सिकंदर रझा, ब्रेंडन टेलर, प्रॉस्पर उत्सेया, शॉन विल्यम्स झिंबाब्वेने कधी कधी बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. परंतु हा संघ लिंबूटिंबू संघच आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१२) अफगाणिस्तान मोहम्मद नबी*, अफसर झझाई, अफताब आलम, अश्गर स्टानिकझाई, दौलत झद्रान, गुलबदीन नैब, हमिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अश्रफ, नजीबुल्ला झद्रान, नासिर जमाल, नवरोझ मंगल, समीउल्ला शेनवारी, शापूर झद्रान, उस्मान घनी, हशमतुल्ला शैदी, इझातुल्ला दौलतझाई, शफीकुल्ला, शराफुद्दीन अश्रफ अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. मागील वर्षी ट-२० विश्वचषक स्पर्धेत या संघाने बांगलादेश संघाला हरवून धक्का दिला होता. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१३) स्कॉटलँड प्रेस्टन मॉमसेन*, कायल कोएटझर, रिची बेरिंगटन, फ्रेडी कोलमॅन, मॅथ्यू क्रॉस, जॉश डेव्ही, अॅलासडेर इव्हान्स, हॅमिश गार्डिनर, मजिद हक, मायकेल लीस्क, मॅट मॅकन, कॅलम मॅकलीऑड, सफयान शरीफ, रॉब टेलर, ईयान वॉर्डलॉ हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१४) युनायटेड अरब अमिराती मोहम्मद तकीर*, खुर्रम खान, अमजद अली, अमजद जावेद, अॅंड्री बेरेंगर, फहाद अल्हाश्मी, मंजुळा गुरूगे, कामरान शहजाद, कृष्णा चंद्रन, मोहम्मद नवीद, नासिर अझीझ, स्वप्निल पाटील, रोहन मुस्तफा, सकलेन हैदर, शैमन अन्वर हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या संघात ठाण्याचा मराठमोळा स्वप्निल पाटील हा यष्टीरक्षक आहे. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. ________________________________________________________________________________ लिंबूटिंबू संघांकडून फारसे अपसेट्स होतील असे वाटत नाही. विश्वचषक स्पर्धेच्या आजपर्यंतच्या इतिहासात आजतगायत अंदाजे ३२५ हून अधिक सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी फक्त १४ सामन्यात (म्हणजे फक्त ४ टक्के सामन्यात) अनपेक्षित निकाल लागलेला आहे. खालील यादीवरून हे लक्षात येईल. (१) १९७९ - भारत वि. श्रीलंका (श्रीलंका विजयी) (२) १९८३ - ऑस्ट्रेलिया वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी) (३) १९९६ - वेस्ट इंडीज वि. केनया (केनया विजयी) (४) १९९९ - भारत वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी) (५) १९९९ - बांगलादेश वि. पाकिस्तान (बांगलादेश विजयी. हा सामना फिक्स केलेला होता असा दाट संशय आहे.) (६) २००३ - केनया वि. झिंबाब्वे (केनया विजयी) (७) २००३ - केनया वि. श्रीलंका (केनया विजयी) (८) २००७ - भारत वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी) (९) २००७ - पाकिस्तान वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१०) २००७ - द. आफ्रिका वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी) (११) २००७ - झिंबाब्वे वि. आयर्लँड (सामना बरोबरीत) (१२) २००७ - बांगलादेश वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१३) २०११ - इंग्लंड वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१४) २०११ - बांगलादेश वि. इंग्लंड (बांगलादेश विजयी) २००७ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागले होते. आतापर्यंत बांगलादेश, केनया, आयर्लँड व झिंबाब्वे यांनीच सर्वाधिक अपसेट्स केलेले दिसताहेत. एकंदरीत २०१५ मध्ये लिंबूटिंबू संघ एखाददुसरा अपसेट करू शकतील. परंतु त्या निकालाने फार फरक पडेल असे वाटत नाही. ________________________________________________________________________________माझे अंदाज
१९८७ पासून भारताची कामगिरी एकाआड एक स्पर्धेत चांगली होत आहे. भारताने १९८७ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, १९९२ मध्ये भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. भारताने नंतर १९९६ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण १९९९ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. २००३ मध्ये भारत चक्क अंतिम फेरीत पोहोचला, पण २००७ मध्ये भारतावर प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की आली. त्यापाठोपाठ २०११ मध्ये भारत चक्क विजेता बनला. हाच क्रम सुरू राहिला तर भारताला २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची आशा नाही. याच्या बरोबर उलटा क्रम दक्षिण आफ्रिकेचा आहे. दक्षिण आफ्रिकेने १९९२, १९९९ व २००७ च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली, तर १९९६, २००३ व २०११ मध्ये ते उपांत्य फेरीपूर्वीच गारद झाले. या इतिहासावरून असं वाटतंय की २०१५ मध्ये हा संघ नक्की उपांत्य फेरीत पोहोचणार. यातला योगायोगाचा भाग सोडला तरी भारताची गेल्या काही काळातील कामगिरी पाहिली तर या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याची शक्यता धूसर दिसतेय. २०११ च्या तुलनेत भारताचा संघ खूपच दुर्बल वाटतो. २०११ च्या संघातील तब्बल ११ खेळाडू या संघात नाहीत. त्यांच्या जागी जे आले आहेत ते तितके चांगले नाहीत. शिखर धवन, जडेजा, रायडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, अश्विन इ. खेळाडूंच्या कामगिरीबद्दलच शंका आहे. त्यांच्याऐवजी मुरली विजय, रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज सिंग इ. खेळाडू हवे होते. मुरली विजय इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर चांगला खेळल होता. रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज हे स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहेत. अक्षर पटेल, धवन, अश्विन हे तिघेही ऑस्ट्रेलियात संपूर्ण अपयशी ठरले आहेत. रायडूलाही फारसा प्रभाव पाङता आलेला नाही. जडेजा जवळपास साडेतीन महिने दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब होता. तो नंतर एकच सामना खेळला व त्यातही अपयशी ठरला. स्टुअर्ट बिन्नी २ सामने खेळला. त्यातल्या एक सामन्यात त्याने बर्यापैकी फलंदाजी केली व दुसर्या सामन्यात बर्यापैकी गोलंदाजी केली. परंतु त्याच्याऐवजी युवराज सिंग कधीही जास्त योग्य ठरला असता. भारतीय गोलंदाजांबद्दल काहीच बोलण्यासारखं नाही. स्वतः धोनी निवृत्तीच्या मूडमध्ये असल्याने त्याच्या देह्बोलीतून उत्साहाचा पूर्ण अभाव जाणवितो. हे सर्व लक्षात घेता भारत या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणार नाही असे मला वाटते. माझ्या अंदाजानुसार द. आफ्रिका, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका हे चार संघ उपांत्य फेरीत असतील. अंतिम लढत न्यूझीलॅंड व द. आफ्रिकेत होऊन द. आफ्रिका विजेता होईल. न्यूझीलँड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया 'अ' गटात व द. आफ्रिका 'ब' गटात असल्याने उपांत्यपूर्व फेरीतच द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया किंवा द. आफ्रिका वि. न्यूझीलॅंड किंवा द. आफ्रिका वि. श्रीलंका असा सामना होण्याची ७५ टक्के शक्यता आहे. तसे झाले तर उपांत्य फेरीतील संभाव्य ४ संघातील एक संघ उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत होईल व त्यामुळे इंग्लंड, भारत किंवा पाकिस्तानला उपांत्य फेरीत जायची संधी मिळू शकेल. कदाचित त्यामुळे अंतिम फेरीत अंदाजापेक्षा एखादा वेगळाच संघ असेल. ________________________________________________________________________________ विनंती - वरील लेखातील तपशिलात काही चुका असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात.
💬 प्रतिसाद
(361)
ग
गणेशा
गुरुवार, 03/05/2015 - 19:49
नवीन
अपेक्षेप्रमाणे बांग्लादेश जिकले.
अंदाज
भारत वि. वेस्ट इंडीज = भारत ( वेस्ट इंडिज पण चांगला खेळ करेन आणि गेम पालटवु शकतो )
अजिंक्य रहाने सर्वात चांगला खेळेल इंडिया कडुन असे वाटते.
गेल चा ऑल राउंड परफॉर्मन्स आणि टेलर च्या गोलंदाजीने वेस्ट इंडिज ला पण चान्स आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/06/2015 - 12:11
नवीन
India 2 out
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Fri, 03/06/2015 - 16:59
नवीन
शनिवार ते सोमवार च्या मॅचेस :
१. अफ्रिका वि. पाक : अफ्रिका (प्लेअर ओफ मॅच : अमला, मॉर्केल,एबी)
२. झिंब्वावे वि आयर्लंड : आयर्लंड (स्टर्लिंग, मसक्दजा, जॉइसे, चतारा)
३. न्युझीलंड वि अफगान : न्युझीलंड ( विल्यमसन, साउदी, मॅक्युलम)
४. ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका : ऑस्ट्रेलिया ( पुन्हा वार्नर, स्टार्क, स्मिथ)
५ इंग्लंड वि बांग्ला : इंग्लंड ( मोईन अली, फिन , बेल्/रुट)
मी कॉर्टर फायनल मध्ये इंग्लंड आणि आयर्लंड ला पाठवले आहे त्यामुळे तेच जिंकावेत अशी अपेक्षा)
- Log in or register to post comments
स
साधा मुलगा
Fri, 03/06/2015 - 17:09
नवीन
मलाही तीच अपेक्षा आहे, उद्या दोन महत्वाचे सामने आहेत जे पूल b चे चित्र थोड स्पष्ट करतील.
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 03/07/2015 - 09:39
नवीन
पाकिस्तानने हरवलं आफ्रिकेला...!!
घ्या गणितं करायला पुन्हा सगळी....
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 03/07/2015 - 10:08
नवीन
हिशोब तुम्ही करायचा! :)
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 03/07/2015 - 10:07
नवीन
आफ्रिकेने माती खाल्ली.
एबीने थोडा आणखी संयम दाखवला असता तर हिरो झाला असता.
- Log in or register to post comments
स
साधा मुलगा
Sat, 03/07/2015 - 13:01
नवीन
खरे आहे तुम्ही म्हणता ते. आता पुन्हा नव्याने गणिते करा. आता वेस्ट इंडीजची वाट बिकट झाली आहे!
- Log in or register to post comments
त
तिमा
Sat, 03/07/2015 - 13:13
नवीन
सा. अफ्रिकेला एवढी घाई कसली होती ? रन रेट चांगला होता, तर धोनीसारखं शांतपणे खेळून जिंकता आली असती मॅच. ते हरल्यापेक्षा पाकडे जिंकले याचं जास्त दु:ख झालं!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 03/07/2015 - 18:07
नवीन
श्या! आफ्रिकेने दगा दिला. पूर्ण अंदाज चुकला. आता पाकड्यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश बराचसा नक्की झालाय आणि विंडीज व आयर्लंड दोघेही संकटात सापडलेत. पाकडे सुरवातीचे दोन सामने हरल्यावर एकदम बदलले आणि लागोपाठ ३ सामने जिंकलेत. त्यांनी चक्क द. आफ्रिकेला हरवलं.
पाकडे आणि विंडीजचे ५ सामने झालेत आणि आयर्लंडचे ४ झालेत.
उर्वरीत सामने - पाकडे वि. आयर्लँड, भारत वि. आयर्लँड आणि विंडीज वि. यूएई.
निव्वळ धावगती - पाकडे: -०.१९४, विंडीज: -०.५११, आयर्लंड: -०.८२०,
गुण - पाकडे: ६, विंडीजः ४, आयर्लंडः ६
पाकडे पुढील फेरीत येऊ नयेत ही माझी इच्छा आहे. परंतु पाकडे बहुतेक येतील असं दिसतंय. विंडीज यूएई विरूद्धचा सामना नक्की जिंकेल. परंतु त्यांना तो मोठ्या फरकाने जिंकावयास हवा. तरच त्यांचे ६ गुण होऊन निव्वळ धावगती वाढेल.
सामना: भारत वि. आयर्लंड - भारत हरला किंवा जिंकला तरी भारताला फार फरक पडणार नाही. आयर्लँड जिंकल्यास त्यांचे ८ गुण होतील आणि ते उपांत्यपूर्व फेरीत जातील व विंडीजची परिस्थिती अजूनच अवघड होईल.
सामना: विंडीज वि. यूएई- यूएई जिंकल्यास विंडीजची वाट बंद होईल. विंडीजला कोणत्याही परिस्थितीत हा सामना मोठ्या फरकाने जिंकावाच लागेल. सामना जिंकल्यास विंडीजचे ६ गुण होतील.
सामना: पाकडे वि. आयर्लँड - आयर्लंड जिंकल्यास विंडीजची परिस्थिती अत्यंत अवघड होईल. पाकडे जिंकल्यास ते उपांत्यपूर्व फेरीत जातील.
म्हणजे आयर्लंड भारताविरूद्ध जिंकले व पाकड्यांविरूद्ध हरले तर विंडीजच्या शेवटच्या सामन्याला महत्त्व राहणार नाही. समजा आयर्लँड ने दोन्ही सामने जिंकले तर आयर्लंड कदाचित दुसर्या क्रमांकाने उपांत्यपूर्व फेरीत जाईल व विंडीजच्या आणि पाकड्यांच्या आशा यूएई विरूद्धच्या सामन्यावर अवलंबून राहतील. विंडीज यूएई विरूद्ध हरला तर सगळाच गोंधळ संपतो आणि पाकडे व आयर्लंड पुढील फेरीत जातील.
पाकडे: पुढील फेरीसाठी आयर्लंडविरूद्धचा सामना जिंकणे किंवा हरल्यास विंडीज यूएई विरूद्ध हरावे किंवा त्यांची निव्वळ धावगती कमी रहावी यासाठी प्रार्थना करावी लागेल. हा सामना अनिर्णित राहिल्यास किंवा बरोबरीत सुटला तर विंडीज बाहेर जाऊन हे दोघेही आत येतील.
विंडीजः पुढील फेरीसाठी आयर्लंड पाकड्यांविरूद्ध जिंकावे ही प्रार्थना करावी लागेल आणि यूएईविरूद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावाच लागेल.
आयर्लंड: भारत किंवा पाकड्यांविरूद्ध जिंकावे लागेल (यातला एकही सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला तरी चालेल). जर दोन्ही सामने हरले तर विंडीज यूएईविरूद्ध हरावे किंवा त्यांची निव्वळ धावगती आपल्यापेक्षा कमी रहावी अशी प्रार्थना करावी लागेल.
एकंदरीत पाकड्यांची स्थिती पुष्कळ बरी आहे. विंडीज व आयर्लँड मध्येच आता चुरस आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 03/07/2015 - 18:10
नवीन
पुढील सामने -
३१) रविवार ०८ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. अफगाणिस्तान, स्थळ - नेपिअर
न्यूझीलँड सहज जिंकेल.
(३२) रविवार ०८ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, स्थळ - सिडने
ऑस्ट्रेलिया जिंकेल.
(३३) सोमवार ०९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), इंग्लंड वि. बांगलादेश, स्थळ - अॅडलेड
अत्यंत महत्त्वाचा सामना. या सामन्यातला विजेता 'अ' गटातून उपांत्यपूर्व फेरीत जाणारा ४ था संघ असेल. बांगलाला हा सामना बरोबरीत सुटला किंवा अनिर्णित राहिला तरी चालेल. इंग्लंडला मात्र हा सामना जिंकायलाच हवा.
(३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन
भारत जिंकेल.
- Log in or register to post comments
स
साधा मुलगा
Sun, 03/08/2015 - 10:19
नवीन
श्रीलंका चांगली खेळत आहे.
२१ ओवर १३५/१ चांगल्या स्थितीत आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 03/08/2015 - 18:50
नवीन
श्रीलंकेने जबरदस्त झुंज दिली. श्रीलंकेला शेवटच्या १० षटकात १०५ धावा हव्या होत्या व फक्त ४ गडी बाद झाले होते. चंडीमल व मॅथ्यूज तुफान मारत होते. फक्त २४ चेंडूत नाबाद ५२ धावा करणार्या चंडीमलचा अचानक स्नायू दुखावला व त्यामुळे त्याला निवृत्त व्हावे लागले. तो आज जाताच लगेचच मॅथ्यूज व थिसारा परेरा बाद झाल्याने श्रीलंकेची झुंज संपली.
आज श्रीलंका जिंकले असते तर 'अ' गटातून श्रीलंका २ र्या क्रमांकाने व ऑस्ट्रेलिया ३ र्या क्रमांकाने उपांत्यपूर्व फेरीत आले असते. अशा परिस्थितीत उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाची गाठ 'ब' गटातील दुसर्या क्रमांकाच्या आफ्रिकेशी पडून दोघातला एक धारातिर्थी पडला असता. परंतु आता तसे होईल असे दिसत नाही. उपांत्य फेरीत बहुतेक न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका व भारत हे देश असतील. भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला टाळणे खूप अवघड आहे. जर ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला आपापल्या मायभूमीवर उपांत्य फेरीचा सामना खेळायला मिळाला नाही तरच विरूद्ध संघाला थोडी जास्त संधी आहे.
'अ' गटातून उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका नक्की येणार. ४ था संघ इंग्लंड असेल की बांगलादेश याचे उत्तर उद्या मिळेल. बांगलाचे ४ सामन्यात ५ गुण आहेत तर इंग्लंडचे ४ सामन्यात २ गुण आहेत. बांगला आपला शेवटचा न्यूझीलँड बरोबरचा सामना नक्की हरणार व इंग्लंड आपला शेवटचा अफगाणिस्थान बरोबरचा सामना नक्की जिंकतील. त्यामुळे उद्याचा सामना इंग्लंडला जिंकावाच लागेल. बांगलादेशाला उद्याचा सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला तरी चालेल. दोन्ही संघांच्या दृष्टीने उद्याचा सामना 'अ' गटातून उपांत्यपूर्व फेरीत जाणारा ४ था संघ ठरवेल.
- Log in or register to post comments
अ
अविनाश पांढरकर
Mon, 03/09/2015 - 03:39
नवीन
मिसळपाववरील कोणी Espncricinfo Fantansy League खेळत तर एक 'मिसळपाव' ग्रुप तयार करून एकत्र खेळु शकतो.
- Log in or register to post comments
स
साधा मुलगा
Mon, 03/09/2015 - 07:02
नवीन
मी आहे cricinfo वर. वेगळा धागा काढायचा का? password आणि id साठी?
पाच दहा लोक तरी पाहिजेत. दोघात मजा नाही येणार.
- Log in or register to post comments
अ
अविनाश पांढरकर
Mon, 03/09/2015 - 07:52
नवीन
मी create केली आहे, ज्यांना कुणाला आवड असेल त्यांनी जॉईन करा.
league name : misalpav
password : misalpav
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/09/2015 - 09:50
नवीन
बांगलाने २७५ धावा करून बर्यापैकी आव्हान दिले आहे. इंग्लंडची फलंदाजी व बांगलाची गोलंदाजी बघता हे आव्हान इंग्लंडला फारसे अवघड नाही. १४ षटकात १ बाद ६७ धावा करून इंग्लंडने चांगली सुरूवात केली आहे. खराब फटके मारून बळी गमावले नाहीत तर इंग्लंड नक्की जिंकेल असं दिसतंय.
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Mon, 03/09/2015 - 12:44
नवीन
आता फक्त एक करा... भारताच्या बाजूने एकही कौल देऊ नका. :D
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 03/10/2015 - 12:15
नवीन
ते तर लेखाच्या सुरुवातीलाच होऊन गेलेलं आहे....त्यांच्या मते भारत काही सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार नाही..!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 03/10/2015 - 14:27
नवीन
तसा सुरवातीला अंदाज होता कारण भारत 'ब' गटात २ र्या क्रमांकावर असेल असा अंदाज होता आणि त्यामुळे 'अ' गटातील ३ र्या संघाशी (श्रीलंका किंवा इंग्लंड) भारताची गाठ पडेल असे वाटत होते. भारतीय संघाची तिरंगी मालिकेतील निराशाजनक कामगिरी पाहिली तर भारत या दोघांविरूद्ध नक्की हरेल असे दिसत होते.
पण प्रत्यक्षात भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही द. आफ्रिकेला अनपेक्षितपणे हरविले व त्यामुळे 'ब' गटातून भारत १ ल्या क्रमांकावर राहील व त्यामुळे अर्थातच 'अ' गटातील ४ थ्या संघाशी भारत उपांत्यपूर्व फेरी खेळेल. भारताच्या सुदैवाने इंग्लंड किंवा श्रीलंकेऐवजी बांगलादेश गटातून थ्या क्रमांकावर (बहुतेक) असेल. इंग्लंडची अत्यंत खालावलेली कामगिरी आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशाला पावसाच्या कृपेमुळे अत्यंत अनपेक्षितपणे ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिळालेला मोलाचा १ गुण. या १ गुणामुळे बांगला सतत इंग्लंडच्या पुढे राहिले व अंतिमतः त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला.
बांगलाशी उपांत्यपूर्व फेरीचा सामना असल्याने भारत तो सामना नक्कीच जिंकून उपांत्य फेरीत जाणार. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला टाळणे खूपच अवघड दिसते. समजा तसे झाले तर निदान हे दोन्ही संघ आपापल्या मायदेशात न खेळता दुसर्या देशात खेळले तर भारत उपांत्य फेरी जिंकण्याची शक्यता वाढते. या दोघांव्यतिरिक्त द. आफ्रिकेशी किंवा श्रीलंकेशी गाठ पडली तरी अवघड आहे. जर उपांत्य फेरीत पाकडे किंवा विंडीज आले तर मात्र आपण आरामात जिंकू.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 03/09/2015 - 11:34
नवीन
१६३- ६ अजून ११३ धावा हव्यात.
बांग्लादेश ही मॅच जिंकून उप उपांत्य फेरीमधे आले तर आपल्यासाठी फार चांगले होइल
- Log in or register to post comments
अ
असंका
Mon, 03/09/2015 - 12:32
नवीन
इंग्लंड एवढं वाईट खेळतंय तर तेच आले तर जास्त चांगलं....
:-))
- Log in or register to post comments
अ
असंका
Mon, 03/09/2015 - 12:42
नवीन
हरलं इंग्लंड...!!
श्रीगुरुजी...सर्टीफिकेट द्या...खराब फटके मारून इंग्लंड्ने पराभव ओढवून घेतला ना?
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Mon, 03/09/2015 - 12:50
नवीन
भारताची सेमीफायनलमध्ये जायची वाट थोडी सोपी झाली.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/09/2015 - 15:42
नवीन
शी! बांगलासारख्या फालतू संघाकडून इंग्लंड हरले. बांगला उपांत्यपूर्व फेरीत आल्याने भारताची वाट सोपी झाली असली तरी उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला हरविण्यात जी मजा आली असती, तशी मजा बांगलाला हरविण्यात येणार नाही. मोईन अली आणि नंतर जॉर्डन मुर्खासारखे धावबाद झाले. मॉर्गनला आल्याआल्या विकेट फेकायची काहीही गरज नव्हती. आपण बाद झालेल्या चेंडूवर कसे वेड्यासारखे खेळलो हे जेम्स टेलरला अजूनही समजलं नसेल. आज स्टीव्ह फिनला का बाहेर ठेवलं ते समजलं नाही. बोपाराला एकही सामना खेळविला नाही.
विश्वचषक सुरू होण्याच्या तोंडावर कुकची हकालपट्टी करण्याची आणि केव्हिन पीटरसन् ला बाहेर ठेवण्याची किंमत इंग्लंडला मोजावी लागलेली आहे.
१९९२ पर्यंत इंग्लंड विश्वचषकातला बर्यापैकी दादा देश होता. पहिल्या ५ स्पर्धात, ४ वेळा इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल झाले होते. त्यापैकी ३ वेळा त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. १९९६ पासून इंग्लंड कधीही उपांत्य फेरीत पोहोचले नाही. यावेळी तर प्राथमिक फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला आहे.
'अ' गटातून आता न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि बांगलादेश उपांत्यपूर्व फेरीत आले आहेत. 'ब' गटातून उपांत्यपूर्व फेरीत फक्त भारताचा प्रवेश नक्की झाला आहे. पाकडे, द. आफ्रिका, विंडीज आणि आयर्लँड या ४ पैकी ३ देश उपांत्यपूर्व फेरीत येतील. भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना 'अ' गटातील ४ थ्या क्रमांकाच्या संघाशी म्हणजेच बहुतेक बांगला देशाशी होईल. काही अनपेक्षित निकाल लागले तर कदाचित श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलियाशीही गाठ पडू शकते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/09/2015 - 15:49
नवीन
>>>> उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला हरविण्यात जी मजा आली असती, तशी मजा बांगलाला हरविण्यात येणार नाही.
आपल्यालाला इंग्लंड झेपलंच नसतं आणि बांगलाने आपल्याला एका विश्वचषकात पहिल्याफेरीतच घरचा रस्ता दाखवला होता हे विसरलात वाटतं. पण, तरीही बांगलादेश आपल्याला सोपं वाटतंय.
मला उद्या आपण हरावं वाटतंय. म्हणजे पाकडे बाहेर पडतील आणि आपण नंतर झिंब्वावेला पाणी दाखवावं. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/09/2015 - 15:59
नवीन
आपण सध्याच्या इंग्लंडच्या संघाला नक्कीच हरवलं असतं. बांगलाने २००७ मध्ये आपल्याला हरविलं होतं तो एक अपवाद होता. एकदा कधीतरी हरवलं म्हणून कायमच बांगलाला घाबरण्याची गरज नाही. बांगलाला लगेचच २०११ च्या विश्वचषकात आपण मोठ्या फरकाने हरविले होते. त्यानंतर बांगलाने अजून एकदा भारताला हरविले होते (२०१२ च्या आशिया चषक स्पर्धेत). हे दोन प्रसंग वगळता बांगलाला भारताविरूद्ध फारसे काही करता आलेले नाही.
काही महिन्यांपूर्वी भारताचा संघ बांगलाच्या दौर्यावर गेला होता. धोनी संघात नव्हता. ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होती. बांगलाने पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून २७० च्या आसपास धावा केल्यावर भारताने चांगली फलंदाजी करून नंतर पाऊस आल्याने डकवर्थ-लुईस च्या आकडेमोडीनुसार सामना जिंकला. दुसर्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत सर्वबाद १०४ अशी भीषण अवस्था झालेली असताना भारताने बांगलाला ५८ धावात बाद करून ४६ धावांनी सामना जिंकला (स्टुअर्ट बिन्नी ६ बळी आणि मोहीत शर्मा ४ बळी). तिसरा सामना पावसामुळे अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आला.
>>> मला उद्या आपण हरावं वाटतंय. म्हणजे पाकडे बाहेर पडतील आणि आपण नंतर झिंब्वावेला पाणी दाखवावं. :)
उद्या आपण हरलो तरी पाकडे लगेच बाहेर पडणार नाहीत. पाकडे बाहेर पडण्यासाठी त्यांना आयर्लँडने हरवावे लागेल आणि विंडिजने यूएई ला मोठ्या फरकाने हरवावे लागेल. तरच पाकडे घरी जातील.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/09/2015 - 15:47
नवीन
एकूण ४९ सामन्यांपैकी ३३ म्हणजे दोन तृतीयांश सामने संपलेले आहेत. आगामी सामने -
(३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन
भारत जिंकेल. जर आयर्लँड जिंकले किंवा दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला तर आयर्लंडचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान नक्की होईल.
(३५) बुधवार ११ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्कॉटलँड वि. श्रीलंका, स्थळ - होबार्ट
श्रीलंका जिंकेल. चुकून लंकन्स हरले तर त्यांचा 'अ' गटातील २ र्या किंवा ३ र्या स्थानाचा दावा डळमळीत होईल.
(३६) गूरूवार १२ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. यूएई, स्थळ - वेलिंग्टन
द. आफ्रिका जिंकेल. चुकून आफ्रिकन्स हरले तर त्यांचा 'ब' गटातील २ र्या किंवा ३ र्या स्थानाचा दावा डळमळीत होईल.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Tue, 03/10/2015 - 12:52
नवीन
एक शब्द कळाला नाही. पाकडे म्हणजे काय ? वन डे सारखा हा क्रिकेटचा प्रकार आहे की मन्डे, ट्युसडे सारखा एखादा वार आहे ?
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 03/10/2015 - 16:43
नवीन
पाकचे खेळाडु नेहमी वाकडे वागतात, म्हणून गुरुजी त्यांना पाकडे म्हणत असावेत.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Tue, 03/10/2015 - 16:48
नवीन
बरीच वर्षे सामना पेपर वाचला नाही. बाकी काही असो, ह्या शब्दाचे निर्माते बहुतेक सेनाप्रमुखच असावेत असा अंदाज आहे. आणि हो उगाचाच सापाचा आणि नागाचा जोक आठवून गेला. :)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 03/10/2015 - 14:41
नवीन
भारताने आयर्लँडला अगदी सहज हरविले. हा विजय अपेक्षितच होता. आता 'ब' गटात आयर्लॅडची अडचण झाली आहे. आयर्लँड (६ गुण), पाकडे (६ गुण) व विंडीजचा (४ गुण) प्रत्येकी १ सामना शिल्लक आहे. आयर्लँड व पाकडे एकमेकांविरूद्ध खेळणार आहेत त्यामुळे त्यातला १ संघ ६ गुणांवरच थांबेल (अनपेक्षितपणे सामना रद्द झाला किंवा बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांचे ७ गुण होऊन विंडीज घरी जातील), तर विंडीजची दुबळ्या यूएई बरोबर गाठ आहे. विंडीज हा सामना नक्की जिंकून ६ गुण मिळवतील. या सामन्यात विंडीजला १ किंवा ० गुण मिळाले तरी विंडीज घरी जातील.
या दोनपैकी कोणताही सामना रद्द झाला नाही किंवा बरोबरीत सुटला नाही तर विंडीजचे ६ गुण असतील आणि पाकडे व आयर्लंड पैकी एकाचे ६ व दुसर्याचे ८ गुण असतील. ज्या २ संघांचे ६ गुण असतील त्यातल्या निव्वळ धावगती सरस असणारा संघ उपांत्यपूर्व फेरीत जाईल.
सध्या पाकडे (निव्वळ धावगती : -०.१९४), विंडीज (निव्वळ धावगती : -०.५११) आणि आयर्लँड (निव्वळ धावगती : -१.०१४) अशी आहे. पाकड्यांनी केलेल्या धावा व दिलेल्या धावा यात फक्त ४८ धावांचा फरक आहे. विंडीजने केलेल्या धावा व दिलेल्या धावा यात फक्त ४० धावांचा फरक आहे. आयर्लंडने केलेल्या धावा व दिलेल्या धावा यात तब्बल १९३ धावांचा फरक आहे.
समजा आयर्लंड हरले व विंडीज जिंकले तर आयर्लंड व विंडीजचे ६ गुण होतील आणी आयर्लंडची निव्वळ धावगती अजून कमी होईल व विंडीजची निव्वळ धावगती वाढेल, त्यामुळे आयर्लंड घरी जातील.
समजा आयर्लंड जिंकले व विंडीजही जिंकले तर आयर्लंड उपांत्यपूर्व फेरीत जातील व पाकड्यांची निव्वळ धावगती आतापेक्षा कमी होईल. सध्या पाकडे व विंडीज यांच्या निव्वळ धावगतीत फारच थोडा फरक असल्याने विंडीजला ६०-७० धावांचा विजय पुरेसा होईल व पाकडे घरी जातील.
त्यामुळे विंडीज आपला सामना साधारण ६०-७० धावांच्या फरकाने जिंकले तरी ते उपांत्यपूर्व फेरीत नक्की जातील व उपांत्यपूर्व फेरीतला शेवटचा संघ पाकडे व आयर्लंडमधील विजेता असेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/11/2015 - 18:38
नवीन
संगकारा जबरदस्त फॉर्मात आहे. दिलशान आणि मॅथ्यूज सुद्धा फॉर्मात आहेत. आजच्या विजयामुळे श्रीलंकेचे 'अ' गटातील तिसरे स्थान जवळपास नक्की झाले आहे. ऑस्ट्रेलिया व बांगलादेश बहुतेक दुसरा व चौथा क्रमांक घेतील.
आपल्या सुदैवाने उपांत्यपूर्व फेरीत आपली गाठ इतर तीन देशांऐवजी बांगलाशी पडेल (बहुतेक). त्यामुळे उपांत्य फेरीत भारत जाणारच. द. आफ्रिका व श्रीलंका या दोन देशांपैकी १ देश उपांत्यपूर्व फेरीतच गारद होणार. परंतु उपांत्य फेरीत या दोन देशातील १ व त्याबरोबरीने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड असतील. त्यामुळे उपांत्य फेरी जिंकणे अवघड आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 06:59
नवीन
बांगलादेश आज जिंकला तर ३ र्या नंबर वर जाईल आणि आपल्याला श्रीलंकेसोबत उपउपांत्यफेरी खेळावी लागेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/13/2015 - 11:17
नवीन
हुश्श! बांगला हरले. बांगलाने किवीजच्या तोंडाला फेस आणला होता आणि किवीज हरतील की काय या भीतिने भारतियांना फेस आला असावा. आज बांगला जिंकले असते तर 'अ' गटात ते दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकावर गेले असते व श्रीलंका निर्विवादपणे ४ थ्या क्रमांकावर राहिली असती. श्रीलंका संघात सध्या दिलशान, संगक्कारा आणि मॅथ्यूज अत्यंत भरात आहेत. अशा संघाशी उपांत्यपूर्व फेरी अवघड गेली असती.
आता बांगलादेशासारखा तुलनेने सोपा संघ उपांत्यपूर्व फेरीत आपल्याविरूद्ध लढेल. बांगला सध्या जोरदार लढत देताहेत. न डगमगता ठराविक अंतराने प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजांना बाद करून दडपण कायम ठेवण्यात ते यशस्वी होताहेत. आपल्याला त्यांच्याविरूद्धची लढत वाटते तितकी सोपी जाणार नाही. आपण नक्की जिंकणार पण सामना एकतर्फी होणार नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 11:32
नवीन
बांगलाचा मनोबल सध्या जबरदस्त वाढले आहे. भारतीय संघाला पूर्ण ताकदीने खेळावा लागणार आहे. तासी १४० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजे करणारे २ गोलंदाज, २ स्पिनर , २ इन फॉर्म बॅट्समन आणि ऑल राउम्डर यामुळे बांगलाची टीम चांगलीच भरात आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/13/2015 - 11:38
नवीन
बरोबर.
स्पिनर्स फक्त २ नाहीत. बरेच जण फिरकी टाकतात. शकीब, तैजुल, नासिर होसेन हे मुख्य आणि सौम्य सरकार, साबिर, महंमदुल्ला असे अनेक फिरकी गोलंदाज आहेत. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरील झेलही अचूक टिपत आहेत. बांगलाची कामगिरी बरीच सुधारली आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/13/2015 - 11:24
नवीन
उद्याचे सामने -
(३९) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), भारत वि. झिंबाब्वे, स्थळ - ऑकलँड
(४०) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलँड, स्थळ - होबार्ट
भारत किंवा झिंबाब्वेच्या दृष्टीने या सामन्याला काहीच महत्त्व नाही. भारत अगदी सहज जिंकेल. त्याचप्रमाणे स्कॉटलँडच्या दृष्टीने या सामन्याला काहीच महत्त्व नाही. परंतु ऑस्ट्रेलियासाठी सामन्याचा निर्णय फरक पाडू शकतो. ऑस्ट्रेलिया सामना जिंकला तर गटात दुसर्या क्रमांकावर येतील, १ गुण मिळाला तर श्रीलंकेइतकेच गुण होऊन गटातील क्रमांक (२ रा किंवा ३ रा) निव्वळ धावगतीवर ठरेल. आणि सामना हरला तर बांगलादेशाइतके गुण होऊन ३ रा किंवा ४ था क्रमांक निव्वळ धावगतीवर ठरेल.
अर्थात ऑस्ट्रेलिया हा सामना अगदी सहज जिंकेल, त्यामुळे फारशी चिंता नाही.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Sat, 03/14/2015 - 07:56
नवीन
९३/४
मुश्किल दिसतंय
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 03/14/2015 - 09:11
नवीन
धोनी अशा पाठलागांचा हिरो आहे..
पण टेलर लईच भारी खेळला.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 03/14/2015 - 10:24
नवीन
जिंकलो एकदाचे. हरलो असतो तरी स्पर्धेच्या दृष्टीने काही फरक पडला नसता. पण लिंबूटिंबू संघाकडून हरल्यामुळे उगाच नाचक्की झाली असती. ४ बाद ९२ असताना पाल चुकचुकायला लागली होती. परंतु नंतर रैना व धोनी जबरदस्त खेळले. रैना बराच नशीबवान ठरला. बर्याचदा झेल उडाले. एक सोपा झेल सुटला. परंतु शेवटी भारत जिंकलाच.
भारताने लागोपाठ सहाव्या सामन्यात प्रतिपक्षाचे सर्व १० गडी बाद केले. हा एक नवीन विक्रम असावा. धवन, कोहली, रहाणे, रैना, धोनी इ. पैकी १-२ जण अपयशी ठरले तरी आळीपाळीने उरलेले खेळतातच. त्यामुळेच लागोपाठ ६ सामने जिंकता आले. मात्र रोहीत शर्माचं अपयश चिंताजनक आहे. ६ सामन्यात तो ४ सामने अपयशी ठरलाय व उर्वरीत २ सामन्यात लिंबूटिंबू संघासमोर अर्धशतके केलीत. पण त्याला पर्याय आहे कोठे? रायडू, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर आणि अक्षर पटेल हे चारच खेळाडू राखीव आहेत. रोहीत शर्माच्या जागी त्यातला फार तर रायडू आत येऊ शकतो. परंतु धोनी पुढील सामन्याकरीता संघात बदल करेल असे वाटत नाही. हाच संघ उर्वरीत सामने खेळेल हे नक्की.
चला. आता पुढचा निर्णायक सामना गुरूवारी १९ मार्चला सकाळी ९ वाजता बांगला विरूद्ध मेलबोर्नमध्ये.
उद्याचे २ सामने महत्त्वाचे आहेत.
(४१) रविवार १५ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), यूएई वि. वेस्ट इंडीज, स्थळ - नेपिअर
(४२) रविवार १५ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. पाकिस्तान, स्थळ - ओव्हल
वेस्ट इंडिज, पाकिस्तान व आयर्लँड या तीन संघांपैकी नक्की कोणते २ संघ व कोणत्या क्रमांकाने उपांत्यपूर्व फेरीत येतील ते उद्या ठरेल.
या दोन सामन्यांपैकी कोणताही एक सामना बरोबरीत सुटला, रद्द झाला किंवा अनिर्णित राहिला तर वेस्ट इंडीजची वाट बंद होऊन आयर्लँड व पाकिस्तान बाद फेरीत जातील.
वेस्ट इंडीज यूएईला अगदी सहज हरवेल असा अंदाज आहे. ते जितक्या मोठ्या फरकाने विजय मिळवितील, तितकी जास्त संधी त्यांना गटात तिसरा क्रमांक मिळविण्यासाठी मिळेल.
आयर्लंड पाकड्यांविरूद्ध जिंकावे अशी इच्छा आहे. परंतु पाकडे थोड्या फरकाने जिंकतील असं वाटतंय.
सध्या तरी पाकिस्तान व वेस्ट इंडीज बाद फेरीत येतील असं वाटतंय. आयर्लंडला बाद फेरीत येण्यासाठी पाकड्यांवर साधा विजय मिळविला तरी चालेल. पाकड्यांची निव्वळ धावगती इतर दोघांपेक्षा सरस असल्याने ते सामना हरूनसुद्धा बाद फेरीत येण्याची बरीच शक्यता आहे. आयर्लंडने पाकड्यांवर मोठा विजय मिळविला व विंडीजने यूएईला मोठ्या फरकाने हरविले तर मात्र पाकडे बाहेर जातील.
- Log in or register to post comments
त
तिमा
Sat, 03/14/2015 - 12:52
नवीन
आजचा झिंबाब्वे वरचा विजय तसा निर्भेळ वाटला नाही. रैनाच्या सुटलेल्या झेलाने सामना फिरला. टेलरचे कौतुक करावे तेवढे थोडेच. बिचार्याला सोडतानाही पराभव पत्करावा लागला.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 03/14/2015 - 18:19
नवीन
वेस्ट इंडीजसाठी वाईट बातमी -
उद्याच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय यायची शक्यता आहे.
There should be plenty of runs on offer from the surface but mitigating circumstances overhead could make it difficult. A cloudy day is forecast as tropical Cyclone Pam makes its way towards New Zealand. The major rains should only arrive on Monday but some showers are forecast for game day as well.
पावसाने किंवा इतर कोणत्याही कारणाने सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला तर विंडीजला एकूण ५ गुण मिळून विंडीज गटात ५ व्या क्रमांकावर राहिल्याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार नाही.
निव्वळ धावगती व गुण : पाकिस्तान = -०.१९४, ६ गुण, वेस्ट इंडीज = -०.५११, ४ गुण, आयर्लंड = -१.०१४, ६ गुण
______________________________________________________________________________
पाकिस्तानची निव्वळ धावगती इतरांच्या तुलनेत चांगली असल्याने आयर्लंडबरोबर हरले तरी त्यांना बरीच संधी आहे. समजा विंडीजने यूएई विरूद्ध ३०० धावा करून ५० धावांनी विजय मिळविला आणि पाकड्यांविरूद्ध आयर्लंडने ३०० धावा केल्या तर पाकड्यांना विंडीजच्यापेक्षा जास्त निव्वळ धावगती राखण्यासाठी किमान २७४ धावा कराव्या लागतील.
समजा विंडीजने यूएईविरूद्ध २५१ धावांचे लक्ष्य ४० षटकांत पूर्ण केले आणि पाकड्यांनी आयर्लंडसमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले तर आयर्लंडला ते लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानने आयर्लंडला किमान ४६ षटके तरी खेळवायला हवे.
समजा विंडीजने यूएईवर किमान ७५ धावांनी विजय मिळविला किंवा यूएईने ठेवलेले लक्ष्य किमान ८१ चेंडू राखून पार केले तर मात्र पाकड्यांना आयर्लंडला हरवावेच लागेल किंवा किमान १ गुण मिळवावाच लागेल.
______________________________________________________________________________
विंडीजने यूएईला हरविले तर कोणत्याही परिस्थितीत आयर्लंडला पाकिस्तानला हरवावेच लागेल. अन्यथा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार नाही.
______________________________________________________________________________
एकंदरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची सर्वात कमी शक्यता आयर्लंडची आहे व सर्वात जास्त शक्यता पाकड्यांची आहे. परंतु उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारे हे दोन्ही संघ तिसर्या/चौथ्या क्रमांकावर असल्याने त्यांची पुढील फेरीत ऑस्ट्रेलिया/न्यूझीलँड या तगड्या संघांशी पडेल व ते सामने यांना फारच भारी जातील.
असो. बघूया उद्या काय होतंय ते. आयर्लंडने पाकड्यांना हरवावे व विंडीजने यूएईवर मोठा विजय मिळवून पाकड्यांना घरी पाठवावे अशी मनोमन इच्छा आहे. विंडीज यूएईला नक्की हरवेल, परंतु पाकडे आयर्लंडवर निसटता विजय मिळवतील असा अंदाज आहे.
- Log in or register to post comments
ल
लॉर्ड फॉकलन्ड
Sun, 03/15/2015 - 10:23
नवीन
इन्डिया वर्ल्डकप जिन्कणार.
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Sun, 03/15/2015 - 14:11
नवीन
पहिली उपांत्यपूर्व लढतः साऊथ आफ्रिका-श्रीलंका, मार्च १८, Sydney Cricket Ground
दुसरी उपांत्यपूर्व लढतः भारत - बांगला देश, मार्च १९, Melbourne Cricket Ground
तिसरी उपांत्यपूर्व लढतः ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान, मार्च २०, Adelaide Oval
चौथी उपांत्यपूर्व लढतः न्यूझीलंड - वेस्ट इंडिज, मार्च २१, Westpac Stadium, Wellington
शुक्रवारी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाशी जीव तोडून खेळेल, (दिवस शुक्रवारचा आहे हे बाजूला ठेवलं तरी) पाकिस्तानची कामगिरी गेले काही सामने उंचावत चालली आहे हे लक्षात घेता हा सामना चुरशीचाच होईल असं वाटतं.
बांगला देशाला भारताने गुरूवारी हरवलं तर उपांत्य फेरीत शुक्रवारच्या सामन्यातील विजेत्याशी २६ मार्चला Sydney Cricket Ground वर भारत खेळेल. तिथे जगलो-वाचलो तर मार्च २९ला Melbourne Cricket Ground ला फायनल!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 03/15/2015 - 16:22
नवीन
>>> शुक्रवारी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाशी जीव तोडून खेळेल, (दिवस शुक्रवारचा आहे हे बाजूला ठेवलं तरी) पाकिस्तानची कामगिरी गेले काही सामने उंचावत चालली आहे हे लक्षात घेता हा सामना चुरशीचाच होईल असं वाटतं.
पाकडे १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत जसे खेळले तसेच या स्पर्धेत खेळत आहेत अशी शंका यायला लागली आहे. १९९२ मध्ये प्रत्येक संघाला प्राथमिक फेरीत ८ सामने खेळायचे होते. पहिल्या ५ सामन्यानंतर पाकड्यांच्या खात्यात फक्त १ गुण जमा होता (इंग्लंडविरूद्ध सर्वबाद ८३ धावा होऊनसुद्धा पावसामुळे पुढे खेळ न झाल्याने पाकड्यांना १ गुणाचा बोनस मिळाला होता.). नंतर उर्वरीत तीनही सामने जिंकून धावगतीच्या जोरावर पाकडे उपांत्य फेरीत पोहोचले आणि नंतर अंतिम फेरी जिंकून विश्वचषक जिंकला.
योगायोगाने ही स्पर्धाही ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मध्ये आहे. या स्पर्धेतही प्राथमिक फेरीतील पहिल्या ६ सामन्यांपैकी पहिले २ सामने पाकडे हरले होते. परंतु उर्वरीत चारही सामने जिंकून पाकडे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. अर्थात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियन भूमीत हरविणे ही पाकड्यांच्या दृष्टीने अत्यंत अवघड गोष्ट आहे. तो सामना बहुतेक पाकडे हरतीलच.
>>> बांगला देशाला भारताने गुरूवारी हरवलं तर उपांत्य फेरीत शुक्रवारच्या सामन्यातील विजेत्याशी २६ मार्चला Sydney Cricket Ground वर भारत खेळेल. तिथे जगलो-वाचलो तर मार्च २९ला Melbourne Cricket Ground ला फायनल!
बांगलाला भारत नक्कीच हरवेल. परंतु उपांत्य फेरीत बहुतेक ऑस्ट्रेलियाशी गाठ पडेल. तो सामना जिंकणे भारताला खूप अवघड आहे.
उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांच्या निकालांचे अंदाज -
पहिली उपांत्यपूर्व लढतः साऊथ आफ्रिका-श्रीलंका, मार्च १८, Sydney Cricket Ground
चुरशीची लढत होईल. या स्पर्धेत द. आफ्रिका २ सामने हरलेले आहेत व दोन्ही पराभव धावांचा पाठलाग करताना आशियायी संघाकडून झाले आहेत. आता पुन्हा एकदा आशियायी संघाशी लढत आहे. आफ्रिकन्स धावांचा पाठलाग करताना दडपणाखाली गडबडतात. त्यामुळे आफ्रिकन्सना जिंकायचे असेल तर प्रथम फलंदाजी करावी लागेल. या सामन्यात जो संघ प्रथम फलंदाजी करेल तो जिंकेल.
दुसरी उपांत्यपूर्व लढतः भारत - बांगला देश, मार्च १९, Melbourne Cricket Ground
भारत जिंकणार
तिसरी उपांत्यपूर्व लढतः ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान, मार्च २०, Adelaide Oval
ऑस्ट्रेलिया जिंकणार
चौथी उपांत्यपूर्व लढतः न्यूझीलंड - वेस्ट इंडिज, मार्च २१, Westpac Stadium, Wellington
न्यूझीलँड सहज जिंकेल.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Tue, 03/17/2015 - 15:54
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 03/17/2015 - 10:31
नवीन
चला संपत आलं धाग्याचं आयुष्य.....अजून बारा दिवस फक्त.
त्यात भारत आधीच बाहेर पडला धाग्याकर्त्याच्या अंदाजानुसार तर आणखीन आधी संपेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 03/17/2015 - 15:49
नवीन
भारत बाहेर पडो वा आत राहो, अंतिम सामना संपेपर्यंत धागा चालेल.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 03/17/2015 - 12:19
नवीन
उद्या दक्षिण आफ्रिका परत चोक होइल का?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »