Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिल्ली विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

क
क्लिंटन
Mon, 02/09/2015 - 14:11
🗣 163 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन. तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी. धन्यवाद क्लिंटन

प्रतिक्रिया द्या
37758 वाचन

💬 प्रतिसाद (163)
श
श्रीगुरुजी Mon, 02/09/2015 - 16:41 नवीन
प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल यांच्या तुलनेसाठी खालील अंदाज देत आहे. मतदानोत्तर चाचणीचे विविध वाहिन्यांचे अंदाज (१) इंडिया टीव्ही - सी-व्होटर आआपः ३१-३९, भाजपः २७-३५, काँग्रेसः २-४ (२) इंडिया टुडे - सिसेरो आआपः ३५-४३, भाजपः २७-३५, काँग्रेसः ३-५ (यात आआप व भाजपच्या सरासरी जागांची बेरीज ७० आहे. काँग्रेसला ३-५ जागा कशा मिळणार?) (३) एबीपी-नेल्सन आआपः ३९, भाजपः २८, काँग्रेस: ३ (४) टुडेज चाणक्य आआपः ४२-५४ (४०-४६% मते), भाजपः १६-२८ (३४-४०% मते), काँग्रेसः ०-२ (१०-१६% मते) (५) न्यूज नेशन आआपः ३९-४३, भाजपः २५-२९, काँग्रेसः १-३ (६) इंडिया न्यूज - अ‍ॅक्सिस आआपः ४६-६०, भाजपः १०-२४, काँग्रेसः ०-२ (७) डाटा माईनिरो आआपः ३१, भाजपः ३५, काँग्रेसः ४
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 02/09/2015 - 19:44 नवीन
Delhi Assembly Elections 2015 - Exit Polls | Create infographics
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 11:02 नवीन
यातला फक्त इंडिया न्यूज-अ‍ॅक्सिस चा अंदाजच प्रत्यक्ष निकालांच्या किंचितसा जवळ आहे. बाकीचे अंदाज मोठ्या फरकाने चुकलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव Mon, 02/09/2015 - 17:47 नवीन
भाजप (४५% शक्यता) किंवा आप (५५% शक्यता) ३६ ते ३७ जागा मिळवुन सरकार बनवणार.
  • Log in or register to post comments
स
सांगलीचा भडंग Mon, 02/09/2015 - 22:30 नवीन
अमित शहा साहेबांनी काय तर ' परचा कार्यकर्ता' प्रयोग केला होता असे एका न्यूज चानेल वर दाखवत होते . म्हणजे प्रत्तेक कार्यकर्ता ला ४०-५० घरे दिली होती आणि ती त्या कार्यकर्ता ची जबादारी कि त्या सगळ्यांनी वोट केलेच पाहिजे . शेवटच्या ४-५ तासात या ' परचा कार्यकर्ता' नि बरेच कष्ट केले , त्याचा फायदा भाजपा मिळणार अशी बातमी होती. अमित शहा नि हा प्रयोग गुजरात मध्ये पण केला होता आधी
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Mon, 02/09/2015 - 22:44 नवीन
घोडा मैदान जवळ आहे देखेंगे क्या क्या होता है ?
  • Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४ Tue, 02/10/2015 - 01:33 नवीन
किती वेळ उरलारे?
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 03:27 नवीन
मतमोजणी सुरू होत आहे.पहिले कल दहा-पंधरा मिनिटात येतील.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/10/2015 - 03:38 नवीन
BJP+ 1 +1 0 AAP 0 -1 0 Cong 0 0 0 Others 0 0 0 Awaited 69
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 03:37 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: १ आआप: ० भाजप: १ कॉंग्रेस: ० भाजपचे विजेन्द्र गुप्ता रोहिणी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. २०१३ मध्ये आआपने रोहिणीची जागा जिंकली होती. बहुदा पहिल्यांदा पोस्टल मते मोजली जात आहेत.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 03:46 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ४ आआप:४२ भाजप: २ कॉंग्रेस: ० भाजपचे विजेन्द्र गुप्ता रोहिणी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. २०१३ मध्ये आआपने रोहिणीची जागा जिंकली होती. मंगोलपुरीमध्ये आआप आघाडीवर आहे. या दोन्ही जागा २०१३ मध्ये आआपने जिंकल्या होत्या. जनकपुरीमधून भाजपचे जगदीश मुखी आघाडीवर आहेत.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 03:47 नवीन
मालवीय नगर मधून आआपचे सोमनाथ भारती आघाडीवर.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 03:49 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ७ आआप: ३ भाजप: ३ कॉंग्रेस: १ कॉंग्रेसचे ए.के.वालिया लक्ष्मीनगरमधून आघाडीवर.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/10/2015 - 03:50 नवीन
काँग्रेसचे एका ठिकाणी तरी आघाडीवर!
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 03:50 नवीन
किरण बेदी (भाजप) कृष्णनगरमधून आघाडीवर.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 03:54 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: १६ आआप: ७ (-३) भाजप: ६ (+१) कॉंग्रेस: २ (+१) बसपा: १ (+१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 03:57 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: २० आआप: १० (-२) भाजप: ७ (०) कॉंग्रेस: २ (+१) बसपा: १ (+१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. या क्षणी एकदम चुरशीची लढत चालू आहे. आआपचा स्वीप नक्कीच वाटत नाही. मागच्या वेळी जिंकलेल्या दोन जागांवर आआप पिछाडीवर आहे.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 04:03 नवीन
:: कल :: आप २६ बीजेपी १५ कॉंग्रेस १ Total TV News (दिल्लीचे लोकल न्युज चॅनल)
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:06 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: २२ आआप: १० (-२) भाजप: ९ (+१) कॉंग्रेस: २ (+१) बसपा: १ (+१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आआपचे राखी बिडलान,सोमनाथ भारती,मनीष सिसोदिया आघाडीवर.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:11 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: २६ आआप: १४ (+१) भाजप: ८ (-२) कॉंग्रेस: ३ (+१) बसपा: १ (+१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आतापर्यंतचे चित्र-- १. आआपने आघाडी घेतली आहे. २. कॉंग्रेसची कामगिरी इतकी वाईट नाही.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:13 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: २९ आआप: १६ (+३) भाजप: ९ (-४) कॉंग्रेस: ३ (+१) बसपा: १ (+१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आतापर्यंतचे चित्र-- १. आआपने आता चांगलीच आघाडी घेतली आहे. हे कल चालू राहिले तर आआपला बहुमत मिळायला हरकत नसावी. २. कॉंग्रेसची कामगिरी इतकी वाईट नाही.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/10/2015 - 04:19 नवीन
काँग्रेसची प्रत्येक जागा आप साठीच्या जागा कमी करत आहे का भाजपाच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:28 नवीन
काँग्रेस नक्की कोणाच्या जागा घेत आहे हे बघायला हवे.त्यातील एक जागा मातिया महाल आहे. तिथून शोएब इक्बाल आघाडीवर आहेत.कोणत्याही पक्षात असले तरी शोएब इक्बाल जिंकतातच. मागच्या वेळी ते जनता दल (यु) च्या तिकिटावर निवडून आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:19 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ३६ आआप: २१ (+५) भाजप: ११ (-५) कॉंग्रेस: ५ (+१) इतर: ० (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आतापर्यंतचे चित्र-- १. आआपने आता चांगलीच आघाडी घेतली आहे. हेच कल चालू राहिले तर अरविंद केजरीवालांना पुढचे मुख्यमंत्री व्हायला हरकत नसावी. २. भाजपची कामगिरी निराशाजनक. ३. कॉंग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा बरीच चांगली.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/10/2015 - 04:26 नवीन
आपने इव्हीएम्स ना रिप्रोग्रॅम केलेले दिसतेय! ;) :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:25 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ४५ आआप: २९ (+८) भाजप: ११ (-८) कॉंग्रेस: ५ (+१) इतर: ० (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आतापर्यंतचे चित्र-- १. आआप ६०% पेक्षा जास्त जागांवर पुढे आहे. बहुमतापासून १० जागा लांब. २. भाजपची कामगिरी निराशाजनक. २०१३ मधील कामगिरीच्या ६०% च जागा पक्ष राखत आहे. पक्षांतर्गत भांडणांचा फटका पक्षाला बसत आहे असे दिसते. ३. कॉंग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा बरीच चांगली.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 04:28 नवीन
सगळ्यात ’ट्रस्टेड’ (पण सगळ्यात स्लो) इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर चार कल आले आहेत आत्तापर्यंत. Image removed.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:31 नवीन
भाजपला जोरदार झटका बसलेला दिसत आहे.जुनी विधानसभा बरखास्त करायला उशीर लावल्याची किंमत पक्ष नक्कीच भोगत आहे.हेच कल चालू राहिले तर भाजपला २० च्या आसपास जागा मिळतील.लोकसभेत पक्ष ६० जागांवर आघाडीवर होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे गणित वेगळे असले तरी ६० पासून २० म्हणजे जोरदार आपटी पक्षाने खाल्लेली दिसत आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Tue, 02/10/2015 - 04:33 नवीन
बरखास्त करायला उशीर करणे आणि किरन बेदी ह्यांना पुढे करणे दोन्ही कारणांचा फटका बसला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
स्वामी संकेतानंद Tue, 02/10/2015 - 04:32 नवीन
अजूनही बरंच काही घडू शकते. उलटफेर होऊ शकते. पण हा शेर आठवला. सामने तन के जिस दिन खडी हो गई एक पर्वत से राई बडी हो गई -- किशन तिवारी
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 04:35 नवीन
सध्याचे कल AAP 31 BJP 17 Congress 2 Total TV
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 04:36 नवीन
किरण बेदी मागे पडल्या.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:36 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ५० आआप: ३५ (+१३) भाजप: ११ (-११) कॉंग्रेस: ४ (-१) इतर: ० (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आतापर्यंतचे चित्र-- १. आआप बहुमताच्या सीमेवर. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री नक्कीच होणार.पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळणार असे दिसते. २. भाजपला प्रचंड मोठा झटका. कामगिरी निराशाजनक. भाजप वीसपेक्षा आत आटपणार असे दिसते. आम आदमी पक्षाचे अभिनंदन आणि अरविंद केजरीवालांना शुभेच्छा. यावेळी आक्रस्ताळेपणा न करता कारभार करावा ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/10/2015 - 04:39 नवीन
किरण बेदी पिछाडीवर?
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 04:45 नवीन
भाजप 09 आप 38 कॉंग्रेस 02 ABP News
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:45 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ५६ आआप: ४२ (+१७) भाजप: ११ (-१३) कॉंग्रेस: ३ (-३) इतर: ० (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. आम आदमी पक्षाने ३५ चा आकडा पार केला आहे.भाजपने आता मागच्या वेळी जिंकलेल्या अर्ध्यापेक्षाही कमी जागांवर आघाडी आहे. किरण बेदी आणि अजय माकन हे दोघेही पिछाडीवर आहेत. तर अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत. कृष्णानगर हा भाजपचा अगदी सर्वात सुरक्षित मतदारसंघ होता.१९९८ मध्येही भाजपने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघातून भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच मागे असणे म्हणजे अमेठीतून राजीव गांधी पिछाडीवर असल्यासारखे झाले.भाजपची कामगिरी १९९८ पेक्षा इतकी झाली तरी खूप झाले.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 02/10/2015 - 04:45 नवीन
:) केजरीवालांवर खुन्नस खाऊन त्यांना त्रास देण्यापेक्षा केंद्राने, विशेषतः मोदिंनी, केजरीसाहेबांना उत्तम सहकार्य करावं अशी भाबडी इच्छा आहे... चान्सेस कमि आहेत पण :(
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/10/2015 - 04:46 नवीन
टाइम्स नाउ वर भाजपा एक आकडी तर आआप ३० वर आघाडी आहे!!!! याचे पाप मोदींच्या माथी मारता येऊ नये म्हणून बेदींना मध्ये घातल्याची चाल त्या अर्थाचे कदाचित मोदींसाठी फेससेव्हर ठरली तरी पक्षासाठी इतके खासदार, स्वतः मोदी मैदानात प्रचाराला उतरूनही झालेला हा पराभव भयंकर नामुष्कीचा आहे! गुजरात विधानसभेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मोदीं विरूद्ध राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष (राहुल, सोनिया, पंतप्रधान वगैरे)प्रचंड प्रमाणात प्रचारात उतरले असूनही एकटे मोदी हिरो म्हणून राजकीय प्रतलावर उभारले गेले. दिल्लीत त्याचीच पुनरावृत्ती होतेय फक्त भाजपा आता दुसर्‍या बाजूला आहे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:48 नवीन
भाजपला ११ जागी आघाडी दिसत आहे त्यापैकी एक जागेवर (राजौरी गार्डन) शिरोमणी अकाली दल आघाडीवर आहे. म्हणजे खुद्द भाजपला १० जागांवरच आघाडी आहे. भाजप १९९८ पेक्षाही मागे पडणार म्हणजे भाजपचा धुव्वा उडाला असे म्हणायला हवे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:54 नवीन
मी राजकारण फॉलो करायला सुरवात केली तेव्हापासून (१९८९) मी दिल्ली हा भाजपचा हक्काचा बालेकिल्ला आहे असे समजतच मोठा झालो होतो.१९८९ मध्ये ७ पैकी ४, १९९१ आणि १९९६ मध्ये ७ पैकी ५, १९९८ मध्ये ७ पैकी ६ आणि १९९३ मध्ये विधानसभेत ७० पैकी ४९ जागा अशी पक्षाची कामगिरी होती.नंतर कळले की १९६७ मध्येही जनसंघाने दिल्लीत ७ पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी नवी दिल्लीतून निवडून गेले होते.या पार्श्वभूमीवर १९९८ च्या विधानसभा निवडणुका म्हणजे भाजपबरोबरच माझ्या या विश्वासालाही बसलेला मोठा धक्का होता. १९९९ मध्ये भाजपने दिल्लीतील ७ पैकी ७ जागा जिंकल्या तेव्हा वाटले की १९९८ च्या विधानसभा निवडणुका म्हणजे एक अपवाद होता.पण नंतरच्या काळात मात्र माझ्या त्या कल्पनेला पूर्ण तडा गेला.तेच अजूनही चालू आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/10/2015 - 04:55 नवीन
आआपला ५०% हून अधिक मते आहेत असे म्हटले जातेय तसे असेल तर तिरंगी लढतीत अशी मते मिळणे ऐतिहासिक आहे एकूणच भाजपाच्या एकट्या केजरीवालांना टारगेट करणार्‍या पर्सनल, भडक नी आक्रस्ताळ्या भाजपीयांच्या सोशल मिडीयावरील (प्रसंगी बिलो द बेल्ट) प्रचाराला दिल्लीकरांनी धूप घातलेली दिसत नाही
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/10/2015 - 05:03 नवीन
तसे असेल तर तिरंगी लढतीत अशी मते मिळणे ऐतिहासिक आहे तिरंगी कसली? काँग्रेस गेल्या विधानसभेपासूनच लांब गेली आहे. तरी देखील ५०% हून अधिक मते मिळणे नक्कीच स्पृहणीय आहे. पण तिरंगी म्हणवत नाही. एकूणच भाजपाच्या एकट्या केजरीवालांना टारगेट करणार्‍या पर्सनल, भडक नी आक्रस्ताळ्या भाजपीयांच्या सोशल मिडीयावरील (प्रसंगी बिलो द बेल्ट) प्रचाराला दिल्लीकरांनी धूप घातलेली दिसत नाही सहमत. यात अजून असे देखील म्हणेन की किरण बेदींना घेण्याचा मास्टरस्ट्रोक ठरला नाही... मागच्या वेळेस हर्ष वर्धन यांची उमेदवारी ठरवण्यात वेळ लावला आता बाहेरून आयात केलेले नेतृत्व आणण्याची चूक दोन्हीचा परीणाम तोच. मेक इन भाजपा पेक्षा आयातीचा दुष्परीणाम अधिक झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 04:57 नवीन
जो काम करेल, लोक त्याला वोट करतील. दिल्लीने हे दाखवून दिले आहे. असभ्य, अभद्र आणि सांप्रदायिक प्रचार करणार्‍यांना जनतेने धडा शिकवला आहे असंच दिसतंय कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली, त्यांना सलाम - संजय सिंह, आप अजय माकन यांनी राजिनामा दिला. - बातमी
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 04:57 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ६५ आआप: ४९ (+२२) भाजप: १३ (-१६) कॉंग्रेस: २ (-५) इतर: १ (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/10/2015 - 05:02 नवीन
योगेंद्र यादव यांचा अंदाज बरोबर येणार की काय? भारतीय मतदाराला व्यक्तिगत व वैयक्तिक टिका एका मर्यादेपलिकडे आवडत नाही हे २००४ ला काही प्रमाणात सोनियांनी पुन्हा समोर आणलेले सत्य दिल्लीत अधिक प्रकर्षाने जाणवतेय असे म्हणावे काय? भाजपा २००४ पासून फारसा शिकला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 05:11 नवीन
याचाच व्यत्यास म्हणजे ज्याप्रमाणे मागच्या लोकसभा निवडणुकी पूर्वी ज्याप्रमाणे सोशल मिडिया वर मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध अतिशय किळस येईल अशी बदनामी मोहीम राबवण्यात आली तशीच मोहीम यावेळेस अमित शह आणि मोदी यांच्याविरुद्ध चालवण्यात आली . दोघांची अक्षरशः लक्तर काढली गेली . सोशल मिडिया च हत्यार भाजप वरच उलटल . भाजप न जे पेरल ते उगवलं अस म्हणता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 05:01 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ६७ आआप: ५२ (+२३) भाजप: १३ (-१७) कॉंग्रेस: १ (-५) इतर: १ (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक. सुरवातीला अमित शहांनी दिल्लीसाठी ’मिशन ६०’ लॉंच केले होते.बहुदा आआपने ते मिशन बरेच सिरियसली घेतले असे म्हणायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 05:05 नवीन
सरकारी कर्मचारी मतदार मोठ्या संख्येने आहेत असे ३ ते ४ मतदारसंघ आहेत तिथे भाजप पिछाडिवर आहे वेळेवर कचेरीत जाणे , उशिरापर्यंत थांबावे लागणे या कारणांनी त्यांचा मोदी सरकारवर रोष होता म्हणे ,.. आता हसावे कि रडावे
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 02/10/2015 - 05:06 नवीन
संघकार्यकर्त्यांनी कमावले साध्वी-महाराजांनी गमावले. मफ्लरने कमावले महागड्या कोटाने गमावले. संघकामाने कमावले बूथ-बंदोबस्ताने गमावले. रास्वसंने कमावले विहिंपने गमावले. इ.इ.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 05:09 नवीन
एकूण जागा: ७० कल उपलब्ध: ६८ आआप: ५४ (+२७) भाजप: १२ (-१८) कॉंग्रेस: १ (-७) इतर: १ (-१) कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा